प्रत्येक गावाची एक संस्कृती असते. त्या नुसार ते गाव जगत असते. गावाचे स्वभाव घडत असतात. यात कोणीच काहीच न ठरवता हे घडत असते.
त्या गावाचे रहिवासी हा स्वभाव घडवतात की गाअ रहिवाशांचे स्वभाव घडवते हे सांगणे कठीण.
आता हेच बघा ना
कोल्हापुरकर म्हंटले की मनमोकळा कुस्ती आणि चित्रकलेवर मनापासून प्रेम करणारा हेच डोळ्यापुढे येते.
अंबाबाई आणि जोतिबा यांच्या यात्रेच्या आठवणी काढणारा शाहु महाराज आणि त्यानी मारलेल्या वाघांच्या शिकारीच्या गप्पा , खासबाग मैदानात कधी काळी झालेल्या मारुती माने /सत्पाल /बिराजदार यांच्या कुस्त्यांच्या आठवणीत रंगणारा कोल्हापुरकर.
पांढरा तांबडा रस्सा दिलखुलास खिलवणारा कोल्हापुरकर.........
पहिल्याच भेटीत एखाद्याला आपले मानणारा / फारसे आतबाहेर न ठेवता बोलणारा कोल्हापुरकर. त्यांच्याशी बोलताना ते तुम्हाला सुद्धा राजे बनवून टाकतील. स्त्रीया सुधा बोलताना मी आलो होतो असे सहज म्हणून जातील. त्यांच्या लेखी आलो होतो / गेलो होतो हे दोन शब्द नसून मी आल्तो मी गेल्तो अशी जोडाक्षरे होतील. एखादी मुलगी घरात आली तर " आलास काय गा"? असे आई विचारेल
"तो यायला लागला आहे" हे अख्खे वाक्य " तो यायलाय" एवढ्या दोन शब्दात आटोपेल.
कोल्हापूरकर आंबाबाईच्या देवळात गेला तर चपलाची चिंता न करता सावकाश दर्शन घेईल.
कोल्हापुरकर राजकारणाबद्दल फारसे बोलणार नाही पण थोरले महाराज , चित्रकार दलाल , बाबुराव पेंटर यांच्याबाबत बोलताना तो खुलतो.
सांगलीची गोष्ट थोडी वेगळी.
कोल्हापुर ला राजे होते सांगलीला संस्थानीक होते. राजा आणि संस्थानीक यात असेल तेवढा फरक या जवळ जवळ वसलेल्या दोन्ही गावांत आहे . राजेपणाची मस्ती नसेल; संस्थानीकाचा हिषेबीपणाआहे.
सांगलीकर गणपतीच्या देवळात रमेल पण तेवढ्याच पटकन देवळातून पाय बाहेर काढून जयसिंगपुरच्या एम आय डी सी त निघेल.
हळद वायदेबाजारात जाईल. गप्पा हाणताना दादा बापू भाऊ या पेक्षा जास्त बोलणार नाही. पण राजकारणात मुरलेला असेल.
जेवणात कोल्हापुरी तर्री नसेल ब्राम्हणी पुरणपोळी असेल. कोल्हापूरकराला मिसळीची नशा असेल सांगलीकर गोरे बंधू भडंगावर समाधान मानेल.
सांगलीकर बोलताना कोणत्याही व्यक्तीला " ते " बनवतील. आदराने नव्हे भाषेच्या लहेज्यामुळे. कॉलेजचे प्राचार्य आले तरी " ते येतय बघ " असे म्हनतील.
तुम्ही त्याना चहा पाजलात तरी ते आपल्या गावच्या चौकात " इंदीराभुवनच्या " शेजारी ये तुला असा चहा पाजतो असा चहा पाजतो असा चहा पाजतो असे म्हणतील. स्वतः निवान्त चहा पिईल आणि आपल्याला घाई करेल
मुम्बैकर मुम्बैत एकदम पटकन कोणाबरोबरही मोकळा न होणारा पण एकदा मुम्बै बाहेर पडला की स्वतःची सामान्यत्व कबूल करत सहज संवाद साधतो.
तो वर्तमानपत्राची घडी सुद्धा उभी घालतो.
जागा आणि जागांचे भाव हे कोणत्याही मुम्बै कराचे जिव्हाळ्याचे विषय.
एरवी शेजार्याशी ही फारसा संभाषण करणार नाही पण वेळ पडली तर न मागता सुद्धा अनोळख्याला भरभरून मदत करेल.
तुम्ही एखादा पत्ता विचारा ठाऊक असेल आणि शक्य असेल तर मुम्बैकर तुम्हाला केवल पत्ता सांगून थांबणार नाही. दाखवायला ही येईल/
पुण्यात हा अनुभव भलताच वेगळा येतो. पावसात तुम्ही भिजताय मुम्बैकर तुम्हाला आपल्या छत्रीत जागा देईल. रांगा लावणे हे मुम्बैकराच्या हाडीमांसी इतके भिनलेले आहे की बागेत छोटी मुले सुद्धा घसरगुंडीसाठी रांग लावून उभी रहातील
सातारकर हे तिरकस बोलण्यात पटाईत. काय कसे आहात ? या प्रश्नाला " बरे आहे/ मजेत आहे" असली सरळ उत्तरे न येता " मला काय धाड भरली आहे" असला निरुत्तर करणारा प्रश्न सातारकरच विचारु शकतो.
चर्चेत हिरीरीने भाग घेईल. सकाळी सकाळी भारत भुवनची रस्सेदार पुरी भाजी हा यांचा आवडता नाश्ता. पंधरा ऑगस्ट ला रस्तोरस्ती लागणारे जिलेबीचे स्टॉल हे सातार्याचे एक वैषिष्ठ्य.
अशोक मोदी ची किंवा लाटकरची आंबा बर्फी / पेढे हे जिव्हाळ्याचे विषय. नुकत्याच कोठेतरी झालेल्या राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेत अमूक एका एकंकिकेत लाईट ची अॅरेन्जमेन्ट कशी चुकीची होती/ अमूक एकाने दिग्दर्शन कसे करायला हवे होते ही चर्चा उद्यासाठी अर्धी राखून ठेवत अर्धा ग्लास दुध पिऊन रात्री दोन वाजता घरी जाणे हे सातार्यातच नियनीतपणे होऊ शकते.
दिवाळीच्या दिवशी न ठरवताही खिंडीतल्या गणपतीला भेटणारे आख्खे गाव हे सातारकरच करु जाणे
सातार्याची एम आय डी सी कशी झोपली या चर्चा बारामतीमुळे हे असे झाले या निष्कर्षला येतात.
पुण्याबद्दल बरेच काही बोलून झाले आहे.
तुम्हाला तुमच्या गावाबद्दल / इतर गावांबद्दल काही सांगायचे आहे?
लिहा बिंधास्त..... गावोगावचे स्वभाव .........
प्रतिक्रिया
19 Nov 2009 - 1:35 pm | भाग्यश्री कुलकर्णी
सही.
मिरज नाशिक इंदोरी भाग्यश्री.
19 Nov 2009 - 1:40 pm | पर्नल नेने मराठे
मुम्बैकर मुम्बैत एकदम पटकन कोणाबरोबरही मोकळा न होणारा
X( अजिबात पटले नाहि
जागा आणि जागांचे भाव हे कोणत्याही मुम्बै कराचे जिव्हाळ्याचे विषय.
:D हे बरोबर
एरवी शेजार्याशी ही फारसा संभाषण करणार नाही पण वेळ पडली तर न मागता सुद्धा अनोळख्याला भरभरून मदत करेल.
8| आम्हीतर शेजार्याशी चानग्ल्या गप्पा मारतो
रांगा लावणे हे मुम्बैकराच्या हाडीमांसी इतके भिनलेले आहे की बागेत छोटी मुले सुद्धा घसरगुंडीसाठी रांग लावून उभी रहातील
=)) ह्म्म
चुचु
19 Nov 2009 - 1:50 pm | समंजस
:)
19 Nov 2009 - 1:57 pm | विनायक प्रभू
तुम्ही कुठले?
19 Nov 2009 - 2:00 pm | अवलिया
नागपुरकरांबद्दल सोईस्कर मौन पाळल्याबद्दल निषेध !
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
19 Nov 2009 - 2:57 pm | मिसळभोक्ता
मौन हे विरजणाच्या व्यस्त प्रमाणात असते.
त्यामुळे विजू कितीही मौन पाळून पॉलिटिकल वागण्याचा प्रयत्न करू दे, त्याच्या दुधाचे दही करण्यास आम्ही नागपूरकर तत्पर आहोत. सध्या जरा व्यग्र आहे, वेळ मिळाल्यावर विजूभाऊंवर आमची विशेष विरजणकृपा होईल.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
19 Nov 2009 - 2:01 pm | अमोल केळकर
माझं मुळ गाव सांगली आणि सांगली बद्दल ( किंबहुना सर्वच गावाबद्दल ) विजुभाउंनी इतकं बरोबर लिहिल आहे की अधिक काही लिहिता येणार नाही.
सध्या मी नवी मुंबईकर - त्यामुळे नवी मुंबई बद्दल थोडेसे.
मुंबईचाच एक भाग पण मुंबईपेक्षा निसर्गाशी जास्त जवळीक, प्रशस्त रस्ते, कमी ट्राफीक जॅम, खेळण्यासाठी बागा, आणि मराठी माणसांचे जाणवण्याइतपत अस्तित्व यामुळे नवी मुंबकर ( मुंबईकरांपेक्षा ) आयुष्य बर्यापैकी एन्जॉय करत आहे.. कामासाठी आठवडाभर मुंबईत जाउन वैतागलेला नवी मुंबईकर सुट्टीच्या दिवशी मात्र कुटुंबासमवेत खारघर, बेलापूर , वाशी येथील नवनवीन बनत असलेली प्रेक्षणीय ठिकाणांना भेटी देतो. हे आता रुटीनच झाले आहे.
मेगा हायवेमुळे नवी मुंबईकर मराठी माणसाची पुण्याशी जास्त जवळीक झाली आहे. सुट्टीच्या दिवशी मुंबईतील नातेवाईकांकडे जाण्यापेक्षा पुण्यातील नातेवाईकांकडे जाऊन येण्याचे जास्त सोयीचे वाटते ( त्यामुळे की काय येथील मराठी माणसांच्यात टिपीकल पुणेरी स्वभाव ही वाढत आहे ;) . )
(नवी मुंबईकर) अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
19 Nov 2009 - 4:09 pm | सूहास (not verified)
( त्यामुळे की काय येथील मराठी माणसांच्यात टिपीकल पुणेरी स्वभाव ही वाढत आहे >>>
जळजळ पोचली ...
खुलाश्याबद्दल धन्यवाद..
सुहास.
19 Nov 2009 - 2:11 pm | sneharani
लै भारी....
19 Nov 2009 - 2:28 pm | श्रीयुत संतोष जोशी
मस्तच विजुभौ.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
19 Nov 2009 - 3:06 pm | झकासराव
पंधरा ऑगस्ट ला रस्तोरस्ती लागणारे जिलेबीचे स्टॉल हे सातार्याचे एक वैषिष्ठ्य>>>>>
ओ विजुभाउ आमच्या कोल्लापुरातबी असतीया की जिल्बी १५ आगस्ट आणि २६ जानेवारीला. त्याशिवाय ते दोन सण पुर्ण होत नाहीत. :)
19 Nov 2009 - 3:27 pm | सुनील
१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला "त्या" जिल्बीचे स्टॉल सातार्यात काय की कोल्हापूरला काय, सगळीकडेच लागत असतील.
पण ह्या दोन दिवशी "ह्या" जिल्बीचे स्टॉल कुठे लागतात कोण सांगेल काय?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
20 Nov 2009 - 2:13 am | उमराणी सरकार
गावाचे नाव सांगा. जिल्बी कुठे मिळेल सांगतो.
उमराणी सरकार
20 Nov 2009 - 10:19 am | शाहरुख
असे बोलणे हे तर आमच्या कोल्हापूरचे भुषण आहे.."जेवलंस काय" असे व्याकरण आम्हास शाळेतच शिकवलेले आहे.झलक म्हणून हे बघा..सांगलीवाल्यानी स्टाईल चोरली असेल एखादवेळेस..
19 Nov 2009 - 3:55 pm | विजुभाऊ
जिलबी चे स्टॉल आणि १५ ऑगस्ट :
मला लहानपणी घरी जिलबी केली असेल तेंव्हा १५ऑगस्ट असेल असेच वाटायचे :)
19 Nov 2009 - 4:11 pm | परिकथेतील राजकुमार
मस्तच हो विजुभौ :)
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
19 Nov 2009 - 4:54 pm | llपुण्याचे पेशवेll
लेख ठीकठाक जमला आहे. अजून पुष्कळ भर घालता आली असती.
जसे कोल्हापुरात कोल्हापूर सोडून इतर कुठल्या मिसळीला चांगले म्हटल्यास गद्दार ठरवले जाते.
उभे राहणेला सर्रास 'उभारणे' हा शब्द वापरला जातो. इ.
पुढील लेखनास शुभेच्छा.
©º°¨¨°º© पुरा ©º°¨¨°º©
19 Nov 2009 - 6:30 pm | शैलेन्द्र
उभारणे हा शब्द कोल्हापुरात नाही तर सोलापुर भागात जास्त वापरतात.
19 Nov 2009 - 4:14 pm | सुमीत
गुणविशेष छान लिहिले आहेत तुम्ही त्या त्या शहर वासीयांचे.
19 Nov 2009 - 4:15 pm | सुमीत
गुणविशेष छान लिहिले आहेत तुम्ही त्या त्या शहर वासीयांचे.
19 Nov 2009 - 4:15 pm | सुमीत
गुणविशेष छान लिहिले आहेत तुम्ही त्या त्या शहर वासीयांचे.
19 Nov 2009 - 4:51 pm | शक्तिमान
सुमीत भाऊंचा प्रतिसाद इतका जबरदस्त आहे, की त्या प्रतिसादाचा echo पण आला आहे ५-६ वेळा..
19 Nov 2009 - 4:56 pm | छोटा डॉन
बाकी तुमचं ते पुणे, मुंबई, कोल्हापुर, सातारा वगैरे "सोलापुरात" कुठशीकं येतं हो ?
------
(कशाचाही ज्वलंत अभिमान असलेला)छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
19 Nov 2009 - 9:00 pm | प्रभो
नशीब डॉन्याने हो चा बे नाही केला अजून ...=))
--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
19 Nov 2009 - 6:44 pm | तिमा
पुलंच्या प्रसिद्ध लिखाणाची कापी वाटली.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
19 Nov 2009 - 6:53 pm | धमाल मुलगा
इकडं सगळेच अट्टल राजकारणी!
कॉलेजात एखाद्या झाडाखाली हमखास ८-१० पोरांचं कोंडाळं दिसणार...त्यातले ३-४ तरी कड्डक खादीचे पांढरेशुभ्र शर्ट घातलेले, आणि तावातावानं चर्चा चाललेली, "गप येड्या..दादांनी कसला भारी खोडा टाकला..आता आन्ना बसतंय बोंबलत....."
"आरं घैन्या...आन्नांची गेम वेगळी हाय! तू बघच नुस्ता! आन्नाशी कुणी नादच नाय करायचा" हे असलं काहीतरी नक्की ऐकु येणार बघा.
हल्ली खिशात पैसे खुळखुळायला लागलेत म्हणुन ठीक, नाहीतर दुकानांत ठरलेली वाक्य, "शेठजी, नाव ल्हिऊन घ्या...नावःअमुक तमुक.. ऊसावं प्येमेंट"
मध्येच एखादा अस्सल धनगरी वेषातला वयस्कर धनगर आपल्या सेमी-मॉडर्न वेशातल्या पोरगेल्या लेका/नातवासोबत एखाद्या दुकानात शिरेल.. वस्तु पाहिल..म्हणजे पोरगंच हेरलेली वस्तु दाखवणार, मग बाप/आजा दुकानदाराला विचारणार "किती?.... काय कमी न्हाय का?....लुटा तुमी त्येच्यायला गरीबाला" आणि डोक्याचं मुंडासं सोडुन त्यातल्या वळकटीतुन नोटा काढून टेबलावर फेकणार...
हा किस्सा मी मित्राच्या गाडीच्या शोरुममध्ये पाहिला... त्या पोराला एक दुचाकी घ्यायची होती, आणि त्या बाप/आज्यानं रोख पैसे देऊन गाडी नेली...आम्ही आ वासुन बसलो :)
इथं, गप्पांचा फड जमवणे/बडबड करत बसणे ह्याला 'सभा टाकणे' असा शब्द आहे.
एखाद्या बडबड्याला टाळताना हमखास येणारा शब्द, "नको येड्या, ते लय सभा टाकतं" :)
बारामतीतल्या गप्पा बहुधा ऊस, पाणी, दारी धरणं, कारखाना, राजकारण ह्याशिवाय पुर्णच होत नसाव्यात :)
-(बाराचा..हे आपलं..बारामतीचा) ध.
इजाभौ, भारी चाल्लंय...चालुद्या!
19 Nov 2009 - 7:23 pm | स्वाती राजेश
तुम्ही लेख फारच आखडता घेतला...
बारा गावचे पाणी पिणार्याने (पाजणार्याने) फक्त ४ गावचीच माहीती लिहीली? हे गणित काय जमले नाही बुवा..... ह.घ्या.
बाकी तुम्हाला आम्ही सातारकर म्हणायचे कि मुंबईकर?
19 Nov 2009 - 7:47 pm | नि३
काही विशेष नाही .नेहमीप्रमाणे विदर्भाला डावलले आहे. लोक वेगळया विदर्भाची मागणी करतात ते का उगाच??
लेखकाचा निषेध असो.... :-)
--- (वर्र्हाडी थाट) नि३.
19 Nov 2009 - 10:23 pm | मुक्तसुनीत
लेख आवडला. विजुभाऊंचा अलिकडे आवडलेला दुसरा लेख. अभिनंदन.
माझा एक मराठी मित्र गुजरातेत वाढला. शिक्षणानिमित्त नंतर पुण्यात आला आणि मग मराठी मुलीशी लग्न झाले. त्यांच्यातले संवाद प्रचंड मनोरंजक.
तो : (जेवताना) : "अगं ए ती पेणी दे ना !"
ती : "पेणी" ??
तो : म्हणजे ते पॅन.
ती : अरे मग कढई सांग ना !
20 Nov 2009 - 1:39 pm | प्रदीप
अहमदाबादेत रहात असता मी ती अनुभवलीय. आमच्या येथे एक मूळ बडोद्याचा मराठी गृहस्थ होता त्याचे मराठी वेगळेच होते. एक उदाहरण :' कार्यक्रम पतून गेला' (समाप्त झाला)'! आणि तो मराठी 'निसरड्या' उच्चाराचे बोलत असे, तेव्हा 'बाबारे, इतके हाल नको करून मराठीचे. तू हवं तर गुजरातीतून बोल आमच्याशी, आम्ही समजवून घेऊ' असे सांगायची वेळ येई अनेकदा!
20 Nov 2009 - 9:55 am | अविनाशकुलकर्णी
त्या" आणि "ह्या"..अयाया हासुन मेलो राव......... =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
20 Nov 2009 - 2:11 pm | गणपा
विजुभौ आवडला लेख.
पण खुपच आखडता घेतला आहे. क्रमशः लेखन बाकी आहे का ?
अजुन बरीच शहरं / गाव बाकी आहेत...
आवादो डिट्टेलमा..