राज ठाकरेंनी शिवसेना सोडून नविन पक्षाची घोषणा करण्यापुर्वी बराच वेळ घेतला होता. त्यामुळे ते नवीन काहीतरी भरीव अजेंडा घेउन येणार ह्या आशेने मी, सद्य स्थितीतील सर्व विचारशून्य आणि कर्तृत्वशून्य राजकीय पक्षांचा वीट आलेला, आनंदीत झलो होतो.
मी राज ठाकरेंचा विद्यार्थीदशेपासून समर्थक आहे (आता.... होतो म्हणावे का?) परंतू ‘मराठी अस्मिता’हाच मुद्दा ‘जुनी दारु नवी बाटली’ असा पुढे आणल्यामुळे माझा काहीसा हीरमोड झाला होता. काल हा लेख ‘ राज ठाकरे यश: मिथ आणि वास्तव’ वाचला आणि माझ्या मनातल्या विचारांना प्रकट रूप मिळाले. लेखातील प्रमुख पटलेले मुद्दे:
1. ‘नेमके काय हवे’ याचे उत्तर जेव्हा राज ठाकरे देण्याचा प्रयत्न करतील तेव्हा ते खोल पाण्यात उतरलेले असतील आणि जितक्या लवकर ते या खोल पाण्यात उतरतील तितक्या लवकर महाराष्ट्रातील राजकारण हे अस्मितावादाच्या प्रभावापासून मुक्त होऊन विकासवादी राजकारणाकडे जाईल
2. प्रस्थापित राजकीय पक्षाच्या कर्तृत्वशून्यतेमुळे आणि कोणीच आश्वासक नसताना हे नवे उदयोन्मुख नेतृत्व तरी काही नवीन घडवेल अशी आशा राज ठाकरेंकडून अनेकांना आहे (माझ्याही ह्याच विचारने आशा पल्लवीत झाल्या होत्या...असो). अर्थातच ती नकारात्मक आहे. कारण राज ठाकरेंनी मराठीच्या अस्मितेचा मुद्दा वगळता दुसरा कोणताही विकासवादी मुद्दा उचललेला नाही.
3. मराठी अस्मितेचा मुद्दा जर मुंबईबाहेर प्रभावी ठरला असता तर राज ठाकरेंनी शिवसेनेची मर्यादा ओलांडली असे म्हणता आले असते किंवा जेथे शिवसेनेचा प्रभाव नाही अशा ठिकाणी जरी मनसेचा प्रभाव दिसला असता तरी ते लक्षणीय ठरले असते. पण राज ठाकरेंचा प्रभाव ज्या ठिकाणी शिवसेनेचा प्रभाव आहे त्याच भागात आहे हेच निवडणूक निकाल सांगतात.
पूर्वग्रहविरहीत व साधक-बाधक चर्चेची अपेक्षा आहे.
(मिपावार नव-अर्भकावस्थेत असल्यामुळे जुन्या खोंडांकडून आणि कंपूबाजांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.)
प्रतिक्रिया
23 Nov 2009 - 10:25 am | सुहास
1. ‘नेमके काय हवे’ याचे उत्तर जेव्हा राज ठाकरे देण्याचा प्रयत्न करतील तेव्हा ते खोल पाण्यात उतरलेले असतील आणि जितक्या लवकर ते या खोल पाण्यात उतरतील तितक्या लवकर महाराष्ट्रातील राजकारण हे अस्मितावादाच्या प्रभावापासून मुक्त होऊन विकासवादी राजकारणाकडे जाईल
नक्कीच.. आणि मला वाटते त्यांनाही ते माहीत असावे..
2. प्रस्थापित राजकीय पक्षाच्या कर्तृत्वशून्यतेमुळे आणि कोणीच आश्वासक नसताना हे नवे उदयोन्मुख नेतृत्व तरी काही नवीन घडवेल अशी आशा राज ठाकरेंकडून अनेकांना आहे .
मलाही आहे.. पण ही आशा नकारात्मक आहे हे ठरवण्याची खूपच घाई होतेय..
--सुहास
23 Nov 2009 - 11:35 am | प्रभो
>>(मिपावार नव-अर्भकावस्थेत असल्यामुळे जुन्या खोंडांकडून आणि कंपूबाजांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.)
मुरलेले राजकारणी दिसताय...विषय पण तापलेल्या तव्यासारखा आहे....
नवअर्भकावस्थेतच तुम्हाला जालीय राजकारणाची चांगलीच जाण आहे की..(ह. घ्या. नाहीतर मग इनो आहेच...)
बाकी सूहासशी सहमत...थोडी घाई होतेय नकारात्मक ठरवायला...
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
23 Nov 2009 - 1:19 pm | विशाल कुलकर्णी
हे राम ! ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
23 Nov 2009 - 2:58 pm | घाशीराम कोतवाल १.२
(मिपावार नव-अर्भकावस्थेत असल्यामुळे जुन्या खोंडांकडून आणि कंपूबाजांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.)
हे वाक्य फार खोलवर जाउन काळजाला भिडले
बाकी पक्के राजकारणी वाटता असो आपल्याला पुलेशु
**************************************************************
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराजकी जय
23 Nov 2009 - 4:22 pm | प्रशु
ह्या असल्या विचारजंत लेखाला काल ममता ब्यानर्जीच्या रेल्वे भरतीत भुमीपुत्रांना सामिल करुन घेण्याच्या निर्णया ने चपराक मिळाली आहे. हा राज ठाकरे यांचाच विजय आहे. वर वर दिसता जरी हा प्रश्न भावनीक असला तरी स्थानिकांच्या रोजगारशी निगडीत असल्याने तो मुळातच तो विकासाचा प्रश्न आहे.
पुण्या सारख्या भागातुन राज चा ऊमेदवार निवडुन आला आहे. पुणे नाक्किच मुंबईत नाहि आणि तेथे सेनेचा प्रभावहि नाहि मग आपला ३ रा मुद्दा कसा ग्राह्य धरावा?
---------------------------------------------------
मनसेची माणसे.
23 Nov 2009 - 5:11 pm | गणपा
सहमत....
आणि हे लगेच आले लोणी खायला..
23 Nov 2009 - 9:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ममता ब्यानर्जी फार मोठं विकासाचं राजकारण करतात असा काही गैरसमज झालेला दिसत आहे. एका बंगाली मित्राशी चर्चा करत होते, त्याने विचारलं, "मला प्रश्न पडतो, आमच्याकडे का नाही राज ठाकरे तयार झाला?" वर स्वत:च म्हणतो, "मॉमतादी आहे काय कमी आहे का?"
अदिती
24 Nov 2009 - 2:44 pm | प्रशु
ममता ब्यानर्जी फार मोठं विकासाचं राजकारण करतात असा काही गैरसमज झालेला दिसत आहे.
असे मी कुठेहि म्हटले नाहि. आपली प्रतिक्रिया जरा समजेल अशी लिहा.
---------------------------------------------------
मनसेची माणसे
23 Nov 2009 - 10:41 pm | अडाणि
पुण्यात मनसे च्या प्रभावाने उमेदवार निवडून आला - असे आपले मत असेल तर मोठा विनोद आहे.
वांजळे , निवडणूकीपुर्वी काही दिवस - ईतर ठीकाणी तिकीट न मिळाल्याने , मनसेत आले आणि त्यांनी स्वताच्या हिमतीवर निवड्णूक जिंकली.
-
अफाट जगातील एक अडाणि.
21 Sep 2011 - 10:34 pm | चेतन सुभाष गुगळे
<< पुण्यात मनसे च्या प्रभावाने उमेदवार निवडून आला - असे आपले मत असेल तर मोठा विनोद आहे. >>
<< वांजळे , निवडणूकीपुर्वी काही दिवस - ईतर ठीकाणी तिकीट न मिळाल्याने , मनसेत आले आणि त्यांनी स्वताच्या हिमतीवर निवड्णूक जिंकली. >>
आपलं हे विधान खरं असल्याचं सिद्ध केलंय ते खालच्या बातमीने
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10065961.cms
जो पक्ष स्वत:च्या दिवंगत आमदाराच्या पत्नीवर देखील प्रभाव टाकू शकत नाही, त्या पक्षाचा प्रभाव मतदारांवर पडूच शकत नाही. अर्थात काही विधानांची सत्यता सिद्ध व्हायला वेळ लागतो. तोवर लोक त्या विधानांना आणि ती करणार्यांना स्वीकारण्याची मानसिकता दाखवू शकत नाही हे कटू वास्तव या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले.
23 Nov 2009 - 5:59 pm | सूहास (not verified)
येत्या काळात लेखातील आणी ईतर प्रतिसादातील मुद्यांना उत्तरे मिळतील अशी आशा..
सू हा स...
23 Nov 2009 - 6:27 pm | हेरंब
स्वतःचे घर भरले असताना आणि भरल्यापोटी तरी काही लोकांना परोपकार आठवतो. निदान् या न्यायाने तरी राजला देव सुबुध्दी देवो!
23 Nov 2009 - 7:14 pm | प्रशु
गेल्या ५० वर्षात महाराष्ट्राता बर्याच लोकांची पोटे भरली, त्यांच्या बद्द्ल पण लिहा कि राव....
23 Nov 2009 - 8:18 pm | विसोबा खेचर
मिलिंद मुरुगकर यांचा लेख वाचला..
तर तर! आपले आहे की अगदी परखड! मला तर टिळकांचाच अग्रलेख वाचतोय की काय असा क्षणभर भास झाला! :)
तात्या.
23 Nov 2009 - 9:26 pm | टारझन
हॅहॅहॅ सहकार्य करून फक्त एवढाच प्रतिसाद देतो :)
नाही तर इथे खरडफळा बनवायचा मुड झालाच होता !!!
असो .. चालू द्या चर्चा आम्ही सहकार्य करतोय्च ..
- कंपुजीरावजुनंखोंडेकर
23 Nov 2009 - 9:36 pm | प्रकाश घाटपांडे
आमच्या मते ही स्वार्थाची लढाई आहे. स्वार्थ ही एक प्रेरणा आहे. या लढाईतुनच विकास होणार आहे. स्वार्थ साधता साधत विकास झाला तरी खुप आहे. अस्मितेच्या लढाईत विकासाचे बायप्रॉडक्ट बाहेर पडावे ही सदिच्छा
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
24 Nov 2009 - 5:07 am | simplyatin
मतदार हे अतिशय् डोकेबाज लोक असत्तात.... दरवेळ खर्डायला नविन पाटी लागते.... ती त्याना राज च्या रूपात मिळालि आहे इतकच...
असो या खरड्न्यत महाराश्त्र चे भले होत असेल तर काय चालुदे खरड्पट्टी....
24 Nov 2009 - 9:32 am | सोत्रि
गंगाजल चित्रपटात अजय देवगणच्या तोंडी संवाद लेखकाने एक वाक्य टाकले आहे “समाज को पुलीस और सरकार वैसेही मिलती है जैसा समाज खुद होता है”. सद्य स्थितीत आंदोलनाचा जो मार्ग अवलंबला जात आहे त्यावर हे वाक्य मर्मिक आणि चपखल आहे.
वरवरचे उपाय शोधण्यापेक्षा खोलात जाउन मुळ समस्येचे निरकरण करणे गरजेचे आहे असे मला वाटते. परप्रांतियांना मुंबइत येण्याची गरजच का भासावी? तसे करणे त्यांना सोपे का वाटावे? झोपडपटट्या का व कश्या उभारल्या जाउ शकतात? हेच जर रोखले तर जाळपोळ आणि तोडफोड हे करावे लागणार नाही.
सध्या जपानस्थित वास्त्व्यात बरयाच चिनी लोकांकबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी चीन आणि चीनचे राजकिय नेतृत्व ह्या विषयावर चर्चा झाली. त्यांच्याकडे पुढील 50 वर्षांचा Development Plan तयार आहे आणि हे केवळ राजकिय नेत्यांचा दूरदर्शीपणा आणि चींनला एक नंबर वर घेउन जाण्याचा ध्यास ह्या गोष्टींमुळे शक्य झाले आहे.
गेल्या 60 वर्षांत भारतात जो राजकारणाचा आणि त्यामुळे सुधारणेचा जो खेळखंडोबा झाला आहे त्यानुसार नवनिर्माण गरजेचे आहेच. प्रस्थापित राजकीय पक्षांच्या कर्तृत्वशून्यतेमुळे ते शक्य नाही म्हणूनच राज ठाकरेंनी नवनिर्माण पक्षाची घोषणा केली आणि आशा पल्लवीत झाल्या. राज ठाकरेंचा महाराष्ट्राच्या प्रश्नांचा गाढा अभ्यास आहे. त्यांचे तरूण नेतृत्व आश्वासक आहे असे अजूनही मला वाटते. त्यांनी आखलेली मर्यादाही महाराष्ट्रापुरतीच आहे हे ही अभिनंदनीय. परंतू त्यांच्या कडून कहीतरी भरीव कार्यक्रम आणि Development Plan आखणे जरजेचे आहे. जेणेकरुउन खरोखरीचे ‘नवनिर्माण’, ज्याची महाराष्ट्राला सध्या खरच जरज आहे, ते होइल.
परप्रांतीय आणि मराठी अस्मिता हा मुद्दा पक्ष स्थापनेच्या सुरुवतीच्या काळात लोकांचे लक्ष वेधुन पक्षाच्या अस्तित्वाची जाणिव करून देण्यासाठी योग्य असेलही कदाचीत पण आता खरोखरीचे भरीव राज ठाकरेंकडून अपेक्षीत आहे. जेणेकरून ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ हा पक्ष प्रस्थापित पक्षांपासून वेगळा आहे आणि पक्षाकडे नवनिर्माणाचा कार्यक्रम आहे आणि ते काय हे लोकांना कळणे महत्वाचे आहे. कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी पायरया-पायरया नी जायची गरज असते. नवनिर्माण एका रात्रीत होत नसते. सध्याच्या आंदोलन ही पहिली पायरी असेलही कदाचीत पण आता पुढची पायरी (भरीव Development Plan) काय हे राज ठाकरेंनी ठरवले पाहीजे.
मूळ लेखामागचा हेतू ह्या अनुषंगाने चर्चा व्हावी हा होता. सध्याच्या आंदोलनाचा मार्ग योग्य की अयोग्य हा हेतू अजिबात नव्हता.
(ता.क.: जुन्या खोंडांचे आणि कंपूबाजांचे सहकार्याबद्दल आणि लिहीण्याचा हुरूप वाढविण्याबद्दल आभार आणि धन्यवाद)
24 Nov 2009 - 9:51 am | बिपिन कार्यकर्ते
बहुतांशी सहमत.
केवळ चीनच्या मुद्द्यावर नो कॉमेंट्स. राजकडून अपेक्षा खूपच आहेत. त्यानेच त्या निर्माण केल्या आहेत. अजून पर्यंत तरी प्राथमिक पायरीवरून गाडी पुढे सरकल्याचे जाणवत नाही. परत एकदा अपेक्षाभंगाचे दु:ख पदरी न पडो हीच इच्छा.
बिपिन कार्यकर्ते
24 Nov 2009 - 10:12 am | शाहरुख
मनसेला आता लग्नातही हवा "मराठी मेनू'
बघा गाडी कुठे चाललीय ते ;-)
24 Nov 2009 - 10:59 am | सुनील
त्यांच्याकडे पुढील 50 वर्षांचा Development Plan तयार आहे आणि हे केवळ राजकिय नेत्यांचा दूरदर्शीपणा आणि चींनला एक नंबर वर घेउन जाण्याचा ध्यास ह्या गोष्टींमुळे शक्य झाले आहे.
नेहेमीच सरकारी प्रयत्न असावे लागतात असे नाही. त्या दृष्टीने ही बातमी मनोरंजक वाटेल.
बाकी मनसेबद्दल सध्यातरी फिन्गर्स क्रॉस्ड!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
24 Nov 2009 - 3:45 pm | परिकथेतील राजकुमार
आपण जे काही लिहिले आहेत (पुर्ण वाचले नाही) ते सकस, चर्चा करण्यायोग्य असेल तर त्यावर सर्व मिपाकरांचे सहकार्य हे नक्की मिळणारच, त्यासाठी "(मिपावार नव-अर्भकावस्थेत असल्यामुळे जुन्या खोंडांकडून आणि कंपूबाजांकडून सहकार्याची अपेक्षा आहे.)" ह्या विधानाची काही गरज होती असे वाटत नाही.
ह्या वाक्या मागचा हेतु कळला नाही. नव-अर्भकावस्थेत देखील आपले हे ज्ञान बघुन थक्कच झालो, क्षणभर आपण अभिमन्यु आहात का काय असे वाटुन गेले.
©º°¨¨°º©भिकाजीराव हातपुढेकर ©º°¨¨°º©
आमचे राज्य
22 Sep 2011 - 12:53 am | पाषाणभेद
आपणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
जय आंतरजाल मराठी नवनिर्माण सेना!!
22 Sep 2011 - 1:41 am | कुंदन
जागा हो ब्वॉ , बघ बँकांमध्ये भरती आहे.
चांगला दिवसा उजेडीची नोकरी आहे बघ बँकांमध्ये, रात्री-अपरात्री कामे करावे लागणार्या नोकरीचे काही खरे नाही रे बाबा.
https://www.manase.org/banking-from.pdf