गोळी

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
9 Mar 2008 - 3:40 pm

आमच प्रेरणा सारंग यांची सुरेख कविता खुळी

उगाच चरले काल रातरी काहीबाही
उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही

तसा वेंधळा जरा माझा स्वभाव आहे
चपळाई या शब्दाचाही अभाव आहे
भरीस आला प्रसंग आहे बाका हाही
उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही...

हसून त्याने प्रश्नचिन्हसे मला पाहता
हातानेच मी त्यास इशारा 'तो' करता
कळून येतो भाव मनातील मग त्यालाही
उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही...

अंतरातली उलथापालथ मी बावरते
बंद पाहूनी दार जराशी मी घाबरते
तो थांबून देतो धक्का तेव्हा दारालाही
उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही...

............

अन मी निघून जाता तोही निघून जातो
औषध गोळी एक उशाशी ठेवून देतो
मी दमात एका गिळते मग ती गोळी ही
उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही...

मी हसून त्याला म्हणते सोडव रे आणि
डोळ्यांमध्ये हसून माझ्या येते पाणी
दुखू लागले आहे पोटी त्याला ही
उदरी त्याच्या मुळीच काही राहत नाही...

केशवसुमार

प्रतिक्रिया

वडापाव's picture

9 Mar 2008 - 3:45 pm | वडापाव

आवडली कविता.

तसा वेंधळा जरा माझा स्वभाव आहे
चपळाई या शब्दाचाही अभाव आहे
भरीस आला प्रसंग आहे बाका हाही
उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही...

हसून त्याने प्रश्नचिन्हसे मला पाहता
हातानेच मी त्यास इशारा 'तो' करता
कळून येतो भाव मनातील मग त्यालाही
उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही...

खूप छान!! अजून कविता येऊ द्यात.
आणि काही कविता ऐकीवात असल्यास 'कवितासंग्रह' या काथ्याकुटात टंकलिखीत करावे, ही विनंती.

आपला नम्र,
वडापाव

विसोबा खेचर's picture

9 Mar 2008 - 5:24 pm | विसोबा खेचर

हा हा हा

केशवा, तुम नही सुधरोगे! :)

तात्या.

प्राजु's picture

9 Mar 2008 - 8:17 pm | प्राजु

दारू, बाई, बायको...... काही ही नाही यात. सही.
केशव... आपल्याला या पथ्यामुळे पोटदुखी सुरू झाली का हो?? :)) ह्.घ्या.

कविता एकदम मस्त.
- (सर्वव्यापी)प्राजु

प्रियाली's picture

10 Mar 2008 - 2:47 am | प्रियाली

अन मी निघून जाता तोही निघून जातो
औषध गोळी एक उशाशी ठेवून देतो
मी दमात एका गिळते मग ती गोळी ही
उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही...

वांझोटे विडंबन ;-) जरा गंभीर वाटले. का माझाच काही गैरसमज??? ;-)

केशवसुमार's picture

10 Mar 2008 - 10:08 am | केशवसुमार

प्रियालीताई,
गंभीर गैरसमज झाला आहे.. विडंबन लिहिताना.. अबर चबर खाण्याने होणारी पोटदुखी येव्हढेच डोळ्यापुढे होते.. :))
आपण भलताच अर्थ समोर आणलात.. :((
(सात्त्विक) केशवसुमार..

केशवसुमार's picture

10 Mar 2008 - 10:28 pm | केशवसुमार

प्रतिसाद देलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी) केशवसुमार

स्वाती राजेश's picture

11 Mar 2008 - 2:31 am | स्वाती राजेश

छान आहे.