मैत्री करण्यासाठी नसावं
लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो
फ़क्त मैत्रीचा आदर
काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.
मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?
कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात
या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला
मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला
आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं
प्रतिक्रिया
9 Mar 2008 - 7:57 am | सुधीर कांदळकर
काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
हे आणि
या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला
मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला
हे पण खरे आहे.
9 Mar 2008 - 3:15 pm | विसोबा खेचर
सदर साहित्य आपलेच आहे किंवा कसे या बाबत कृपया २४ तासांच्या आत खुलासा करावा. काही सभासदांनी आपण फक्त इथे इ पत्रातून पुढे ढकललेले साहित्य प्रकाशित करता आणि तसा नामोल्लेखही करत नाही अशी तक्रार केली आहे.
२४ तासांच्या आत आपल्याकडून खुलासा न आल्यास नाईलाजास्तव आपण प्रकाशित केलेले सर्व साहित्य अप्रकाशित करावे लागेल...
तात्या.