(डिजीटल किंवा साधी) फोटोग्राफी - एक कला की विज्ञान ?

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in काथ्याकूट
12 Dec 2009 - 9:26 am
गाभा: 

(डिजीटल किंवा साधी) फोटोग्राफी - एक कला की विज्ञान ?

डिस्क्लेमर : या काथ्याकूटात मिपावर असणार्‍या फोटोग्राफरांना व कलादालनात फोटो टाकणार्‍यांना दुखावण्याचा अजिबात हेतू नाही. या बाबत मागेच मी एका धाग्यात या बद्दल चर्चा करण्याबाबत विचारले होते.

साधा फिल्मवरचा फोटो घ्या किंवा आताचे डिजीटल कॅमेरॅवरचे काढलेले फोटो घ्या, फायनल रिझल्ट (फोटो) तुमच्या हातात येईपर्यंत तुम्हाला कोणतेतरी तांत्रीक हत्यार वापरावी लागते किंवा त्या हत्यारांद्वारे केलेली क्रिया वापरावी लागते. यात ज्याचा फोटो काढायचा आहे तो ऑब्जे़क्ट, फोटोग्राफर, फोटो कॅमेरा, फोटो डेव्हलप करण्याची रसायने, त्यातील केमीकल क्रिया, प्रिंटींग आदी क्रिया येतात.

फोटोग्राफीच्या जन्मापासूनच फोटोग्राफी ही एक कला आहे की एक तांत्रीक क्रिया आहे या बद्दल वाद आहे. काही लोकांच्या मते कलाकारांचे (चित्रकार) पोट भरण्याचा मार्ग फोटोग्राफीमुळे खुंटला गेल्याने ते फोटोग्राफी ही कला नाही अशी तक्रार करतात असे म्हणणे आहे. इतिहास तपासला असता काही समूदायाने (चित्रकारांनी) या बाबत आपला आक्रोश देखील जाहिरपणे दाखवला होता.

आता असे समजा की तुम्हाला एक फुलपाखरू आवडले. त्याचे तुम्ही ५/६ (फिल्मअसलेल्या व डिजीटल कॅमेरॅने) फोटो काढले. त्यातला एक चांगला फोटो तुम्ही डेव्हलप केला व डिजीटल फोटो सॉफ्टवेअरने प्रक्रियेने उन्नत केला. त्याच फुलपाखराचे तुम्ही मेमरी ड्रॉइंग काढले. या दोन्ही किंवा तिनही क्रियेत कोणती क्रिया त्या माणसाची जास्तीत जास्त कलेकडची नजर दाखवते? प्रत्येक जण जसा विचार करेल त्या त्या प्रमाणे त्याचे उत्तर येईल. यात अनेक वादही होतील.

अगदी उलट विचार केला तर माझ्या पाहण्यात पुर्वीचे चित्रकार होते ते आता कॉम्पुटर वापरून आपली चित्रकारीतेचा व्यवसायात रूपांतर करणारे लोकही आहेत. त्यांच्या बाबतीत कला ही पैसे कमवण्याचे माध्यम झालेले आहे.

काही जणांचे असेही म्हणणे आहे की केवळ काढलेले फोटो जसेच्या तसे (प्रोसेस न करता, कोणताही लाईट, कॉस्चूम, सॉफ्टवेअर टचींग न करता ) बघीतले /वापरले तरच ती एक कला असे आहे.

माझ्या मते फोटोग्राफी एक आनंद देणारे, भूतकाळ सांभाळून ठेवणारे एक वैज्ञानीक माध्यम आहे तर चित्रकला हीच त्याची मुळ जननी आहे व ती कला आहे. फोटोग्राफी जोपर्यंत काही प्रोसेस न करता वापरात येते तोपर्यंत काही प्रमाणातच फोटो काढणार्‍याच्या अँगलने व तो फोटो कलेच्या अँगलने बघणार्‍याच्या अ‍ॅंगलने कला आहे. अन्यथा ती एक केवळ वैज्ञानीक प्रक्रिया आहे.

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

12 Dec 2009 - 9:38 am | प्रकाश घाटपांडे

आमच्या मते ते उपयोजित तंत्रज्ञान आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

अजय भागवत's picture

12 Dec 2009 - 9:50 am | अजय भागवत

पूर्वी फोटोग्राफीचा शोध लागला नव्हता तेव्हा चित्रकला, शिल्पकला हेच पोर्ट्रेट, इ शिल्प/चित्ररुपाने जपण्याचे साधन होते. चित्रकलेचा विकास तोपर्यंत चालूच राहिला. शिल्पकलेला फोटो हा पर्याय होऊ शकत नाही पण फोटोग्राफि आहे. (पर्याय म्हणजे, जी कामं चित्रकलेच्या माध्यमातून साधली जातात त्यापैकी काही).
फोटोग्राफीच्या मर्यादा जे समोर आहे ते बंदीस्त करणे हे आहे- त्यात कलाकार फोटोग्राफर काही महत्वाचे बदल घडवून "हौशी", "व्यावसायिक" व "कलात्मक" फोटोग्राफीतील फरक दाखवू शकतात. पुढे, फोटोशॉप सारख्रा प्रणाल्यांमुळे त्यात आणखी काही रचनात्मक बदल घडवून आणू शकतात.
चित्रकार, जे मनात आहे ते उतरवू शकतो व त्यामुळे त्याच्या कलेला फोटोग्राफीच्या मर्यादा नाहीत. उत्तम चित्राला लाखो डॉलर मिळतात- उत्तम फोटो किती मिळतील?

एखाद्याने १० कोटींचा बंगला घेतला आणि त्यात एक "फोटो" जगातल्या सर्वात महागड्या फोटोफ्रेममधे लावला v/s मी एका सुदर चित्र त्याच फ्रेममधे लावल- काय जास्त साजेसं वाटेल?

चित्रकारी ला वेळ लागतो. फोटो मनात येता क्षणी बंदीस्त करता येतो- हेच त्याचे सर्व्सामान्यापर्यंत पोहोच्ण्याचे कारण. तेच महत्वाचे आहे. चित्रकलेला जे स्थान आहे ते गौण झाले आहे का?- मुळीच नाही.

मला वाटते- हे आशयानुसार उत्तर देण्याचे प्रकरण आहे.

प्रत्येकाच अभिव्यक्त होण्याच माध्यम वेगळ, वेगळ असु शकत आणि ते माध्यम वापरण्याच कौशल्य देखिल.फोटोग्राफी ही चित्रकलेची सुधारीत आव्रुत्ती आहे असं मला वाटत.माझ्या वैयक्तीक बाबतीत म्हणाल तर चित्रकला आवडते पण जमली नाही म्हणुन फोटोग्राफी निवडली. (गणपतीचा मारुती व्हायचा हो म्हणुन दुधाची तहान ताकावर)
मला माजे गुरु नेहमी सांगायचे "कॅमेरा महत्वाचा नाही तर त्याच्या मागचा डोळा खुप महत्वाचा आहे, तेंव्हा तो सेन्स डेव्हलप कर मग बाकी उरता त्या सगळ्या तांत्रीक गोष्टी ज्या सरवाने पण जमतील"
चित्रकलेच महत्व मानणारा
जयपाल

विनायक रानडे's picture

12 Dec 2009 - 11:05 am | विनायक रानडे

फोटोग्राफी एक साधन संवादाचे. जे मला दिसले ते इतरांना दाखवता येते. महत्त्वाचे जिव्हाळ्याचे क्षण टीपून साठवता येतात. ते क्षण पुन्हा बघता येतात. अशा साधनाचा वापर चांगल्या प्रकारे करता येणे ही कला आहे. फसवणूक हा गुन्हा आहे पण फसवणूक बेमालूम करणे ही कला आहे.

नीधप's picture

12 Dec 2009 - 11:49 am | नीधप

शेवटी फोटोग्राफी सुद्धा एक दृष्य कला आहे.
कॅमेरा हे एक तंत्र आहे. तसेच फोटोशॉप (किंवा इतर सॉफ्टवेअर्स.. थोडक्यात डिजिटली फोटोवर संस्कार करणे) हेही एक तंत्र आहे.
आपल्याला अपेक्षित परिणाम साधण्यासाठी चित्रकार त्याच्या व्हिजन पर्यंत पोचण्यासाठी विविध तंत्रे वापरून एक चित्र तयार करतो.
तेच इथेही आहे. फोटोग्राफर कॅमेरा आणि डिजिटल संस्कार या माध्यमातून एक चित्र तयार करत असतो. जे त्याच्या डोक्यात असते.
शेवटी महत्वाचं काय असतं की अल्टिमेट रिझल्ट. एक चित्र म्हणून त्या वस्तूचं पूर्णत्वाला गेल्यानंतरचं स्वरूप.
मला तरी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर चुकीचा किंवा कलेला, कौशल्याला डायल्यूट करणारा वाटत नाही.

हा आता डॉक्युमेंटेशन स्वरूपाच्या फोटोग्राफ्स मधे डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर चुकीचा आहे कारण ते फोटोग्राफ्स सत्याचा पुरावा म्हणून असतात.
तसेच मॉडेल्सचे, नटांचे पोर्टफोलिओ फोटोग्राफ्स (काम मिळण्यासाठी, नवीन असताना काढून घेतले जातात ते..) डिजिटली नको इतके सुंदर करणं जेणेकरून मूळ व्यक्तीच हरवून जाईल असम करणं चुकीचं आहे कारण ते फोटो मॉडेल वा नट नट्या कसे दिसतात हे त्यांना हायर करणार्‍यांना कळावं यासाठी काढलेले असतात. अर्थात हा घोळ मेकप आणि गेटपमुळे पण होतो.
हल्ली आम्ही फोटो मागवताना घरगुती फोटो असतील, मेकपशिवायचे फोटो असतील ते पाठवा असं सांगतो स्पेसिफिकली.. :)
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

धनंजय's picture

13 Dec 2009 - 11:14 am | धनंजय

स्मृती किंवा कल्पना वापरून चित्र काढणे म्हणजे कुंचले, रंग मिसळणे वगैरे तंत्रे आलीच की - चित्रकला सुद्धा कलाही आहे, तंत्रही आहे.

("विज्ञान" शब्द "तंत्र" या अर्थाने चर्चाप्रस्तावकाने वापरला आहे, असे वाटते.)

मला तर वाटते, की जितके पोस्ट-प्रोसेसिंग अधिक तितके प्रकाशचित्रण हे स्मृति-चित्रकलेच्या अंगाने जाऊ लागते.

वर नीधप यांनी उदाहरण दिले आहे, की एखाद्या नटीचे चित्र बदलुन इतके सुंदर करणे, की ती मूळ नटी रहातच नाही. जुन्या कुठल्या चित्रकाराने "पहुडलेली सुंदरी" वगैरे काढली असेल, तिथे मॉडेलशी चित्र जुळते की नाही, ते आपण कुठे बघतो? किंवा राजा रवी वर्मांनी देवतांची चित्रे काढलीत, बहुधा ओळखीच्या मनुष्यांच्या चेहर्‍यांनाच त्यांनी अतिशय सुंदर बनवले असावे.

कलाकाराने ती वस्तू आस्वाद्य बनवण्यासाठी विशेष प्रयत्न केला असेल, तर मला वाटते की "कलावस्तू" ठरण्यासाठी तेवढे तथ्य पुरते. आस्वाद्यवस्तू बनवण्यासाठी तंत्र किती कमी-अधिक वापरले जाते, मूळ मॉडेलची कितपत हुबेहूब प्रतिकृती आहे, वगैरे तपशील गौण आहेत.

नीधप's picture

13 Dec 2009 - 11:32 am | नीधप

मला तर वाटते, की जितके पोस्ट-प्रोसेसिंग अधिक तितके प्रकाशचित्रण हे स्मृति-चित्रकलेच्या अंगाने जाऊ लागते. <<
नाही स्मृति-चित्राच्या म्हणजेच वस्तू दर्शक (Representational - Realism, Naturalism, Impressionism etc) या एकाच क्याटेगरीमधे असेल असे नाही. वस्तूसूचक (Presentational - Expressionism, Abstract etc) अश्याही क्याटेगरीत ते जाऊ शकते.

वर नीधप यांनी उदाहरण दिले आहे, की एखाद्या नटीचे चित्र बदलुन इतके सुंदर करणे, की ती मूळ नटी रहातच नाही. जुन्या कुठल्या चित्रकाराने "पहुडलेली सुंदरी" वगैरे काढली असेल, तिथे मॉडेलशी चित्र जुळते की नाही, ते आपण कुठे बघतो? किंवा राजा रवी वर्मांनी देवतांची चित्रे काढलीत, बहुधा ओळखीच्या मनुष्यांच्या चेहर्‍यांनाच त्यांनी अतिशय सुंदर बनवले असावे. <<
मी मुद्दामून पोर्टफोलिओ फोटोग्राफ्स असं म्हणाले आहे. जे फोटो नवीन नट नट्यांना किंवा मॉडेल्स नी काम मिळवण्यासाठी विविध ठिकाणी द्यायचे असतात. उत्तम पण चेहरेपट्टी बदलून टाकणारा मेकप, केशरचना आणि डिजिटल तंत्राने केलेले बदल ह्यामुळे नट नटी हे मूळ स्वरूपात कसे आहेत हे कळू शकत नाहीत आणि मग त्यांना ऑडिशनला बोलावल्यावर 'फोटोत तर वेगळी दिसत होती आणि आता वेगळी... हिचा काही उपयोग नाही..' असं होतं अनेकदा. आमच्याकडे सध्या ऑडिशन्स चालू आहेत आणि हा घोटाळा कैक वेळा होतोय. त्यामुळे आम्ही बिना मेकपचे घरगुती फोटो मागवतोय.
माझे विद्यार्थी जे शिक्षण पूर्ण करून आता अभिनयात उतरत असतात वा इतर नवीन स्ट्रग्लर्स असतात अश्या सगळ्यांना पोर्टफोलिओ करून घेतानाही मी हेच सांगते की पहिला पोर्टफोलिओ हा तुमचा चेहरा, अंगयष्टी (उंची, बिल्ट इतपत) काय आहे हे समजून येईल, तुम्ही झाकले जाणार नाही इतपतच गेटप्स करून करा. त्याला खर्चही कमी येईल आणि ते उपयोगाचे पडतील...
थोडक्यात काय ओळखपत्रावरचा फोटो जसा माणूस ओळखू यावा म्हणून काढायचा असतो तसा हा पोर्टफोलिओ फोटो हा माणूस कसा दिसतो ते कळावं यासाठी काढायचा असतो...
एकदा यातले कोणी प्रथितयश नट झाल्यावर मग एक आर्ट म्हणून त्या फोटोवर काम केले जाणे हा मुद्दाच वेगळा..

कलाकाराने ती वस्तू आस्वाद्य बनवण्यासाठी विशेष प्रयत्न केला असेल, तर मला वाटते की "कलावस्तू" ठरण्यासाठी तेवढे तथ्य पुरते. आस्वाद्यवस्तू बनवण्यासाठी तंत्र किती कमी-अधिक वापरले जाते, मूळ मॉडेलची कितपत हुबेहूब प्रतिकृती आहे, वगैरे तपशील गौण आहेत.<<
बरोबर... पण फोटो कशासाठी काढला जातोय यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत ..

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

पोर्टफोलियोच्या बाबतित सहमत आहे.

चित्र विवक्षित उपयोगासाठी असले, तर त्या उपयोगाच्या कसावर ते पारखले जावे हे योग्यच आहे. नटा-नटीचे चित्र स्वतः चरम-आस्वाद्य नसले (खुद्द नट-नटी चरम आस्वाद्य असला-असली) तर वेगळी गोष्ट आहे.

मग चित्रकला काय, प्रकाशचित्रण काय... (काही शतकांपूर्वी ऑलिव्हर क्रॉमवेल याने आपले चित्र काढणार्‍या चित्रकाराला सांगितले "चामखिळी वगैरे सर्व दाखव" अशी सूचना केली. क्रॉमवेलचे चरम उद्दिष्ट्य होते "मी कसा दिसतो, ते चित्र बघणार्‍याला खरेखरे कळावे" - म्हणजे पोर्टफोलियो चित्रासारखा प्रकार.)

पोर्टफोलियो चित्राच्या बाबतीत (किंवा वृत्तपत्रकारितेच्या बाबतीत - कोर्टात कॅमेराची बंदी असल्यास स्मृतिचित्रे रेखाटावी लागतात) "कला की तंत्र" हा प्रश्नच विचारणे मुश्किल आहे. कारण "यथार्थाचे दर्शन " हा उपयोग सर्वात महत्त्वाचा आहे. "जमल्यास जास्तीत जास्त सुबक चित्र बनवणे" हा प्रयत्न मग त्यापुढे कारागीर करतात, हे योग्यच. पण दुय्यम.

हे अँडी वॉर्हॉलने भरपूर प्रोसेसिंग केलेले स्वयंचित्र (निश्चित कला/आस्वाद्यवस्तू)

हे पॅरिस हिल्टनचे कोर्टात काढलेले रेखाचित्र (चित्र कलात्मक आहे की तांत्रिक आहे, हा मुद्दाच दुय्यम).

नीधप's picture

13 Dec 2009 - 1:04 pm | नीधप

वा छान उदाहरणे.
अ‍ॅण्डी वॉरहॉल... मस्तच..
सध्या मी जा मिशेल बास्किया च्या प्रेमात आहे त्यामुळे संदर्भाने अ‍ॅण्डी वॉरहॉल पण अभ्यासला जातोय.. :)
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

विनायक रानडे's picture

13 Dec 2009 - 3:32 pm | विनायक रानडे

ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान हे अनुभव, सिध्दता व संवेदन शीलता ह्यावरच खरे ठरते.
शिक्षण, शिक्षित, शिकवलेला हे साचेबंद आभ्यासक्रमाचे परिणाम आहेत.
चर्चा ही विषय व उद्देश ह्या मार्यादेतच असावी. चर्चा घडवून व्यक्ती कोण, कसा, का, केव्हा हे पटवून देणे ही मात्र कला आहे. अशा चर्चेत विषय व उद्देश नावा पुरते तोंडीलावणे असावे असे अपेक्षित असावे, असते.
मी एखाद्याचा जीव घ्यावा ह्याला खुन म्हणतात. पण वकीली डावपेचाने तो आत्म संरक्षण ठरवता येतो.
सीमा ओलांडली एकाच्या सांगण्यावरुन, त्याला ठार मारले एकाच्या सांगण्यावरून त्याला खुन म्हणावे का? मग खुनी कोण, शिक्षा कुणाला?
तुम्ही चर्चा घडवा व नाव कमवा. फसवणूक करणारे फोटोग्राफर नांव, सम्मान, पैसा मीळवण्यात सार्थक मानीत उदर व पाकीट भरण्यात मग्न आहेत.

नीधप's picture

13 Dec 2009 - 5:57 pm | नीधप

हे पोस्ट वाचून मी वरती लिहिलेली पोस्टस अवांतर आहेत की काय असं वाटायला लागलं...

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

विनायक रानडे's picture

13 Dec 2009 - 7:01 pm | विनायक रानडे

मी "(डिजीटल किंवा साधी - फिल्म) फोटोग्राफी - एक कला की विज्ञान ?" हे अर्थाअर्थी मला काय वाटले हे सांगितले. कोणालाही दुखवावे हा उद्देश नाही. मला चर्चेत विषय हरवल्या सारखे वाटले.

नीधप's picture

14 Dec 2009 - 8:09 am | नीधप

मला माझ्या वरच्या काही पोस्टस मधे चर्चेचा विषयाला सोडून काही बोलल्यासारखे वाटत नाहीये अजिबात.

बर ते खून, हत्या, आत्मसंरक्षण इत्यादीचा काही संबंध लागला नाहीये.
मलातरी.
समजावून सांगणार का?

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Dec 2009 - 12:20 am | बिपिन कार्यकर्ते

धाग्याचा मूळ रोख नीटसा कळला नव्हता. त्यामुळे नुसतेच वाचत होतो. पाषाणभेद बरेच वेळा गंमतीशीर धागे टाकतात म्हणून असे वाटले. :)

पण नी आणि धनंजयचे धागे वाचून मात्र बरेच काही नवीन कळले, छान वाटले. धन्यवाद.

रानडेसाहेबांचा पहिला प्रतिसाद मात्र नीटसा कळला नाही किंवा त्यांना चर्चा भरकटल्यासारखे का वाटले तेही कळले नाही. असो. रानडेसाहेबांचाही या विषयावरचा अभ्यास आहे असे वाटते. अजून ऐकायला आवडेल. वेगवेगळी मते विचार समृद्धच करतात.

बिपिन कार्यकर्ते

लंबूटांग's picture

14 Dec 2009 - 3:54 am | लंबूटांग

चित्रकला आणि फोटोग्राफी ह्या दोन भिन्न कला आहेत असे मला वाटते.

डिजिटल आणि साध्या/फिल्म फोटोग्राफीमधला एन्ड युजर साठी मोठा फरक इतकाच आहे की डिजीटल फोटोग्राफीमधे फोटोग्राफ लगेच बघता येतो. कारण तो फिल्मवर स्टोअर न करता १ आणि ० च्या स्वरूपात मेमरी मध्ये स्टोअर केला जातो. (बाकी डिजिटल कॅमेरामधील प्रीसेट मोड वगैरे काही बाबी फिल्म कॅमेरामधे नसतात पण तो ह्या लेखाचा मूळ मुद्दा नाही असे मला वाटते)

फोटोग्राफी ही एक कला आहेच आणि त्यामागे शास्त्रही आहे.

शास्त्र अशासाठी की फोटो काढताना किती एक्स्पोजर ठेवावे, शटर स्पीड किती असावा, काय सेटिंग्ज ठेवली असता काय इफेक्ट येईल हे सगळे शास्त्र.

मात्र हे सगळे शास्त्र कुठे आणि कसे वापरायचे ही कला अथवा कलात्मक दृष्टिकोन.

उदा. एखादा माणूस/ स्त्री समुद्रकिनारी अथवा तळ्याशेजारी उभे असताना फोटो काढला आणि त्याच व्यक्तीचा त्याच वेळी Silhouette पद्धतीने फोटो काढला तर केवळ फोटो काढण्याची पद्धत बदलली म्हणून दुसरा फोटो अधिक चांगला/ अर्थपूर्ण वाटू शकतो जरी त्यात बर्‍याचशा गोष्टींच्या केवळ सावल्याच दिसत आहेत. (फोटो जालावरून साभार)

साधी साधी रोजच्या बघण्यातली ठिकाणे अथवा गोष्टी देखील केवळ कलाकाराच्या वेगळ्या हाताळणीमुळे अतिशय सुंदर दिसू लागतात.

बाकी फोटोशॉप अथवा तत्सम software चा वापर ही ज्याची त्याची मर्जी. मला स्वतःला मी काढलेल्या फोटोंना फोटोशॉप वापरून ठीक करणे आवडत नाही कारण ते म्हणजे मी केलेल्या चुका झाकण्याचा प्रयत्न केल्यासारखे वाटते. अर्थात हे माझे वैयक्तिक मत झाले आणि मी landscape/ निसर्गसौंदर्य अथवा तत्सम फोटोज जास्ती काढत असल्यामुळे केवळ त्याचबद्दल म्हणतो आहे.

एखाद्या व्यक्तीचे features enhance करण्यासाठी त्याचा वापर करणे ह्याबाबतीत मी नीधप यांच्याशी सहमत आहे.

माझे काही फोटोग्राफीमधील प्रयोग इथे पाहू शकता

विनायक रानडे's picture

14 Dec 2009 - 8:15 am | विनायक रानडे

कला ह्या प्रकाराला कोणत्याही नियमांचे, माध्यमांचे बंधन नसते. एका व्यक्तीचा विचार, अनुभव, कल्पना, मत वगैरे प्रदर्शित करणे ही कला आहे. म्हणून मी - फसवणूक हा गुन्हा आहे पण फसवणूक बेमालूम करणे ही कला आहे.- हे वाक्य टाकले. ह्याचे उदाहरण - एमेफ हुसेन - आज चार रंगांचे फराटे व गोंधळ घातलेला कॅनव्हासचे लाख रुपये मिळवु शकतो ही कला आहे. २५ वर्षापूर्वी त्यानेच काढलेले सुबक, रेखीव, रंगसंगती सांभाळत काढलेले कॅनव्हास दारोदार (त्याच्याच शब्दांत) विकायला जाणे ती कला नव्हती.

विज्ञान = विषयाचे ज्ञान (मला समजलेला अर्थ). इथे नियम, माध्यम, पात्रता वगैरे प्रत्येक मुद्दा महत्त्वाचा असतो. म्हणूनच इंजिनीयर, डॉक्टर, फोटोग्राफर वगैरे मंडळी कलाकार गणले जात नाही. म्हणून फोटोग्राफी हे विज्ञान आहे. त्याचा वापर करुन पैसा, नाव, संम्मान मिळवणे ही कला आहे. ह्याचे उदाहरण बघा.

ब्रिटिश एअरवेजचा ओमान चा अधिकारी दुपारी हे विमानाचे मॉडेल घेउन माझ्या स्टुडिओत आला होता. ह्या नवीन रंगसंगतीचे विमान दुसर्‍या दिवशी सकाळी मस्कतला प्रथमच येणार म्हणून त्याला अर्धा पानी जाहिरात करायची होती. त्याला मी ते एका तासात करुन दिले. डिजीटल फोटोग्राफी व फोटोशॉप हे विज्ञान वापरण्याची कला.

इथे नियमांचे उल्लंघन नाही. कोणाच्या भावना दुखावल्या नाहीत. जे हुसेन करतो व त्यातून सुटतो कारण कलाकार ? नियमांचे, भावनांचे बंधन . . हे काय असते विचारणारा.

लंबूटांग's picture

14 Dec 2009 - 8:57 am | लंबूटांग

तुम्ही केलेले काम लाजवाब :)

पण माझ्यामते तरी ह्याला फोटोग्राफी म्हणता येणार नाही.

ढोबळ भाषेत कॅमेराचा वापर करून फोटो काढणे ह्याला फोटो काढणे असे मानले जाते.

जालावर सर्च केले असता ही माहिती मिळाली

तुम्ही जे केले आहे त्याला photo manipulation अशी संज्ञा आहे. स्रोत

बाकी
>>इंजिनीयर, डॉक्टर, फोटोग्राफर वगैरे मंडळी कलाकार गणले जात नाही
हे वाक्य वाचून अंमळ मौज वाटली.

इंजिनीयर, डॉक्टरांबद्दल बरेचदा ऐकले होते पण फोटोग्राफर पण कलाकार नसतात हे माहित नव्हते.

आपल्याला तर बुवा वाटायचे की इंजिनीयर, डॉक्टर हे लोक पण स्टेट ऑफ द आर्ट गोष्टी बनवतात त्यामुळे ते पण आर्टिस्ट असतात.

येथे अशीच काहीशी चर्चा झाली आहे. बाकी फोटोशॉप बनवणार्‍या सॉफ्ट्वेअर इंजिनीअरला तुम्ही काय म्हणाल? माझ्या दृष्टीने तो पण एक आर्टिस्ट च होता.

>>त्याचा वापर करुन पैसा, नाव, संम्मान मिळवणे ही कला आहे.

असहमत. माझ्यामते हे धंदा करण्याचे कौशल्य आहे.

असो.. photography an art or science हे गूगलल्यास बर्‍याच लोकांनी ही चर्चा केली आहे असे दिसते. बहुतांश चर्चा ह्या डिजिटल फोटोग्राफीवर झालेल्या दिसतात.

ह्या दुव्यावर दिलेले एक वाक्य मला उद्दृत करावेसे वाटते..

The true nature of digital photos lies in the hands of the person who takes the pictures
. The way a person treats the process defines the nature of digital photography for him or her. It is not absolutely art nor is it absolutely science. The true nature of digital photography is a paradox. It might seem to be contradictory, but it is somehow true.

ह्यातील digital शब्द काढून वाचलात तरीही चालेल.

नीधप's picture

14 Dec 2009 - 9:13 am | नीधप

चांगली माहीती लंबूटांग.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

धनंजय's picture

14 Dec 2009 - 10:34 am | धनंजय

येथे "कोलाज" या कलेचे नवयुगातले रूप म्हणणे सयुक्तिक वाटते.

विमानाच्या चित्रातली कारागिरी उत्तम आहे, हे सांगणे नलगे.

पण मग मागच्या शतकामधील (चित्रफितीवरील) उत्तमोत्तम डबल-एक्स्पोझर प्रकाशचित्रांना काय म्हणावे, कोलाजच म्हणावे का? असा प्रश्न मनात येतो.

मला वाटते "अमुक प्रकाशचित्र आहे" किंवा "नाही" असे ठामपणे म्हणण्याची वेळ फक्त एखाद्या स्पर्धेमधील अटींमध्येच येऊ शकते. अन्यथा "अमुक कलावस्तू आहे", "रंजक आहे", "सुंदर आहे" वगैरे म्हणून रसिकाचे काम संपते. शुद्ध वर्गीकरण जमले नाही तरी काही बिघडत नाही.

**(कुंचल्याच्या दोन-चार फराट्यांनी चित्रनिर्मिती करायचा प्रयत्न मी खुद्द केला आहे. मनातले फराटेच कागदावर न जमल्यामुळे १. मी हिरमुसला झालो, २. समर्थ चित्रकारांच्या मोजक्या फराट्यांबाबत नवा आदर निर्माण झाला.)**

नीधप's picture

14 Dec 2009 - 11:05 am | नीधप

पण मग मागच्या शतकामधील (चित्रफितीवरील) उत्तमोत्तम डबल-एक्स्पोझर प्रकाशचित्रांना काय म्हणावे, कोलाजच म्हणावे का? असा प्रश्न मनात येतो. <<
म्हणू शकतो बहुतेक.. उदाहरणं द्या ना. तुमच्याकडून वरच्या अ‍ॅण्डी वॉरहॉलवाल्या उदाहरणांसारख्या अजून अस्सल उदाहरणांची अपेक्षा आहे.

मला वाटते "अमुक प्रकाशचित्र आहे" किंवा "नाही" असे ठामपणे म्हणण्याची वेळ फक्त एखाद्या स्पर्धेमधील अटींमध्येच येऊ शकते. अन्यथा "अमुक कलावस्तू आहे", "रंजक आहे", "सुंदर आहे" वगैरे म्हणून रसिकाचे काम संपते. शुद्ध वर्गीकरण जमले नाही तरी काही बिघडत नाही. <<
मान्यच. शेवटी हेतू (उपयोजित की शुद्ध कला) महत्वाचा आणि त्या हेतूवर त्या त्या कलाकृतीचे योग्यायोग्यपण किंवा लहानमोठेपणही.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

नीधप's picture

14 Dec 2009 - 8:34 am | नीधप

ह्याचे उदाहरण - एमेफ हुसेन - आज चार रंगांचे फराटे व गोंधळ घातलेला कॅनव्हासचे लाख रुपये मिळवु शकतो ही कला आहे. २५ वर्षापूर्वी त्यानेच काढलेले सुबक, रेखीव, रंगसंगती सांभाळत काढलेले कॅनव्हास दारोदार (त्याच्याच शब्दांत) विकायला जाणे ती कला नव्हती.<<
वादग्रस्त नाव घेऊन उगाच कशाला हिंदू मुस्लिम भांडणं इथे आणायची आहेत?
तुम्हाला त्याचा आजचा कॅन्व्हास चार रंगांचे फराटे आणि गोंधळ एवढाच दिसतो. दुसर्‍याला त्यात कलाअनुभूती मिळत असेल आणि त्या दुसर्‍याकडे लाखो रूपये असतील तर तो विकत घेणारच ना.
तुमची अनुभूती सच्ची आणि दुसर्‍याची खोटी असं काही होत नाही.
रेखीव, रंगसंगती सांभाळत इत्यादी नियम कलेला लावायचे असतील तर कला कुठे उरली?

सच्च्या रितीने व्यक्त होणं हा कुठल्याही शुद्ध कलेचा(Pure Art.. not applied art) आत्मा असायला हवा. मग त्यात तंत्र काय वापरलं जातंय, कसं जातंय, विषय काय, रंगरेषांचे तथाकथित नियम पाळलेत की नाहीत इत्यादी दुय्यम ठरतं.

या सच्चेपणामुळेच १९व्या शतकातल्या गोया पासून १९८०'s मधल्या बास्किया पर्यंतचे अनेक लोक आजही भुरळ घालतात.

आता चित्रकलेबद्दल हे इथे का बोलायचं तर फोटोग्राफी हे तंत्र नंतर निर्माण झालं. पण शेवटी त्यातून मिळणारी गोष्ट ही एक चित्रच असते. फोटोग्राफी ही पण शेवटी द्विमित दृष्य कलाच आहे चित्रकलेसारखी.

त्याचा वापर करुन पैसा, नाव, संम्मान मिळवणे ही कला आहे. <<
प्रचंड असहमत.

विज्ञान.. नव्हे तंत्र. तंत्राचा वापर करून आपल्याला हवा तो परिणाम साधणारी दृष्य कलाकृती बनवणे ही कला आहे.
कलाकृती बनवताना पैसा, नाव आणि सन्मान ह्या गोष्टींचं गोल सेट करून बनवली गेली तर या तीन गोष्टी कधीच मिळत नाहीत. कलाकृतीचा प्रामाणिकपणा, कलावस्तू असणं यावर हे सगळं मिळणं न मिळणं आहे..

आणि मला धागा जसा समजलाय त्याप्रमाणे फोटोग्राफी, डिजिटल तंत्राचा वापर आणि कलाकृती म्हणून प्युरिटी हे मुद्दे चर्चेचे आहेत. पैसा, नाव आणि सन्मान इत्यादी नव्हेत.

तुम्ही वरती उदाहरण देताय ते उपयोजित कलेचे. (applied art). अनेक ग्राफिक डिझायनर्स वेगवेगळ्या पातळ्यांवर हे करतच असतात. उपयोजित कलांचा मूळ हेतूच ती विक्रीयोग्य कलावस्तू निर्माण करणे हा आहे. म्हणजेच ती उदरनिर्वाहाची कला असणं हा हेतू झालाच की.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

अक्षय पुर्णपात्रे's picture

14 Dec 2009 - 9:01 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री पाषाणभेद, पोस्ट-प्रोसेसिंग असले तरीही प्रकाशचित्रण एक कलाच आहे. कलेची विकिपीडियावरील व्याख्या पहा:

Art is the process or product of deliberately arranging elements in a way that appeals to the senses or emotions.

पोस्ट-प्रोसेसिंग हे फोटोग्राफरच्या प्रतिभेचे प्रतिबिंब आहे तेव्हा कलेचाच भाग (त्यातील बर्‍याच गोष्टी तांत्रिक असल्या तरी) आहे.

धनंजय आणि नीधपतैंचे प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत.

नीधप's picture

14 Dec 2009 - 9:12 am | नीधप

अक्षय,
मी एवढी जी डोकेफोड केली ती एका वाक्यात सोप्पी करून मांडलीस कि तू (कि तुम्ही?) . मला जमलं नसतं.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

विनायक रानडे's picture

14 Dec 2009 - 10:02 am | विनायक रानडे

वादग्रस्त नाव घेऊन उगाच कशाला हिंदू मुस्लिम भांडणं इथे आणायची आहेत?>>> रानडे मुस्लिम नाव घेतो म्हणजे हे होणार हे अपेक्षित होते. सोयिस्कर गैरसमजूत करणे, करवून देणे .... वगैरे.

"पोस्ट-प्रोसेसिंग हे फोटोग्राफरच्या प्रतिभेचे प्रतिबिंब आहे तेव्हा कलेचाच भाग (त्यातील बर्‍याच गोष्टी तांत्रिक असल्या तरी) आहे." पूर्ण सहमत, विषयाला धरून आहे. छान अक्षय पुर्णपात्रे.

>इंजिनीयर, डॉक्टर, फोटोग्राफर वगैरे मंडळी कलाकार गणले जात नाही< हे वाद घालणे हे आवडणारे म्हणतात, मी नाही. मी त्या वाक्याला ब्रॅकेट, प्रश्न चिन्ह टाकले नव्हते.

३ इंचाच्या विमान मॉडेलची मॅक्रो (मायक्रो नाही) ही फोटोग्राफी व ते चित्र अपेक्षित परिणाम साधण्याचे ते मॅनिप्युलेशन. ह्यात म्हटली तर कला नाहीतर पोटपूजा, नक्की काय ते ठरवण्याचा हक्क व्यक्ती/विचार/मत स्वातंत्र्यवाल्यांचा, मी फक्त उदाहरण दिले ते योग्य की नाही ते ठरवणारे ठरवतीलच. मला त्यांचा हात धरायचा नाही दोन्ही अर्थाने.

नीधप's picture

14 Dec 2009 - 10:59 am | नीधप

रानडे मुस्लिम नाव घेतो म्हणजे हे होणार हे अपेक्षित होते. सोयिस्कर गैरसमजूत करणे, करवून देणे .... वगैरे.<<
फारच वाईट मानसिकता आणि गॄहिते..
एमेफ हुसेन हे हिंदु मुस्लिम भांडणांसदर्भातले वादग्रस्त नाव आहे. तुम्ही रानडे आहात की कांबळे याने यात काहीही फरक पडत नाही.

माफ करा हा प्रतिसाद अवांतर झालाय पण अवांतर मुद्दे आणि गृहितके येऊ लागली की असं होतं...

>>ह्यात म्हटली तर कला नाहीतर पोटपूजा, नक्की काय ते ठरवण्याचा हक्क व्यक्ती/विचार/मत स्वातंत्र्यवाल्यांचा, मी फक्त उदाहरण दिले ते योग्य की नाही ते ठरवणारे ठरवतीलच. मला त्यांचा हात धरायचा नाही दोन्ही अर्थाने.<<
तुमचे आभार या परवानगीबद्दल. कला आणि पोटपूजा ह्या विरूद्धार्थी गोष्टी आहेत हे आजच नवीन कळले.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

चतुरंग's picture

14 Dec 2009 - 8:37 pm | चतुरंग

मला वाटते 'डिजिटल फोटोग्राफी कला की विज्ञान?' ह्या तुमच्या मूळ प्रश्नापासून चर्चा मधेमधे दूर गेलेली आहे. तरीही रंजक आहे त्यामुळे खूप काही बिघडले आहे असे वाटत नाही! :)
आता मूळ मुद्द्याकडे वळू. मुळात कला आणि शास्त्र हे पूर्णपणे वेगळे काढता येत नाहीत असे माझे मत आहे. उदा. फोटो तुम्ही का काढता? ह्या प्रश्नाचा विचार केलात तर काय दिसते? वरचा तुमच्या विमानाच्या मॉडेलचा फोटो घेऊ. ओमानी अधिकार्‍याला काय हवे आहे? तुम्ही काढलेला फोटो जेव्हा जाहिरातीत येईल तो बघून लोकांना असे वाटले पाहिजे "वा! मस्त. ह्या विमानातून आपण प्रवास करावा!" ह्यात कुठेही शास्त्र येत नाही. विमानाचे आकर्षक दिसणे, जाहिरात लोकांच्या डोल्यात भरणे हे होण्यासाठी जे काही करावे लागेल ती कला आहे. त्या मॉडेलवर लाईट, शेड कसा कुठून आला की त्याचा फोटो छान दिसेल, बॅकग्राऊंड काय असली म्हणजे विमान आकाशात असल्याचा भास निर्माण करता येईल ह्याची जाण म्हणजे कला.
आता शास्त्राचा भाग - हा फोटो घेताना कॅमेर्‍याचा कुठला मोड वापरावा? भिंग कुठले वापरावे? एक्सपोजर किती असावे? सॉफ्टवेअरचा वापर करुन ह्या फोटोत बदल करायचे झाले तर पुन्हा एकदा कला+शास्त्र ह्याचे मिश्रण आलेच. ह्यातल्या सर्व तांत्रिक बाबी म्हणजे शास्त्र - ह्यातले कौशल्य हे अनुभवानेच वाढत जाते. कला आणि शास्त्र ह्या दोन्ही बाबींचे योग्य मिश्रण म्हणजे हा मॉडेलचा फोटो. ह्या अर्थाने डॉक्टर, इंजिनिअर, फोटोग्राफर तसेच गायक, वादक चित्रकार ह्यांची प्रत्येकच गोष्ट ही शास्त्र आणि कलेचे मिश्रण असते. काही ठिकाणी शास्त्राचा भाग जास्त असेल काही ठिकाणी कलेचा.
(विज्ञान = विशेष + ज्ञान)

चतुरंग

नीधप's picture

14 Dec 2009 - 10:06 pm | नीधप

चतुरंग.. अ‍ॅण्डी वॉरहॉलच्या स्वयंचित्रामधे बरेच काही मुद्दे स्पष्ट होतायत.
मधेच खून, हत्या इत्यादी आल्यावर काहीच कळेनासं झालं.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

वाचक's picture

15 Dec 2009 - 3:35 am | वाचक

संवेदनांना आवाहन करणारा 'आउट्पुट' महत्त्वाचा, ती(च) कला(च)
बाकी सगळे शास्त्र - वेगवेगळ्या उपकरणांशी संबंधित.
कॅमेरा, फोटोशॉप = कुंचला, रंग, कॅनव्हास = उपकरणे (शास्त्र)
फोटो/चित्र कसे आले आहे, कसे दिसते आहे, आवडले/नावडले = कला :)

भटकंती अनलिमिटेड's picture

16 Dec 2009 - 12:46 am | भटकंती अनलिमिटेड

कुठलीही कला ही उपजत किंवा विकसित गुणांचा आविष्कार असतो. मग तो आविष्कार कुठल्या माध्यमातून व्यक्त केला आहे याने फरसा फरक पडत नाही. जरी फोटोग्राफी हे एक तंत्र उपयोजित कला असली तरी तिचा मूळ उद्देश हा भावना व्यक्त करणे हा आहे. कितीही प्रगत तंत्र असले तरी जर चौकट मांडणी (कॉंपोझिशन) आणि रंगाची समज जर एखाद्यात नसेल तर त्या तंत्राचा (मग ते कितीही भारी, अद्ययावत, किमती असले तरी) शून्य उपयोग. फोटोग्राफी (आणि चित्रकला) या दोहोंचे मूळ एकच असले तरी साधने भिन्न आहेत. आणि प्रत्येकावर हुकुमत मिळवण्यासाठी सारखीच मेहनत करावी लागते. जर चित्रकाराला एखद्या दृश्याचे चित्रण करायला अनेक तास लागत असतील तर फोटोग्राफरला मनाला हवी तशी फ्रेम मिळायला कित्येकदा खूप दूरचा प्रवास करावा लागू शकतो. किंवा रोजचेच एखादे दृश्य चित्रकार (किंवा छायाचित्रकार) एका वेगळ्या दृष्टीने मांडू शकतो.

फोटोग्राफर किंवा चित्रकार जेव्हा एखादी पाहिलेली घटना, व्यक्ती किंवा ठिकाण जसेच्या तसे आपल्या समोर साकारू शकते तेव्हाच ती कला खऱ्या अर्थाने यशस्वी ठरते. मग त्यासाठी चित्रकाराला विविध रंग आणि ब्रश वापरावे लागतील आणि फोटोग्राफरला अनेकविध कॅमेरे, लेन्स, डिजिटल संस्करणाची साधने इत्यादी. कारण जे डोळ्यांना दिसते त्याची प्रतिमा मेंदूशिवाय अन्य माध्यमावर जशीच्या तशी उमटवणे ही एक कला आहे. कारण डोळ्यांद्वारे येणाऱ्या संवेदना या एका क्षणाला २०,००० इतक्या असतात आणि मेंदूमध्ये त्याचे संस्करण होऊनच त्याचे त्रिमिती आभासी प्रतिमा तयार केली जाते त्याला आपण दृष्य असे म्हणतो. हेच दृश्य अन्य माध्यमावर उतरवण्यासाठी तसेच काहीसे संस्करण आवश्यक असते मग ते रंग-कुंचल्याच्या माध्यमातून असो किंवा मग कॅमेरा आणि अन्य प्रगत तंत्राद्वारे असो.

फोटोला डिजिटल न संस्करण करणे म्हणजे एखाद्या चित्रकाराला फक्त तीन मुलभूत रंग (लाल, हिरवा आणि निळा) देऊन चित्र काढायला लावण्यासारखे आहे. शेवटी कलाकाराला आनंद कुठल्या माध्यमातून मिळतो हे त्याने ठरवावे. माझ्यामते या दोन्हीही कलाच आहेत ज्यांचे माध्यम वेगवेगळे आहे.

-Pankaj भटकंती Unlimited
www.pankajz.com

नीधप's picture

16 Dec 2009 - 9:32 am | नीधप

खरंय..
तंत्र आणि कौशल्यालाच कला म्हणलं जात असल्याने हे गोंधळ उत्पन्न होतात की काय असं वाटतं.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

भटकंती अनलिमिटेड's picture

16 Dec 2009 - 10:45 am | भटकंती अनलिमिटेड

होय... तंत्र आणि कौशल्य हे कलेचेच (अनेकांपैकी) दोन भाग आहेत. चित्रकाराला ब्रशच्या निवडण्याचे योग्य तंत्र माहीत असावे लागते आणि ते वापरण्याचे तंत्रही अवगत असायला हवे. तसेच फोटोग्राफरलाही त्याच्या कॅमेराचे तंत्र अवगत असावे लागते आणि दिलेल्या प्रसंगी उपलब्ध तंत्रातून कुठले अचूक निवडावे याचे कौशल्य (उदा. शटर आणि अपेर्चर). पण फक्त तंत्र आणि कौशल्य यामुळेच कला परिपूर्ण होते असेही नाही. त्यासाठी उपजत किंवा विकसित कलात्मक दृष्टिकोनही (perspective) आवश्यक आहे.

-Pankaj भटकंती Unlimited
www.pankajz.com