मी आणि माझा "संत ज्ञानेश्वर"

प्राजु's picture
प्राजु in जनातलं, मनातलं
9 Mar 2008 - 2:12 am

काही दिवसांपूर्वी मला इप्रसारणवर स्वरसंध्या या कार्यक्रमात "संत ज्ञानेश्वर" या विषयावर कार्यक्रम करायचा होता. तसं पाहिलं तर आम्ही(आदरार्थी एकवचन) पुणे आकशवाणीवर अक्कल पाजळत होतो आणि शब्दांचे कारंजे उधळ होतो. पण तिथे होणारे कार्यक्रम हे केवळ बाल बुद्धिशी निगडीत असत. त्यामुळे "संत ज्ञानेश्वर" या सारख्या गंभिर विषयावर कधी बोलण्याची वेळ आली नाही. तसे इप्रसारणवर इतके दिवस मी केलेले कार्यक्रम म्हणजे गीतकार, संगितकार किंवा गायक , एखादा अभिनेता यांच्याशी संबंधित होते. पण अध्यात्माची जोड असेल असा कार्यक्रम मी केलेला नव्हता. तेव्हा हे शिवधनुष्या पेलायचे असा निर्णय मी घेतला.

माझ्या एकूणच लेखनाच्या शैलीकडे पाहून कोणालाही सांगितले तर पटणार नाही की आमच्या मातोश्री एक प्रख्यात लेखिका , कवयित्री आहेत. आणि ज्ञानेश्वरी सारख्या गहन विषयावर उत्तम प्रवचनही करतात आणि इतके असूनही आजतागायत मी तिच्या एकाही प्रवचनाला उपस्थिती लावू नये ..... याला म्हणतात करंटेपणा..! लोकांकडून ऐकायला मिळायचे की आई सुंदर बोलते ज्ञानेश्वरीवर.. असो. तर आता माझ्यापुढे प्रश्न होता ज्ञानेश्वरांबद्दल १ तास बोलता यावे इतकी माहिती कुठून आणायची?
शाळेत असताना एकदा वक्तृत्व स्पर्धेला विषय होता "संत ज्ञानेश्वर".. तेव्हा जोरदार भाषण करून पहिला नंबर मिळवला होता पण तेव्हा माझे वय वर्षे १२ होते. थोडे फार आठवत होते त्यातले. एकतर ज्ञानेश्वरांच्या जीवनातील प्रसंग जसेच्या तसे रंगवून सांगणे म्हणजे लोकांना जे माहिती आहे तेच पुन्हा सांगून त्याना पिळणे. आणि हे प्रसंग सगळ्यांनी सिनेमातून, प्रा. राम शेवाळकरांसारख्या प्रख्यात प्रवचनकाराकडून सरस वाणीत ऐकले असणार.. त्यामुळे माझ्या रटाळ वाणीतून ते मी सांगू लागले तर रेडिओ वरचा तो माझा शेवटचा कार्यक्रम असण्याची शक्यताच जास्ती. :(( त्यामुळे पहिल्या १० मिनिटांमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या जीवनातील ..त्यांच्या माता-पित्याची देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा घेणं, पाठिवर मांडे भाजलेला प्रसंग , रेड्यामुखी वेद वदवलेला आणि चांगदेव भेटीसाठी भिंत चालवलेला .. असे प्रसंग .. हे सगळे अगदी मन लावून लिहिले .. वा वा वा.. एकदम भारी झालं..

आता पुढे पं. हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेली आणि लतादिदी आणि आशाबाईंनी गायलेली एकूण ११ गाणी/अभंग मी निवडले. त्या गाण्यांचा अर्थ थोडा सांगायचा आणि ते गाण लावायचं... हे असंच मला करायचं होतं. पण त्यासाठी थोडीफार ज्ञानेश्वरी बद्दल वाचन असणे आवश्यक होते.. इथेच आडलं सगळं. आंतरजालावर शोधावे म्हणून गुगलेआझम्(गुगल सर्च) ला आमंत्रित केले. त्यावर बर्‍याच ज्ञानेश्वरि संदर्भात साईट्स मिळाल्या. पण हाय रे कर्मा...! सगळे विंग्रजी... पुन्हा घोडं आडलं. इन्स्टंटच्या जमान्यात हे सगळे वाचायचे आणि ते मराठीत.. तेही अध्यात्मिक भाषेत अनुवादीत करायचे म्हणजे... छे..छे..! मी इतिहासाबद्दल गाढा अभ्यास असणार्‍र्या प्रियाली ताईंना फोन केला. पण त्यांनी मला जो सल्ला दिला.. तो ऐकून मी आणि प्रियाली दोघीही हसायला लागलो. प्रियाली ताई म्हणाली "अगं, नमोगतावर आपले काका आहेत ना..त्यांचा ज्ञानेश्वरीवर भरपूर अभ्यास आहे.. त्यांना फोन कर." हे काका म्हणजे जगत् काका आहेत. ते तात्यांचेही काका आहेत.. आणि समस्त नमोगताच्या महिला सद्स्यांचेही. तर त्या काकांना मी फोन करणं म्हणजे माझ्या स्वतःच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्यासारखं होतं. तो विषय तिथेच राहिला. आमच्या मतोश्रींना फोन करून गप्पा झाल्यानंतर ज्ञानेश्वरीबद्दल थोडं सांग असं सांगणं म्हणजे १० डॉलरचे कॉलिंग कार्ड एका दिवसांत संपवणे.. कसे परवडावे??? तरीही मी फोन केलाच. आईला म्हणाले की, त्या गाण्यांबद्दल थोडे सांग आणि ज्ञानेश्वरीबद्दलही. तिचे उत्तर, " ज्ञानेश्वरीबद्दल प्रवचन करायला अख्खा दिवस सुद्धा पुरत नाही तिथे तुला १० मिनिटांत काय सांगू?" तरीही तिने २-३ गाण्यांचा जुजबी अर्थ सांगितला आणि म्हणाली," हे बघ, ती गाणी समोर ठेऊन.. पुन्हा पुन्हा वाच.. आणि मनापासून वाच.. तुला अर्थ कळू लागेल. आणि तू सुद्धा सुंदर कविता लिहितेस(मी फ्लॅट्च्...)तुला अर्थ नक्की समजेल..." म्हणजे आता १०-११ गाणी..प्रत्येक गाणे किमान ११ वेळेला वाचणे आले. इंन्स्टंटचे माझे ते स्वप्न पार धुळीला मिळाले...

पण आता मी ठरवले की या गाण्यांचा अर्थ अगदी नीट समजून घ्यायचा. आणि आईने जो जुजबी अर्थ सांगितला होता त्या अनुषंगाने विचार करत ती गाणी वाचू लागले. हळू हळू अर्थ उलगडत होता. मी त्या गाण्यांच्या अभ्यासात इतकी गढून गेले कि... बाकी सुद्धा वाचण्यासारखे बरेच काही असते हेही विसरून गेले. सलग ३ दिवस.. गाणं वाचायचं प्रत्येक कडव्याचा पहिल्यांदा लागलेला अर्थ लिहून काढायचा.. पुन्हा ३-४ वाचना नंतर लागलेला अर्थ आणि पहिला अर्थ यात पुन्हा थोडा गोंधळ.. असे चालू होते. आणि..........

एका रात्री अचानक.. संत ज्ञानेश्वर आले. मला म्हणाले, "प्राजक्ते(मुक्ते सारखं ),........ अगं रडू नको.. इतकी गोंधळून जाऊ नको. मांडे भाजण्यासाठी मुक्ता अशीच रडत होती पण शेवटी तिला जे हवे होते ते तिला करता आलेच.. " मी उठले..मी कुठे आहे ते पाहिलं ...बेडवरच होते(नशिब!). हे नक्की काय होतं , स्वप्न की भास? झोप उडाली. लिहायला बसले. आणि यावेळि समोर होतं "पसायदान".. अचानक प्रा.राम शेवाळकरांचे पसायदानावरील प्रवचन कोण्या एका मैत्रिणीच्या घरी चकाट्या पिटतांना बॅकग्राऊंडला कॅसेट प्लेअरवर चालू होते ते आठवले. थोडे फार आठवले... आणि त्यावर लिहितांना पुढे पुढे.. बहुतेक संत ज्ञानेश्वरच माझ्या हातून लिहित आहेत की काय असा भास होऊ लागला. सकाळी नवरा उठला. शनिवार होता .. सुट्टी होती. मला म्हणाला "खायला काय करणार आहेस?".. एरवी शनिवार्-रविवार महाराष्ट्रीयन अन्नाला "नो" (नवर्‍याला आवडत असून सुद्धा) म्हणणारी मी म्हणाले ,"तुला काय हवं सांग ..पोहे करू की उप्पीट??" नवरा फक्त बेशुद्ध पडायचा बाकी होता. मला म्हणाला.. " नक्की काय होतंय आपल्या घरांत? हे असं ?" मी ," जो जे वांछिल, तो ते लाहो." .. मुलाला पसारा घातल्याबद्दल रागावणारी मी, त्याने तुकडे तुकडे केलेले कागद हसत मुखाने आवरत होते.."आई, तू माझ्यावर रागवली नाहीस?" मुलाचा प्रश्न. "अरे, तू लहान आहेस.. तू आता नाही पसारा घालणार तर कधी?".. मी. मुलगा काहितरी विपरीत घडल्याप्रमाणे माझ्याकडे आणि माझ्या आवरण्याकडे बघू लागला. तो संपूर्ण दिवस असा अजिबात न रागवता, न चिडता गेला. काहिअतरी वेगळं निश्चित झालं होतं. मी विचार करत बसले. माझी अवस्था संजय दत्तच्या मुन्नाभाई सारखी झाली. जळीस्थली काष्ठीपाषाणी मला संत ज्ञानेश्वर दिसू लागले. वेळ मिळाला की, कानडावू विठ्ठलू, मोगरा फुलला, अवचिता परिमळू, अरे अरे ज्ञाना झालासि.. अशी गाणी आणि त्यांचे अर्थ समोर दिसू लागत. लागलीच मी लिहायला घेत असे. असे करता करता १०-११ गाणी , प्रत्येक गाणे १०-११ ... छे.. २०-२५ वेळेला वाचून.. अर्थ लिहून झाली. आणि माझं स्क्रिप्ट तयार झालं. हुश्स्श....!

आता रेकॉर्डिंग करायचे होते. ते चालू केले. आधी गाण्यांचा क्रम लावला. त्यानुसार प्रत्येक गाण्याचा अर्थ आणि मग ते गाणे. असे होत सधारण १५-१६ दिवसांत पूर्ण अभ्यास करून तो कार्यक्रम अगदि मला हवा तसा तयार झाला. अध्यात्मिक वातावरणांत असलेल्या माझ्या घराने निश्वास टाकला. कार्यक्रम इप्रसारणला पाठवून दिला. मला आता थोडं हलकं वाटू लागलं.

त्यानंतरच्या लगेच च्या शनिवारी नवरा म्हणाला "मस्त बटाटे पोहे कर नाश्त्याला". मी लगेचच नाक मुरडून म्हणाले ," ह्ह्या.. काहीतरी काय? मी आता मस्त गार्लिक टोस्ट आणि पास्ता इन व्हाइट सॉस करणार आहे. विकेंड्ला कसले पोहे खातोस?" नवरा समजला..'बाईसाहेब मूळ पदावर आल्या अहेत'. मुलाने मला विचारले ," आई, तुला मी मस्त पेंटिंग करून दाखवू?" मी लगेच" कर पण खाली कार्पेटवर पसारा नाही घालायचा, ते रंगीत पाणी सांडेल.. मला चालणार नाही" त्यालाही समजले..ही खरी आई!

माझा कार्यक्रम प्रसारीत झाला. माझ्या आईनेही ऐकला.. आई चक्क ,"किती सुंदर बोललिस तू या गाण्यांवर!" असेहि म्हणाली. इप्रसारणला आलेले फिडबॅकही चांगले होते असे समजले.

एकूण काय मी केलेला माझा "संत ज्ञानेश्वर" कार्यक्रम.... चांगल्या रितिने पार पडला... :))

- प्राजु

प्रतिक्रिया

इनोबा म्हणे's picture

9 Mar 2008 - 2:37 am | इनोबा म्हणे

कार्यक्रम मी स्वतः ऐकला आहे.खरेच खुप छन झाला होता.विशेष म्हणजे जी गाणी आजकाल ऐकायला ही मिळत नाहीत ती गोड गाणी ऐकताना मन प्रसन्न झाले.

तू सुद्धा सुंदर कविता लिहितेस(मी फ्लॅट्च्...)
आपल्या मातोश्रींच्या शब्दावर आमचे शिक्कामोर्तब समजा. तुमच्या चारोळ्यांतून तुम्ही ते आगोदरच सिद्ध केले आहे.

बाकी लेख खुपच छान झाला. लगे रहो.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

स्वाती राजेश's picture

9 Mar 2008 - 2:37 am | स्वाती राजेश

काय मस्त लिहिले आहेस गं...
बहुतेक संत ज्ञानेश्वरच माझ्या हातून लिहित आहेत की काय असा भास होऊ लागला
काय मस्त धमाल आली असेल घरात्...याचे वर्णन भारीच केले आहे.:)))
बाकी मस्तच्..बिचारा नवरा आणि मुलगा म्हणत असेल असे आईचे आध्यात्मारवरचे कार्यक्रम रोज असतील तर काय बहार होईल.....:)))

इनोबा म्हणे's picture

9 Mar 2008 - 2:39 am | इनोबा म्हणे

बिचारा नवरा आणि मुलगा म्हणत असेल असे आईचे आध्यात्मारवरचे कार्यक्रम रोज असतील तर काय बहार होईल.....:)))
हे बाकी बरोबर बोललात.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

प्राजु's picture

9 Mar 2008 - 5:32 am | प्राजु

ठेविले अनंते तैसेची रहावे... अशी स्थिती झाली होती माझी.

आवांतर : माझी मैत्रिण आणि मिपाची सदस्या सुवर्णमयी हिने सांगितल्यामुळे हा अनुभव शब्दबद्ध करण्यास प्रवृत्त झाले.
- (सर्वव्यापी)प्राजु

व्यंकट's picture

9 Mar 2008 - 2:46 am | व्यंकट

वा! प्राजुताई. जी. ए., कुरुंदकर, खांडेकर वैगेरे वाद आम्हास कळत नाहीत. आमुच्या मख्ख चेहऱ्यावर ज्या लेखनामुळे भाव येतील त्यास आम्ही उत्तम लेखन म्हणतो.

विसोबा खेचर's picture

9 Mar 2008 - 6:26 am | विसोबा खेचर

प्राजू,

लेख छानच झाला आहे. भाषा अगदी सहजसोपी आहे. अजूनही अश्याच काही आठवणी येऊ देत..

संत ज्ञानेश्वरांची तुझ्यावर नेहमी अशीच किरपा राहो हीच सदिच्छा..! :)

अवांतर - १

प्रियाली ताई म्हणाली "अगं, नमोगतावर आपले काका आहेत ना..त्यांचा ज्ञानेश्वरीवर भरपूर अभ्यास आहे.. त्यांना फोन कर." हे काका म्हणजे जगत् काका आहेत. ते तात्यांचेही काका आहेत.. आणि समस्त नमोगताच्या महिला सद्स्यांचेही.

हा हा हा, लय भारी! :)
बाय द वे, आपली प्रियालीताई म्हण्जे अंमळ वात्रटच आहे बघ! :))

तर त्या काकांना मी फोन करणं म्हणजे माझ्या स्वतःच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्यासारखं होतं.

हे बाकी सही बोल्लीस. नायतर ज्ञानेश्वरी ऐवजी तुला दुसर्‍याच्या कविता चोरून, नांव बदलून कुणा तिसर्‍यावरच राग काढण्यासाठी चौथ्या संस्थळावर कश्या टाकाव्यात याचंच अधिक ज्ञान मिळालं असतं! :)

अवांतर - २

इतर काही थोर आणि दिग्गज संस्थळांच्या सोबतीनेच आम्हा मिपाकरांनाही या लेखाच्या "अन्-एडिटेड(!) आवृत्ती"चा लाभ मिळाला याचे समाधान वाटते! :)

अवांतर - ३

प्राजूने कृपया इतर संस्थळावर जाऊन,

"कृपया या लेखाची "अन्-एडिटेड आवृत्ती" मिपावर वाचावी!"

अशी प्रतिसादवजा सूचना करावी! :))

ही सूचना जरी तिथे राहिली तरी मराठी संस्थळं पुष्कळ सुधारली असंच म्हणायला हवं! :)

तात्या.

प्रियाली's picture

15 Aug 2008 - 7:19 am | प्रियाली

देवाशप्पथ!! या लेखाने जाम मजा उडवलेली दिसते. याकाळात मी सर्व संकेतस्थळांवरून तात्पुरती रजा घेतल्याने मनोगतावर किंवा मिसळपावावर हा लेख आला होता याची खबर मला आत्ताच लागली. लेख वाचायचा चुकला होता.

प्राजु, तू पण ग्रेट आहेस.

प्रियाली ताई म्हणाली "अगं, नमोगतावर आपले काका आहेत ना..त्यांचा ज्ञानेश्वरीवर भरपूर अभ्यास आहे.. त्यांना फोन कर." हे काका म्हणजे जगत् काका आहेत. ते तात्यांचेही काका आहेत.. आणि समस्त नमोगताच्या महिला सद्स्यांचेही.

=)) =)) =)) =)) =))

हे तू मनोगतावर छापलंस.... हाहाहाहाहाहा!!!! धन्य आहेस आणि मला वाटत होतं की मीच वात्रट! काकांनी काय हाणलं होतं ते वाचायला पाहिजे होतं. मला काहीच माहित नाही यातलं. आज लेख वर आला तरी मी तो अद्याप पूर्ण वाचला नाही. सहज म्हणून उघडला आणि वरची वाक्ये वाचून खुर्चीवरून खाली पडायची बाकी होते.

मनोगतावर आता या लेखाचं काय झालं होतं ते शोधायला हवं.

असो, बाकीचा लेख वाचून वेगळी प्रतिक्रिया देईन.

सध्या
हसून हसून बेजार
प्रियाली.

सुधीर कांदळकर's picture

9 Mar 2008 - 6:49 am | सुधीर कांदळकर

आपले गद्य पहिल्यांदा वाचले. अतिशय प्रसन्न, मनमोकळी आणि अकृत्रिम शैली. मजा आली.

असेच विविध विषया/अनुभवा वरील गद्य येऊ द्यात.

धन्यवाद. शुभेच्छा.

विसोबा खेचर's picture

9 Mar 2008 - 8:29 am | विसोबा खेचर

बरं का प्राजू,

आमच्या काकांनी तुला नमोगतावर मस्त हाणलाय! दे आता त्यांना उत्तर.. :))

विनायक काका, हम तुम्हारे साथ है!

विनायक काकाकी जय हो! :)

आपला,
(विनायककाकांचा नंबर एकचा भिकारचोट पुतण्या!) तात्या.

:)

प्रमोद देव's picture

9 Mar 2008 - 9:00 am | प्रमोद देव

प्राजु काय मस्त लिहिलं आहेस? खरे तर लिहिले आहेस असे म्हणण्यापेक्षा साक्षात समोर बसून कथन केलेस असे म्हणणे जास्त संयुक्तिक होईल.
शनिवार होता .. सुट्टी होती. मला म्हणाला "खायला काय करणार आहेस?".. एरवी शनिवार्-रविवार महाराष्ट्रीयन अन्नाला "नो" (नवर्‍याला आवडत असून सुद्धा) म्हणणारी मी म्हणाले ,"तुला काय हवं सांग ..पोहे करू की उप्पीट??" नवरा फक्त बेशुद्ध पडायचा बाकी होता. मला म्हणाला.. " नक्की काय होतंय आपल्या घरांत? हे असं ?" मी ," जो जे वांछिल, तो ते लाहो." .. मुलाला पसारा घातल्याबद्दल रागावणारी मी, त्याने तुकडे तुकडे केलेले कागद हसत मुखाने आवरत होते.."आई, तू माझ्यावर रागवली नाहीस?" मुलाचा प्रश्न. "अरे, तू लहान आहेस.. तू आता नाही पसारा घालणार तर कधी?".. मी. मुलगा काहितरी विपरीत घडल्याप्रमाणे माझ्याकडे आणि माझ्या आवरण्याकडे बघू लागला.

हे तर एकदम मस्त!

अवांतरः हा लेख मनोगतावर मला तरी दिसला नाही. उडवला की काय?

प्राजु's picture

9 Mar 2008 - 9:18 am | प्राजु

काय होता "हाणलेला"??
कारण नमोगतावर माझा लेख दिसत नाहिये. काढून टाकला असावा बहुतेक.. साधारण ही कल्पना होतीच मला...
- (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर's picture

9 Mar 2008 - 9:31 am | विसोबा खेचर

काय होता "हाणलेला"??

हम्म, जाऊ द्या आता... ते जर मी तुला सांगितलं तर उगाच तुम्हा दोघांमध्ये भांडणं होतील!

कारण नमोगतावर माझा लेख दिसत नाहिये. काढून टाकला असावा बहुतेक..

हम्म!

मिपावर,

"प्राजू, तुला विनायककाकाने नमोगतावर हाणला आहे. दे आता उत्तर!"

असा माझा प्रतिसाद पडल्या पडल्या पुढच्या दोन तीन मिनिटातच तो लेख नमोगतावरून गायब झाला! :)

बघितलंस! तात्याच्या लेखनाचा नमोगताबाहेर राहूनही नमोगतावर केवढा इफेक्ट पडतो ते!! :))

साधारण ही कल्पना होतीच मला...

ह्म्म! जिंदादिली मॅटर्स!! ती कशाशी खातात हे कळलं नाही की असं होतं!

बरं झालं! तुलाही स्वत:चं घर सोडून इतर ठिकाणावर गेल्यावर मोठ्या प्रामाणिकपणे टाकलेला, पूर्णपणे विनोदी, खुसखुशीत शैली असलेला, कुणालाही दुखावण्याच्या हेतूने न लिहिलेला एक प्रांजळ लेख उडवला गेल्यावर कसं वाटतं हे यातून तरी कळावं असं वाटतं!

तात्या.

कोलबेर's picture

9 Mar 2008 - 10:05 am | कोलबेर

मी इतिहासाबद्दल गाढा अभ्यास असणार्‍र्या प्रियाली ताईंना फोन केला. पण त्यांनी मला जो सल्ला दिला.. तो ऐकून मी आणि प्रियाली दोघीही हसायला लागलो. प्रियाली ताई म्हणाली "अगं, नमोगतावर आपले काका आहेत ना..त्यांचा ज्ञानेश्वरीवर भरपूर अभ्यास आहे.. त्यांना फोन कर." हे काका म्हणजे जगत् काका आहेत. ते तात्यांचेही काका आहेत.. आणि समस्त नमोगताच्या महिला सद्स्यांचेही. तर त्या काकांना मी फोन करणं म्हणजे माझ्या स्वतःच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्यासारखं होतं.

अर्थातच ह्या विषयी होता...पण वरील मजकुर मनोगतावर बराच कमी केलेला होता. (लेखिकेने की प्रशासकाने ते ठाउक नाही!)

प्राजु's picture

9 Mar 2008 - 10:34 am | प्राजु

पण वरील मजकुर मनोगतावर बराच कमी केलेला होता. (लेखिकेने की प्रशासकाने ते ठाउक नाही!)
हो.. तो मजकूर मीच कमी केला आहे. कारण मिपा इतकी जिंदादिली आणि मोकळे वातावरण बाकी कुठे आहे???

- (सर्वव्यापी)प्राजु

कोलबेर's picture

9 Mar 2008 - 10:40 am | कोलबेर

हीच 'जिंदादीली' आणि 'मोकळे वातावरण' वापरुन सांगतो.. वरील मजकुर अनावश्यक होता.. बाकी लेख छान जमला आहे!

प्राजु's picture

9 Mar 2008 - 10:43 am | प्राजु

धन्यवाद.. आपला मैत्रीपूर्ण आणि हक्काने दिलेला सल्ला आवडला. पुढील लिखाणाचे वेळी मी याची दक्षता घेईन.
पुन्हा एकदा धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर's picture

9 Mar 2008 - 11:13 am | विसोबा खेचर

हीच 'जिंदादीली' आणि 'मोकळे वातावरण' वापरुन सांगतो.. वरील मजकुर अनावश्यक होता..

असहमत आहे. माझ्या मते त्या मजकूरात आक्षेपार्ह असं काहीच नव्हतं!

अर्थात, अंतरजालावर नव्याने वावरणार्‍यांना त्या दोन चार ओळींचा संबंध लागला नसता हे मलाही कबूल आहे परंतु आमच्यासारख्या जुन्याजाणत्यांची मात्र त्या मजकुरामुळे दोन घटका करमणूक झाली! :)

बेसनलाडू's picture

10 Mar 2008 - 2:40 am | बेसनलाडू

कोलबेरपंतांशी सहमत आहे.
लेख छान झाला आहे.
(वाचक)बेसनलाडू

प्राजु's picture

9 Mar 2008 - 9:34 am | प्राजु

अजिबात नाही वाटलं. कारण इथेच इतका उदंड जिंदादिल प्रतिसाद मिळतो आहे.. की बाकी ठिकाणी जाण्याची गरजच नाही..

- (सर्वव्यापी)प्राजु

सृष्टीलावण्या's picture

9 Mar 2008 - 9:53 am | सृष्टीलावण्या

हे सारस्वताचे गोड,
तुम्हीची लावले झाड,
आता अवधानामृते वाढ,
सिंपोनी किजो..

>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Mar 2008 - 10:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन वाचून मजा आली, लेखन झकास झाले आहे, हे सांगणे न लगे. विशेषतः संत ज्ञानेशवर मला म्हणाले पासून पुढे.....
आम्हाला कधी ऐकायला मिळणार आपले आकाशवाणीवर सादर केलेले कार्यक्रम कोणास ठाऊक ? :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज's picture

9 Mar 2008 - 12:34 pm | सहज

वाचुन खूप मजा आली. (पण इतरांपेक्षा बहुतेक तात्यांना थोडी जास्त मजा आली असावी हा अंदाज ;-) ) तात्या ह. घ्या. हो नाही तर वरुण प्रमाणे माझे पण नाते जोडाल तुमच्या प्रिय काकांशी (ते काळे की गोरे हे देखील मी पाहीले नाही हो :-))

प्रा. डॉ. म्हणाल्याप्रमाणे ह्या कार्यक्रमाचे प्रसारण/पुनःप्रसारण कधी होणार त्याची माहीती असल्यास इथे द्यावी.

असेच अजुन लेख येउ देत.

अवांतर - इप्रसारणचा दुवा -

छोटा डॉन's picture

9 Mar 2008 - 7:10 pm | छोटा डॉन

खरचं चागली शैली आहे लिहण्याची . वाचून मज्जा आली. कार्यक्रम मी काही ऐकला नाही पण जर पुन्हा "ऐकण्याची सोय असेल" तर जरून ऐकेन ....
पण एकंदरीत लेखनावरून कार्यक्रमाच्या तयारीसाठी किती कष्ट केले आहेत याची कल्पना आली. आता येवढे कष्ट केल्यावर व "आई भवानीचा आशिर्वाद" असल्यावर कार्यक्रम चांगला होणार यात शंका नाही.
वास्तविक पाहता एकदा कार्यक्रम बसवण्यासाठी व तो यशस्वी रित्या सादर करण्यासाठी किती तयारी करावी लागते व ती करताना आपली किती "लागते" याची मला पूर्ण कल्पना आहे. [ कालिजात दूसरे काय केले हो ?] पण येवढे सर्व कष्ट करून कार्य सिद्धीस नेल्यावर जे मानसीक समाधान लाभते त्याला तोड नाही, "सांगा सूख म्हणजे काय असते?" या प्रश्नाचे उत्तर म्हणजे कार्यक्रमानातर मिळणारे आत्मिक समाधान असे म्हणायला हरकत नाही ....
बाकी तयारी करताना आपण केलेले वाचन, चर्चा व त्यात पूर्णपणे गढून गेल्याव्र व पूर्णपणे "ज्ञानेश्वरमय" झाल्यावर प्रत्यक्ष "ज्ञानेश्वरांचे" आपल्या स्वप्नात येणे हे वाचून मला "मुन्नाभाई व गांधीजींची" आठवण झाली.....
तेव्हा हा काही "केमिकल लोच्या" नसावा अशी मी "माऊलींच्या चरणी प्रार्थना " करतो .... ह. घ्या ....

अवांतर : चारोळीपेक्षा व 'तसल्या नजरा" मधल्या लेखाच्या प्रतिसादात 'मुलींची बाजू दमदार पणे मांडणार्‍या प्रतिसादाशिवाय", मी वाचलेले हे आपले "पहिलेच गद्य लिखाण". मस्त आहे.... चालू द्या ........

छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या "http://chhota-don.blogspot.com/ "]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

धनंजय's picture

9 Mar 2008 - 7:31 pm | धनंजय

आवडले

विद्याधर३१'s picture

9 Mar 2008 - 9:20 pm | विद्याधर३१

त्यानंतरच्या लगेच च्या शनिवारी नवरा म्हणाला "मस्त बटाटे पोहे कर नाश्त्याला". मी लगेचच नाक मुरडून म्हणाले ," ह्ह्या.. काहीतरी काय? मी आता मस्त गार्लिक टोस्ट आणि पास्ता इन व्हाइट सॉस करणार आहे. विकेंड्ला कसले पोहे खातोस?" नवरा समजला..'बाईसाहेब मूळ पदावर आल्या अहेत'. मुलाने मला विचारले ," आई, तुला मी मस्त पेंटिंग करून दाखवू?" मी लगेच" कर पण खाली कार्पेटवर पसारा नाही घालायचा, ते रंगीत पाणी सांडेल.. मला चालणार नाही" त्यालाही समजले..ही खरी आई!

हे तर एकदम मस्तच....

विद्याधर

केशवसुमार's picture

9 Mar 2008 - 11:20 pm | केशवसुमार

प्राजुताई,
लेख उत्तम आहे..
अवांतरः हा कार्यकम जाला वर कुठे एकता येईल किंवा या प्रोग्रामची एमपी ३ आहे का?
असे काही कार्यक्रम असतील तर आधी मिपावर जाहिर करावे ही विनंती...
(चांगल्या कार्यक्रमाला मुकलेला)केशवसुमार..

सर्वसाक्षी's picture

10 Mar 2008 - 3:14 pm | सर्वसाक्षी

लेखाप्रमाणे कार्यक्रमही चांगलाच झाला असेल.

धमाल मुलगा's picture

10 Mar 2008 - 6:01 pm | धमाल मुलगा

छान लिहिले आहेस प्राजुताई.
लेखनाची ओघवती शैली, नर्मविनोदी खुसखुशीत जागा...सगळ॑ कस॑ त॑तोत॑त बसल॑ आहे.
(मरतोय आता मी...फार मोठ्या समिक्षकाच्या तोर्‍यात प्रतिसाद दिलाय खरा, पण ..आता माझी काही धडगत नाही!!!)

बाकी, का कोण जाणे,

आई, तू माझ्यावर रागवली नाहीस?" मुलाचा प्रश्न. "अरे, तू लहान आहेस.. तू आता नाही पसारा घालणार तर कधी?".. मी. मुलगा काहितरी विपरीत घडल्याप्रमाणे माझ्याकडे आणि माझ्या आवरण्याकडे बघू लागला.

हे वाचल्यान॑तर त्याला न बघताही माझ्या डोळ्यासमोर त्याचा भाबडा निरागस आणि प्रच॑ड गो॑धळलेला चेहरा आला.बिच्चारा :)

अवा॑तर : हे बर॑य बुवा, मिपागडाच्या गडकर्‍या॑च्या स्वप्नात कोण कोण येतात, तात्या॑च्या स्वप्नात भाईकाका काय, प्राजुताईच्या स्वप्नात साक्षात माऊली काय...आम्ही कसे एव्हढे कपाळकर॑टे कोण जाणे! बिछान्यात पडलो की ठार! सकाळी गजर झाल्यावर रोजचा पडणारा पहिला प्रश्नः "मै कहा॑ हू॑?"

छोटा डॉन's picture

10 Mar 2008 - 6:12 pm | छोटा डॉन

" सकाळी गजर झाल्यावर रोजचा पडणारा पहिला प्रश्नः "मै कहा॑ हू॑?"
बरोबर आहे. हा प्रश्न पडतोच .... पण कधी ?
कारण हा प्रश्न पडण्याचे स्वाभाविक कारण म्हणजे आदल्या रात्री झालेली "फुल्टू टांगा पल्टी पार्टी ".

तेव्हा हा प्रश्न दररोज पडतो की फक्त विकांतानंतर ???

छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या "http://chhota-don.blogspot.com/ "]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

धमाल मुलगा's picture

10 Mar 2008 - 6:19 pm | धमाल मुलगा

गप रे बाबा...गप जरा...
अशा गोष्टी असल्या धाग्यावर विचारू नयेत रे. माऊली॑च॑ नाव आहे ह्यावर, इथ॑ कुठे नाही ते काढतोयस?
असो, हे प्रभो, ह्या अज्ञानी बालकास कृपया क्षमा कर, कारण तो काय करतो आहे हे त्याला ठाऊक नाही...आमेन...तथास्तु...शुभ॑ भवतु....सर्व धर्म समभाव झि॑दाबाद!

तेव्हा हा प्रश्न दररोज पडतो की फक्त विकांतानंतर ???

दररोज. का कोण जाणे...पण होत॑ बुवा अस॑. विका॑तान॑तर उलट मी लवकर उठतो (जर साजरा केला असेल तर...घशाला कोरड फार पडते हो).

छोटा डॉन's picture

10 Mar 2008 - 6:24 pm | छोटा डॉन

"जर साजरा केला असेल तर...घशाला कोरड फार पडते हो)."
हा हा हा . हे अगदी खरं आहे ....

अवांतर : विषयाला सोडून प्रतिसाद द्यायचे मनात नव्हते पण राहवल नाही ....

अज्ञानी बालक छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या "http://chhota-don.blogspot.com/ "]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

चतुरंग's picture

10 Mar 2008 - 8:06 pm | चतुरंग

प्राजु, वर इ-प्रसारणचा दुवा मिळालाय त्यावर हा कार्यक्रम ऐकता येईल का?

चतुरंग

प्राजु's picture

10 Mar 2008 - 8:14 pm | प्राजु

हा कर्यक्रम पुनःप्रसारण करावे लागेल. तुम्ही जर इप्रसारणला तसे लिहिलेत तर होईल त्याचे पुनःप्रसारण.

- (सर्वव्यापी)प्राजु

धनंजय's picture

10 Mar 2008 - 8:31 pm | धनंजय

मी ई-प्रसारणला विनंती करीन - त्यासाठी सदस्यत्व घ्यावे लागते का?

नाहीतर बघा - मिपा ची लॉबी ई-प्रसारणावर ई-विरोपांचा पाऊस पाडेल!

प्राजु's picture

10 Mar 2008 - 8:37 pm | प्राजु

नाही हो.. सदस्यत्व नाही लागत. त्या साईट वर जाऊन कॉन्टॅक्ट अस मध्ये जाऊन लिहा फक्त.

- (सर्वव्यापी)प्राजु

सुवर्णमयी's picture

10 Mar 2008 - 10:34 pm | सुवर्णमयी

प्रत्येक लेख, कार्यक्रम , कविता यामागे काही तयारी असते. ती प्रोसेस सुद्धा महत्त्वाची आहे असे मला वाटते. त्याविषयी जरुर कुठेतरी लेखन व्हावे, त्याची नोंद घ्यावी असे माझे मत आहे. त्यामुळे हा आढावा उत्तमच झाला.

प्राजु चा हा कार्यक्रम ऐकायला मला आवडेल नोव्ह- मिड फेब्रुवारी माझेही इप्रसारणाचे कार्यक्रम चुकले आहेत. त्यांना तुझा पुन्हा प्रक्षेपित करा असे मी पण सांगेन.
प्राजु,
तुम्हाला एखाद्याची मदत होईल असे वाटते प्रत्यक्षात काही कारणाने तसे होत नाही असा माझासुद्धा अनुभव आहे. पण ज्यांनी मदत केली ते फक्त ध्यानात ठेऊन पुढे गेले तर मनाला कमी त्रास होतो. कित्येकदा अनेक जण भेटतात की जे स्वत्:चा वेळ देऊन दुसर्‍याला मदत करतात. आता अगदी परवाच सुरंगीची फुले कशी असतात ते विचारल्यावर धनंजय यांनी मला व्य नि ने चित्र पाठवले. ते गुगलवर शोधा असे सुद्धा सांगू शकले असते. :)मला अशी मंड्ळी अधिक भेटतात. मी सुदैवी आहे असे म्हणेन.
तात्यासुद्धा मी काही लिहीले (दुसरीकडे तरी सुद्धा) त्याची दखल घेतात. मी लिहिते रहावे या करता त्यांचे शेरे सुद्धा महत्त्वाचे असतात ! आणि कित्येकदा दखल न घेण्याने सुद्धा मोठी मदत करणारे सुद्धा आहेत!:)(
.

विसोबा खेचर's picture

12 Mar 2008 - 8:27 am | विसोबा खेचर

तात्यासुद्धा मी काही लिहीले (दुसरीकडे तरी सुद्धा) त्याची दखल घेतात. मी लिहिते रहावे या करता त्यांचे शेरे सुद्धा महत्त्वाचे असतात !

बरं बरं! :)

काय करणार बाबा? जी माणसं माझ्या खास मर्जीतली आहेत असं मी मानतो, ती नेहमी लिहिती कशी राहतील हे पाहायला मला आवडतं! :)

असो..

आपला,
(सुवर्णमयीवर मनोगतापासून मर्जी असलेला) तात्या.

अभिज्ञ's picture

10 Mar 2008 - 9:03 pm | अभिज्ञ

प्राजुताई.
फारच सुरे़ख लिहिले आहे.
वाचून फार मजा आलि.
मुलाने मला विचारले ," आई, तुला मी मस्त पेंटिंग करून दाखवू?" मी लगेच" कर पण खाली कार्पेटवर पसारा नाही घालायचा, ते रंगीत पाणी सांडेल.. मला चालणार नाही" त्यालाही समजले..ही खरी आई!

हे तर जब-या आहे.

अप्रतिम

अबब

सर्किट's picture

10 Mar 2008 - 10:53 pm | सर्किट (not verified)

प्राजु,

छानच लिहिले आहेस. व्यक्तिगत उल्लेखामुळे "तिकडे" काटछाट झाली असावी. त्याचे फारसे मनाला वाईट वाटून घेऊ नकोस.

माउलींचा संचार झाल्यावर स्वतःच्या पाठीवरच मांडे भाजले नाहीस, हे बरे झाले. (आमच्या काकांत असा माउलीचा संचार झाला, की भिंती चालवतात, पुतण्याकडून विडंबने वदवतात, काकूंच्या सर्व पाककृती पाठीवरच शिजवतात.)

असो, इप्रसारण वर ऐकायला हवा कार्यक्रम.

- सर्किट

विसोबा खेचर's picture

11 Mar 2008 - 12:09 am | विसोबा खेचर

माउलींचा संचार झाल्यावर स्वतःच्या पाठीवरच मांडे भाजले नाहीस, हे बरे झाले. (आमच्या काकांत असा माउलीचा संचार झाला, की भिंती चालवतात, पुतण्याकडून विडंबने वदवतात, काकूंच्या सर्व पाककृती पाठीवरच शिजवतात.)

हा हा हा! सर्कीटच्या या हलकट प्रतिसादाची मी वाटच पाहात होतो! :))

आपला,
(काकांचा नादान पुतण्या!) तात्या.

सर्किट's picture

11 Mar 2008 - 2:27 am | सर्किट (not verified)

हा हा हा! सर्कीटच्या या हलकट प्रतिसादाची मी वाटच पाहात होतो! :))

हलकट म्हण की आणखी काही. मात्र बाण काय अचूक बसला आहे, वा ! भाउबंदकी सुरू झाली बघ पुन्हा !

- (धनुर्धारी) सर्किट

बेसनलाडू's picture

11 Mar 2008 - 3:29 am | बेसनलाडू

शांत पाण्यावर दगड मारण्याचा धंदा सगळेच कधी ना कधी करतातच. काही गंमत म्हणून तर काही खाज म्हणून :) मिसळपावात पडलेल्या माशाही फरसाणातले/मक्याच्या चिवड्यातले बेदाणे म्हणून खाल्ल्या गेल्या तर संपलेच :)
(आस्वादक)बेसनलाडू

सर्किट's picture

11 Mar 2008 - 3:32 am | सर्किट (not verified)

िसळपावात पडलेल्या माशाही फरसाणातले/मक्याच्या चिवड्यातले बेदाणे म्हणून खाल्ल्या गेल्या तर संपलेच :)

अमृततुल्य चहाची चव जशी चहावाल्याने गाळणी म्हणून वापरलेल्या कळकट कापडामुळे येते, तशी मिसळीची रंगतही त्यात पडलेल्या माशांमुळे अधिक, हे देखील विचारात घ्यायला हवे.

बिसलेरी पाण्याच्या पाणीपुर्‍यांची चव अगदीच थर्ड क्लास असते, हा आमचा व्यक्तिगत अनुभव आहे.

त्यामुळेच हल्ली बिसलेरीच्या पाणीपुर्‍या आम्ही फक्त वाचनमात्र ठेवल्या आहेत.

- सर्किट

बेसनलाडू's picture

11 Mar 2008 - 3:35 am | बेसनलाडू

म्हणजे खर्‍या चवदारपणाचे गमक कळले !
(तरीच इथल्या विडंबनांतून पोटदुखी, गोळ्या घेणे वगैरे दिसून येत असते :))
(निरोगी)बेसनलाडू

कोलबेर's picture

11 Mar 2008 - 3:42 am | कोलबेर

पोटदुखी दिसुन येणारे हेच ते विडंबन ना?.. काय आहे, आपला तो तात्या..सॉरी बाब्या.. दुसर्‍याचं ते कार्टं..चालायचंच!!
तात्याश्री हलके घ्या हं!!

संजय अभ्यंकर's picture

10 Mar 2008 - 11:14 pm | संजय अभ्यंकर

प्राजु,

तु सादर केलेली ज्ञानेश्वरी आम्हाला कशी ऐकता येईल, हे कृपया सांग.
मला ती ऐकायची फार इच्छा आहे.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

प्राजु's picture

11 Mar 2008 - 12:04 am | प्राजु

आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.

सुवर्णमयी, आपण सांगितलेले आगदी योग्य आहे. मदत ही कोठून कशी मिळेल हे नाही सांगता येणार. माझ्या याच कार्यक्रमासाठी, कानडावू विठ्ठलू हे गाणं मला मिपाच्या अन्नपूर्णा स्वाती राजेश हिने पाठवले. तेही शोधून. कारण आंतरजालावर मिळाले ते आशाबाईंच्या आवाजात नव्हते. म्हणून स्वातीने कोठून तरी हे मला मिळवून दिले. मी तिचे भार मानून तिचा अपमान नाही करणार. आभार परक्यांचे मानायचे असतात.. घारातल्या माणसांचे नाही.

सर्किट,
माउलींचा संचार झाल्यावर स्वतःच्या पाठीवरच मांडे भाजले नाहीस, हे बरे झाले. (आमच्या काकांत असा माउलीचा संचार झाला, की भिंती चालवतात, पुतण्याकडून विडंबने वदवतात, काकूंच्या सर्व पाककृती पाठीवरच शिजवतात.)

हे वाचून खूपच हसले मी. तुम्ही भारी लिहिता राव...

- (सर्वव्यापी)प्राजु

भडकमकर मास्तर's picture

16 Mar 2008 - 4:36 pm | भडकमकर मास्तर

एका रात्री अचानक.. संत ज्ञानेश्वर आले. मला म्हणाले, "प्राजक्ते(मुक्ते सारखं ),........ अगं रडू नको.. इतकी गोंधळून जाऊ नको. आणि त्यावर लिहितांना पुढे पुढे..

...बहुतेक संत ज्ञानेश्वरच माझ्या हातून लिहित आहेत की काय असा भास होऊ लागला.

ज्ञानेश्वरीवर आजपर्यंत अनेक थोर थोर लोकांनी लिहिले असेल परंतु असे विलक्षण अनुभव घेणार्‍या बहुधा आपणच .... साक्षात ज्ञानेश्वर आपल्या हातातून लिहित आहेत असा भास होणे ,काय गंमत आहे??
आपल्या अध्यात्मिक उंचीला माझा मनोमन प्रणाम....

गोट्या's picture

16 Mar 2008 - 5:30 pm | गोट्या (not verified)

वा ! विनोदी व भाषा अगदी सहजसोपी आहे.... असेच लिहीत राहा.

विचारणा : तुमचे हे ई-प्रसारण कधी अपडेट होते ? कारण आज १६ मार्च आहे पण तुम्ही संपादन केलेल्या व मधुरा जींनी वाचलेल्या बातम्या तर मागील महीण्यातील आहेत खास करुन (चेंडूफळीची बातमी व तारे जमीं पर ची बातमी )

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

इसम's picture

16 Mar 2008 - 8:29 pm | इसम

प्राजू,

अवचिता परिमळू...

मनावर जास्त परिणाम कोण करतय, लता-ह्रदयनाथ की ज्ञानेश्वर असा प्रश्न साहजिकच पडावा असे हे गाणे. इतक्या वर्षांपूर्वी रेकॉडींग करतांना एकमेकांमध्ये मिसळून जाणारे, (जणु) प्रतिध्वनी वापरायची गरज ह्रदयनाथांना याच गाण्यात का भासावी असा प्रश्न तुला पडला का? खूप पूर्वी; ज्ञानेवरांची ही ओवी त्यांचे नाथ सम्प्रदायाशी असलेले नाते स्वच्छपणे दाखवते असे कुठेसे वाचल्याचे स्मरते. म्हणूनच हे गाणे सुरू करण्याआधी तु काय विवेचन केले होतेस हे जाणून घ्यावेसे वाटते. जमल्यास लिहिशील का?

"विश्वाचे आर्त माझ्यामनी प्रकटले" हे दुसरे असेच गाणे, तु निवडले होते का?

-एक इसम

प्राजु's picture

16 Mar 2008 - 11:00 pm | प्राजु

सगळेच अभंग असे आहेत की, हे अभंग माऊलींच्या लेखणीमुळे सुंदर आहेत की, पं. हृदयनाथांच्या संगितामुळे की, लतादिदींच्या स्वरामुळे हे सांगणे कठीण आहे. सगळ्याच परमोत्तम गोष्टी एकत्र आल्यावर जे स्वर्गसुख मिळते तेच हे असावे बहुतेक. आणि म्हणूनच अमुक एका गाण्याच्या वेळी मी जास्त भारावून गेले असं काही नाही झालं.. प्रत्येक गाण्यासठी मी तितकेच कष्ट घेतले.. मी विवेचन नक्की लिहिन.
पण तरिही मला समजलेले पसायदान हे जास्ती मनावर ठसले माझ्या.
तेही लिहिन मी इथे
पण कोणी मला प्रवचन करते असे म्हणू नये.
- (सर्वव्यापी)प्राजु

इसम's picture

16 Mar 2008 - 11:18 pm | इसम

घोर घोडचूक झाली का?

अवचिता परिमळू - संगीत हृदयनाथांच की श्रीनिवास खळ्यांचे?

(स्वगत)च्यायला जास्त झाली काय?

-एक इसम

प्राजु's picture

16 Mar 2008 - 11:22 pm | प्राजु

पं. हृदयनाथ मंगेशकरच.. हा दुवा..
- (सर्वव्यापी)प्राजु

वडापाव's picture

16 Mar 2008 - 9:38 pm | वडापाव

छान लेख आहे.
आवडला.
अजून लेख प्रकाशित करा.

(अवांतर वाचक)वडापाव

प्राजु's picture

16 Mar 2008 - 10:13 pm | प्राजु

धन्यवाद.

इसम,
"विश्वाचे आर्त माझ्यामनी प्रकटले" हे दुसरे असेच गाणे, तु निवडले होते का?

हो, हे गाणे सुद्धा होते त्या कार्यक्रमात.

गोट्या,
इप्रसारण वर आठवड्याच्या कार्यक्रमाचे शेड्युल असते. आणि दर रविवारि रात्री बदलते.

- (सर्वव्यापी)प्राजु

इसम's picture

16 Mar 2008 - 10:39 pm | इसम

प्राजु,

उर्वरित दोन प्रश्न अनुत्तरितच राहिले.

-एक इसम

शितल's picture

15 Aug 2008 - 2:46 am | शितल

प्राजु,
लेख अगदी आता ही बाई करेल ? असा प्रश्न पडेल असा. :)
तु़झा नवरोबा आणि लेकरू म्हणत असेल आईच्यात संत ज्ञानेश्वर नेहमीच संचारू देत. ;)
तु़झा कार्यक्रम ऐकायला आवडेल. :)

अविनाश ओगले's picture

15 Aug 2008 - 8:47 pm | अविनाश ओगले

ज्ञानेश्वरी येथे उपलब्ध...
मराठी स्तोत्रे, आरत्या, धार्मिक साहित्य येथे उपल्ब्ध

बहुगुणी's picture

16 Aug 2008 - 12:19 am | बहुगुणी

http://www.khapre.org/portal/url/mr/books/dnyaneshari/index.aspx

कंस आणि प्रश्नचिन्हे चुकून टंकित झाली असावीत.

संदीप चित्रे's picture

15 Aug 2008 - 9:38 pm | संदीप चित्रे

प्राजु... मूळपदावर आलीस बरं झालं ... नाहीतर म्हटलं आता तुझ्याशी टवाळक्या करत बोलता येत नाही बहुतेक :)
जोक्स अपार्ट - इप्रसारण ऐकतो लवकरच