मिपावरील पनीर वाल्या पाककृती पाहून खायचा मोह अनावर झाला तेव्हा मी शेवटी काही लो फॅट पर्याय शोधायला सुरुवात केली. बरीच शोधाशोध केल्यावर शेवटी हे लो फॅट पनीर मिळाले. माझ्यासारखे पनीर पाहून नुसतीच लाळ गाळणारे कोणी मिपाकर असल्यास त्यांनाही उपयोगी पडेल म्हणून इथे कृती देतेय.
साहित्य
१६ कप १% दूध
२ कप स्किम मिल्क पावडर
१/३ कप व्हाईट व्हिनेगर
कृती
मोठ्या पातेल्यात दूध आणि मिल्क पावडर एकत्र करुन गॅस वर गरम करायला ठेवा. उकळी आली की त्यात व्हिनेगर घालून नेहमी सारखे पनीर करा.
प्रतिक्रिया
23 Nov 2009 - 7:31 pm | सूहास (not verified)
???????
फोटु
सू हा स...
23 Nov 2009 - 7:52 pm | स्वाती२
च्च! पनीरचा काय फोटो टाकायचा. त्यातून टाकाला असता पण मी केलेलं पनीर फ्रीजरमधे आहे.
23 Nov 2009 - 8:14 pm | jaypal
सौजन्य :- तरला द्लाल
****************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
23 Nov 2009 - 7:44 pm | गणपा
१६ कप १% दूध
किती किलो पनीर तयार होते या पासुन?
23 Nov 2009 - 8:04 pm | स्वाती२
वजन कुणी केलेय ? :)
मी नेहमीच १ गॅलनचे पनीर करते. साधारण ७-८ इंचाच्या पनीरच्या चाकाचे ४ तुकडे कापून फ्रीजरला टाकते. १ तुकडा ३ जणांच्या एकवेळच्या जेवणाला वापरते.
23 Nov 2009 - 8:20 pm | गणपा
खुलाश्या बद्दल धन्यु. :)
24 Nov 2009 - 5:12 am | चित्रा
उपयुक्त माहिती आहे. एकदाच पनीर घरी करण्याचा खटाटोप केला होता. बाहेरचे मिळते, पण घरातल्याची चव वेगळीच.
24 Nov 2009 - 5:48 am | शाहरुख
१.>>नेहमी सारखे पनीर करा
म्हणजे कसे ?
२. दूधाबरोबर मिल्क पावडर पण ?
३. होल (whole) मिल्क वापरल्यास फॅटदार पनीर होईल ना ?
४. व्हिनेगर ऐवजी लिंबाचा रस चालणार नाही का ?
माझ्यातील भोळ्याभाबड्या स्वयंपाक्याने कच्च्या दूधात लिंबाचा रस पिळून थोडा वेळ तसेच ठेवले होते आणि मग फडक्यातून घट्ट पिळून घेतले होते पण तो प्रयत्न फसला होता.
आणि बाहेरून पनीर विकत आणणे परवडत नाही हो :-D
24 Nov 2009 - 7:35 am | स्वाती२
१. पनीर साठी हा व्हिडियो बघा.
http://www.youtube.com/user/Manjulaskitchen#p/search/5/acROvuObr-Q
२. १% दूध नुसतं वापरलं तर खूप कमी पनीर तयार होते म्हणून मिल्क पावडर+ दूध
३. हो. फॅटवालं पनीर होईल.
४. लिंबू रस चालेल. देशात मी तेच वापरायचे. इथे लिंबू मिळतेच असे नाही म्हणून व्हिनेगर वापरते.