मी माझाच

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जे न देखे रवी...
8 Mar 2008 - 11:21 am

ब्लॉग वर लिहीताना.... मी माझ्याच प्रेमात पडलो
लोकांच्या कॉमेंट्स वाचल्यावर.... ताडकन उडालो

अशी चारोळी एक माझ्या हातुन घडावी
वाचताना हासून त्यांची बत्तिशी पडावी

तिथे मग सांडतो फेस अक्षरांचा.......
पेला हिंदळकतो तुझ्या स्वरांचा
कैफात स्म्रुतिंच्या ....मी मग स्वार होतो...
तुला घेउनी सवे..साता समुद्रापार होतो....


मि पा करनो......
जमले तर या तीन चारोळ्यांची उत्तरे...चारोळीतच द्या...
आपला...
चारोळी चरणारा
विजुभाऊ

प्रतिक्रिया

फटू's picture

8 Mar 2008 - 4:21 pm | फटू

तुझ्या प्रेमात पडल्यावर... मी चार ओळी लिहू लागलो होतो
तुझा प्रतिसाद कळल्यावर... मात्र मी थोडासा बावरलो होतो

तुझी अन् माझी एक अनोखी प्रेमकाहाणी घडावी
माझी प्रत्येक सांज तुझ्या बाहुपाशात विरघळावी

ओसंडून कधी वाहतो इथे, आनंद तुझ्या आगमनाचा...
आसमन्तात सा~या भरून जातो जणू गंध मोग~याचा...
धुंदीत तुझ्या शब्दांच्या... मी मलाच हरवून जातो...
मिसळून नजरेत नजर तुझ्या, मी साता समुद्रापार पाहतो...

प्राजु's picture

8 Mar 2008 - 9:37 pm | प्राजु

दोन्ही काव्यं सुंदर आहेत.

- (सर्वव्यापी)प्राजु

विजुभाऊ's picture

12 Mar 2008 - 10:55 am | विजुभाऊ

प्राजु केवळ कॉमेंट्स नकोत्......जरा काहितरी चारोळ्या पाडुयात सगळे मिळुन
पण जरा हसर्या असुद्या

मी मला काल आरशात पाहीले......
वाढ्लेली दाढी कुरवाळीत म्हंटले
की दर्शन नाही राहीले आता पहिले....
तो तुझाच तेंव्हाआदेश होता मजला
("गाढवा आरशात तोंड पहा म्हणुन")
पाहीले आरशात मी मानून तुजला.
सारे होते जेथल्या तेथे .....अचंभीत झालो मी
मान झटकून जाती झालीस तू रूप गर्वीता षोडशा
पहातच राहीलो त्याकडे मी बावरुन येडासा.......
क्षण काल वर्षे निघोनी गेली......
हासत कोणी दुसरी मिळाली
काल तू पुन्हा दिसलीस आणि
मी आरशात पाहीले......
वाढ्लेली दाढी कुरवाळीत म्हंटले की
तुझे दर्शन नाही राहीले आता पहिले....
........विजुभाऊ

विजुभाऊ's picture

12 Mar 2008 - 11:07 am | विजुभाऊ

तुला पाहीपर्यंत मी देखणा होतो....
नजरे ला नजर भिडेपर्यंत चकणा होतो.
तुझ्या हातात ही जादू चंट होती
तू डोळ्यांची डॉक्टर् होतीस..मी पेशंट होतो

व्यंकट's picture

12 Mar 2008 - 10:55 am | व्यंकट

चारोळ्यांविषयी मला काही वैशेषीक प्रेम नाही, परंतु वरील पान वाचल्यावर आंतर्जालावर आद्य चारोळीकारांच्या नावानी शोध घेतल्यावर meemaza.com सापडले. चारोळी फॅन्सनी इच्छा असल्यास लाभ घ्यावा.

व्यंकट

विसोबा खेचर's picture

12 Mar 2008 - 11:27 am | विसोबा खेचर

तिथे मग सांडतो फेस अक्षरांचा.......
पेला हिंदळकतो तुझ्या स्वरांचा
कैफात स्म्रुतिंच्या ....मी मग स्वार होतो...
तुला घेउनी सवे..साता समुद्रापार होतो....

क्या बात है...

तात्या.

विजुभाऊ's picture

12 Mar 2008 - 6:27 pm | विजुभाऊ

बेभान होतानाही तूला भान असायचे
घड्याळाच्या काट्याकडे ध्यान असायचे
दर वेळी मला हे उमगायाचे ....
जेंव्हा होटेल चे खाण्याचे बील यायचे

वरदा's picture

12 Mar 2008 - 7:24 pm | वरदा

ब्लॉग वर लिहीताना.... मी माझ्याच प्रेमात पडलो
लोकांच्या कॉमेंट्स वाचल्यावर.... ताडकन उडालो

मस्तच....

तुमचा व्य.नि. पाहून...मी ही बुचकळ्यात पडले
चारोळ्या लिहिताय म्हटल्यावर...लुडबुडायचे ठरवले.....:)))

विजुभाऊ's picture

13 Mar 2008 - 12:26 pm | विजुभाऊ

ग्रुहपाठ लिहीताना माझे पेनच हरवले...
असे मी मोजून दहा वेळा गिरवले
हे लिहिण्याची एक मजा असते....
वाचायला लावायची मस्त सजा असते

विजुभाऊ's picture

17 May 2008 - 3:06 pm | विजुभाऊ

मी कोणी खास आहे असा माझा भास आहे
दाखवुनी बोटे माझ्याकडे ते म्हणाले
हा उद्याचा उज्वल इतिहास आहे.
अभ्यासक्रमातुनी त्यानी वगळले ते पान माझे होते.
माझ्या इतिहासाचे त्यांनाच ; झाले जड ओझे होते