पुणेरी मिसळ

गोगलगाय's picture
गोगलगाय in काथ्याकूट
20 Nov 2009 - 2:39 am
गाभा: 

मागच्याच आठवड्याअखेर सेरीटोस (लॉस एंन्जेलीस) येथील एका रेस्टॉरंट्मध्ये महाराष्ट्रीयन पध्द्तीचे फास्ट फुड मिळते असे समजले आणि मग अती उत्साहात तिथे जावून गरमागरम पुणेरी मिसळ मटकावली. मिसळ आवडली कारण असेही पुण्यातली मिसळ खाऊन दशक झालेय आणि आमच्या टेस्ट बड ला इथे राहुन नाही म्हटलं तरी no discrimination तत्वाप्रमाणे पिझ्झा पासुन पास्ता पर्यंत सगळेच आवडून घ्यावे लागते. तरीही कोणी ही मिसळ खाल्ली असल्यास प्रतिक्रिया द्यावी.

रेस्टॉरंट - मुंबई की गलीयोंसे, पायोनियर बुलेवाड, सेरीटोस, दक्षिण कॅलीफोर्निया

दक्षिण कॅलीफोर्नियातले काही मराठ्मोळी फूडचे अड्डे महीत असल्यास क्रुपया कळवावे.

-धन्यवाद

प्रतिक्रिया

gaikiakash's picture

20 Nov 2009 - 3:36 am | gaikiakash

एक आहे मदर इन्डिया नावचे. ते च्याट् वर्थस मध्ये आहे . महाराष्ट्रीयन पध्द्तीचे जेवण मिळते - भाकरी, थालिपीट व इतर. पत्ता आहे:
http://motherindiarestaurant.com/

आकाश

सूहास's picture

20 Nov 2009 - 8:47 pm | सूहास (not verified)

तु जिथे लिहीलयस तिथेच मी खाल्ली एकदा !! देवाशपथ त्यानंतर ईतक्या वेळा गेलो अमेरिकेत ..पण कधीही कोणालाही ईकडे मिसळ मिळते का म्हणुन नाही विचारले !!

सू हा स...

सुनील's picture

20 Nov 2009 - 7:06 am | सुनील

पायोनियर बुलवार्डवर अनेक भारतीय रेस्टॉरंट आहेत पण बहुतेक सगळी पंजाबी धाटणीची (किंवा दाक्षिणात्य पदार्थांची). हे मराठी पद्धतीचे नवीन दिसते आहे. तिथे स्टेट बँकेसमोरील एका रेस्टॉरंटमध्ये एकदा गेलो होतो (नाव आठवत नाही). खास वाटले नाही.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

बहुगुणी's picture

21 Nov 2009 - 7:07 am | बहुगुणी

गेल्या वर्षीपर्यंत हे वुडलँड रेस्टॉरंट उत्तम साउथ इंडियन (आणि काही महाराष्ट्रीयनही) डिशेस मिळण्याची उत्तम जागा होती. त्यानंतर ते एका पारश्याने विकत घेतलं आणि आता सर्वच पदार्थांची चव (आणि सर्व्हिसही) बिघडल्याचं गेल्या खेपेत आढळलं.

विजुभाऊ's picture

20 Nov 2009 - 2:26 pm | विजुभाऊ

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
थोडे चेंज करुयात
Doing what you like is freedom.
Liking what you do is job.

Doing correct things is Management.
Correcting the things done is an Leadership

सुनील's picture

20 Nov 2009 - 2:54 pm | सुनील

Correcting the things done is an Leadership
विजुभौ, मिपावर फक्त मराठी शुद्धलेखनाला फाट्यावर मारले जाते, इंग्लीश नव्हे! ;)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Nov 2009 - 11:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सुनील भौ, अजून एक:
Liking what you do is a job.

असो. टी.ए.-डी.ए. मिळाल्यास जरूर कळवेन दक्षिण कॅलिफोर्नियातले अड्डे!

अदिती

हे माझ्या पसंतीप्रमाणे क्र. १, २ ३, तिन्ही गुजराती पद्धतीच्या जेवणासाठी. जागा तीच, आर्टेशियातील पायोनियर बुलेव्हार्ड.