त्या आठवणी

सुनिल पाटकर's picture
सुनिल पाटकर in काथ्याकूट
10 Dec 2009 - 10:15 pm
गाभा: 

बजाजने स्कुटर उत्पादन बंद केल्याची बातमी टिव्ही.वर पाहिली आणि आठवणींनी मन हेलावून गेले.येथे प्रश्न स्कुटर पूरता मर्यादित नव्हता.काळाच्या ओघात प्रत्येक नवी गोष्ट इतिहास बनून जाते.विकासाच्या लाटेत या गोष्टींच्या उरतात त्या फक्त आठवणी.काँलेजला स्कुटर वरुन येणारे सर,, त्याकाळची तरूंण पोरं... पाच पाच दिवस रेडिओवर ऐकली जाणारी काँमेंट्री..बिनाका गीतमाला आणि अमिन आयानीचा आवाज ऐकण्यासाठी बुधवारची वाट पाहाणारे अनेक जण, अँन्टीना फिरवून फिरवून टिव्ही.वरचा सिनेमा पाहाण्यासाठी चाललेली धडपड.. परदेशातून येणार्‍याकडे सोनिचि कँसेट ,नँशनलचा रेडिओ नाहितर सिटिझनचे घड्याळ आणण्यासाठी घातली जाणारी गळ..ती लिमलेटची गोळी... रावळगावचे चाँकलेट. फळीची बँट बनवून क्रिकेट खेळणे..खांद्यावर लटकणारे कापडी पिशवीचे दप्तर..दप्तरात लपवलेले जादुची लहान पुस्तकं ...दगडी पाटी आणि दगडी पेन्सिल ..त्यावर गुरुंजीचा मार खाऊन गिरवलेला श्रीगणेशा..
या सार्‍या आठवणी थोड्याफार फरकाने प्रत्येकाच्या आयुष्यातील.बजाजची स्कुटरही अशाच प्रकारची आठवण बनून राहणार आहे. आपल्याही जवळ असतील अशा काही गोड-कटु आठवणी.चला त्या एकमेकांजवळ शेअर करु या.....

प्रतिक्रिया

chipatakhdumdum's picture

10 Dec 2009 - 10:45 pm | chipatakhdumdum

इन्द्रजाल कोमिक्स- वेताळ, मेन्ड्रेक्स आणि फ्लेश गोर्डन ही मराठीतून भेटणारी मन्डळी....कुठे गेले ते मराठी अन्क?
सगळ लहानपण इतरसुद्धा पण या सुद्धा आणि चान्दोबा वर गेल. मात्र आठवणीन्चा मोठा भाग इन्द्रजाल कोमिक्सनी व्यापला आहे.

उच्चाराप्रमाणे लिहीता येत नाही, त्याबद्दल क्षमस्व

मराठे's picture

10 Dec 2009 - 11:43 pm | मराठे

मी दोन वर्षांपुर्वी अमेरिकेला आलो. त्यावेळेला एके ठिकाणी गराज सेल चालु होता. लोक भारतीयच होते. थोड्या वेळाने ते पण मराठीच असल्याचं कळलं. निघताना त्यांनी माझ्या मुलाला वाचायला म्हणून काही "चांदोबा" आणि "चंपक" चे अंक दिले. इतक्या वर्षांनंतर चांदोबा बघून मीच ते अधाशासारखे वाचून काढले. तो खरोखरच एक सुखद धक्का होता.
/मराठे.

Dhananjay Borgaonkar's picture

11 Dec 2009 - 12:41 pm | Dhananjay Borgaonkar

चालायचच साहेब..
आमचे आजोबा मुंबईच्या ट्रामची आठवण आली की अजुनही सेंटी होतात्..
ट्राम गेली लोकल आली..आता मेट्रो येत आहे..

उप्तती ही होतच रहाणार..

jaypal's picture

11 Dec 2009 - 12:56 pm | jaypal

बाजुला झाल्या शिवाय नव्याला जागा कशी मिळणार? ( याचा अर्थे जुनते सगळं भंगार अस नव्हे, ते तर आठवणितल सोनच आहे) बदल थोपउ शकत नाही आणि का थोपवावा?

मृत्युन्जय's picture

11 Dec 2009 - 2:04 pm | मृत्युन्जय

आजची मेट्रो उद्याचा इतिहास असेल. कदाचीत उद्या आपल्याला डेक्कन क्वीन नोस्टेल्जिक फीलिंग देउन जाईल.

satish kulkarni's picture

16 Dec 2009 - 6:00 pm | satish kulkarni

अजुनहि मिळतो... www.chandamama.com