ताजमहाल कोणी बांधला??

वडापाव's picture
वडापाव in जनातलं, मनातलं
8 Mar 2008 - 6:06 pm

असे म्हणतात की आपल्या मेलेल्या पत्नीची म्हणजे मुमताजची भव्य कबर बांधून तिची आठवण म्हणून त्याभोवती 'ताजमहाल' शहाजहानने बांधला. मुमताज ब-हाणपुरात मेली. त्यानंतर सहा महिन्यांनी ताजमहालाचे बांधकाम पूर्ण झाले.
एका युरोपियन प्रवाशाने प्रवासवर्णनात 'तेजोमहालाचा' उल्लेख केला होता. हा महाल सध्या ताजमहाल ज्या ठिकाणी अस्तित्वात आहे त्या ठिकाणी होता. पु. ना. ओक यांच्या 'इतिहास संशोधनातील घोडचूका' या पुस्तकाप्रमाणे ताजमहालाचे नीट निरीक्षण केल्यास तेथे कमळ, त्रिशूळ, अशी चिन्हे होती.
असेही म्हटले जाते की जेथे सध्या मुमताजची कबर आहे, त्याखाली शिवलिंग असून ते गाडले गेले.
ताजमहालाचे शहाजहानकडून बांधकाम म्हणजे खरोखर निर्मीती होती की फक्त जुन्या व भव्य अशा शिवमंदिरात केले गेलेले बदल होते? जर ताजमहाल शहाजहानने नाही बांधला, तर या महालाच्या निर्मीतीमागे नेमका कोणत्या महाभागाचा हात होता??

-------- (ऐतिहासिक वास्तूंचा व वस्तूंचा प्रेमी) वडापाव

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

8 Mar 2008 - 8:52 pm | llपुण्याचे पेशवेll

फक्त ताजमहालच नव्हे तर इतरही अनेक वास्तू मुसलमान सुल्तान आणि मौलवी यानी संगनमत करून अशी बाटवली आहेत. याचे एक ढळढळीत उदाहरण म्हणजे 'नारायणेश्वर' आणि 'पुण्येश्वर'. ही दोन मंदिरे पुणे किंवा 'पुनवडी' मधे मुठा नदीच्या काठाला आहेत असे वर्णन नामदेव महाराजानी केलेले आहे. पण ती मंदीरे आता बडा शेख सला आणि छोटा शेख सल्ला या नावाने बाटली आहेत. नारायणेश्वर आणि पुण्येश्वराच्या देवळातील फोडून काढलेल्या इतर देव देवतांच्या मूर्तींचे अवशेष हे मध्यंतरी इतिहास संशोधक बलकवडे आणि बेडेकर यानी शोधून काढले होते(मुठा नदीच्या पात्रातच मिळाले आणि विशेषतः ते ब्रिटीशानी बांधलेल्या नव्या पुलाच्या खालतीच मिळाले). त्यामुळे पु. ना. ओक यांचा दावा सत्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी मधली अशी बाटलेली मंदीरे त्या मशिदी जमिनदोस्त करून परत नव्याने मंदिरे बांधल्याचा उल्लेख आहे.
पुण्याचे पेशवे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Mar 2008 - 10:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इतकेच आम्हाला माहित आहे.
इतिहासातील घोडचुका पु. ना. ओकांचे वाचायलाच पाहिजे, पण आनंद देणा-या वास्तुंच्या बाबतीत इतिहास उकरुन आम्ही तो आनंद घालवणार नाही.

ताजमहालाची प्रतिकृती औरंगाबादला बीबी का मकबरा म्हणुन उभे करणा-या कारागिरांच्या कलेचे तर आम्हाला नेहमीच कौतुक आहे :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिखाळ's picture

13 Mar 2008 - 10:02 pm | लिखाळ

शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी मधली अशी बाटलेली मंदीरे त्या मशिदी जमिनदोस्त करून परत नव्याने मंदिरे बांधल्याचा उल्लेख आहे.

काय सांगता !!
मग त्या काळातल्या बुद्धीवादी, तर्कनिष्ठ, शांतताप्रेमी, सर्वधर्म समभाव जपणार्‍या अभिजनांनी आकांडतांडव केल्याचे उल्लेख असतीलच की !
( का त्यांनी मराठी संकेतस्थळांवर जावून आग पाखडली ? त्याकाळी विश्वजाल होते का? )

-- (चौकस) लिखाळ.

'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

सर्किट's picture

8 Mar 2008 - 10:36 pm | सर्किट (not verified)

मी नाही बांधला, एवढे नक्की. इतरांचे मला माहिती नाही.

- सर्किट

पिवळा डांबिस's picture

8 Mar 2008 - 10:48 pm | पिवळा डांबिस

कोणीही बांधला असेल, पण आता त्या शिळ्या कढीला ऊत आणण्यात काय मतलब आहे?
ती एक अतिशय सुंदर वास्तू आहे यावर तर सगळ्यांचे एकमत आहे ना!
मग त्या सुंदर वास्तूचा सत्यानाश होण्याइतके पोल्युशन निर्माण करणारे हलकट कोण आहेत याचा शोध घेऊन त्यांचे निर्मूलन करणे जास्त महत्वाचे नाही काय?

सर्किट's picture

8 Mar 2008 - 10:59 pm | सर्किट (not verified)

+१ !!

- सर्किट

ऋषिकेश's picture

13 Mar 2008 - 9:56 pm | ऋषिकेश

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

व्यंकट's picture

8 Mar 2008 - 11:36 pm | व्यंकट

>> ताजमहालाचे शहाजहानकडून बांधकाम म्हणजे खरोखर निर्मीती होती की फक्त जुन्या व भव्य अशा शिवमंदिरात केले गेलेले बदल होते?

बदल होते.

>> जर ताजमहाल शहाजहानने नाही बांधला, तर या महालाच्या निर्मीतीमागे नेमका कोणत्या महाभागाचा हात होता??

सदानंद धनाजी मुळकुटकर-जावळे.

असो विनोदाचा भाग वगळता, धर्मनिरपेक्ष भारतात; बुद्धीवादी, पुरोगामी, मूलतत्ववादी, परदेशवादी, स्वदेशवादी, परदेशनिष्ठ, देशभक्त, विद्रोही, मूलनिवासी, ५००० वर्षांपासून ज्यांनी अत्याचार केले आणि ज्यांनी सहन केले त्यांनी, अल्पसंख्यांक, खास आणि आम आदमी वैगेरेंनी बोलावे आणि इतरांनी गप्प बसावे. म्हणून आम्ही गप्प बसतो.

पिवळा डांबिस's picture

8 Mar 2008 - 11:49 pm | पिवळा डांबिस

>> जर ताजमहाल शहाजहानने नाही बांधला, तर या महालाच्या निर्मीतीमागे नेमका कोणत्या महाभागाचा हात होता??

सदानंद धनाजी मुळकुटकर-जावळे.

मु. पो.: आळंदी (चोराची)!!

डॉ.प्रसाद दाढे's picture

8 Mar 2008 - 11:56 pm | डॉ.प्रसाद दाढे

ताजमहालचा निर्माता नक्की कोण ह्यावर बरेच वर्षे वाद चालू आहे. पर॑तु मलाही असेच वाटते की त्या सु॑दर वास्तूचा विध्व॑स करायला निघालेल्या म॑डळीना आवर घालणेच जास्त योग्य आहे. आणि ताजच का, साक्षात महाराष्ट्रात कोणते ऐतिहासिक स्थळ नीट-नेटके व पाहण्याजोगे आहे. शिवाजीमहाराजा॑च्या नावाने टाहो फोडणार्‍या यच्चयावत सर्व राजकीय नेत्या॑नी कोणत्या किल्ल्याची डागडुजी करून महाराजा॑चा वारसा जपलाय? पूर्वजा॑च्या कलाकृती कशा जपाव्यात हे इ॑ग्रजा॑कडून शिकाव॑. ब्रिटिशा॑नी त्या॑चे हजारो वर्ष जुने राजवाडे आणि तो सर्व इतिहास पुस्तका॑त ठेवलेल्या पि॑पळपानासारखा जपलाय..छोड दो..भारतीय लोकच कर॑टे आहेत्..जिथे साक्षात भवानी तलवार चोरून नेऊन त्यावरचे रत्ना॑चे को॑दण बाजारात विकले जाऊ शकते, तिथे नारायणेश्वर काय चीज आहे..?

विसोबा खेचर's picture

9 Mar 2008 - 12:16 am | विसोबा खेचर

शिवाजीमहाराजा॑च्या नावाने टाहो फोडणार्‍या यच्चयावत सर्व राजकीय नेत्या॑नी कोणत्या किल्ल्याची डागडुजी करून महाराजा॑चा वारसा जपलाय? पूर्वजा॑च्या कलाकृती कशा जपाव्यात हे इ॑ग्रजा॑कडून शिकाव॑. ब्रिटिशा॑नी त्या॑चे हजारो वर्ष जुने राजवाडे आणि तो सर्व इतिहास पुस्तका॑त ठेवलेल्या पि॑पळपानासारखा जपलाय..छोड दो..भारतीय लोकच कर॑टे आहेत्..जिथे साक्षात भवानी तलवार चोरून नेऊन त्यावरचे रत्ना॑चे को॑दण बाजारात विकले जाऊ शकते, तिथे नारायणेश्वर काय चीज आहे..?

डॉक्टरांशी सहमत आहे...

आपला,
(ताजप्रेमी) तात्या.

पिवळा डांबिस's picture

9 Mar 2008 - 12:35 am | पिवळा डांबिस

पूर्वजा॑च्या कलाकृती कशा जपाव्यात हे इ॑ग्रजा॑कडून शिकाव॑. ब्रिटिशा॑नी त्या॑चे हजारो वर्ष जुने राजवाडे आणि तो सर्व इतिहास पुस्तका॑त ठेवलेल्या पि॑पळपानासारखा जपलाय..

इंग्रजांचं जास्त कौतुक करतांना हे विसरलांत की त्यांनी "त्यांचे" राजवाडे व इतिहास जपून ठेवलाय. ते कलाप्रेमी होते म्हणून नव्हे! त्याच इंग्रजांनी रायगड किल्ला जिंकल्यानंतरही तोफा लावून उध्वस्त केला होता. मराठी राजधानीची नामोनिशाणी शिल्लक राहू नये हा उद्देश त्यामगे होता. अनेक सुंदर मूर्ती व कलाकुसरीचे नमुने याच इंग्रजांनी या देशाबाहेर स्मगल केले आहेत...

फारतर असे म्हणू की युरोपीय लोकांनी त्यांची कला व इतिहास जपून ठेवलाय. पण इंग्रजांसारख्या कावेबाज आणि निमकहराम जातीला हा बहुमान कृपया देऊ नका हो!

राष्ट्रभक्त,
पिवळा डांबिस

विसोबा खेचर's picture

9 Mar 2008 - 12:48 am | विसोबा खेचर

इंग्रजांचं जास्त कौतुक करतांना हे विसरलांत की त्यांनी "त्यांचे" राजवाडे व इतिहास जपून ठेवलाय. ते कलाप्रेमी होते म्हणून नव्हे!

काही का असेना, परंतु इंग्रजांनी "त्यांचे" राजवाडे व इतिहास तरी जपून ठेवलाय ना? मला वाटतं इंग्रजांचा हाच गूण घ्यायला डॉक्टर सांगत आहेत!

फारतर असे म्हणू की युरोपीय लोकांनी त्यांची कला व इतिहास जपून ठेवलाय.

दॅटस् इट!

आणि आम्हा लोकांना आमच्या परमपूज्य शिवछत्रपतींच्या भवानी सारखी मोलाची वस्तूदेखील जपून ठेवता आली नाही, सांभाळता आली नाही हा आपला करंटेपणा नव्हे काय??

ठाणे-कळवा जोडणार्‍या जुन्या पुलाला जेव्हा १०० वर्ष पूर्ण झाली तेव्हा ठाण्याच्या महापालिकेत लंडनहून संबंधित बांधकाम खात्याकडून एक पत्र आलं होतं. हे पत्र आजही ठाणेमहापालिकेच्या दफ्तरी आहे. त्याचा मजकूर साधारण असा होता,

"अमूक अमूक साली आम्ही ठाणे-कळवा हा पूल बांधला होता. आमच्या रेकॉर्डस प्रमाणे त्या पुलाला अमूक अमूक दिवशी १०० वर्ष पूर्ण होताहेत. आमच्या कार्यालयातर्फे या पुलाच्या सुरक्षिततेची जबाबदारी केवळ १०० वर्षांचीच होती, सबब आपण या पुलाची डागडुजी करून घ्या. येथून पुढे जर काही त्या पुलाची पडझड झाली तर त्याला आम्ही जबाबदार असणार नाही!!

!!!

आमच्या बिचार्‍या ठामपाच्या कर्मचार्‍यांना ह्या पत्राचा नक्की उलगडा होण्यासच दोन दिवस लागले होते!! :))

तात्या.

विसोबा खेचर's picture

9 Mar 2008 - 12:58 am | विसोबा खेचर

उगाच नाही एखादा देश भारतावर १५० वर्ष राज्य करत!!

त्या करता काही स्ट्राँग क्वालिटीज असाव्या लागतात, त्या निश्चितच ब्रिटिशांकडे होत्या. त्या आपल्याला घ्यायला काय हरकत आहे असा डॉक्टर दाढ्यांचा सूर असावा!

अगदी मुंबईच्या पोलिस कमिशनरच्या हापिसतली गोष्ट!

ब्रिटिशांची राजवट सुरू होती. मुंबईच्या पोलिस कमिशनरच्या हापिसातल्या एका कोकणी चाकरमान्याला फुटकळ रजा हवी होती. म्हणून त्याने कोकणात वडील आजारी आहेत असा बहाणा केला आणि कोकणातून नुकतंच आलेलं मोडीलिपीतलं एक पत्र रजेकरता वडील आजारी असल्याचा पुरावा म्हणून ब्रिटिश साहेबाला दाखवलं!

ते पत्र वाचून तो ब्रिटिश साहेब हसत हसत त्या कारकुनाला म्हणाला,

"तुला रजा हवी असेल तर ती मी देतो, परंतु तुझे वडील आजारी असल्याचा या पत्रात काहीच उल्लेख नाही! हे तर साधं खुशालीचं पत्र आहे!"

त्यावर तो कारकून उडालाच!

त्यावर तो ब्रिटिश पोलिस अधिकारी त्याला म्हणाला,

"मला मोडी लिपी उत्तम समजते आणि लिहिताही येते! मी ती शिकलो आहे!"

तात्या.

वडापाव's picture

9 Mar 2008 - 2:26 pm | वडापाव

ब्रिटीशांनी शनिवारवाडासुध्दा जाळला होता.
तोफांचा पुरवठा शिवाजी महाराजांना करण्याचे त्यांनी अश्वासन दिले होते. पण त्यांनी शेवटी महाराजांच्या विरोधातच तोफा डागल्या.

प्राजु's picture

9 Mar 2008 - 12:32 am | प्राजु

डॉ. दाढेंशी मी सहमत आहे.

- (सर्वव्यापी)प्राजु

डॉ.प्रसाद दाढे's picture

9 Mar 2008 - 12:52 am | डॉ.प्रसाद दाढे

इ॑ग्रज हे दुर्ग भ॑जक होते ही गोष्ट खरी आहे व राजस्थानातले बहुतेक किल्ले कधी न लढविले गेल्यामुळेच टिकले आहेत हेही सत्य नाकारता येत नाही. पर॑तु इ॑ग्रजा॑चे राज्य एकोणीसशे सत्तेचाळीस साली स॑पल्या न॑तर परत आपले किल्ले स॑शोधनासाठी कि॑वा अस्मितेसाठी सोडा निदान पर्यटन व्यवसाय आणि त्यायोगे मिळणार्‍या परकीय चलनाकडे पाहून तरी मे॑टेन करण्याची बुद्धी आपल्या सरकारने दाखविली नाही हे अत्य॑त कटू सत्य आहे..
स्वतः इ॑ग्रजा॑ची राजधानी दुसर्‍या महायुद्धात जमीनदोस्त झाली होतीच की, अनेक जुनी चर्चेस, राजवाडे व दस्तूरखुद्द पार्लमे॑टची आर्क सुद्धा कोसळली होती पण इ॑ग्रजा॑नी युद्ध स॑पण्याचीसुद्धा वाट न पाहता ती परत जशीच्या तशी बा॑धून काढली हे निश्चितच कौतुकास्पद आहे..
डा॑बिस साहेब इ॑ग्रज आपले शत्रूच होते, मग त्या॑नी आपले किल्ले उध्वस्त केले त्यात कसले आश्चर्य..पण आज आपलेच लोक आपल्याच किल्ल्या॑ची जी दुर्दशा करीत आहेत ते कैक पटीने स॑तापजनक आहे. जो 'सि॑हगड' जि॑कण्यासाठी हजारो मावळे (आपलेच पूर्वज) धारातीर्थी पडले त्याच गडावर ३१ डिसे॑बरला ज्यादा पोलिस ब॑दोबस्त ठेवण्याची वेळ येते ही वस्तुस्थिती आहे..

भडकमकर मास्तर's picture

9 Mar 2008 - 12:55 am | भडकमकर मास्तर

डॊक्टरसाहेब, एकदम पटले...

वडापाव's picture

9 Mar 2008 - 2:29 pm | वडापाव

दाढे साहेब, पटलं आपलं म्हणणं.
पूर्णपणे सहमत.

आपला नम्र,
वडापाव

डॉ.प्रसाद दाढे's picture

9 Mar 2008 - 1:10 am | डॉ.प्रसाद दाढे

मला तेच म्हणायचे आहे..इ॑ग्रज आपले पिढीजात शत्रू असले तरी त्या॑च्याकडून योग्य त्या गोष्टी शिकण्यात कि॑वा त्या॑च्या गुणा॑ची प्रश॑सा खुल्या दिलाने करण्यात गैर काय आहे..असो..माझेही सर्व मिपा'करा॑सारखे आपल्या गडाकोटा॑वर मनापासून प्रेम आहे म्हणूनच जीव तीळ तीळ तुटतो..बाकी काही नाही

स्वाती राजेश's picture

9 Mar 2008 - 3:15 am | स्वाती राजेश

केसरीच्या वीणा पाटील यांनी एक लेख लिहिला आहे..
मी चोर आहे....

सर्वगुण संपन्न माणूस मिळणे तसं अवघडच. प्रत्येकामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टींचा संगम झालेलाच असतो. काही वेळेला आपल्याला त्याचे दुर्गुण माहित असतात पण त्यातून बाहेर पडता येत नाही.यासाठी साधा उपाय म्हणजे आपाल्यातील चांगले गुण वाढवायला घ्यायचे.
यासाठी तुम्ही काय करायचे?..बेधडक चोरी करायची. समोरच्या व्यक्तीचे चांगले आचार, चांगले विचार चोरून आपल्याकडे घ्यायचे.असली चोरी सॉलीड फायद्याची असते.
कोणकडून वक्तशीरपणा चोरायचा तर कोणाकडून बोलण्यातील अस्खलीतपणा चोरायचा. कोणाकडून प्रामाणिकपणा चोरायचा तर कोणाकडून शांतपणा चोरायचा.कोणाकडून नम्रपणा चोरायचा तर कोणाकडून धाडस चोरायचे, तर कोणकडून मिश्कीलपणा चोरण्याबरोबरच स्पष्ट्पणा अलगद चोरून घ्यायचा. आपल्या आजूबाजूला असल्या चांगल्या गोष्टींचा महासागर उसळलेला असतो. किती चोरायचे, काय काय चोरायचे हे आपण ठरवायच.
तर मंडळी आताच अशा गोष्टींची चोरी करायला सुरवात करूया. आपले कान, डोळे उघडे ठेऊन सावज गाठूया.तुम्हाला चांगले घबाड मिळाले तर मला सांगा, मी ही मला चांगले तर तुम्हाला सांगेन.
सगळे मिळून आयुष्याचा प्रवास रंगतदार बनवू या.

हा लेख कुठे लिहावा कळत नव्हते पण इथे चर्चा चालू आहे कि चांगले असेल तर ते घेण्यात काय हरकत आहे.. मग ते इंग्रज असोत किंवा दुसरे कोण.

कोलबेर's picture

9 Mar 2008 - 7:54 am | कोलबेर

ताजमहाल कोणी बांधला??

गवंड्यांनी बांधला म्हणे.. पु.ना. ओक काय म्हणतात? शिंप्यांनी बांधला ?..माझ्या मते शिंपी कपडे शिवतात बहुदा...
गवंडीच बांधकाम करतात.. तरीही तज्ञांनी खुलासा करावा!

सुधीर कांदळकर's picture

9 Mar 2008 - 2:26 pm | सुधीर कांदळकर

मी सहमत आहे.

उगाच नाही एखादा देश भारतावर १५० वर्ष राज्य करत!!

हे सत्य आहे. प्रखर राष्ट्रनिष्ठा हा त्यांचा मोठा गुण आहे. आणि कितीहि वजनदार माणूस असला तरी त्यापेक्षा कायदा मोठा हा देखील त्यांचा असाच मोठा गुण आहे. पंतप्रधानांचा जावई हाताला किंमती घड्याळ लावून आला तर तेथील सामान्य कस्टम ऑफिसर त्यावर कायद्याप्रमणे कस्टम ड्यूटी भरायला लावतो. आपल्याकडे हे घडू शकेल?

ताजच्या परिसरात प्रदूषण करणारांमागे वजनदार व्यक्ती असतील तर त्यांवर कारवाई होईल? भोपाळ गॅस दुर्घटनेचे काय झाले?

प्रखर भारतीय
सुधीर कांदळकर

शैलेन्द्र's picture

10 Mar 2008 - 4:14 pm | शैलेन्द्र

बान्धलाय चान्गला, पन तल मजला पार्किन्ग नाहि केला हो

इनोबा म्हणे's picture

10 Mar 2008 - 4:26 pm | इनोबा म्हणे

च्यामारी! आपल्याला तर हा प्रतिसादच जास्त आवडला.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

पिवळा डांबिस's picture

10 Mar 2008 - 10:24 pm | पिवळा डांबिस

बान्धलाय चान्गला, पन तल मजला पार्किन्ग नाहि केला हो

तळमजला पार्किंग केला असता तर त्या काळी पार्क केलेल्या हत्ती-घोड्यांच्या हगण्या-मुतण्याचा कबरीत राजा आणि राणीला वास घेत बसावा लागला नसता का? :))

त्यांचे फक्त अधिकारी होते. सर्व बाबतीतली शिस्त, गुणग्राहकता, कायद्याचा धाक आणि त्याचे उल्लंघन करणार्‍याला जबर आणि तातडीने होणारे शासन, अत्यंत सावध आणि दूरगामी विचार, परंपरांची आणि इतिहासाची प्राणपणाने जपणूक हे त्यांनी केलं आणि तेच त्यांच्या सामर्थ्याचं रहस्य होतं/आहे. (बारकाईने बघितलं तर हेच सगळे गुण शिवाजी महाराजांमधेही होते आणि त्यामुळेच ते एवढे थोर झाले. राज्य करु आणि वाढवू शकले. इंग्रज इथे एवढे बळकट होण्याआधीपासून महाराजांचे हे मोठे उदाहरण आपल्यासमोर होतेच पण आपण त्यापासून काही शिकलो नाही हे करंटेपण नाही तर काय!)
आज ह्या गुणांची वानवा आपल्याला अधोगतीला घेऊन जात आहे. इंग्रजांना नावे ठेवण्यापेक्षा आपण चांगले काय करु शकतो ह्याकडे स्वातंत्र्यानंतर ६० -६० वर्षे लक्ष देता येऊ नये हे लांच्छनास्पदच आहे, डॉ. साहेब म्हणतात तसा जीव तीळतीळ तुटतो हे खरं आहे.
नाही त्या वादात आणि मारामारीत पडून आपण आपलाच नाश ओढवून घेतो आहोत. चांगल्या गुणांचा आदर करणे गैर नाहीच.

चतुरंग

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Mar 2008 - 10:25 pm | llपुण्याचे पेशवेll

'मला तेच म्हणायचे आहे..इ॑ग्रज आपले पिढीजात शत्रू असले तरी त्या॑च्याकडून योग्य त्या गोष्टी शिकण्यात कि॑वा त्या॑च्या गुणा॑ची प्रश॑सा खुल्या दिलाने करण्यात गैर काय आहे..असो..माझेही सर्व मिपा'करा॑सारखे आपल्या गडाकोटा॑वर मनापासून प्रेम आहे म्हणूनच जीव तीळ तीळ तुटतो..बाकी काही नाही'
पडके किल्ले बांधता येतीलही परत पण कुजकी मने बदलणार कोण आणि कशी? आता एक डॉ. दाढे, तात्या, मिराशी लढतील हो पडक्या किल्ल्यांच्या खुशालीसाठी, पण ते परत पडले तर तेव्हा कोण लढणार आहे? आणि किल्ल्यवरला एकांत फक्त दारु प्यायला आणि शरीरमंथनाकरीता आहे असे मानणार्‍या प्रेमी युगुलांचे प्रबोधन कोण करणार. आणि ही युगुले परप्रांतीय आहेत असेही नव्हे हो १९ फेब्रुवारीला मारे लाऊडस्पीकरवर 'पवाडे' गात असतात. आणि हेच 'पवाडे' गाणारे पुढे मागे एखाद्या साहेबांचे पवाडे गाऊन येतात शासनकर्ते म्हणून. मग सांगा कसे टि़कणार आपले किल्ले?
शेवटी कधीतरी मि.पा.वर उधृत केलेल्या मॅकाले साहेबाच्या पत्राचीच आठवण येते. या जनतेचा असा बुध्दीभेद करा की परत त्यानी वर डोके नाही काढले पाहीजे. आणि ब्रिटीशांनी ते तसे करून दाखवले.
आता मंडणगडच्या किल्ल्यावर (कदाचित गोपाळगड नाव आहे त्याचे)एका मुसलमानाने बिनधास्तपणे दिंडीदरवाजाला लोखंडी दार बसवून आतमधे स्वतःच्या मालकीची आंब्याची बाग केली आहे. कोण बोलते आहे त्याविरुध्द? कुठेगेले शिवप्रेमी आणि पुरातत्व खाते?
पुण्याचे पेशवे

माझ्या माहितीप्रमाणे सध्याचा अस्तित्वात असलेला ताजमहाल हा "शहाजहानने" आपल्या "मुमताजसाठी" बांधला होता ...
दुसर्‍या एका विचारसारणी प्रमाणे "ताजमहालाच्या जागी एक शिवमंदिर " होते. शहाजहानने ते उध्वस्त करून त्या जागी ही "जंगी प्रेमाची निषाणी बांधली " ...
अजून कुणी काय म्हणते तर कुणी काय ?

पण सध्या उपलब्ध असलेल्या दस्तावेजावरून तो शहाजहानने बांधला हे समजून चालण्यास हरकत नाही. त्याच्याकडे आपण एक मस्त कलाकॄती म्हणून पहायचे , नसत्या वादात पडू नये. कारण जात-धर्म या कितीही खर्‍या गोष्टी असल्या तरी त्याच्यासाठीच्या भांडणातून विनाष सोडून काहीही हासिल होत नाही ....
एक " बाबरी झाली " तेवढे बास झाले. त्याच्यासाठी पुन्हा सामान्य जनतेला त्रास नको ...........

अवांतर :
" ताजमेहल तय्यार होने के बाद ,
शहाजहान ने उसको इधरसे देखा , फिर उधरसे देखा,
सब देखने के बाद उसके दिमाग मे खयाल आया,
च्यायला, मजाक मजाक मे बहूत खर्चा हो गया ....."

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

माझ्या माहितीप्रमाणे सध्याचा अस्तित्वात असलेला ताजमहाल हा "शहाजहानने" आपल्या "मुमताजसाठी" बांधला होता ...
दुसर्‍या एका विचारसारणी प्रमाणे "ताजमहालाच्या जागी एक शिवमंदिर " होते. शहाजहानने ते उध्वस्त करून त्या जागी ही "जंगी प्रेमाची निषाणी बांधली " ...
अजून कुणी काय म्हणते तर कुणी काय ?

पण सध्या उपलब्ध असलेल्या दस्तावेजावरून तो शहाजहानने बांधला हे समजून चालण्यास हरकत नाही. त्याच्याकडे आपण एक मस्त कलाकॄती म्हणून पहायचे , नसत्या वादात पडू नये. कारण जात-धर्म या कितीही खर्‍या गोष्टी असल्या तरी त्याच्यासाठीच्या भांडणातून विनाष सोडून काहीही हासिल होत नाही ....
एक " बाबरी झाली " तेवढे बास झाले. त्याच्यासाठी पुन्हा सामान्य जनतेला त्रास नको ...........

अवांतर :
" ताजमेहल तय्यार होने के बाद ,
शहाजहान ने उसको इधरसे देखा , फिर उधरसे देखा,
सब देखने के बाद उसके दिमाग मे खयाल आया,
च्यायला, मजाक मजाक मे बहूत खर्चा हो गया ....."

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Mar 2008 - 11:48 pm | llपुण्याचे पेशवेll

च्यायला, मजाक मजाक मे बहूत खर्चा हो गया
सहीच छोटा डॉन.
पुण्याचे पेशवे

विजुभाऊ's picture

13 Mar 2008 - 5:49 pm | विजुभाऊ

या लिंक वर टिचकी मारुन पहा. सगळे फोटो दिले आहेत.......
http://www.stephen-knapp.com/was_the_taj_mahal_a_vedic_temple.htm
http://www.stephen-knapp.com/photographic_evidence_of_vedic_influence.htm

वडापाव's picture

16 Mar 2008 - 9:04 pm | वडापाव

विजुभाऊ, आपण वर नमुद केलेल्या लिंक्स आवडल्या.
फोटोंपेक्षा त्यांवरील माहिती जास्त आवडली, पटली.
आपला नम्र,
वडापाव