भरली वांगी

श्रद्धा.'s picture
श्रद्धा. in पाककृती
1 Dec 2009 - 12:21 pm

साहित्य : ६ छोटी वांगी , १ वाटी भाजलेले शेंगदाणे, ६ लसुण पाकळ्या, चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, कांदा लसुण चटणी २ चमचे, मीठ चवीप्रमाणे, फ़ोडणीसाठी तेल आणि फ़ोडणीचे साहित्य...

कृती : प्रथम वांग्याची देठे थोडी काढुन टाकावीत.. म्हणजे साधारण वांग्याला वर अर्धा इंच देठ ठेवले तरी चालतील. वांग्याला खालील बाजुने (+) अशा आकारात चिरा द्याव्यात आणि वांगी पाण्यात बुडवुन ठेवावीत. मिक्सर मधे शेंगदाणे,लसुण, थोडी कोथिंबीर,चटणी, मीठ घालुन जरा जाडसर काढावे. आता पाण्यातुन वांगी बाहेर काढुन घ्यावीत. मिक्सर मधुन काढलेला मसाला वांग्यामधे भरावा. जाड बुडाच्या कढईमधे फ़ोडणी साठी तेल घालुन त्यात मोहरी,जिरे,हिंग,हळद घालुन वांगी परतुन घ्यावीत आणि २ वेळा वाफ़ देउन घ्यावी. मग थोडे पाणी घालुन वर ताट ठेवुन शिजायला ठेवावीत. ही वांगी अपल्याला जशी हवी त्या पद्धतीने शिजवुन घ्यावीत. कारण कुणाला जास्त शिजलेली आवडतात तर कुणाला साधारण कमी शिजलेली. वांगी शिजल्यावर त्यावर चिरलेली कोथिंबीर घालुन भाकरी बरोबर खायला घ्यावी.

टीप : याबरोबर सायीचे दही असेल तर खुप छान लागते....

वांग्याला जर रस नको असेल तर एकदा फ़ोडणीत वाफ़वलेली वांगी काढुन जसे आपन मोदक चाळणीवर वाफ़वुन घेतो त्याप्रमाणे वाफ़वुन घ्यावीत... अशा भाजीला तेल जास्त सुटत नाही आणि फ़ोडणी मधे पण तेल वाचते.

प्रतिक्रिया

दशानन's picture

1 Dec 2009 - 12:39 pm | दशानन

गतप्राण झालो.

*****

मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

गणपा's picture

1 Dec 2009 - 1:05 pm | गणपा

माझा आवडता पदार्थ..

आशिष सुर्वे's picture

1 Dec 2009 - 1:09 pm | आशिष सुर्वे

दुपारच्या येळेला हा कसला हो अन्याय!!
प्वाटात कालवाकालव झाली ओ!

झक्कास्स..
-
कोकणी फणस

jaypal's picture

1 Dec 2009 - 1:10 pm | jaypal

चुलीवरील तव्यातुन ताटात आलेली शाळु(ज्वारी)ची भाकरी. स्वर्गीय सुख ते हेच.
कृष्णाकाठच्या वांग्याची चवच न्यारी. आम्हाला ती लै लै प्यारी.

सारिका's picture

1 Dec 2009 - 1:25 pm | सारिका

mazi aai hyach padhatine bhaji banavate . Khoop divas zale ase
wange khale nahi :-(

zakas picture and zakas bhaji

अवलिया's picture

1 Dec 2009 - 1:37 pm | अवलिया

छान !

--अवलिया

परिकथेतील राजकुमार's picture

1 Dec 2009 - 4:26 pm | परिकथेतील राजकुमार

वांगो वांगो वांगो !!! ज ब र्‍या च.

©º°¨¨°º© परालिया ©º°¨¨°º©
आमचे राज्य

सुनील's picture

1 Dec 2009 - 4:49 pm | सुनील

मस्त.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

शार्दुल's picture

1 Dec 2009 - 4:53 pm | शार्दुल

नेहा

मेघवेडा's picture

1 Dec 2009 - 5:20 pm | मेघवेडा

चचलो!!!

भरली वांगी म्हणजे जीव की प्राण हो आमचा!!

अप्रतिम!!!

सूहास's picture

1 Dec 2009 - 6:49 pm | सूहास (not verified)

चटकदार !!

सू हा स...

विसोबा खेचर's picture

1 Dec 2009 - 7:42 pm | विसोबा खेचर

बहोत अच्छे! :)

स्वाती२'s picture

1 Dec 2009 - 7:47 pm | स्वाती२

मस्त! भरली वांगी आमच्याकडे सोडे घालून करतात. ही पाकृ झटपट आणि चविष्ट आहे तेव्हा नक्की करुन बघणार.

प्रभो's picture

1 Dec 2009 - 8:48 pm | प्रभो

मस्त

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

शब्देय's picture

1 Dec 2009 - 8:57 pm | शब्देय

मस्त जमलीये!!

भरली वांगी, बाजरीची भाकरी, पातीचा कांदा, आणि आंबटसर दही ..
आ हा हा!!!

श्रीयुत संतोष जोशी's picture

2 Dec 2009 - 8:10 am | श्रीयुत संतोष जोशी

बरोबर तांदुळाची गरमागरम भाकरी आणि दाण्याची तिखट चटणी.
लै भारी .
भरली वांगी म्हण्जे आमची एकदम आवडती.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.