स्पर्धा

नि३'s picture
नि३ in काथ्याकूट
19 Dec 2009 - 8:26 pm
गाभा: 

आमच्या ऑफीस मधे ख्रिसमस निमीत्त रोज काही ना काही स्पर्धा होत असते. तर आज एक अशी स्पर्धा होती कि ,तुम्हाला दोन ओळी दिल्या जाईल त्यावरुन तुम्हाला कविता लिहायची आहे.बक्षीस अर्थातच जी कवीता जास्त मिनींगफुल असेल त्याला मिळणारच....

तर सुरवात आहे ,

मनात होते बरेच काही,
मनात सारे राहुन गेले,
----------
-

मिपाकरहो ,क्रुपया आपण यात मला मदत कराल अशी अपेक्षा करतो आणी माझे दोन शब्द संपवीतो.

जय हिंद , जय महाराष्ट्र.

नि३.

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

19 Dec 2009 - 8:47 pm | मदनबाण

मनात होते बरेच काही,
मनात सारे राहुन गेले,
सांगायचे होते बरेच काही
न-सांगताही समजुन गेले...
;)

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

शक्तिमान's picture

19 Dec 2009 - 8:49 pm | शक्तिमान

मस्त रे मदनबाणा!

टारझन's picture

22 Dec 2009 - 12:57 am | टारझन

लेका .. तु शरदिनी दिदींचा सल्ला का घेत नाहीस ?

मनात होते बरेच काही,
मनात सारे राहुन गेले,
पावसाला पाहुन भिजलात का ?
हे राज्य व्हावे यह तो श्रींची इच्छा !

असो .. चालून द्या !
- आर्यमान

प्रकाश घाटपांडे's picture

20 Dec 2009 - 10:49 am | प्रकाश घाटपांडे

मस्त रे मदनबाना!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Dec 2009 - 12:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

.

jaypal's picture

19 Dec 2009 - 9:23 pm | jaypal

काय आहे? कधी देणार? कुठे देणार? ते मिपाकराला मिळणार का?
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

सुधारक's picture

19 Dec 2009 - 9:17 pm | सुधारक

मनात होते बरेच काही,
मनात सारे राहुन गेले,
डोळ्यात पण पाहून माझ्या
कळ्ले तुला हे मला समजले.

प्राजु's picture

19 Dec 2009 - 9:20 pm | प्राजु

मनांत होते बरेच काही
मनांत सारे राहुन गेले
काय बोलु, किती बोलु
शब्द पाठ फिरवुन गेले..

- प्राजक्ता
http://www.praaju.com/

शैलेन्द्र's picture

19 Dec 2009 - 10:30 pm | शैलेन्द्र

मनात होते बरेच काही,
मनात सारे राहुन गेले,
थंड पाषाणा बीलगुन कैसे,
निळसर जल ते जीरुन मेले,

मी-सौरभ's picture

20 Dec 2009 - 12:06 am | मी-सौरभ

मनात होते बरेच काही,
मनात सारे राहुन गे
ते आले सरसावुन बाही
अन तुला घेउनी गेले

-----
सौरभ :)

-----
सौरभ :)

शाहरुख's picture

20 Dec 2009 - 12:09 am | शाहरुख

मनात होते बरेच काही,
मनात सारे राहुन गेले,
परंतु आता स्पर्धेच्या या वेळी
मिपाकरा, जुळवून दे मज चारोळी

अडाणि's picture

20 Dec 2009 - 7:51 am | अडाणि

मनात होते बरेच काही,
मनात सारे राहुन गेले,
मंद स्मित जे तुझे येता,
मन माझे विरून गेले

-
अफाट जगातील एक अडाणि.

तिमा's picture

20 Dec 2009 - 8:04 am | तिमा

मनात होते बरेच काही,
मनात सारे राहुन गेले,
समोर दिसता मूर्तिमंत तू
उसने माझे, धैर्य गळाले

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

कालिन्दि मुधोळ्कर's picture

20 Dec 2009 - 8:37 am | कालिन्दि मुधोळ्कर

मनात होते बरेच काही,
मनात सारे राहुन गेले,

दोन मनोरे, चार फुलोरे
विणता विणता उसवून आले

पर्नल नेने मराठे's picture

20 Dec 2009 - 10:39 am | पर्नल नेने मराठे

मनात होते बरेच काही,
मनात सारे राहुन गेले,
परत पाहता आज तुला,
आठवणींचे ढग दाटुन आले.
चुचु

शक्तिमान's picture

20 Dec 2009 - 12:16 pm | शक्तिमान

उत्तम! दिलेल्या २ ओळींना एकदम चपखलपणे जुळत आहे!!

अवलिया's picture

20 Dec 2009 - 12:16 pm | अवलिया

श्री रा रा नि३

आपला धागा पाहुन आमच्या मनात काही भावना आल्या. त्या टंकाव्या की न टंकाव्या अशा विवंचनेत असतांना संयमावर बोटांच्या तडफडीने मात केली आणि आम्ही काही (बाही) टंकले आहे. आम्हास बक्षिसाची आशा नाही. आणि, आपण बक्षिस जाहीर करुनही दिले नाही तरी आम्ही हा धागा तुमचा टिआरपी वाढवण्याचा प्रयत्न होता वगैरे बिलकुल समजणार नाही.

घ्या आमचा प्रयत्न

मनात होते बरेच काही,
मनात सारे राहुन गेले,

काय करावे कसे सांगावे
बोलु की लिहु मनातले
चित्र विचित्र अनुभवांचे
ठसे सारे आयुष्यातले

आयुष्याच्या वैराण वाटी
सुखदुःखाच्या पाउलवाटी
एकेदिनी मृगजळ भ्रांती
निर्झरसलिल आले ओठी

कोण कुठले ते अनामिक
असती जरी भिन्न स्थाने
रमले सारे एका ठायी
विरंगुळ्याच्या एकमिषाने

फेकुनी बुरखे सभ्यपणाचे
प्राशन करती हास्यरसाला
जो जो बुडला ह्या कल्लोळी
तो तो तरला अन सुखावला

विसरुन जावुन सा-या चिंता
सामील होवुन त्या कल्लोळाला
पुन्हा बिलगती आयुष्याच्या
सदैव तप्त क्रुर रणभुमीला

मरुभुमीमधे लाभे जळ
दैवाला परी नामंजुर ते
व्याघ्रमुखी जैसे पाडस
तसेच होई हास्यरसाते

आता केवळ खेळ शब्दांचे
अन उदो उदो करावयाचे
श्री रा रा जी जी बोलायचे
मनातले मनात ठेवायाचे

बरेच काही अजुनी आहे
सांगायाचे बाकी आहे
लिहिले होते सगळे काही
देव कृपेने डिलीट झाले

असो, बदलीन.

धन्यवाद.

--अवलिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Dec 2009 - 12:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लै भारी. अजून येऊ द्या. :)

-दिलीप बिरुटे
[काही दिवसापासून डिलीटची बंदूक संदुकात ठेवून दिलेला]

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Dec 2009 - 5:01 pm | बिपिन कार्यकर्ते

नानासाहेब, एकच विनंति..... बदलू नका!!!!!

बिपिन कार्यकर्ते

संजय अभ्यंकर's picture

20 Dec 2009 - 10:02 pm | संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

ज्ञानेश...'s picture

20 Dec 2009 - 11:33 am | ज्ञानेश...

सगळेजण चारोळ्या का लिहित आहेत?? :/

JAGOMOHANPYARE's picture

20 Dec 2009 - 11:44 am | JAGOMOHANPYARE

चार पाच चारोळ्यांची मोळी बांधा, गजल तयार होइल..

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

ज्ञानेश...'s picture

20 Dec 2009 - 11:46 am | ज्ञानेश...

'गझल' निर्मितीसाठी शुभेच्छा.

विकास's picture

23 Dec 2009 - 8:11 pm | विकास

सगळेजण चारोळ्या का लिहित आहेत??

चार ओळींच्या चारोळ्या होतील पण पाच ओळींचा पाचोळा होऊ शकेल अशी भिती असते म्हणून. ;)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Dec 2009 - 8:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाच ओळींचा पाचोळा
:)

-दिलीप बिरुटे
[पाचोळा]

विनायक प्रभू's picture

20 Dec 2009 - 1:23 pm | विनायक प्रभू

वयात आल्यावर
आपोआप वाहुन गेले.

फ्रॅक्चर बंड्या's picture

23 Dec 2009 - 6:05 pm | फ्रॅक्चर बंड्या

वयात आल्यावर
आपोआप वाहुन गेले.

8} 8} 8}

binarybandya™

नि३'s picture

20 Dec 2009 - 6:17 pm | नि३

बक्षिस असे काही विशेष नाही आणि प्रश्न बक्षिसाचा नाही असो.

तात्काळ आणी महत्वाचे म्हणजे खुप सुरेख प्रतीसाद दिल्याबद्द्ल सर्व मिपाकरांचे आभार ...

विशेषतहा मदणबाण, नेने,प्राजु आणी अडाणी ..

श्री रा रा अवलिया साहेब तुमचापण प्रयत्न आवड्ला बर का

सौरभ एकदम चपखल...

शाहरुख सुंदर .
अजुन येऊ द्या सोमवार पर्यंत वेळ आहे.

---नि३.

मी-सौरभ's picture

20 Dec 2009 - 11:45 pm | मी-सौरभ

-----
सौरभ :)

मनात होते बरेच काही,
मनात सारे राहुन गेले,

सोमवारी ख्रिस्तवासी,
सारेच ते होऊन गेले!

विशाल कुलकर्णी's picture

21 Dec 2009 - 12:02 pm | विशाल कुलकर्णी

मनात होते बरेच काही,
मनात सारे राहुन गेले,
मी बोलतो भाषा मौनाची,
शब्द हलके वाहून गेले.....

शब्दांची अलवार फुले ,
अन शब्दांचेच हळवे झूले,
आठवणींच्या हिंदोळ्यावर,
झुलायचेही राहून गेले....

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

सुनिल पाटकर's picture

21 Dec 2009 - 10:13 pm | सुनिल पाटकर

मनात होते बरेच काही,
मनात सारे राहुन गेले,
आज उद्या करता करता
आयुष्य सारे सरून गेले.

अमोल केळकर's picture

22 Dec 2009 - 12:08 pm | अमोल केळकर

मनात होते बरेच काही,
मनात सारे राहुन गेले,
बक्षीसाची रक्कम तीही
दुसरे कुणी घेऊन गेले !!
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

नि३'s picture

23 Dec 2009 - 7:53 pm | नि३

वयात आल्यावर
आपोआप वाहुन गेले.

परभु मासतर
वयात आल्यावर काय आपोआप वाहुन गेले हो
काही मार्गदर्शन कराल का??

---नि३.