मिपाच्या रोजच्या खादाडी बरोबरच्या दक्षिणात्य ललना बघुन बघुन शेवटी आमच्या टाळक्यावर व्हायचा तोच परिणाम झाला.
रोज स्वप्नात या बायड्यांच्या जोडीने विविध डोसे,अप्पम, सांबार,मेदुवडे, चिकन ६५ , चिकन चेट्टीनाड, मीन करी आदी दक्षिणी पदार्थ येउ लागले.
सकाळ पर्यंत उशी लाळेने ओली होउ लागली. यावर काही तोडगा काढावा म्हणुन यातली एखदी डिश बनवुन आपणच आपल्या वाहणार्या जिभेचे नळ बंद करायचे ठरवले.
साहित्य :
सुका मसाला
१ लहान चमचा काळीमीरी
१ लहान चमचा धने
१ लहान चमचा जिरे
१ इंच दालचिनी
३-४ लाल सुक्या मिरच्या
४-५ लवंगा
१/२ वाटी सुक खोबरं
१/२ किलो चिकन. (मध्यम आकारचे तुकडे करुन)
१ मोठ्ठा कांदा (मध्यम चौकोनी) चिरुन.
१ टोमॅटो बारीक चिरुन.
२-३ कढिपत्याची पाने.
२ चमचे आल-लसुण पेस्ट.
मीठ - लाल तिखट चवी प्रमाणे.
कृती :
सर्व प्रथम तव्यावर खडा मसाला मध्यम आचेवर भाजुन घ्यावा.
सुके खोबरं पण मंद आचेवर भाजुन घ्यावे.
हे भाजलेले जिन्नस गार झाल्यावर मिक्सरमध्ये कोरडेच (पाणी न टाकता) वाटुन घ्यावे. सुक्या खोबर्याचे थोडे तेल सुटते.
एका फ्राइंग पॅन मध्ये २ चमचे तेल तापवुन त्यात कढीपत्याची पाने टाकावीत. त्यांच तडतडण संपल्यावर त्यात कांदा टाकुन परतुन घ्यावा.
कांदा गुलाबी झाल्यावर त्यात चिरलेला टोमॅटो टाकुन परत परतावं.
नंतर त्यात वाटलेला सुका मसाला, आल-लसणाची पेस्ट, लाल तिखट आणि चवीनुसार मिठ टाकुन चांगल परतुन घ्याव.
मसाला बाजुने तेल सोडायला लागला की त्यात चिकनचे तुकडे टाकुन नीट वर खाली करुन सगळा मसाला त्यातुकड्यांना लावुन घ्यावा.
वर झाकण ठेवुन (१०-१५ मिनिटं) मध्यम आचेवर एक दणदणीत वाफ काढावी. शक्यतो पाणी टाकु नये. चिकनच पाणी सुटतं.
तर अस हे गरमा गरम झणझणीत चिकन चेट्टीनाड आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत मिटक्या मारत खावं.
प्रतिक्रिया
20 Nov 2009 - 11:34 am | अवलिया
यांड खट्ट लोंड बिड्ड... !
ठौक ठोक ठौ ठौ
(अर्थ विचारु नये देवकाकांना नाव सांगितले जाईल)
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
20 Nov 2009 - 11:39 am | ब्रिटिश टिंग्या
यांड खट्ट लोंड बिड्ड... !
ठौक ठोक ठौ ठौ
(अर्थ विचारु नये देवकाकांना चाल लावायला सांगितले जाईल) ;)
--टिंगलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन प्रतिसाद लिहुन मिळेल. चिल्लर मधे आयपी अॅड्रेसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
20 Nov 2009 - 1:10 pm | टारझन
यांड खट्ट लोंड बिड्ड... !
ठौक ठोक ठौ ठौ
(अर्थ विचारु नये टिंग्याकाकांना चावायला सांगितले जाईल)
-- टारुलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला लावुन "हायब्रिड करून मिळेल. हल्लीच "ब्रिट्रीश बुल्डॉग" आणि "शिट्झु" ची यशस्वी चाचणी झाली आहे, नाव आहे "बुलशीट" . अधिक माहिती व्यनीमधुन.
20 Nov 2009 - 11:36 am | ब्रिटिश टिंग्या
ह्या गणपाच्या!
20 Nov 2009 - 11:40 am | सहज
ओहो गणपा
आहा गणपा
वाचनखुण साठवल्यागेलेली आहे, केवळ नेत्रसुखाकरता!! बाकी पाकृ कोरली गेलीय.
20 Nov 2009 - 2:16 pm | गणपा
मारीटोपी सहजराव लै डोकं खाजवल पण हे कुठे तरी वाचल्या सारख वाटल हो..
आत्ता टाळक्यात प्रकाश पडला. =))
20 Nov 2009 - 11:45 am | sneharani
जरादेखील गप्प बसता येत नाही काहो तुम्हाला, सारखं स्वैपाक्घरात कशाला जाताय?
जाऊ दे तर रेसिपी एकदम सुपर्ब....
करायला हवी !
20 Nov 2009 - 11:58 am | jaypal
सुस्वागथा (वेलकम) गणपा
![](http://www.michaelbarrier.com/Commentary/Chicken_Little/Chicken_Little.jpg)
नन्नु(मला) चिकन प्रिथिसुथने(लव्ह/आवड्ते)
ह्रिदयपुर्वक शुभशगलु (हार्दीक अभिनंदन)
चिकन डिश सुंदरवगिधिरी (ब्युटिफुल)
होगि बरुथीने (गुड बाय)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
20 Nov 2009 - 11:54 am | शेखर
मस्त पाकृ...
गणपाला पाकृ संपादक नेमावा का? तात्यांना सांगुन बघावं....
शेखर
20 Nov 2009 - 11:55 am | दिपाली पाटिल
मस्तच...
शब्दच नाही आहेत पुढे बोलायला...कुठून मिळतात या सगळ्या रेसिपीज??
दिपाली :)
20 Nov 2009 - 12:38 pm | महेश हतोळकर
मस्तच! सडकून भूक लागली.
कुठून मिळतात या सगळ्या रेसिपीज??
साहेबांना रेसेपीची गरज नाही. एकदा खातात दुसर्यांदा करून दाखवतात.
20 Nov 2009 - 12:39 pm | नंदन
नेहमीप्रमाणेच झकास पाकृ!
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
20 Nov 2009 - 1:11 pm | विसोबा खेचर
जोरदार पाककृती!
आपले,
तात्या आणि मधुरिमा.
20 Nov 2009 - 1:45 pm | परिकथेतील राजकुमार
च्यायला !! ह्या गणपा शेठला आवरा रे कोणीतरी.
तुमच्या पाककृती वाचुन आणी बघुन आता मला मांसाहारी व्हावेसे वाटु लागले आहे.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
20 Nov 2009 - 1:46 pm | सुनील
हुश्श. जेवण झाल्याखेरीज पाकृ उघडायची नाही हा निश्चय योग्यच ठरला म्हणायचं!
पाकृ दिसतेय मस्तच!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
20 Nov 2009 - 1:56 pm | श्रावण मोडक
देवा...
20 Nov 2009 - 2:25 pm | बिपिन कार्यकर्ते
...परमेश्वरा...
बिपिन कार्यकर्ते
20 Nov 2009 - 2:49 pm | टारझन
.... श्रीकृष्णा ....
- लाच्किन कानकोर्ते
20 Nov 2009 - 9:06 pm | धमाल मुलगा
प्रभु........
स्वगतःह्या गणप्याला किडन्याप करावं काय? रोज खायची चंगळ होईल राव :)
20 Nov 2009 - 2:53 pm | किट्टु
मस्तच रेसिपी...
चला विकेंडच्या मेनुचा प्रश्न मिटला..... :)
20 Nov 2009 - 3:09 pm | समंजस
झक्कास पाककृती.
या रविवारी नक्कीच :)
20 Nov 2009 - 3:44 pm | स्वाती२
मस्त!
20 Nov 2009 - 4:03 pm | सूहास (not verified)
चिकन चेट्टुनाडी....मरीना बिचवर खाल्ले होत...मस्त..झकास....जबरा...
ईतके बोलुन मी आपली रजा घेतो...
जय खादाडी !! जय गणपा !!
सू हा स...
20 Nov 2009 - 6:23 pm | सुमीत
झ क्का स मित्रा, लय चमचमीत रे :) आणि फोटो पाहून कलिजा खल्लास
माझा नाही रे, मी खाणार्या कोंबडीचा :)
20 Nov 2009 - 8:09 pm | संदीप चित्रे
हा त्रस्त समंध आला पुन्हा :)
20 Nov 2009 - 9:01 pm | प्रभो
१ नंबर....रे गणप्या...
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
20 Nov 2009 - 9:07 pm | अक्षय पुर्णपात्रे
श्री गणपा, सुटसुटीत आणि सचित्र पाककृती आवडली. धन्यवाद. जमेल असे वाटते. या सप्ताहांताला करीनच असे म्हणतो.
__________________
As an internet discussion grows longer, the probability of a comparison involving Nazis or Hitler approaches 1.
-Godwin's law
20 Nov 2009 - 9:09 pm | गणपा
मंडळ सर्व वाचक/प्रतिसादकर्त्यांचे मनःपुर्वक आभारी आहे.
20 Nov 2009 - 11:11 pm | आशिष सुर्वे
गणपा, ओगा..
किती छळशील र्रे लेका..
तुझा हात हाय का मसीन??
बाओ ओगा!
-
कोकणी फणस
20 Nov 2009 - 11:26 pm | अनिल हटेला
जहबहर्या !! :-)
(चिकनप्रेमी)
बैलोबा चायनीजकर !!!
Drink Beer,
Save Water !!
;-)
20 Nov 2009 - 11:51 pm | अडाणि
-
अफाट जगातील एक अडाणि.
21 Nov 2009 - 12:08 am | स्वप्निल..
गणपाच्या पाककृतींना प्रतिक्रिया देण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत !!!
स्वप्निल
21 Nov 2009 - 12:12 am | पक्या
शब्द संपले.
_/\_
-जय महाराष्ट्र , जय मराठी !
21 Nov 2009 - 12:21 am | चित्रा
सगळ्या पुढच्या पाककृतींना एकत्र अशी आधीच दाद देऊन ठेवते. दरवेळी काय नवीन लिहावे?
पाककृती देण्याची पद्धत, रंगसंगती, प्लेटची निवड, चव सर्वच भारी.
21 Nov 2009 - 4:17 am | प्राजु
तुमच्या पाकृ इतकीच पा़कृ लिहिण्याची पद्धतही वाखाण्ण्याजोगी आहे हे पुन्हा पुन्हा सांगायला नको.
फोटो तर जीवघेणे आहेत.
:)
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
21 Nov 2009 - 5:10 am | लवंगी
=P~
21 Nov 2009 - 9:07 am | टुकुल
आता बस्स !!!
एकट्या जिवांचा अंत पाहु नका, नाहीतर नायजेरीयाच टिकिट काढुन आठवडाभर मुक्काम टाकतो : )
--टुकुल
21 Nov 2009 - 10:24 am | वेताळ
काय बोलु गणपा शेठ....एकदम झक्कास....
वेताळ
21 Nov 2009 - 10:37 am | श्रीयुत संतोष जोशी
खलास.........
दुसरे शब्दच नाहीत.
चला आणा लवकर.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
22 Nov 2009 - 11:04 pm | बट्ट्याबोळ
गणप्या ... लय भारी !!
आजच करून बघितली. थोडेसे बदल केले :
१. एव्हरेस्ट चा चिकन मसाला वापरला आणि नारळाची रेडीमेड भुकटी
थोड्या तेलावर परतून घेतली. कारण मिक्सर नाही आणि गुडगाव मधे खोबरं मिळत नाही माझ्या सेक्टर मधे.
२. मधुरिमा नव्हती .. आपल्या गल्लीतल्याच आयटम ला बोलवून घेतल !! :)
तरीपण चव चांगली लागली (दोन्ही गोष्टींची ...)
22 Nov 2009 - 11:10 pm | धनंजय
मस्तच दिसते आहे!