शुन्य प्रहर म्हणजे काय?

अमृतांजन's picture
अमृतांजन in काथ्याकूट
27 Nov 2009 - 11:50 am
गाभा: 

शुन्य प्रहर म्हणजे काय? तो (की ती?) किती वाजता येतो (येते)? ही भानगड काये?

लोकसभेसारखा विधानसभेत का नसतो? (की असतो पण त्या प्रहराला कोणीच उपस्थित नसतं?)

विधानसभेत नसेल तर संबंधित अधिकारी इकडे लक्ष देतील काय?

प्रतिक्रिया

अवलिया's picture

27 Nov 2009 - 12:06 pm | अवलिया

संसद विधानसभेतील माहित नाही, पण असले धागे मिपावर येतात तेव्हा त्याला शु्न्य प्रहर चालु आहे असे म्हणतात.

--अवलिया

अमृतांजन's picture

27 Nov 2009 - 1:23 pm | अमृतांजन

मी १२ वाजण्याच्या सुमारास हा प्रश्न म्हणूनच उपस्थित केला होता. मिपाच्या शुन्य प्रहरात- द्या टाळी!

टारझन's picture

27 Nov 2009 - 12:11 pm | टारझन

केवळ सुरेख नृत्य .
देशांतराचं थ्रील थ्रील म्हणतात ते हेच !
धर्म म्हणजे काय ? हे आपल्या ह्या सर्वांग सुंदर धाग्यातुन मला कळले !!
बराच जुणा इतिहास चाळून माहितीपुर्ण लेख लिहीण्याच्या आपल्या हातोटीला प्रणाम.
खरे मुक्तक काय असते ? हे शिकायचे असल्यास ह्यापेक्षा उत्तम उदाहरण ते काय ?
आपले मत व्यक्त करून चौकशीद्वारे शिफारस करण्याचा एक उत्कृष्ठ नमुणा हॄदयाला भिडलाच
अचूक माध्यमवेध घेतलात बघा तुम्ही
आपला सल्ला पटला तो आपल्या ह्या प्रश्नोत्तरे मालिका लेखातून , ह्याची आम्हाला भावी आयुष्यात फार मोलाची मदत होईल ह्यात वाद च नाही.
हा उपक्रम आम्ही विरंगुळा म्हणून राबवूच राबवू.

अमृतांजन नेहमीच असे झणझणीत अंजन घालणारे लेख लिहून आम्हाला प्रभावित करत अलेले आहेत. मी त्यांना सादर प्रणाम करतो.

- टारझन

अवलिया's picture

27 Nov 2009 - 12:16 pm | अवलिया

वा ! वा ! छान ! छान !

टारझनरावांना सादर प्रणाम !!

--अवलिया

विजुभाऊ's picture

27 Nov 2009 - 1:26 pm | विजुभाऊ

अवलीयाचे प्रतिसाद हे काम करतात

अमृतांजन's picture

27 Nov 2009 - 12:58 pm | अमृतांजन

टारझन ला मागल्या आठवड्यात दोन-तील गुगल्या टाकून बीट केल्यावर तो स्कोअर सेटल करणार हे माहितीच होते. :-)
मस्त समीक्षा केलीस टाऱ्या.

अवलियांनी असे इतके प्रतिसाद का दिले कळले नाही. साद दिली की प्रति-साद येते ह्या नियमाप्रमाणे एक-दोन "ओ" आला असता तर सामान्य वाटलं असतं. [इतक्या "ओ" एको-व्हॅली तून ऐकू येतात.] तरीही त्यांचा उत्साह पाहून गहीवरुन आले.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Nov 2009 - 12:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काय हो अमृतांजन काका,

१. आजकाल शाळेत नागरिकशास्त्र शिकवत नाहीत का?
२. आजकाल गुगल काही लोकांपुरतंच मर्यादित आहे का?
हे आणि हे पण घ्या, वाचा आणि मग असले तीनोळींचे धागे काढा!

आणि हो, ० हा आकडा शब्दात शून्य असा लिहीतात, शुन्य असा नाही.

अदिती

निखिलराव's picture

27 Nov 2009 - 12:30 pm | निखिलराव

ईथे शुन्य प्रहर नाही प्रणाम प्रहर चालु आहे.
चला द्या ड्बल.........

नितीनमहाजन's picture

27 Nov 2009 - 12:32 pm | नितीनमहाजन

शून्य प्रहर येथे वाचा.

नितीन

अमृतांजन's picture

27 Nov 2009 - 1:19 pm | अमृतांजन

खालील फ्रेज छान आहेत. इतर ठिकाणी वापरता येतील.

१. the hour at which a planned, especially military operation is timed to begin"; "a crucial moment";
२ "a time set for the beginning of an attack'; "a decisive or critical time";
३ "a time when a vital decision or decisive change in the course of events is impending; crisis; the time set as a basis for reckoning the time of day"

विनायक प्रभू's picture

27 Nov 2009 - 12:35 pm | विनायक प्रभू

१."प्रहार" झाल्यानंतरच्या वेळेला शुन्य प्रहर म्हणतात.
२. खुप टुन्न झाल्यानंतरच्या वेळेला सुद्धा शुन्य प्रहर म्हणतात.

अमृतांजन's picture

27 Nov 2009 - 1:03 pm | अमृतांजन

>>>खुप टुन्न झाल्यानंतरच्या वेळेला सुद्धा शुन्य प्रहर म्हणतात.

:-) पण हे असं रोज करता येतं?

टारझन's picture

27 Nov 2009 - 1:08 pm | टारझन

असं दर आठवड्याला सरासरी ३ वेळा करता येते असं पिडां काका म्हणालेले मागे कधीतरी ;)

विनायक प्रभू's picture

27 Nov 2009 - 2:29 pm | विनायक प्रभू

असे रोज करता येते.
रोज करायची ताकद असेल तर.

निखिल देशपांडे's picture

27 Nov 2009 - 12:43 pm | निखिल देशपांडे

ओ काका
तुमचा माहीती पुर्ण धागा आवडला
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!