मुंबई
शिवसेनेवर कार्यक्रमातून व बातम्यांमधून टीका केली जात असल्याच्या आरोपावरून शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी 'आयबीएन-लोकमत' या मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यालयावर जोरदार हल्ला करून या वाहिनीच्या कर्मचा-यांना व संपादक निखिल वागळे यांना जोरदार मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.
'आयबीएन-लोकमत' या वाहिनीच्या आजचा सवाल या कार्यक्रमात संपादक निखिल वागळे हे शिवसेनेवर वारंवार टीका करत असतात असा आरोप करून सुमारे 40 ते 50 शिवसैनिकांचा जमाव या वाहिनीच्या मुंबई कार्यालयावर चालून आला. यावेळी त्यांनी वाहिनीच्या कार्यालयात काम करीत असलेल्या कर्मचा-यांना जोरदार मारहाण करून संपादक वागळे यांनाही मारहाण केली.
कार्यालयातील सामान व काचांचीही त्यांनी तोडफोड केली.
दरम्यान, वाहिनीने या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणी अगदी पोचट भूमिका घेतल्याचा आरोप केला असून या प्रकरणी संरक्षणाची मागणी केली आहे.
स्त्रोतः वेबदुनिया
प्रतिक्रिया
20 Nov 2009 - 4:52 pm | मड्डम
पत्रकारितेवरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध
20 Nov 2009 - 4:55 pm | llपुण्याचे पेशवेll
हे हे हे. तुमच्याकडून धागा आणि त्याचा निषेध अपेक्षित होता. पुढच्या वेळेपासून तुमच्या धाग्याला आमचा प्रतिसाद 'प्रटावाना'
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
20 Nov 2009 - 8:00 pm | टारझन
एकदा बिहारी चॅनल्स ची ऑफिसं फोडली पाहिजेत च्यामायला त्यांच्या. ..
पार वात आणेपर्यंत खाजवत असतात हल्ली हे न्युज चॅनल वाले !!
जर तोडफोड करणे गुण्हा आहे तर चुकीच्या आणि स्वतःच्या फायद्यानुसार न्युज देऊन लोकांना विचारवंत बनवने हा त्यापेक्षा मोठा गुन्हा आहे.
असो .. कोणाचेही समर्थन नाही किंवा निषेध नाही :)
आपला संदिप खरे ची गाणी ऐकत बसतो ..
22 Nov 2009 - 4:03 pm | सुधीर काळे
खरा निषेध करायला हवा श्री राजदीप सरदेसाईंचा! सरकारपुढे गार्हाणे मांडून बाहेर आल्यावर झालेल्या पत्रकारपरिषदेत हिंदीत बोलल्याबद्दल. राजाभाऊंच्या एकाद्या कार्यकर्त्याने "कानाखाली" वाजविली पाहिजे त्याच्या! चांगला दिलीप सरदेसाईंचा मुलगा पण असा कसा निघाला?
------------------------
सुधीर काळे, जकार्ता
22 Nov 2009 - 9:02 pm | शाहरुख
महाराष्ट्र मे जो कोई हिंदी बोलेगा उसके कान के निचे आप आवाज निकालते बैठेंगे क्या ? अपने शाहरुख भाई का क्या होगा फिर ??
[ माझे हिंदी चांगले नाही..शिकतोय मी :-) ]
22 Nov 2009 - 9:32 pm | प्रकाश घाटपांडे
माझा एक मित्र आहे सय्यद . त्याला ऑफिसमधला एक जण (मराठी ) भेटला
तो:- क्या कैसे क्या चल रहा है|
सय्यदः- मजेत आहे
तो:- बहोत दिनसे दिखे नही
सय्यदः- गावाला गेलो होतो
तो:- चलु क्या जरा जल्दि मे है
सय्यद:- ठीक आहे भेटु
नंतर सय्यद मला म्हणाला मी त्याच्याशी मराठीत बोलतोय हे त्याच्या लक्षातच येत नव्हत. दोघांच्याही कैक पिढ्या मराठीच.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
22 Nov 2009 - 9:49 pm | शाहरुख
आपले मित्र सय्यद कोणी कानफाटात मारेल या भितीने मराठीत बोलतात की मराठीशी जवळीक निर्माण झाल्याने मराठीत बोलतात याबद्दल अधिक माहिती मिळू शकेल का ?
22 Nov 2009 - 4:09 pm | सुधीर काळे
खरा निषेध करायला हवा श्री राजदीप सरदेसाईंचा! सरकारपुढे गार्हाणे मांडून बाहेर आल्यावर झालेल्या पत्रकारपरिषदेत हिंदीत बोलल्याबद्दल. राजाभाऊंच्या एकाद्या कार्यकर्त्याने "कानाखाली" वाजविली पाहिजे त्याच्या! चांगला दिलीप सरदेसाईंचा मुलगा पण असा कसा निघाला?
------------------------
सुधीर काळे, जकार्ता
20 Nov 2009 - 5:16 pm | सूहास (not verified)
आपले धागे बघुन अमंळ कामधंदा सोडुन टि.व्ही.पुढे बसाव की काय असे वाटाया लागले...
नेहेमीप्रमाणे वैचारिक निषेध !!!!
बाकी तो एक दिवस मार खाणारच होता !! शिवराज पाटीलही ईतक्या लवकर कपडे बदलत नाहीत जितक्या लवकर निखील वागळे पार्टी बदलतो !!!
सू हा स...
आम्ही हल्ली ,मोबाईलच्या प्रकाशात, वहीत, वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
20 Nov 2009 - 6:54 pm | सन्जोप राव
म्हणजे शिवराज पाटील की काय?
सन्जोप राव
जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.
20 Nov 2009 - 7:05 pm | निमीत्त मात्र
आम्ही कृतीवाले लोक आहोत. डायरेक्ट अॅक्शण! हे विसरलात काय?
20 Nov 2009 - 5:02 pm | बाकरवडी
पुण्यातील कार्यालयावर पण हल्ला झाल्याची बातमी येत आहे
निषेध!!!!
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
20 Nov 2009 - 5:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
निषेध...निषेध.....निषेध.....!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
20 Nov 2009 - 7:25 pm | अक्षय पुर्णपात्रे
प्राध्यापक साहेबांशी सहमत. या हल्ल्याचा निषेध नोंदवतो.
__________________________
As an internet discussion grows longer, the probability of a comparison involving Nazis or Hitler approaches 1.
-Godwin's law
21 Nov 2009 - 2:09 pm | आण्णा चिंबोरी
ही बातमी कळली तेव्हा आपोआपच तोंडातून 'हय शाबास' असे उद्गार निघाले. वटवट वागळ्याला सटकवले हे फार चांगले झाले.
वागळे, केतकर यासारख्या उंडग्या पत्रकारांनी थोडे आत्मपरीक्षण करावे. मराठे, ब्राम्हण असे सगळेच लोक आपल्यालाच का बडवतात याचा थोडा विचार करावा. वागळ्याला निदान पाचव्यांदा सडकून काढले असेल पण याचे शेपूट अजून सरळ झालेले नाही.
मराठी माणसाच्या विरोधात मुद्दाम लिहायचे हा याचा एककलमी कार्यक्रम आहे. परवा बाळ ठाकरेने लिहिलेला लेख मी स्वतः वाचला होता. त्यातले वाक्य, 'सचिन म्हणतो मला महाराष्ट्रीय असल्याचा अभिमान आहे, पण त्याचबरोबर मी भारतीयही आहे. आमचेही हेच म्हणणे आहे. आम्हालाही भारतीय असल्याचा अभिमान आहे. त्यामुळेच आम्ही जय महाराष्ट्र च्या आधी जय हिंद म्हणतो' असे स्पष्ट लिहिले होते.
आता यात भारतीयत्व वि. महाराष्ट्रीयत्व कुठे आले? पण वागळ्याचा सगळा कार्यक्रम हा बाळ ठाकरे भारतीयत्वाच्या विरोधात या मुद्द्यावर होता. अरे किती खोटे बोलणार?
खोट्याच्या कपाळी गोटा बसलाच ना शेवटी.
बाळ ठाकरेही काही धुतल्या तांदळाचा नाही पण ठाकरेच्या काठीने वागळे नावाच्या सापाला शिक्षा झाली तर त्यात नुकसान नाही.
20 Nov 2009 - 5:30 pm | गणपा
कंटाळा आला आहे या प्रसारमाध्यमांचा/वृत्तपत्रांचा.
निप्पक्ष पत्रकारीता राहीली बाजुला, नुसता बाजार मांडला आहे यांनी.
कधी कधी वाटते की या माध्यमांना उगाच नको तितके स्वातंत्य दिले आहे.
आपण जे काही दाखवु तेच लोकांनी खर मानव असा अट्टहास असतो चोच्यांचा.
एकवेळ गिधाडं परवडली पण याचें टोचे पत्रकार आवरता येत नहीत.
मी शिवसेनेचा वा कुठल्याच संघटनेचा/पक्षाचा पुरस्कारकर्ता नाही.
पण सध्या मन मनसे कडे झुकु लागलय..
20 Nov 2009 - 5:30 pm | विसोबा खेचर
निखिल वागळे हे जर नि:पक्षपातीपणाने पत्रकारीता करत असतील तर त्यांच्यावरचा हल्ला हा निंदनीय आहे असे म्हणावे लागेल!
तात्या.
20 Nov 2009 - 5:40 pm | सूहास (not verified)
तात्या ...
न्युज कॅन बी मन्युपुलेटेड !! निड टु चेक !! वागळेंच आणी बाळासाहेबांच भांडण जगजाहीर आहे ..उध्दव ठाकरे कसाही असला तरी ईतका मुर्ख नाही की अश्यावेळेस जेव्हा शिवसेनेची भादरल्या गेलीय तेव्हा असे काही करेल .निड टु चेक...
आणी वागळे काय लै धुतल्या तांदळाचा नाही !! आय.बी.एन-लोकमत मध्ये शेयर आहे मालकांचा !! त्याची टी.आर.पी. सध्या चांगली आहे !!
२००२ मध्ये जया टि.व्ही. वर पण असाच हल्ला झालता , नंतर कळाले की त्यांचीच माणसे होती ...सध्या केस कोर्टात आहे !!
सू हा स...
20 Nov 2009 - 5:40 pm | बाकरवडी
हॅ हॅ हॅ तटस्थ भूमिका ...
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
21 Nov 2009 - 1:18 am | अनामिका
तात्यांशी सहमत!
निखिल वागळे हे जर नि:पक्षपातीपणाने पत्रकारीता करत असतील तर आणि तरच त्यांच्यावरचा हल्ला हा निंदनीय आहे असे म्हणावे लागेल!
अवांतर-
अबु प्रकरणात मनसेच्या आमदारांनी अबुला कानफटवल्यावर सेनेने काही ठाम भुमिका घेतली नाही अथवा मनसे आमदारांच्या बरोबरीने विधानसभेत राडा केला नाही म्हणुन बराच खल प्रसारमाध्यमांनी केला..........झी २४ तास या वृत्तवाहीनी वर शिवसेनेची गोची तत्सम शिर्षकाखाली एक चर्चासत्र घडवुन आणण्यात आले .सहभाग ज्येष्ठ पत्रकार व लेखक निळू दामले व सेनेतर्फे दिवाकर रावते यांचा होता.......मुलाखतकाराने दामले यांना "सेनेचे पुर्वीचे स्वरुप आता बदलत चाललेय ,थोडक्यात सेना सध्या थोडी सभ्य होतेय असे तुंम्हास वाटत नाही का ?"असा प्रश्न विचारला असता "सेनेने राडा संस्कृतीचा त्याग केला आहे हे तुंम्हास पटले नाही का व सेनेने कायम राडेच करत रहावे असे तुंम्हास वाटते का ?"असा उलट प्रश्न निळु दामले यांनी मुलाखतकाराला केल्यावर चेहरा बघण्यासारखा झाला होता........
आज हि बातमी सगळ्या वाहिन्यांवर झळकल्यावर नेहमी प्रमाणे जनतेच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या असत्या निदान ७०%लोकांनी निखिल वागळे यांच्यावर व आयबिएन लोकमत वर झालेल्या या हल्ल्याचे समर्थन केले आणि प्रतिक्रिया देणार्या बहुतांश लोकांचे म्हणणे असे होते कि निखिल वागळे हे फार उच्चप्रतिची शिवराळ भाषा वापरतात.
निखिल वागळेंकडुन नि:पक्षपाती पत्रकारितेची अपेक्षा करणे गैर आहे का? :? संजय राऊत यांच्याकडुन तशी अपेक्षा बाळगण्याचे कारणच नाही कारण ते एका पक्षाच्या मुखपत्राचे संपादक आहेत........
राडा केला नाही तरी बोंब आणि केला तरि बोंब 8}
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
21 Nov 2009 - 1:41 am | शाहरुख
उद्या मी म्हणालो की "मला असे वाटते की मिपाचा संपादक क्ष हा निपक्षपातीपणे काम करत नाही" आणि म्हणून त्याच्या टक्कुर्यात दगड हाणला तर ते चालू शकेल का ?
मी ते चॅनल जेव्हडे बघितले आहे त्यातून मला तो माणूस बोंबाबोंब करून सनसनाटी निर्माण करणारा वाटतो पण मग मी फक्त चॅनल बदलतो :-)
21 Nov 2009 - 1:49 am | अनामिका
मी ते चॅनल जेव्हडे बघितले आहे त्यातून मला तो माणूस बोंबाबोंब करून सनसनाटी निर्माण करणारा वाटतो पण मग मी फक्त चॅनल बदलतो .
काय पण योगायोग मी पण तेच करते.
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
21 Nov 2009 - 1:51 am | Nile
छ्या! तुम्ही सगळे विचारवंत फक्त चॅनेलच बदला!
21 Nov 2009 - 1:55 am | प्रभो
>>उद्या मी म्हणालो की "मला असे वाटते की मिपाचा संपादक क्ष हा निपक्षपातीपणे काम करत नाही" आणि म्हणून त्याच्या टक्कुर्यात दगड हाणला तर ते चालू शकेल का ?
तुम्ही त्याला ईतर राडेबाजांप्रमाणे शाब्दीक जळजळीचे बटाटे फेकून मरू शकता....
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
21 Nov 2009 - 2:23 am | Nile
अहो मालक गफलत होत आहे का?
शाब्दीक वगैरे जे काही फेकुन मारतात ते 'विचारवंत' ना? राडेबाज तर कृतीशील?? तुम्ही भांड-वल-शाही अमेरीकेत येउन इतक्या लवकर वाया (via) जाल असे वाटले नव्हते! ;)
21 Nov 2009 - 9:58 pm | llपुण्याचे पेशवेll
नाही नाही. एक कृतीशील विचारवंत म्हणून पण गट हल्ली उदयाला आला आहे ते म्हणे केवळ 'जळजळीत शाब्दिक बटाटे' फेकून मारायचे काम करतात.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
22 Nov 2009 - 3:27 am | Nile
हा उदय एका विचारवंताच्या डोक्यातुन दिसतोय! :)
20 Nov 2009 - 5:43 pm | मुक्तसुनीत
लवकरच या हल्ल्याबद्दलच्या गमतीदार कॉमेंट्स, एकमेकाना टाळ्या देणे नि शिट्ट्या वाजवणे हे मिसळपाववर दिसेलच. चला . वागळ्यांच्या निमित्ताने सर्व "चैतन्यशील आणि कृतीशील" लोकांनी पुन्हा एकदा आपल्या मनगटावरच्या कड्यांना कल्हई लावून घ्यावी. वागळ्यांना (आणि हो , रिसेप्शनिस्ट सारख्या लोकांनाही - आणि कदाचित येणार्या जाणार्यांपैकी काही लोकांना) झालेल्या मारहाणीचा , नासधूशीचा संबंध "कर भरणे" "विचार करणे" (किंवा त्यांच्या आहार-भय-निद्रा सारख्या ) एखाद्या गोष्टीशी जोडता येईल.
मिसळपाववरील पुढील उरुसाच्या प्रतीक्षेत :-)
20 Nov 2009 - 5:47 pm | सूहास (not verified)
मु.सु.
सर्वात पहिली शिट्टी आणी टाळी तुम्हालाच..
एक नंबर प्रतिसाद...
सू हा स...
20 Nov 2009 - 5:48 pm | सूहास (not verified)
मु.सु.
सर्वात पहिली शिट्टी आणी टाळी तुम्हालाच..
एक नंबर प्रतिसाद...
सू हा स...
20 Nov 2009 - 5:44 pm | सुमीत
जोकर आहे तो, त्याला बिग बॉस मध्ये पाठवा, असंबद्ध बडबड करण्यात त्याचा हात नाही कोणी धरणार.
निखिल वागळे लोकांच्या मतांन किंमत देत नाही , एसेमस मागवून वर लोकांना सवाल कळालाच नाही अशी मल्लीनाथी करतो.
20 Nov 2009 - 5:44 pm | परिकथेतील राजकुमार
उच्च कोटीच्या तुच्छ वागळे विषयी लोक हातातली काम धंदे सोडून चर्चा का करत आहेत ?
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
20 Nov 2009 - 5:52 pm | jaypal
तात्या हे म्हणजे "काकुला मिश्या असत्या तर काका म्हटलं असतं"
)

मला तर तो निखिल (वागळ्यांच हो ) पत्रकारां मधला आबुच वाटतो. महानगरचा धंदा चालेना म्हणुन आयबीएन लोकमत आलेला. मिपा मधे गडगंज पगार दे लगेच येईल बघ. यांच्या कडुन कसल्या निषपक्षतेच्या फाजिल आपेक्षा ठेवता. यांच्या फक्त नावात लोकमत पण लोकांच्या मताला सोईस्कर *ट्या वर मारतात. बाकी शिव्या तुच दे.( तुझ्या तोंडुन खुप गोड वाटतात रे
मार खाउन परत कसा हस्तोय बघ (वरील प्रतिसादाशी याफोटोचा काहीही संबंध नाही)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
20 Nov 2009 - 6:04 pm | वि_जय
जयपाल.. जबरदस्त प्रतिक्रीया दिलीयस..
मानल तुला दोस्ता...
तुला मानाचा भगवा फेटा दिला रे मित्रा.......
20 Nov 2009 - 5:55 pm | वि_जय
त्या शिवसैनिकांचे हार्दिक अभिनंदन!!!!!!!!!!!१
त्या शिवसैनिकांचे हार्दिक अभिनंदन!!!!!!!!!!!
त्या शिवसैनिकांचे हार्दिक अभिनंदन!!!!!!!!!!!
सुमितशी सहमत..निखिल वागळे हा नक्की पत्रकार आहे का?.
20 Nov 2009 - 6:20 pm | तिमा
हल्ल्याबद्दल शिवसेनेचा निषेध आणि त्याचबरोबर अशा हल्ल्यांना, विधानसभेतल्या मारामारीला आणि एकूणच अशा कायदा हातात घेणार्यांचे समर्थन करणार्या मिपावरील प्रत्येकाचा निषेध! जी माणसे विचाराने वाद घालू शकत नाहीत तीच मुद्द्यांवरुन गुद्द्यांवर येतात.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
20 Nov 2009 - 7:08 pm | बिपिन कार्यकर्ते
व्यथित!!!
बिपिन कार्यकर्ते
20 Nov 2009 - 7:28 pm | दीपक साळुंके
+ १
20 Nov 2009 - 7:37 pm | धमाल मुलगा
ही घटना पाहिल्यावर्/वाचल्यावर अचानक आठवण आली ती आक्रमक पत्रकारीता करणार्या वृत्तपत्रात काम केलेल्या एका पत्रकार स्नेहींची. त्यांच्याशी ह्या विषयावर चर्चा करावी म्हणलं तर त्यांचे असे म्हणणे पडले की...
"प्रामाणिकपणे पत्रकारिता केली तर असे हल्ले होत नाहीत. अगदी गल्लीबोळातले टुकार गुंडच ते करु शकतात. राजकीय पक्ष किंवा मोठ्या गँगस्टरवर प्रामाणिक प्रोफेशनल्सचं बरच मोठं दडपण असतं अन ते बफर म्हणुन काम करतं."
ह्यानंतर चर्चेत स्वतःचे काही अनुभव सांगताना ते असेही म्हणाले की "आक्रमक पत्रकारिता व सुपारीबाज ठरणारी पत्रकारिता हा भेद करावा लागेलच."
आजकाल जे बोकाळलंय ते भावना भडकावणारे आणि विशिष्ट माध्यमांनी विशिष्ट गट/संस्था/पक्ष ह्यांना लक्ष्य करुन प्रसारण करणे.
शेवटी ते उपहासाने हेदेखील म्हणाले की, "आता तर मलाच इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स येतोय की माझ्यावर, माझ्या कुठल्याच सहकार्यावर कधी राजकीय पक्षाकडुन हल्ला झाला नाही म्हणजे आम्हीच बहुधा प्रामाणिकपणे पत्रकारिता केलेली नसावी." :)
असो, आय.बी.एन.च्या एकापाठोपाठ एक येणार्या स्टेटमेंट्समध्ये इतका विरोधाभास होता की हसावं रडावं की त्यांना येड्यात जमा करावं हेच कळेना.
असो, एका पत्रकारितेमधल्या मुरलेल्या जेष्ठ पत्रकारांचे विचार इथे कळवावेसे वाटले.
बाकी चालु द्या....
20 Nov 2009 - 8:07 pm | प्रकाश घाटपांडे
धम्याने मांडलेले मुद्दे विचारार्ह आहेत. जर टीआरपी वाढवण्यासाठी हे प्रकरण असेल तर त्याचाही निषेध केला पाहिजे.
तरीही लोकशाहीत विचारांचा प्रतिवाद विचारांनीच झाला पाहिजे. मुद्दे संपले म्हणुन गुद्द्यावर येणे हा दहशतवादच आहे. जर निखिल वागळे बिनबुडाचे आरोप करत आहेत असे वाटले तर ते त्यांच्यावरच उल्टवता येतात. न्याय्य मार्गाने जर अब्रुनुकसानीचा काही कोटींचा दावा लावला तर निखिल वागळेंची पळता भुई थोडी होईल.
पण हल्ला करुन शिवसेना आयबीएन लोकमत चा टीआरपी वाढवत आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
20 Nov 2009 - 8:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
:-(
मी मारल्यासारखं करतो, तू लागल्यासारखं आणि सामान्यांना बसू देत, टॅक्स भरत, चर्चा-भांडणं करत ...
अदिती
21 Nov 2009 - 1:44 am | Nile
एकदा का, 'कार्यालयं फोडुन' आपण धडा शिकवु शकतो ही वृत्ती बळावली की तोडफोड ही फक्त बदला घेणे यापुरतीच असते. उद्या एखाद्या प्रामाणिक पत्रकारावर खरी(पण स्फोटक) बातमी दिली म्हणुन हल्ला, आरोप, राजकीय दबाव येणार नाही असे वाटते का?
मला वाटतं बरेच 'प्रामाणिक' पत्रकार असल्या भानगडीत पडतही नसावेत. ते लोक कसबापेठेत जलवाहिनी फुटली, अमुकतमुक समाजसेवी संघटनेची फलनावी शाखा उद्घाटन वगैरे बातम्या देत सुखी जीवन जगत असावेत.
थोडक्यात,(प्रस्तुत वादातील) पत्रकारही 'राडेबाज' आणि राजकीय पक्षही राडेबाज.म्हणुन (असं मानलं तर) सामान्यांनी ही राडेबाजी स्वीकारावी असे काहिंचे म्हणणे आहे का?
जाता जाता: All the president's men, सिनेमा सुचवावासा वाटतो! (करमणुक म्हणुन हो!)
20 Nov 2009 - 8:44 pm | मराठे
सकाळि सहज आंतरजालावर मटा उघडला तेव्हा ही ब्रेकिंग न्युज वाचली. पण अजुन हल्ला का केला ते कळलं नाहि.
20 Nov 2009 - 8:47 pm | ज्ञानेश...
"आम्ही-सुद्धा-राडे-करतो-म्हटलं" सिंड्रोम...!
20 Nov 2009 - 11:34 pm | सुहास
:)
21 Nov 2009 - 12:19 am | प्रभो
जबहरा
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
20 Nov 2009 - 10:00 pm | देवदत्त
शिवसेनेने तर जबाबदारी स्वीकारली आहे. बाळासाहेबांबद्दल अपशब्द काढले म्हणून त्यांनी हा हल्ला केला असे त्यांचे म्हणणे आहे.
शिवसेनेबाबत काही विरोधाभास दिसत आहेत.
एका ठिकाणी मराठीचा मुद्दा आमचा आहे म्हणताना त्याबाबतीत काही करायचे नाही. वर मराठी माणसानेच खंजीर खुपसला असे म्हणायचे.
विधानभवनात तर ते काहीच बोलले नाहीत.
सचिनच्या विधानाबाबतीत जो मुद्दा नाहीच त्याला मुद्दा बनवून समोर आणले. तेव्हा हेच शिवसैनिक म्हणाले की सचिन हा बाळासाहेबांना मुलासारखाच आहे. त्यामुळे त्याला समजावून सांगत आहेत.
मग एखाद्या मराठी पत्रकाराने घरातीलच लोक समजून त्यांना काही म्हटले/विचारले असे समजू शकत नाहीत का? पण त्यांचावरच हल्ला करायचा?
तेच तो बाहेरचा अबू आझमी बाळासाहेबांना काहीतरी बोलून गेला तेव्हा "उद्या बघतो ना त्याला" असे म्हणाले, वर आता अबू आझमीने "विधानसभेत हिंदी आणेनच" म्हटले त्याबाबतीत हे लोक का शांत बसून होते? फक्त तक्रार करत आहे? तेव्हा नव्हती की ही हाणामारी सुचली?
मी आयबीएन लोकमतच्या सर्वच मतांशी सहमत आहे असे नाही. तसेच शिवसेनेच्या विरोधात आहे असेही नाही. उलट त्यांचे समर्थन करतोही. शिवसेनेची महाराष्ट्राला गरज आहे.
पण असल्या मुद्यांत तरी समर्थन नाही.
20 Nov 2009 - 10:32 pm | टारझन
भावना नेमकी व्यक्त करण्यासाठी शब्द सापडत नव्हते .. देवदत्त ने योग्य शब्दांकन केलं आहे ;)
प्रत्येक वाक्याशी सहमत ..
- प्रमोद देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान
(वरील सही शरदिनीला अर्पण)
20 Nov 2009 - 11:32 pm | सुहास
+२
स ह म त..
--सुहास
20 Nov 2009 - 11:49 pm | शिवापा
विडिओ पाहिला. बरीच तोडफोड केलीये. विमा होता का? एका माणसाला गुरासारखे मारलेय. तो मराठी होता का? टि. व्ही वाले आहात म्हणुन आमच्या दैवतांचा अपमान कराल का? शेतीविषयक कार्यक्रम करायाला काय होते? ह्या प्रकाराचे शुटींग करणारा मार खाणा-याला वाचवु शकत होता का? त्या ऑफिसातले पडदे काय छान आहेत! राडा करणा-यांचा सत्कार कधि आहे? आणि सर्वात महत्त्वाचे, हि सगळी उत्स्फुर्त प्रतिक्रिया नेमकी कोणाला सांगावी?
21 Nov 2009 - 2:52 am | प्रभो
हे सगळं वाचून मला तिरंगा मधल्या शेवटच्या डायलॉगची आठवण झाली..
आपला नाना म्हणतो...."पहले लाथ, फिर बात फिर मुलाकात.."
यावर जानी म्हणतो.."नही नही जानी, हमारा उसूल है पहले मुलाकात, फिर बात अगर उससे बात ना बने तो फिर लाथ..."
उदा घ्यायचे म्हणून मनसेचे घेतो...आधी पत्रकं वाटली आवाहनाची की मराठीतून शपथ घ्या म्हणून सगळ्या आमदारांना...मग मुद्दामहून ऐकून नाही ऐकलं करणार्या अबूच्या दिली ठेऊन कानाखाली ....(हे वर सगळं लिहिलय ह्याचा अर्थ असा नाही की मी विचारवंत झालो.....पण राडे सुद्धा विचार करूनच करायचे असतात..नाहीतर त्या राड्यांच्या मागचे कार्य सिध्दीस जात नाही...)
असच एकदा समज-निवेदन दिले असते निखिल वागळेला आणी मग न ऐकल्यावर फोडला असता तर जास्त बरं झालं असतं...नाहीतरी कावळ्याच्या शापाने गाय मरत नसतेच..(हे वाक्य वागळ्याचा बोलण्याने वाघास त्रास होत नसतो असे वाचावे...आणी त्रास होत असेल तर अबूची अस्थी-दंत विम्याची पॉलीसी केस टार्याकडे कशी काय नाही आली???)
आजकाल खुप कमी वृत्तपत्रे/वाहिन्या राहिल्या आहेत ज्या पक्षनिरपेक्ष पत्रकारिता करतात. प्रत्येक वृत्तपत्राची/वाहिनीची नाळ ही कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या सतत जवळची असत आलेली आहे.
नाही म्हणायला बरेचशे पत्रकार असतातही पक्षनिरपेक्ष ....त्यांनी तसेच वागावे ही सामान्यजनांची हीच अपेक्षा असते..पण सगळ्या म्हशी भरवश्याच्या असतीलच असेही नाही...
वृत्तपत्रीय स्वातंत्र्याच्या नावाने टाळी वाजवायची की शिमगा करायचा हा ज्याचा त्याचा वैचारीक प्रश्न आहे.
आपल्या मिपावरच सुध्दा काही पत्रकार आहेत.जे माझे मित्र/गुरू आहेत.ते जे मित्र/गुरू आहेत ते मात्र वैयक्तीक पातळीवर. व्यावसायीक दृष्ट्या माझा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. त्यांचा या विषयावरचा उहापोह ही वाचायला/ऐकायला आवडेल मला..सगळ्यांनाही आवडेल असं वाटतय...अजूनही त्यांनी ह्यावर भाष्य केले नाहीये..मे बी ते कोणती बाजू घ्यावी ह्या डायलेमात असतील.
बाकी बाळासाहेबांच्या नवाखाली संजय राउतांनी मनाला येईल ते खरडू नये ही इश्चरचरणी प्रार्थना करून २ शब्द संपवतो.
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
21 Nov 2009 - 3:11 am | अनामिका
बाकी बाळासाहेबांच्या नवाखाली संजय राउतांनी मनाला येईल ते खरडू नये ही इश्चरचरणी प्रार्थना करून २ शब्द संपवतो.
हजार टक्के सहमत!
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
21 Nov 2009 - 7:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
.
21 Nov 2009 - 7:13 am | कालिन्दि मुधोळ्कर
अर्वाच्य भाषा वापरल्याबद्द्ल ठाकरे ग्यांग ने वैतागून जाणे म्हणजे.... कोणते उदा. चपखल बसेल बरे... हा.. शक्ती कपूर ने सिनेमात कमी-बटबटीत विनोद असावे अशी मागणी करण्यासारखे आहे.
गुंडांचा निषेध.
21 Nov 2009 - 8:41 am | पाषाणभेद
निखील वागळे म्हणतो की आमच्या शूर सहकार्यांनी हल्ला परतवून लावला आणि ७ हल्लेखोर आम्ही पकडले.
म्हणजे आयबीएन फेकमत मधील लोक पण एक प्रकारे बंडच आहेत. (त्याच तोलामोलाचे आहेत.)
बाकी निखील जेव्हा बोलतो तेव्हा समोरच्याला उचकावयाच्या भाषेतच बोलतो. आपण पाहणार्यांच्या डोक्यातही काही वेळा तिडीक जाते त्याच्या बोलण्याची. खरा पत्रकार असले अरबटचरबट बोलेल की नाही अशी शंका वाटते. मला वाटते तो त्याच्या पत्रकारीतेचे शस्त्र म्हणून उपयोग करतो.
अवांतर: काही पत्रकार/ वृत्तपत्र काही ठिकाणाहून पैसे मिळाले नाही तर त्याच्या विरुद्ध बातम्या छापतात. त्यातलाच हा प्रकार असावा.
--------------------
काय? घरात वॉल टू वॉल कारपेट टाकायचे नाही? मग घरात स्लीपर वापरा.
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|
21 Nov 2009 - 3:27 pm | गणपा
21 Nov 2009 - 12:15 pm | वि_जय
निखिल वागळे हि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला लागलेली कीड आहे.
21 Nov 2009 - 1:45 pm | समंजस
असले हल्ले करून अनावश्यकरीत्या विरोधकांना फुकट प्रसिद्धी मिळवून देण्या पेक्षा, शिवसेनेने स्वत: च मराठी न्युज चॅनेल काढून त्या द्वारे धर्म निरपेक्षता, व्यक्तिनिरपेक्षता, पक्षनिरपेक्षतेचा आव आणणार्यांना उघडं पाडावं.
शेवटी असल्या तोडफोडीचा आणि हे करणार्यांचा बागुलबुवा(भिती) मतदारांना दाखवूनच "तथाकथित चांगले, कर्तुत्ववान ?" पक्ष/नेते वर्षानुवर्षे सत्ता मिळवतात.
21 Nov 2009 - 3:26 pm | गणपा
बोल्ड टॅग बंद करेल का कुणी.
त्रास होतो रे डोळ्यांना..
च्यायला मलाच जमल रे
हुशार गण्या ;)
21 Nov 2009 - 9:19 pm | १.५ शहाणा
वटवट वागळ्याला सटकवले हे फार चांगले झाले.
21 Nov 2009 - 9:19 pm | १.५ शहाणा
वटवट वागळ्याला सटकवले हे फार चांगले झाले.
22 Nov 2009 - 4:55 pm | पर्नल नेने मराठे
आइया हाच का तो निखिल वागळे मी ह्याला tvवर पाहिले आहे
तेव्हाच मला आगावु वाटला होता
चुचु
22 Nov 2009 - 10:12 pm | वेताळ
बिचारा निखिल वागळे उगाच सेनावाल्यानी त्याला मारले.तो जसे तोंडाला येईल तसे बोलतो म्हणुन जर त्याला मारले असेल तर ते चुकीचे आहे.
गेले एक दोन महिने सेनेचे मुखपत्र सामनातले अग्रलेख वाचा,त्यातली भाषा किती गचाळ आणि मुर्खपणाची आहे ते लक्षात येईल. बाळासाहेबानी संजय राऊताला अधिकार दिले म्हणुन त्याने काहीबाही खरडावे हे चुकीचे आहे.चक्क मराठी माणसाला शिव्या देणे,सचिनचे बोलणे नीट समजावुन न घेता त्याला फटकारणे हे अतिशय चुकीचे आहे. वागळेला मारणारे शिवसैनिक वाटतच नाहीत,ते भाडोत्री गुंडच वाटतात. हे सगळे ज्याने केले आहे तो आजकाल सेना चालवत आहे असे वाटते. उध्दव ठाकरे नेहमीप्रमाणे फॉरेन टुर वर गेले असावेत.आजकाल जो तो उठतो व सेनेला गुद्दे घालतो हे लक्षण ठिक वाटत नाही.
जी पत्रकारिता वागळे करीत आहे तिचाच कित्ता संजय राऊत गिरवत आहेत. दोघाचाही जाहिर निषेध .
वेताळ