साहित्य : किसलेला दुधी भोपळा १ कप, गार दही २ कप( सायीचे असेल तर छान), बारीक चिरलेला
कांदा १ मोठा चमचा , बारीक चिरलेली कोथिंबीर १ मोठा चमचा, बारीक चिरलेला टोमॅटो १ मोठा चमचा,
जीरे पूड १ चमचा, चवीनुसार मीठ, साखर.........
कृती : साले काढुन किसलेला भोपळा पारदर्शक होईपर्यंत शिजवून घ्या आणि भोपळा थोडावेळ गार करायला ठेवा.
तोपर्यंत दही चांगले फेटून घ्या. मग ह्या दह्यामधे सगळे साहित्य टाकून चांगले मिक्स करा. दही गार असल्यामुळे
तुम्ही हा रायता लगेच खाऊ शकता किंवा १ तास फीज़ मधे ठेवा. हा गार रायता तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता.
प्रतिक्रिया
24 Nov 2009 - 9:56 am | सुबक ठेंगणी
झटपट पण चविष्ट पा.कृ.
अशाच प्रकारे पालकाचं रायतं आई करायची त्याची आठवण झाली. पण त्यात कांदा टोमॅटो नसायचा. पण वरून हिंग जिरं आणि लसणाची चरचरीत फोडणी मात्र असायची.
24 Nov 2009 - 10:02 am | मदनबाण
मागच्याच आठवड्यात अननस रायते हादडले होते... हा प्रकारसुद्धा मस्त लागत असणार. :)
(बुंदी रायता प्रेमी)
मदनबाण.....
"Life is the flower for which love is the honey."
Victor Hugo
24 Nov 2009 - 11:10 am | अवलिया
वा ! छान !!
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
24 Nov 2009 - 2:31 pm | भाग्यश्री कुलकर्णी
मस्त्च आहे करायलाही सोपे आहे.
24 Nov 2009 - 7:38 pm | प्रभो
चलू द्या
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
24 Nov 2009 - 9:43 pm | टारझन
सुंदर !! (जरी दुधी भोपळा आवडत नसला तरी) ... सुंदर . अतिशय सुंदर पाकृ
- टारझन
26 Nov 2009 - 1:29 pm | सुप्रिया
मस्त दिसतंय रायतं. उद्याच करते.