कसाब आणि दयेचा अर्ज...

प्रशान्त पुरकर's picture
प्रशान्त पुरकर in काथ्याकूट
16 Dec 2009 - 8:27 am
गाभा: 

मिपाकरानो...

आजच्या मटा मध्ये खालिल बातमी वाचलि...

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5341505.cms

शन्का फक्त येवढिच कि कसाब (पाक नागरिक ) पण अफझल गुरु सरखा दयेचा अर्ज करु शकतो का...(त्याल म्रुत्युदन्ड होनार हे मी ग्रुहित धरले आहे)...

तसे असल्यास त्याचे पण लाड पुरवावे लागतील पुढे...माझ्या घामाच्या पैशातुन ~X(

प्रतिक्रिया

JAGOMOHANPYARE's picture

16 Dec 2009 - 11:18 am | JAGOMOHANPYARE

Forgiving a Terrorist should be left to the GOD, but fixing their appointment with GOD is entirely our responsibility.”

-Quote from Indian Army

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

आशिष सुर्वे's picture

16 Dec 2009 - 11:52 am | आशिष सुर्वे

त्या क** ने जर्र दयेचा अर्ज केलाच, तर त्याचा अर्ज संमत करून त्याला लगेच सोडून देण्यात यावे..

एक छोटीशी सुधारणा..

त्याला मुंबईच्या रस्त्यांवर सोडण्यात यावे.
(बाकीचे सांभाळण्यासाठी मुंबईची जनता समर्थ आहेच!)

-
कोकणी फणस

शक्तिमान's picture

16 Dec 2009 - 11:58 am | शक्तिमान

कसाबला फाशी होणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे...
त्यामुळे दयेचा अर्ज वगैरे इज नॉट रिक्वायर्ड..........

टारझन's picture

16 Dec 2009 - 12:15 pm | टारझन

कसाब ला भरपुर चिकन बिर्यानी खाऊ घालण्यात यावी. त्याला रोल्स रॉयस घोस्ट , बेंटली , लँबॉर्गिनी आणि एक फेरारी एफ-१६ भेट द्यावी. तसेच कफ्परेड ला ५००० स्केयरफुटाचा एखादा पेंटहाऊस फ्लॅट द्यावा. तसेच अ‍ॅन्युअली ४ फॉरेन ट्रिप्स सुद्धा द्याव्या. आणि जर जमलंच तर भारतात कॅबिनेट मंत्री पद द्यावं .. गेलाबाजार म्हाराष्ट्राचं गृहखातं दिलं तरी चालेल.

दयेचा अर्जं ही तर फारंच क्षुल्लक मागणी आहे :)

- हिसाब

अवलिया's picture

16 Dec 2009 - 12:37 pm | अवलिया

श्री रा रा प्रशांतजी पुरकरजीसाहेब

आपल्या मनातील घालमेलीबद्दल मला सहानुभुती आहे. माझे विचारसुद्धा आपल्यासारखेच आहेत. परंतु नुकतीच माझी एका अमेरिकास्थित विचारवंताशी गाठ पडली. नुकताच काही वैयक्तिक कारणसाठी तो विचारवंत भारत भेटीला आला असतांना त्याच्या अत्यंत धावपळीच्या वेळापत्रकातुन त्याने मला अमुल्य १५ मिनिटे दिली त्याबद्दल मी त्याचा आभारी आहे. त्या १५ मिनिटांत आम्ही मानववंशशास्त्र, ज्योतिष, धर्म, राजकारण, नासाचे नवे प्रकल्प तसेच भारतातील झोपडपट्टी उच्चाटन, रस्तेबांधणी प्रकल्प (त्यातील भ्रष्टाचारासह) अशा विविध विषयांवर विस्तृत चर्चा केली. सदर विचारवंताच्या म्हणण्यानुसार ज्यांना आपण अतिरेकी समजतो ते प्रत्यक्षात अतिरेकी नसुन तुमच्या आमच्या सारखीच माणसे आहेत. हे ऐकुन बसलेल्या धक्याने मला तीन दिवस जेवण गेले नव्हते. अशा माणसांना कायद्याच्या आधारे फाशी देणे म्हणजे आपल्यातील निद्रिस्त हिटलरला जागृत करणे हे त्या विचारवंताने पटवुन दिले. त्यामुळे मी संभ्रमावस्थेत असुन कसाब (अथवा अफजल) यांना फाशी न देता त्यांच्या मनुष्यत्वाचा गौरव करण्यासाठी काय करावे लागेल याची विचारणा त्या विचारवंताकडे केली. परंतु वेळेच्या अनुपलब्धतेमुळे आमची चर्चा अर्धवट राहिली, तरी मी भारत सरकारकडे जो पर्यत आमची चर्चा पुर्ण होत नाही तो पर्यत कुणालाही फाशी देवु नये अशी मागणी करण्याच्या विचारात आहे.

धन्यवाद.

--अवलिया

प्रशान्त पुरकर's picture

16 Dec 2009 - 1:17 pm | प्रशान्त पुरकर

श्री रा रा अवलियाजी

कमाल आहे बुवा तुमच्या आकलान शाक्तिची, १५ मिनिटात येवढ्या सगळ्या गहन विषयांवर चर्चा आणि ती पण विस्तृत चर्चा.तो विचाररवन्त पण चाट पडला असेन नाहि ?

तुमची त्याच्यशी लवकरच भेट होउ, आणि जगभरातल्या सगळ्या अट्टल गुन्हेगरानच्या मनुष्यत्वाचा गौरव करण्याचि सन्धि तुम्हाला लाभो हिच सदिच्चा !!!!!

JAGOMOHANPYARE's picture

16 Dec 2009 - 4:32 pm | JAGOMOHANPYARE

तरी मी भारत सरकारकडे जो पर्यत आमची चर्चा पुर्ण होत नाही तो पर्यत कुणालाही फाशी देवु नये अशी मागणी करण्याच्या विचारात आहे. >>>>>>>>>>>>>>>>>>

सरकार फक्त कागदी फाशी देते. आणि नंतर मरेपर्यन्त सजा रखडवते... फाशी आणि जन्मठेप हे आता कागदी फरक राहिले आहेत. तुम्हाला वेगळी मागणी करण्याची गरज नाही..

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

विजुभाऊ's picture

16 Dec 2009 - 1:13 pm | विजुभाऊ

कसाब ने दयेचा अर्ज करावा की नाही हा त्याला शिक्षा मिळाल्यानन्तरचा प्रश्न आहे.
त्याने त्याला नेमून दिलेले काम केले आहे. त्या कर्माची फळे मिळतीलच.
आपण भारतीय करदाते नागरीक आपले काम करुयात. प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष कर भरूया. आपल्या माननीय यु पी/बीहारी नेत्यांचे खीसे भरुयात.
इतर नेत्याना त्यांचे काम करुद्यात.बाबरी मशीदीच्या प्रश्नावर निवडणूका जिंकूद्यात . वेळ आलीच तर जीन्नांना देशभक्त ठरवून त्यंच्या
कबरीवर फुले वाहुद्यात.
इथे शेतकरी जीव देतो.... डाळी महागतात रस्ते पाण्याने धुवुन जातात लोड शेडिंगमुळे गावोगावच्या पाणीयोजना कोरड्या ठाक पडतात. बायाबापड्या पाण्यासाठी वणवण भटकतात.
त्यांच्या गावी झैरीतींच्या बोर्डाला २४ तास वीज मिळते. वडपाव श्रेष्ठ की कांदे पोहे याच्या चर्चा झडतात.
असो.....
या सार्‍यावर ना विरोधी पक्षाला काही करावे वाटते ना सत्ताधीशाना.
कसाब मुळे चर्चेची सत्रे झडतील. वाहिन्या अहोरात्र रतीब घालतील.
शेतकरी तसाच राहील. बालकामगार काम करत रहातील ,शिक्षकाना इतरत्र राबवले जाईल. शाळा ओस रहातील. हक्काच्या प्राथमिक शिक्षणाचा डंका वाजवला जाईल.
कल्याणकारी मायबाप सरकार् टीकवण्यासाठी सामान्य नागरीक म्हणून महागाईने मोडलेल्या कंबरड्याने कंबर कसून प्रयत्न करुयात

टारझन's picture

16 Dec 2009 - 4:53 pm | टारझन

डोळे पाणावले..!

मी-सौरभ's picture

20 Dec 2009 - 12:13 am | मी-सौरभ

-----
सौरभ :)

अविनाशकुलकर्णी's picture

16 Dec 2009 - 4:44 pm | अविनाशकुलकर्णी

कसाब ला फाशी नाहि होणार..तो निवडणुकिचा उमेदवार होइल..समाज वादि पार्ती चा

श्रीयुक्त कसाब ह्याना वाचुन दाखवावा.त्याचे निर्जीव डोळे नक्कीच पाणावतील. इतक्या दु:खाने पिचलेल्या,गरीबीत बुडालेल्या,दारिद्र्याशी लढण्यात आयुष्य घालवणार्‍या लोकांवर आपण हल्ला करुन किती चुक केली हे त्याला कळाले तर त्याच्या निरागस मनाला त्याची बोचणी लागेल. आयुष्यभर तो त्या बोचणीत झुरुन झुरुन ( अडवाणी जसे पंतप्रधानपदासाठी झुरत आहेत तसे) मरेल.

विजुभाऊ ना ह्याबद्दल धन्यवाद द्यायला हवेत. एकाद्या ज्वलंत विषयावरुन लोकांचे लक्ष कसे दुसरीकडे विचलित करावे ह्याचे हे छान उदाहरण आहे.
निदान घाम गाळणार्‍या प्रशांतजीं बद्दल जरा तरी दया दाखवा.

वेताळ