पाचक व मादक

सहज's picture
सहज in पाककृती
26 Nov 2009 - 4:11 pm

डिस्क्लेमरः सदर लेखात उल्लेखलेल्या चवी या लेखकाच्या वैयक्तिक आवडीनिवडी आहेत.
वाचकांची मते त्यांच्याशी जुळतील असे नाही. तसा आग्रहही नाही. Cheers! ;-)

मित्रांनो, एकंदरीत मिपाकरांना मसालेदार खाणे व पिणे आवडते असे दिसते आहे. मसाल्याचा वापर करुन वेगळ्या वेगळ्या प्रकारची मादक द्रव्ये म्हणाले की सर्वप्रथम बेनेडिक्टाइन डोम (Benedictine D.O.M.) हे नाव बर्‍याच जणांना माहीत असेलच.

आज माझ्या कपाटातील एका पेयाशी तुमच्याशी भेट करुन देतो. (ह्म्म एक लेखमाला होउ शकेल ;-)) ह्या पाचक व मादक द्रव्याचे नाव आहे "पास्टीस" [Pastis liqueur] हे एक "अ‍ॅपेरिटिफ" (Aperitif ) प्रकारचे पेय आहे. Aperitif म्हणजे जेवणाच्या अगोदर किंवा एखाद्या हलक्या आहाराबरोबर / स्नॅक्स प्यायचे, रुचकर पचनास उत्तम असे मादक द्रव्य.

बरं हे पास्टीस एका उत्तम अश्या घराण्यातून आले आहे बरं का मंडळी. "पेर्नो रिकार्द (pernod ricard)" अहो ह्या घराण्यातुन एकसे एक मादकोत्तम द्रव्य बाहेर आली आहेत. दंतकथा अशीही आहे म्हणे की समुद्रमंथनातुन आलेली आहे हो. जसे ग्लेनलिवेट, मालिबू, एब्सोल्युट व्होडका, शिवास रिगल, मार्टेल कॉर्डन ब्लू इ इ इ ...

असो तर हे रिकार्द पास्टीस, स्टार अनिस (दगडफूल??) व लिकोरिश (ज्येष्ठमध??) वापरुन बनवले असते. अर्थात यात अल्कहोल कंटेन्ट ४५% आहे पण अगदी घोट, दोन घोट मस्त सोनेरी द्रव्य त्याच्या पाचपट पाण्यात घालून प्यायचे असते. शक्यतो दिवसभर काम करुन अथवा न करुन कंटाळा आला असेल , उकाड्याने अस्वस्थ (कंपूबाजासाठी तुमचा छान छान एसी बंद पडून जीव कासावीस झाला असेल इ इ ) झाला असाल तर मस्तपैकी गार सोडा वॉटर त्यात दोन चार बर्फाचे खडे टाकून प्या. मसाल्याची सुंदर चव नंतर जेष्ठमधाचा मंद गोडवा जिभेवरच नव्हे तर चेहर्‍यावर आल्याशिवाय रहाणार नाही. :-)

तर अश्या ह्या पेयाला जरुर आपल्या घरी न्या. मागल्या वर्षी म्हणे ५.४ मिलीयन केसेस विकल्या गेल्या.

हा लेख सर्व कंटाळलेल्या जीवांना अर्पण

प्रतिक्रिया

गणपा's picture

26 Nov 2009 - 4:21 pm | गणपा

सहजराव..
चियर्स
सुरेच्या बाबतित म्हणाल तर आम्ही अजुन पाळण्यात आहोत..
(फक्त धम्यासाठी : सुरा = सोमरस.. भोसकायचा सुरा नव्हे)

धमाल मुलगा's picture

26 Nov 2009 - 4:47 pm | धमाल मुलगा

गणप्या लेका... =)) हो की!

सहजकाका,
मस्तच हो.
आम्हा येड्याबागड्यांना अशाच छान छान नव्या नव्या दारवांच्या ओळखी करुन द्या..तेव्हढीच ज्ञानात (आणि संग्रहात ;) ) भर!

शंका: पाचक वगैरे म्हणताय, म्हणजे ऑन द रॉक्स घेणं शक्यच नाही ना?

अवांतरः कधी येताय हो...माझ्यासाठी गिफ्ट घेऊन :)

निखिल देशपांडे's picture

26 Nov 2009 - 6:19 pm | निखिल देशपांडे

आम्हा येड्याबागड्यांना अशाच छान छान नव्या नव्या दारवांच्या ओळखी करुन द्या..

निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

अवलिया's picture

27 Nov 2009 - 9:15 am | अवलिया

>>>सुरेच्या बाबतित म्हणाल तर आम्ही अजुन पाळण्यात आहोत..

रे च्या ठिकाणी चुकुन ने वाचलं.

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

टारझन's picture

26 Nov 2009 - 4:37 pm | टारझन

सहज राव ह्यांचे लेख मी नेहमी वाचतो. एकदा मला माझा मित्र परा ह्याने सांगितले की "सहज"रावांचा नविन लेख आलाय .. वाचलास का ? तेंव्हा मी ज्युस सेंटरामधे पपईज्युस पित होतो .. तो तसाच सोडून पळत पळत कॅफेत आलो .. आणि लेख वाचला होता. खिषात पैसे नाहीत हे माहित असतांना दादांच्या कॅफेत गेलो होतो हे विषेश.
सहजराव लेख आवडला हो .. मी तुमचा चाहता झालो आहे. थ्री चियर्स !!

- टारझन

धमाल मुलगा's picture

26 Nov 2009 - 4:48 pm | धमाल मुलगा

अरे बागड...
मारतो का आता? जीव घेणारेस का?

महेश हतोळकर's picture

26 Nov 2009 - 4:56 pm | महेश हतोळकर

मस्त लेख.
निरामिष रंगाशेठना गणपाच्या पा.कृ. वाचून जे वाटते तेच मला नाटक्या ची साकिया आणि हा लेख वाचून वाटते.

तेंव्हा मी ज्युस सेंटरामधे पपईज्युस पित होतो .. तो तसाच सोडून पळत पळत कॅफेत आलो .. आणि लेख वाचला होता. खिषात पैसे नाहीत हे माहित असतांना दादांच्या कॅफेत गेलो होतो हे विषेश

ज्युसचे पण पैसे दिले नाहीत आणि दादांचे पण. आता काय?

टारझन's picture

26 Nov 2009 - 9:25 pm | टारझन

ज्युसवाले काळोखे काक आणि सायबर डिझायनर दादा .. दोघांना १०-१० रुपयांच्या बदल्यात मी मोघम २०-२० प्रतिसाद खेचुन आणनारी १-१ प्रतिक्रिया द्यायचं कबुल केलं आहे.

- टारझन

सुनील's picture

26 Nov 2009 - 4:37 pm | सुनील

चिअर्स!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

उग्रसेन's picture

26 Nov 2009 - 4:43 pm | उग्रसेन

चिअर्स रे भावा

बाबुराव :)

परिकथेतील राजकुमार's picture

26 Nov 2009 - 6:00 pm | परिकथेतील राजकुमार

बर का सहजराव तुमचे हे पास्टीस आणी कॉकटेल्स वगैरे जिथे संपतात ना तिथे आमची 'संत्रा' चालु होते.

हा प्रतिसाद माझ्या डिझायनर मित्रास समर्पीत.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

सूहास's picture

26 Nov 2009 - 6:10 pm | सूहास (not verified)

+१ ...

नारंगीप्रेमी
सू हा स...

विंजिनेर's picture

26 Nov 2009 - 6:54 pm | विंजिनेर

अ‍ॅपर्तिफ मधे आम्ही फक्त अनीसे पितो. आणि हो, जर जोडीला तेलकट चमचमीत तोंतोरो वगैरे असेल तर उमेश्यु पुढे सगळ्या युरोपियन पास्तिस झक मारत जातात..

सहज's picture

26 Nov 2009 - 7:02 pm | सहज

उमेश्यु छान आहे. गेक्केकान प्लम वाईन [Gekkeikan Plum Wine ] अफलातून आहे. पुढे मागे जमल्यास त्याचीही ओळख करुन देइन.

सुनील's picture

28 Nov 2009 - 4:46 pm | सुनील

पौर्वात्य सोमरसाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. कारण एक साकी सोडली तर इतरांबाबत फारशी माहिती नाही.

अवांतर - बाकी सहजराव (आणि नाटक्या) यांना पवैय्या (खवय्याच्या धर्तीवर) असे का म्हणू नये?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विंजिनेर's picture

28 Nov 2009 - 7:49 pm | विंजिनेर

पौर्वात्य सोमरसाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

धन्यवाद :)
पाश्चिमात्य वाईन/स्कॉच/बियर संस्कृतीएव्ह्ढीच पौर्वात्य सोमरस-संकृती (साके/शोच्यु/सोजु)ही हजारो वर्षांचा इतिहास लाभून समृद्ध झाली आहे.
ह्या संस्कृतीची यथामती तोंडओळख करून द्यायला नक्कीच आवडेल (चवी/रंग/रूप/तयार करण्याच्या पद्धती इ.) :) पण ती मिपाच्या वाचकांना कितपत आवडेल ते माहित नाही तेव्हा सध्यातरी प्रतिसादापुरतेच ठिक.

सुनील's picture

29 Nov 2009 - 5:18 am | सुनील

पण ती मिपाच्या वाचकांना कितपत आवडेल ते माहित नाही तेव्हा सध्यातरी प्रतिसादापुरतेच ठिक.
त्याची चिंता सोडा नि लिहिते व्हा!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहज's picture

29 Nov 2009 - 6:59 am | सहज

त्याची चिंता सोडा नि लिहिते व्हा!

हेच म्हणतो.

नंदन's picture

29 Nov 2009 - 7:44 am | नंदन

विंजिनेरराव, नक्की लिहा.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

अनिल हटेला's picture

29 Nov 2009 - 10:05 pm | अनिल हटेला

अगदी अगदी !!

बैलोबा (वोडकापूरकर) !!!
Drink Beer,
Save Water !!

;-)

अवलिया's picture

26 Nov 2009 - 7:24 pm | अवलिया

सहजराव खुप छान लिहितात.

त्यांचे लेखन आवर्जुन वाचण्यासारखे असते. त्यांच्यात असलेला विचारवंत अस्वस्थ असला तरी सृजनशील आहे हे मी नमुद करु इच्छितो. सर्वसामान्य लेखकांमधे दारु अथवा सुरापान याविषयी असलेला तुच्छतेचा भाव त्यांच्या लेखनात दिसत नाही हे विशेष आहे. वेगवेगळ्या दारवांची (दारुचे अनेकवचन या अर्थाने) त्यांनी ओळख करुन देण्याचे जे व्रत अंगिकारलेले आहे त्याची तुलना इतर कशाशीही होवु शकत नाही, करु नये.

कपाटातील एका पेयाची ओळख करुन देतांना लेखमाला होवु शकेल असे सुचित करुन त्यांनी आपले कपाट मोठे आहे हे सुचवुन कंटाळलेल्या जीवांच्या तसेच कपाटं नसलेल्या लोकांना खिजवले आहे असे वाटु शकते, पण सहजरावांना जितका मी ओळखतो त्यावरुन ते तसे नाहीत असे मी ठामपणे सांगु शकतो. त्यांनी कपाटातील सर्व पेये बाहेर काढून लेखमाला लिहावी ही विनंती, त्यानिमित्ताने कपाटाची साफसफाई होईल.

त्यांना दिर्घायुष्य चिंतुन माझा प्रतिसाद आटोपता घेतो.

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

विनायक प्रभू's picture

26 Nov 2009 - 7:51 pm | विनायक प्रभू

येताना आमच्या सारख्या अडाणि जिवांना आपल्या खर्चाने अशा उत्तमोतम पाचक द्रव्यांची तोंडओळख करुन द्यावी अशी विनंती.

चित्रा's picture

26 Nov 2009 - 8:40 pm | चित्रा

अशा मादक पेयांच्या निमित्ताने का होईना पण सहज लेख लिहीतात हे काय थोडे आहे?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Nov 2009 - 9:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सोडा आणि/किंवा वॉटर आणि पास्टीस यांच्या मापास विसरलात का काय सहजकाका?

अदिती

मदनबाण's picture

27 Nov 2009 - 9:11 am | मदनबाण

आज माझ्या कपाटातील एका पेयाशी तुमच्याशी भेट करुन देतो
चला या निमित्त्याने का होईना बंद दरवाजा उघडला तर... ;)

अशा मादक पेयांच्या निमित्ताने का होईना पण सहज लेख लिहीतात हे काय थोडे आहे?
यकदम करेक्ट... :)

मदनबाण.....

"Life is the flower for which love is the honey."
Victor Hugo

श्रीयुत संतोष जोशी's picture

27 Nov 2009 - 8:11 am | श्रीयुत संतोष जोशी

व्वा !!! सहजराव मस्तच.

ठाण्यात कुठे मिळेल ?

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

श्रावण मोडक's picture

27 Nov 2009 - 2:22 pm | श्रावण मोडक

अशा गोष्टींची केवळ लेखातून ओळख करून दिल्याबद्दल निषेध!

Nile's picture

29 Nov 2009 - 11:10 pm | Nile

सहजरावांनी आता ओळख करुन दिलीच आहे त्याबरोबर प्रात्यक्षीकही (त्यांचे कपाट उघडण्यापासुन) करण्याची संधी आम्हाला द्यावी.

-अजुन बीअर-व्होडका-वाईन-(काही)कॉकटेल्स इतक्याच पायर्‍या चढलेला. ;)

नाटक्या's picture

28 Nov 2009 - 3:30 pm | नाटक्या

पास्तीस बद्दल लिहायचे बरेचदा ठरवले पण देशात हे मिळते की नाही या बद्दल साशंक होतो... सहजरावांनी उणीव भरून काढली...

शैली आणि लि़हाण दोन्ही आवडले..

- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

नाटक्या's picture

28 Nov 2009 - 3:31 pm | नाटक्या

पास्तीस बद्दल लिहायचे बरेचदा ठरवले पण देशात हे मिळते की नाही या बद्दल साशंक होतो... सहजरावांनी उणीव भरून काढली...

शैली आणि लि़खाण दोन्ही आवडले..

- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)

स्वाती२'s picture

28 Nov 2009 - 5:46 pm | स्वाती२

पास्तीसची ओळख आवडली.

हे अजुन सांगितले नाही.
वेताळ

सहज's picture

28 Nov 2009 - 6:27 pm | सहज

१) मुंबई विमानतळ ड्युटी फ्री शॉपिंग विभागात ही बाटली मी पाहीली आहे. त्यामुळे कोणी येणारा मित्र, पाहूणा असेल तर त्याच्याकरवी मागवता येईल.

२) बाकी ह्या कंपनीचे भारतातील कार्यालय आहे. तिथे विचारणा करता येईल. त्यांच्या भारतातील शाखेच्या संकेतस्थळावर ह्या पानावर ह्या पेयाची माहीती तर दिसते आहे.
http://pernod-ricard-india.com/liqueur.html

मुंबईतला पत्ता

http://pernod-ricard-india.com/contactus.html

West Region
Pernod Ricard India Pvt. Ltd.
101/B Wing ,First floor
Centaur House ,Shanti Nagar
Vakola ,Santacruz East
Mumbai - 400055
Ph:- 02266975411/14
Fax:- 022 66975417

enquiries@pernod-ricard-india.com

टारझन's picture

28 Nov 2009 - 9:29 pm | टारझन

च्यायला .. सहजराव .. दचकलोच .. क्षणभर मला गुगळे साहेबांचीच प्रतिक्रीया वाटली :)

धनंजय's picture

28 Nov 2009 - 7:45 pm | धनंजय

@गणपा - ऑन-द-रॉक्स चालते.

@सहज - शुद्ध व्होडक्यामध्ये चक्रफूल (स्टार अनीस) कुटून भिजत टाकले आहे - फ्रीझरमध्ये. आठवड्याभराने बघतो कशी लागते. (बहुधा चमचाभर मध घालून गोड करेन. ऑन-द-रॉक्स चव घेण्याचा विचार आहे.)

सहज's picture

29 Nov 2009 - 6:58 am | सहज

मी ऑन द रॉक्स घेउन पाहीले, जरा जास्तच कडवट जाळ वाटला. अर्थात कोणाला तरी आवडेलही. पाण्याचे प्रमाण कमी करुन ज्याला त्याला आपल्या पसंतीचे मिश्रण करता येईल.

असे म्हणतात की एखादा, पेग व त्याच्या पाचपट पाणी घालून प्यायचे असते.

धनंजय नक्की कळवा तुमचा हा प्रयोग कसा झाला.

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Nov 2009 - 12:14 am | बिपिन कार्यकर्ते

सहजराव कधी तरी लिहितात, पण लै भारी लिहितात. मस्त पेय.

बिपिन कार्यकर्ते

नंदन's picture

29 Nov 2009 - 7:52 am | नंदन

मस्त लेख. पास्तिसची घरंदाज (घराण्यासह) ओळख आवडली. पास्तिससारखेच फ्रेंच कुलोत्पन्न असणारे किह् (kir) हे ऍपरिटिफही सुरेखच. शँपेन घालून बनवलेले kir royale हे त्याचं चुलतभावंडही 'पेय'.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

दशानन's picture

30 Nov 2009 - 3:47 pm | दशानन

तुम्ही आजकाल दारवां बाबत जास्तच माहिती देत घेत आहात हे पाहून नवल वाटले, एक सुसंस्कृत मिपाकर ह्या नात्याने मला तुमचा हा धागा पाहून अतिव दुखः झाले, जगामध्ये इतक्या सुंदर सुंदर गोष्टी खाण्या पिण्याचा असताना तुम्ही आपली लेखन प्रतिभा फक्त दारु साठी वाहत सोडलेली पाहून देखील अतीव दुखः होत आहे.
तुमच्या कडून अशी अपेक्षा नव्हती. कृपया पुढील भारत वारी मध्ये आपल्या कपाटातील त्या नतद्रष्ट बाटल्या माझ्या घरी सोडण्याची तसदी घ्यावी जेणे करुन मी त्यांची योग्य पध्दतीने विलेवाट लावेन व तुम्हाला ह्या पापी द्रव्यापासून दुर ठेवेन जेणे करुन थोडे फार पुण्य मला ही मिळेल.

*****

मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही