भारत सरकारने भ्रमण्-ध्वनि सेवा पुरवणारयांना आदेश दिले आहेत कि त्यांनि ज्या ग्राहकांकडे अवैध "आंतर्-राष्ट्रिय भ्रमण्-ध्वनि संच ओळख क्रमांक" (आय्.एम्.इ.आय्.) आहेत किंवा असे क्रमांकच ज्यांकडे नाहित त्यांचि सेवा ३० नोवेंबर २००९ वेळ :- २४:०० नंतर तत्काळ बंद करावि.
राष्ट्रिय सुरक्षिततेच्या द्रुष्टिने अतिशय महत्वाचे असे हे धोरण आहे
असतो तरि काय हा आय्.एम्.इ.आय्. क्रमांक ?
हा १५ किंवा १७ अंकि क्रमांक भ्रमण्-ध्वनि चि ओळख असते (वाहनांना जसे क्रमांक असतात तसेच वरुन शोधुन काढ्तात अगदि तस्सेच)
प्रत्येक केल्या जाणारया कौल बरोबर हा क्रमांक सेवा पुरवठादाराकडे प्रदर्शित होत असतो.
जी.एस्.एम. सुविधा पुरविणार्यांचि अग्रणी संसथा ह्या क्रमांकांचि माहिति साठवुन ठेवते.
ह्याचा ऊपयोग कसा होतो ?
तूमचा संच चोरला गेल्यास तपास यंत्रणा सेवा पुरवठादाराकडुन ह्या क्रमांकाच्या आधारे चोराचा माग काढु शकतात. २६/११ च्या भ्याड हल्ल्यानंतर ह्याच क्रमांकाचा आधारे तपास यंत्रणा अतिरेक्यानि कुठुन संच विकत घेतले ते शोधु शकल्या.
तुमच्या संचाच्या आंतर्-राष्ट्रिय भ्रमण्-ध्वनि संच ओळख क्रमांकाचि वैधता कशि पडताळाल?
ह्याकरिता आधि तुम्हाला तुमचा आंतर्-राष्ट्रिय भ्रमण्-ध्वनि संच ओळख क्रमांक माहित असायला हवा.
त्याकरिता तुमचा संचावर टाइप करा *#06#
आता प्रदर्शित झालेला क्रमांक 53232 ह्या क्रमांकावर पाठ्वून द्या.
तुमचा क्रमांक वैध असेल तर ‘Success’ असा प्रतिसाद येइल.
तुमचा क्रमांक अवैध असेल तर ‘Invalid IMEI’ असा प्रतिसाद येइल.
क्रमांक अवैध असेल ह्याचा अर्थ तुमचा संच निरुपयोगि झाला का?
नाहि!!!
तुम्हि जि.आय्.आय. द्वारे रु. १९९ भरुन तुमच्या संचासाठि नविन क्रमांक घेउ शकता. हा भारत सरकारने प्रोत्साहित केलेला उपक्रम आहे.
http://www.ica-ind.org/index.html
http://www.msai.in/FAQ/GII_FAQ.pdf
http://www.msai.in/listofcentre.php
प्रतिक्रिया
26 Nov 2009 - 10:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
उपयुक्त माहिती.
किंचित खडूसपणा: २४:०० म्हणत नाहीत! ३० नोव्हेंबरला २३:५९:५९ नंतर १ डिसेंबर येईल, आणि तेव्हा वेळ असेल ००:००:००
अदिती
26 Nov 2009 - 10:33 pm | विचित्र विर
किंचित खडूसपणा: २४:०० म्हणत नाहीत! ३० नोव्हेंबरला २३:५९:५९ नंतर १ डिसेंबर येईल, आणि तेव्हा वेळ असेल ००:००:००
माझा घड्याळात तर ००:००:०० हेहि कधिच दिसले नाहित @)
26 Nov 2009 - 11:02 pm | टारझन
आघाऊपणा : मग २४:०० दिसतात काय आपल्या घड्याळात ? आहो रेल्वेचं घड्याळ पहा .. ००:०० ने सुरू होतं :)
पण छाण आणि माहितीपुर्ण लेखा बद्दल आभार ! बर्याच शंका दुर झाल्याने आभारी आहे.
- (महाभारतातला विचित्र विर्य) गटारझन
27 Nov 2009 - 7:28 am | Nile
=)) =))
आता कळलं दोष कुठाय ते! ;) ;)
27 Nov 2009 - 9:12 am | विजुभाऊ
माझा घड्याळात तर ००:००:०० हेहि कधिच दिसले नाहित
त्यावेळी कोणतेही रंगीत सोनेरी पाणी पान न करता नीट जागे राहून पहा.
27 Nov 2009 - 11:46 am | ज्ञानेश...
काट्यांचे घड्याळ असेल त्यांचे, म्हणून नसेल दिसले. ;)
26 Nov 2009 - 10:33 pm | बिपिन कार्यकर्ते
अतिशय उपयुक्त माहिती. धन्यवाद.
बिपिन कार्यकर्ते
27 Nov 2009 - 12:54 am | मी-सौरभ
:)
सौरभ
27 Nov 2009 - 2:26 am | शाहरुख
चांगली माहिती..
आय्.एम्.इ.आय्. क्रमांक फक्त फोनलाच नव्हे तर जी. एस. एम. जाळ्यावर वापरल्या जाणार्या कोणत्याही डिव्हाईसला असतो जसे की डेटा कार्डस...त्यांची वैधता एस.एम.एस. ने तपासता येईल का ते बघावे लागेल, पण बहुतेक त्या कार्डवरून एस.एम.एस. पाठवण्याची सोय असते.
अवैध आय्.एम्.इ.आय्. वाले मोबाईल फोन फक्त चायनिजच आहेत काय ?
27 Nov 2009 - 2:43 am | चतुरंग
ही डेडलाईन बर्याचवेळा वाढवत वाढवत आता पुन्हा ३० नोवेंबरला सेट केलेली दिसते.
चीनमध्ये मोबाईल फोनचे ग्रे मार्केट फार प्रचंड प्रमाणात आहे. हा दुवा बघा. चिनी ग्रे मार्केट मधून ४३% पेक्षा जास्त फोन्स निर्यात होतात. अनेक बड्या कंपन्या ह्या मार्केटमुळे हैराण झालेल्या आहेत.
अनेक मोबाईल कंपन्यांचे हँडसेट्स चीनमध्ये असेंबल होतात. त्या फोनची डिझाईन्स चोरुन डुप्लिकेट फोन्स बनवणार्यांना विकणे हा एक फार मोठा धंदा आहे. इतर ठिकाणी ग्रे मार्केट जवळपास नाहीच असे म्हटले तरी चालेल.
चतुरंग
27 Nov 2009 - 12:26 pm | अरुण मनोहर
आणखी एक उपयुक्त माहीती खालीलप्रमाणे-
आय एम ई आय क्रमांक एस एम एसने चेक करायला तीन रु. फी लागते. ५३२३२ वर एस एम एस करायचा फॉरमॅट असा-
IMEI-space-nnnnnnnnnnnnnnn
the number should be entered excluding any dashes, slashes etc, i.e. digits only. If your IMEI number has 17 digits, only the first 15 digits will suffice.
The number can also be validated on line at-
http://www.numberingplans.com/?page=analysis&sub=imeinr
27 Nov 2009 - 11:25 am | jaypal
१००%सहमत. मौलिक माहिती बद्दल धन्यवाद.
(किंचित खडूसपणा:त्यावेळी कोणतेही रंगीत सोनेरी पाणी पान न करता नीट जागे राहून पहा. विजुभौंशी १०१ % सहमत )
____________________________________________________
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/