१०९ वाचने आणि एकही प्रतिसाद नाही. त्यानंतर आलेल्या वाटेल त्या लिखाणावर वाटेल तो धिंगाणा चाललेला पाहीला, आणि म्हटले "आपला एक शून्य बाजीराव झाला."
काय चुकले? कोणाच्या कंपूत जाता येईल? जाणकारांनी माहीती द्यावी. कंपूत प्रवेश करण्यासाठी काय करावे लागते? समुपदेशन मिळेल का?
(ही खालील भुतावळ कदाचित इथे फार टेम वाटली असेल)
ताजी खबर, ताजी खबर
भुतीण पारावरून ओरडली
लगबगीने सरसर सरसर
पारंबी धरून खाली आली
-
रात्र काळी, सळसळ झावळी
समंध भारी, मुंजे किरकीरी
जखिणी, हडळी आणि भुतावळी
झाडांवर जमली सारी बिरादरी
-
कशाला उगाच मारतेस बोंबा
उलटे झुलते वेताळ विचारते
जरा थांबा, खाली घ्या टांगा
सांगते सारे, भुतीण फिस्कारते
-
आपला सगळा मोहल्ला चालला
येथून दुसरीकडे जागा देतील
संपला जुना सहवास इथला
कबरीतून काढून भांड्यात ठेवतील
-
बिरादरी भुमीवर वसाहत बांधून
जागा भरणार, माणसे रहाणार
हाडे खोदून, थोडीशी निवडून,
एकावर एका बॉक्समधे ठेवणार ***१
-
मज्जा ने मज्जा, केकाटला मुंजा
नवीन घर, हायराईज रिसॉर्टवर
ए तुला नाही भेजा, म्हणाला कुब्जा
तूच मर, मला नको डब्ब्याचे घर
-
एयर कंडीशन कंडो जंक्शन ***२
असेल, पण खुराडेच खरोखरी
लॅन्डेड प्रॉपर्टी, बगीचा सोडून
डब्ब्यांच्या घरी कशाला गुदमरी?
-
बकवास नको, समंध पिसाळला
तुमचे मत कोणी विचारले का तुम्हाला?
पुढल्या अमावस्येला बिरादरीला
पॅक करून धाडतील कंडोत रहायला
-
मिळतील हेल मनी, कागदी मोटारी व हनी, **३
इथे दोन हप्ते उरले, मजा करू जानी
चिंता भविष्याची कधी केली भुतांनी?
सोडा ही झाडे, कंडोत राहू सुखानी
सोडा ही झाडे, कंडोत राहू सुखानी
--------------------
--------------------
तळटिपा-
***१- कबरस्थान हटवून त्याजागी फ्लॅटस होणार. नवीन वातानुकुलीत इमारतीत कबरीतील हाडांचे अस्थीकलश, पोस्टबॉक्स सारखे एकावर एक रचून ठेवणार.
***२ कंडो- कंडोमिनीयम
***३-चायनीज संस्कृतीत पितरांना कागदाच्या नोटा, कागदाचे बंगले, गाडया, खरया मधाचे बुधले वगैरे जाळून अर्पण करतात.
प्रतिक्रिया
20 Nov 2009 - 3:05 pm | चेतन
डायरेक्ट भयालीदेवींना कॉम्पिटिशन आणि ति ही कवितेतुन
आता तुमचं नामकरण काय करावं :?
चेतन
20 Nov 2009 - 3:09 pm | Nile
कवितेतलं फारसं कळत नाही(तरी आपलं वाचतो उगाच) त्यामुळे त्यावर काही बोलत नाही.
पण
एक प्रामाणीक (आगाउ) सल्ला, असले प्रश्न विचारणार्यांच्या कंपुत चुकुनही जाउ नका!
पुढील लेखनास शुभेच्छा! :)
20 Nov 2009 - 3:18 pm | बिपिन कार्यकर्ते
कविता मस्तच.
अवांतर: इतकी सगळी भुतावळ असूनही अजून कंपू कशाला? ;)
बिपिन कार्यकर्ते
20 Nov 2009 - 3:56 pm | सूहास (not verified)
छान -छान कविता !!
ते कंपुच डिसक्लेमर का टाकलत तेव्हंढ आणी आख्खी कविता अजिबात समजली नाही ....
अवांतर: इतकी सगळी भुतावळ असूनही अजून कंपू कशाला?>>
चुकताय बिपिनदा :: इतकी सगळी कपुंबाजी असूनही अजून भुतावळ कशाला ??
सू हा स...
20 Nov 2009 - 3:51 pm | गणपा
अरुणराव मस्त कविता.
आवडली.
एकला चालो रे...
कारवॉ अपोआप तयार होईल. फिकर नॉट :)
20 Nov 2009 - 5:19 pm | विसोबा खेचर
मस्त कविता..! :)
तात्या.
20 Nov 2009 - 8:42 pm | प्रभो
१०९ वाचने आणि एकही प्रतिसाद नाही.
पुप्या, कुठायसं.....पुढच्या बुधवारच्या कवितेचा मसाला घे... =))
अमो, ह घ्या.
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
21 Nov 2009 - 12:32 am | पक्या
छान कविता.
जय महाराष्ट्र , जय मराठी !