व्हेजिटेबल पुलाव

श्रीयुत संतोष जोशी's picture
श्रीयुत संतोष जोशी in पाककृती
27 Nov 2009 - 9:58 am

साहित्य :
१/२ कि. बासमती तांदुळ्, साजूक तूप ३ चमचे , काजू .
अख्खा मसाला ( लवंग,हि.वेलची,मसाला वेलची,दालचिनी,तमालपत्र ) मीठ , साखर , आलं लसूण पेस्ट ,
लिंबाचा रस , केशरी रंग , चेरी , संत्र , मोसंब , वेलची केळं.
भाज्या : फ्लावर ( लहान फुले काढणे ) ,फरसबी ( उभी कापणे ), गाजर ( लांबट तुकडे ), बटाटा ( लांबट तुकडे ) मटार ,

कृती :
तांदुळ धुवून चाळणीत निथळत ठेवावे.

फ्लावर्,फरसबी,गाजर व मटार शिजवून घ्यावे.

बटाटा व काजू तळून घ्यावा . बटाटा व काजूवर थोडे लाल तिखट व मीठ शिंपडावे.

एका पातेल्यात तूप गरम करून त्यात सर्व अख्खा मसाला टाकून तो तडतडला की तांदुळाच्या दुप्पट
पाणी घालून उकळवावे.पाणी उकळत असताना त्यात चवीप्रमाणे मीठ , साखर , आलं लसूण पेस्ट व लिंबाचा रस घालावा. नंतर भिजवलेले तांदूळ घालून भात शिजवून घ्यावा.
भात तयार झाल्यावर दुस-या पातेल्यात भात आणि भाज्यांचे थर लावून सर्वात वरच्या थरावर फळं आणि काजू घालून सर्व्ह करावे.

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

27 Nov 2009 - 10:10 am | मदनबाण

श्रीयुत संतोष जोशी महोदय... सकाळी सकाळी अशा पाकृ वाचण्यास लयं म्हणजी लयं तर्रांस्स्स व्हतो बघा... ;)

मदनबाण.....

"Life is the flower for which love is the honey."
Victor Hugo

ब्रिटिश टिंग्या's picture

27 Nov 2009 - 10:55 am | ब्रिटिश टिंग्या

हे आमचे श्रीयुत संतोष जोशी! ह्यांच्या पाककृतीवर आमचा फार जीव!

- टिंग्या

अवलिया's picture

27 Nov 2009 - 11:07 am | अवलिया

मेलो ! वारलो ! खपलो !

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

गणपा's picture

27 Nov 2009 - 11:27 am | गणपा

वाह, संतोष मस्तच.
विनंती. जर तो शेवटचा फोटो जरा मोठा करता आला तर पहाना.

शाहरुख's picture

27 Nov 2009 - 12:02 pm | शाहरुख

माझा आळस आता गेला आहे..अजून कुणाची काही फर्माइश ?

गणपा's picture

27 Nov 2009 - 11:43 am | गणपा

डप्रकाटाआ

jaypal's picture

27 Nov 2009 - 11:57 am | jaypal

आज लगेच फर्माईश केली पण.
अश्याच सहज , सुंदर रेशीप्या येउद्यात आम्ही पण तयारीचे आहोत.
____________________________________________________
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

समंजस's picture

27 Nov 2009 - 12:09 pm | समंजस

झक्कास पाककृती जोशीबुवा :)

टारझन's picture

27 Nov 2009 - 12:17 pm | टारझन

शब्द संपले !
श्रीयुत संतोष , तू ही एक उत्तम सुगरण्या आहेस हे ठाऊक नव्हतं :)

- टारझन

श्रीयुत संतोष जोशी's picture

27 Nov 2009 - 3:08 pm | श्रीयुत संतोष जोशी

सर्वांना अनेक धन्यवाद.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

विसोबा खेचर's picture

27 Nov 2009 - 7:19 pm | विसोबा खेचर

छान रे..

सहज's picture

28 Nov 2009 - 6:46 pm | सहज

मस्त दिसतोय. केला पाहीजे.

>फ्लावर्,फरसबी,गाजर व मटार शिजवून घ्यावे.

पुलाव खाताना ह्या भाज्या फार ब्लॅन्ड (??) तर नाही ना लागणार?

लवंगी's picture

28 Nov 2009 - 8:45 pm | लवंगी

अगदि पौष्टिक दिसतोय पुलाव..

प्रभो's picture

29 Nov 2009 - 9:16 pm | प्रभो

मस्त...

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

श्रद्धा.'s picture

29 Nov 2009 - 9:31 pm | श्रद्धा.

संतोष............ पुलावा मस्तच...