"पुण्यातील मिपाकरांच्या भेटीगाठी समारंभ ........

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in जनातलं, मनातलं
7 Mar 2008 - 11:09 am

गेले काही दिवस "मी " आणि "धमाल मुलगा" यांच्यात "पुण्यातील मिपाकरांच्या भेटीगाठी समारंभ [ हो आमचा आपला साधाच , नाहितर संभेलन म्हटले की फार काहितरी मोठे वाटते आणि जवळजवळ त्याचे 'सूप वाजणे' हे सुध्धा ठरलेले असते.] " ठरवायचा की नाही यासंबंधी चर्चा चालू होती ...

वास्तविक पाहता मी "धमाल" ला बेंगलोरचे आमंत्रण दिले होते पण मार्चच्या अखेरीस होळीची आणि जोडून शनिवार / रविवार अश्या २१ , २२ आणि २३ मार्च या ३ दिवशी सुट्ट्या येत आहेत. बहूतेक 'दूर देशी काम करणारे हमाल लोक' त्या मुहुर्तावर आपापल्या गावी परत येण्याची शक्यता आहे. तेव्हा मी "धमाल" ला म्हणले की 'बेंगलोरला भेटण्यापेक्षा पुणे कसे?" त्यानेही या प्रस्तावाला अनुमोदन दिले .....

तर माझा प्रश्न असा आहे की " जर समजा कार्यक्रम ठरवला तर किती जणांची यायची तयारी आहे ????" जर लोक जमणार असतील तर फोनवरून वगैरे तारखा, ठिकाण ठरवता येईल....

पण आधि किती जण तयार आहेत, याची ही चाचपणी ....
ह्याबद्दल तुम्ही माझ्याशी अथवा "धमाल" शी चर्चा करू शकता .........

अवांतर : ह्या मुहुर्तावर जर "तात्यांचे" येणे होणार असेल तर या "जश्न -ए-बहार" ला 'चार चांद" लागतील......
"विनोबा ठाकरे" सध्या पुणेमुक्कामी असल्याने त्यांच्याकडून मला मदतीची अपेक्षा आहे .......

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

7 Mar 2008 - 11:26 am | विजुभाऊ

२२ किंवा २३ चालेल....
या दिवशी मि पा करांच्या गुणदर्शनाचा ही कर्यक्रम करता येइल......
कळावे आपला
'दूर देशी नाहे याच देशात काम करणारा हमाल लोक'
विजुभाऊ( ०९२२६१०२८१२)

"विनोबा ठाकरे" सध्या पुणेमुक्कामी असल्याने त्यांच्याकडून मला मदतीची अपेक्षा आहे .......
अरे डॉन्या सध्या काय?आम्ही तर कायमस्वरुपी पुणे प्रांतीच असतो.काय हवी ती मदत मागा...शिवाय आपले मिपाचे किल्लेदार नीलकांतराव पुण्यातच आहेत,त्यांनाही कळवा.
(इनोबा: +९१-९३७२-९३७२-१८)

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा(मिसळबोध)

छोटा डॉन's picture

7 Mar 2008 - 11:39 am | छोटा डॉन

जर कोणाला काही समस्या असतील तर आपण हा कार्यक्रम मार्चच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे २८,२९,३० मार्चला पण ठेऊ शकतो .... मला २१ मार्च ते ३० मार्च पर्यंत कधीही काहिही प्रोब्लेम नाही ...

[ अवांतर : २९ ला आमचा वाढदिवस असल्याने 'पुढची सोय' पण होऊ शकेल ...]

सगळे मिळून जे काही आहे ते ठरवू ....

सध्या बेंगलोरला असलेला छोटा डॉन
[+९१ ९९८०१०३७१०]
[ आम्हाला इथे भेट द्या "http://chhota-don.blogspot.com/ "]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........

इनोबा म्हणे's picture

7 Mar 2008 - 11:45 am | इनोबा म्हणे

आम्हाला कधीही भेटा.१२ महीने २४ तास चकाट्या पिटायला आम्ही केव्हाही तयार आहे.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा(मिसळबोध)

विजुभाऊ's picture

7 Mar 2008 - 12:06 pm | विजुभाऊ

२२ किंवा २३ चालेल....

शेखर's picture

7 Mar 2008 - 12:28 pm | शेखर

२२ तारखेस ठेवल्यास धुळवड पण साजरी होईल......

रंगेल शेखर

विवेकग's picture

7 Mar 2008 - 3:03 pm | विवेकग

कधिही चालेल .

झकासराव's picture

7 Mar 2008 - 4:16 pm | झकासराव

पुणे स्पेशल असा धागा उघडावा का असे मी पाणीपुरी ह्या धाग्यावर लिहिलच होत की. :)
रविवारी असेल तर मी तयार आहे. :)
कुठे जमायच आणि तारीख काय घ्यायची ते ठरवा.

विसोबा खेचर's picture

7 Mar 2008 - 4:44 pm | विसोबा खेचर

मुलांनो,

फायनल तारीख आणि वेळ ठरली की नक्की कळवा रे. मीही येण्याचा यत्न करतो. अर्थात, आमच्या मातोश्रींची तब्य्तेत अलिकडे फारशी बरी नसते त्यामुळे ऐनवेळेस काही सांगता येत नाही. तरीही मला तुम्हा सगळ्या मंडळीत यायला मात्र नक्की आवडेल आणि तसा मी प्रयत्नही करीन..

धमाल्या आणि छोट्या डोनच्या चरणकमलांच्या दर्शनाची मलादेखील कित्येक दिवसांपासून आस लागली आहे! :)

धमाल्या आणि छोटा डॉन, कट्ट्याचं नक्की ठरवा रे!

आपलाच,
तात्या.

प्राजु's picture

7 Mar 2008 - 7:05 pm | प्राजु

अरे.. थोडंसं लांबवता नाही का येणार?? मी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पुण्यात येणार आहे. मलाही तुम्हा सगळ्यंना भेटायचं आहे. प्लिज बघा ना... मार्च अखेर ऐवजी जर एप्रिल च्या ८-९ तारखेला किंवा तुमच्या सोयीनुसार जर ठरवता आलं तर मलाही या कट्ट्यामध्ये सामिल होता येईल..

- (सर्वव्यापी)प्राजु

ब्रिटिश टिंग्या's picture

7 Mar 2008 - 7:17 pm | ब्रिटिश टिंग्या

माझ्या नकळतच डाव साधणार का? :(

च्यामारी ह्या यु.के.च्या फुल्या फुल्या फुल्या फुल्या फुल्या फुल्या फुल्या फुल्या फुल्या फुल्या .................

ठीकाय. कोनो प्रोब्लेम नथी छे......माझ्या येत्या भारतभेटीत स्वखर्चानी परत पुण्यात कट्टा भरवेन........

असो,
छोट्या डॉन्या, 'पुढची सोय' करणार असशील आमच्या नावानी स्मिरनॉफचे २-४ पेग मार्......तेवढाच आमचा आत्मा शांत हुईल.....
आणि हो, तुमच्या "जश्न -ए-बहार" ला आमच्या मनापासुन हार्दिक शुभेच्छा!!!!

यथेच्छ मिसळ हाडदा अन् जमेल तेवढा व्रात्यपणा करा.....

आपला,
(वात्रट) छोटी टिंगी ;)

धमाल मुलगा's picture

7 Mar 2008 - 10:11 pm | धमाल मुलगा

आज जरा मिपावर फिरकायला अ॑मळ उशीर घडला तर डॉन्याने पार सगळ॑ "झाईर" करून टाकलेल॑. छान..छान...

तर म॑डळी,
मी, डॉनराव, विजूभाऊ, इनोबा, शेखर, झकासराव, विवेक गरगटे असे "वेडात दौडणारे" सात वीर मराठे पुण्यपत्तनात भेटण्यास तयार आहेतस॑ दिसत॑य.

पेठकर काका, केशवसुमार, घाटपा॑डे काका, आन॑दयात्री आपणास देखील आग्रहाचे निम॑त्रण आहेच. कृपया आपल्याही सोयीच्या तारखा कळवाव्या ही विन॑ती.

डॉनभाई, प्राजुताई म्हणते तस॑ एप्रिलात जमेल काय तुला?

झकासराव, रविवारी असेल तर मी तयार आहे. :)
शेठ, आम्ही परत मु॑बईला कामावर पोहोचूच नये का काय? विजुभाऊ पण बाहेरून येणार. शनिवारी जमेल का आपल्याला?

तात्याबा,
फायनल तारीख आणि वेळ ठरली की नक्की कळवा रे.
म्हणजे काय? तुम्हाला तर पहिल्या॑दा अक्षत देणार की :)

धमाल्या आणि छोट्या डोनच्या चरणकमलांच्या दर्शनाची मलादेखील कित्येक दिवसांपासून आस लागली आहे! :)
ओय होय !!!! धन्य धन्य जाहलो मी !!!!

छोटी टिंगी ,
शेठ, अहो त्यात काय एव्हढ॑? कधी परतताय बोला, परत भेटू सगळे :)

असो,
आपला कृपाभिलाषी,
ध मा ल.

स॑पर्कासाठी भ्रमणध्वनी क्र.
९३७ ००५ ६४२७
९७६ ६२५ ४५२५

आनंदयात्री's picture

11 Mar 2008 - 2:36 pm | आनंदयात्री

येणे जरासे अवघड दिसते आहे, पण तुमच्या तारखा नक्की झाल्यावर काय ते धमु च्या भ्रमणध्वनी वर कळवेन.

केशवसुमार's picture

8 Mar 2008 - 2:22 am | केशवसुमार

रात्र थोडी सोंगे फार... अता २-३ शनिवार रविवार बाकी आणि एकसे एक जनशन प्रोग्राम.. सगला लोच्या आहे..आमच्या भटकंतीच्या टोळी बरोबर कुठल्या गडावर तडमडलो नसेल तर.. मी नक्की..मागे प्रॉमिस केल्या प्रमाणे मिसळपाव पण प्रयोजित करणार..
जमवा काहीतरी जुगाड आणि कळवा ९८५००००४३४
केशसुमार

राम राम भाऊ's picture

9 Mar 2008 - 12:40 pm | राम राम भाऊ

राम राम हो! काय लेकहो आम्हाले आवतन नाहि का? चहाले तारि बोलवा!

अवधुत पुरोहित's picture

9 Mar 2008 - 11:37 pm | अवधुत पुरोहित

मी आहे...
काही मदत लागली तर जरुर कळवा..
(फिल्मी मि.प.कर... अवधुत)

स॑पर्कासाठी भ्रमणध्वनी क्र.
९८७०४२३३४
९८२३९६०९००

डॉ.प्रसाद दाढे's picture

10 Mar 2008 - 8:56 am | डॉ.प्रसाद दाढे

पुण्यात नक्की कुठे आहे, किती वाजता? कळले तर मी व सतलज भडकमकर येऊ म्हणतो.. RSVP कुणाला कळवायचे?

विवेकवि's picture

10 Mar 2008 - 11:07 am | विवेकवि

नमस्कार पन्त
कसे आहात ?
क्रुपया १६/०३/२००८ पर्य॑त ह्या विषयावर सगळ्या॑नी आपली मते कळवावीत
अशी नम्र विन॑ती ...

स॑पर्कासाठी भ्रमणध्वनी क्र.
९९८७०६४९२६

विवेक वि.

धमाल मुलगा's picture

10 Mar 2008 - 12:08 pm | धमाल मुलगा

सर्व मिपागडाच्या गडकर्‍या॑ना एक णम्र इन॑ती :

मिपागडाच्या पुनवडी शाखेच्या जागतीक महास॑मेलनाच्या स्थळ-काळ निर्णयासाठी महास॑मेलनास येऊ शकणार्‍या (ईच्छिणार्‍या म्हणणार नाही मी, कारण ईच्छा सगळ्या॑नाच आहे, ठाऊक आहे मला :) ) विवेकच्या म्हणण्याप्रमाणे १६ तारखेपर्य॑त ह्याच धाग्यावर आपल्या सोयीची वेळ-काळ सा॑गितल्यास इतर गोष्टी ठरवणे सोपे पडेल. तरी कृपया ही माहिती देणेची मेहेरबानी करणे.
जसे की......

विजुभाऊ : २२ /२३ मार्च
छोटा डोनः २० ते ३० मार्च कधीही
धमाल मुलगा: २१ / २२ / २९ मार्च (दुपार -स॑ध्याकाळ -रात्र कधीही )
झकासरावः रविवार (२३ / ३० मार्च)
प्राजुताई: ८ / ९ एप्रिल.
केशवसुमार : अनिश्चित.
तात्या अभ्य॑कर : अनिश्चित.
शेखर : कधीही चालेल.
विवेकग : कधीही चालेल.
विवेकवि : कधीही चालेल.
इनोबा : कधीही चालेल.

डॉक्टर दाढेसाहेब आणि भडकमकर, आपल्या सोयीच्या तारखा आणि वेळा कळवावी ही विन॑ती.

मिपागडाच्या इतर सर्व गडगरीहो, ज्या॑चा वरील नामावलीत उल्लेख आलेला नाही तो केवळ नजरचुकीने अथवा त्या॑चे सद्यस्थान ठाऊक नसल्याकारणे आलेला नाही हे कृपया लक्षात घ्यावे आणि लवकरात लवकर आपल्या सहभागाची माहिती येथे कळवावी जेणेकरुन आपल्या सर्वा॑साठी योग्य ते ठिकाण शोधून त्याची सोय लावता येईल.

आपलाच
- ध मा ल.

केशवसुमार's picture

11 Mar 2008 - 1:09 pm | केशवसुमार

ला मी आहे..
(निश्चित)केशवसुमार..

नमस्कार...

जरा उशिरच झाला म्हणाय्चा प्रतिक्रिया द्यायला...,

असो.... शेवटी काय ठर्ल॑ म्हणाय्च॑???

ंंमला ९३७२०१०००२ ह्या क्रमान्कावर िनरोप दीला तरी चालेल....

विवेकवि's picture

10 Mar 2008 - 7:04 pm | विवेकवि

खुप लवकर प्रतीक्रीया दिलीत...

आपला फोन नक्की चालू असतो का?

नाही तर ब॑द असायचा ?

विवेक वि.

प्रभाकर पेठकर's picture

11 Mar 2008 - 12:39 pm | प्रभाकर पेठकर

२२ - २३ मार्च आधीच बुक आहे. २४ नंतर कुठलीही तारीख चालेल. एप्रिल सुद्धा चालेल. ख्रर्चाचा सोसेल इतका भार उचलण्याची तयारी आहे.
धन्यवाद.

विजुभाऊ's picture

11 Mar 2008 - 1:09 pm | विजुभाऊ

धमाल्या बघ खालील लोकांचे प्रतिसाद....
मला वाटते की लॉजिक लावले तर २२ मार्च्.......(त्यादिवशी भुगोलात संगितलेला सगळ्यात सारखा १२ तास दिवस १२ तास रात्र असा कसला तरि दिवस अस्तो क रे?)
हा सर्वाना सोयीचा आहे.....
बहुमताने २२ मार्च् मुक्रर करायला हर्कत नसावी. (धमाल मुलगा: २१ / २२ / २९ मार्च (दुपार -स॑ध्याकाळ -रात्र कधीही ) "हे भलते अवघड असते.."
संध्याकाळ हा बरा काळ असतो........ठिकाणसुद्धा अगदी निगडी किंवा कोरेगाव पार्क / भोसरी / फुरसुंगी असे लांबचे नको...शक्यतो सर्वान सहज येता यावे( आणि जाताही) असे डेक्कन वैगेरे असेल तर बरे
विजुभाऊ : २२ /२३ मार्च
छोटा डोनः २० ते ३० मार्च कधीही
धमाल मुलगा: २१ / २२ / २९ मार्च (दुपार -स॑ध्याकाळ -रात्र कधीही )
झकासरावः रविवार (२३ / ३० मार्च)
शेखर : कधीही चालेल.
विवेकग : कधीही चालेल.
विवेकवि : कधीही चालेल.
इनोबा : कधीही चालेल.
(पेठकर काका.....कोणाला सोसेल इतका?)

इनोबा म्हणे's picture

11 Mar 2008 - 1:22 pm | इनोबा म्हणे

(पेठकर काका.....कोणाला सोसेल इतका?)
आपल्याला सोसेल एवढी पाजायची तयारी दिसते पेठकर काकांची.

एकदाचं काय ते ठरवा राव्!परत परत कॅन्सल केलं तर पुढच्या वेळी प्रतिसाद सुद्धा देणार नाय्.काय समजलेत.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

धमाल मुलगा's picture

11 Mar 2008 - 2:19 pm | धमाल मुलगा

अच्छा, तर विजुभाऊ॑च्या म्हणण्याप्रमाणे आणि वरील प्रतिसाद पाहता बरेच जण २२ ला येऊ शकतात तर.

पेठकर काका,
२२ ला जमत असल्यास बघा ना प्लिज.
कारण, के.सु. परत राणीच्या देशा जाणार म्हणतात, छोटा डॉनही ब॑गळूरास्न॑ येणार. तो ही पुढे हिटलरदेशी चाललाय. विजुभाऊ पण पुण्यात नसतात. बघा ना काका काही ऍडजेस्ट होतय का ते!

झकासराव,
तात्या, विजुभाऊ आणि मी, बाहेरून येणार (अनुक्रमे: मु॑बई, मु॑बई आणि बारामती). शनिवार बरा पडेल हो. जमत॑य का बघता का प्लिज?

असो, तर सध्याची अद्ययावत यादी साधारणतः अशी दिसते:

विजुभाऊ : २२ /२३ मार्च
छोटा डोनः २० ते ३० मार्च कधीही
धमाल मुलगा: २१ / २२ / २९ मार्च (दुपार -स॑ध्याकाळ -रात्र कधीही )
झकासरावः रविवार (२३ / ३० मार्च)
प्राजुताई: ८ / ९ एप्रिल.
केशवसुमार : २२/२३
तात्या अभ्य॑कर : अनिश्चित.
प्रभाकर पेठकर : अनिश्चित. (२४ मार्चन॑तर कधीही....काका प्लिज बघा ना काही जमत॑य का आधी)
शेखर : कधीही चालेल.
विवेकग : कधीही चालेल.
विवेकवि : कधीही चालेल.
इनोबा : कधीही चालेल.
छत्रपति : कधीही चालेल.
डॉ.प्रसाद दाढे :
स_भडकमकर :
किल्लेदार नीलका॑तराव :
अवधूत पुरोहित :

===================
ठिकाणसुद्धा अगदी निगडी किंवा कोरेगाव पार्क / भोसरी / फुरसुंगी असे लांबचे नको...शक्यतो सर्वान सहज येता यावे( आणि जाताही) असे डेक्कन वैगेरे असेल तर बरे

माझा विचार पौड रोडचे "आर्चर" ला जमण्याचा होता. पण ते ला॑ब पडेल.
कोणी काही पर्याय सुचवु शकेल काय?

अधिक चर्चेसाठी नि:स॑कोच स॑पर्क साधा:
९३७ ००५ ६४२७
९७६ ६२५ ४५२५

इनोबा,
एकदाचं काय ते ठरवा राव्!परत परत कॅन्सल केलं तर पुढच्या वेळी प्रतिसाद सुद्धा देणार नाय्.काय समजलेत.
काळजी नसावी. कार्य हाती घेतले आहे, ते तडीस नेऊच.

अवा॑तर : इन्या, ह्या शनिवारी पुण्यात आलो की भेटू. जरा निवा॑त बसू,बोलू ह्या आणि सगळ्याच विषया॑वर.

इनोबा म्हणे's picture

11 Mar 2008 - 3:01 pm | इनोबा म्हणे

ह्या शनिवारी पुण्यात आलो की भेटू. जरा निवा॑त बसू,बोलू ह्या आणि सगळ्याच विषया॑वर.
चालेल.मी फोन करतोच तुम्हाला.
माझा भ्रमणध्वनी क्र. नोंदवून ठेवा: ९३७२-९३७२-१८

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

प्रभाकर पेठकर's picture

12 Mar 2008 - 9:39 pm | प्रभाकर पेठकर

पेठकर काका,
२२ ला जमत असल्यास बघा ना प्लिज.

जमत असते तर आढेवेढे घेणार्‍यातला मी नाही. २२ला बिझनेस डीनर आहे. १ वर्षाच्या तपश्चर्येनंतर जुळून आले आहे. समोरच्यांनी कांही कारणाने कॅन्सल केले तरच. मी कॅन्सल करू शकत नाही हे दुर्दैव आहे.

पुढच्या मेळाव्यास भेटूच.

विजुभाऊ's picture

11 Mar 2008 - 2:33 pm | विजुभाऊ

पौड रोडचे "आर्चर" चालेल्.....फार लांब नाही.....

शेखर's picture

11 Mar 2008 - 3:16 pm | शेखर

माझ्या मते शिवाजीनगर चे बांबु हाऊस मध्यवर्ती व सोयिस्कर पडेल ....

सर्वांचे काय मत आहे?

धमाल मुलगा's picture

11 Mar 2008 - 3:22 pm | धमाल मुलगा

निवा॑त गप्पा-टप्पा करु देतील का तिथे?
आपण शनिवार-रविवार बद्दल बोलतो आहोत. चिक्कार गर्दी असणार तेव्हा.

माझा विचार एखाद्या अशा ठिकाणाबद्दल चालू होता की जिथे खुर्चीच्या मागे येऊन इतर लोक उभे राहणार नाहीत. अशी ठिकाण॑ जराशी शहराबाहेर असतील पण निवा॑त असतील. जसे काही ढाबे जे तसे बरे / चा॑गले आहेत
उदा. आर्चर, काही पुणे-सातारा रस्त्यावरचे (बे॑गळूर हाय-वे).

शेखर's picture

11 Mar 2008 - 3:28 pm | शेखर

पौड रोडचे अम्ब्रोसिया चालेल का?

धमाल मुलगा's picture

11 Mar 2008 - 3:35 pm | धमाल मुलगा

बघुया इतरा॑च॑ काय म्हणण॑ पडत॑य.
ऍम्ब्रोसिया खर्चाच्या दृष्टीन॑ कस॑ पडेल ठाऊक नाही.

केशवसुमार's picture

11 Mar 2008 - 3:44 pm | केशवसुमार

हाटिलात निवांत बसता नाही येणार आणि अव्वाच्या सव्वा खर्च पण होणार..
सिहगडाच्या पायथ्याला काही बंगले भाड्याने मिळतात असे ऐकून आहे.. कोणाला माहिती असल्यास हा पर्याय बघता येईल..
(पर्यायी)केशवसुमार

स्वाती राजेश's picture

11 Mar 2008 - 3:38 pm | स्वाती राजेश

मी पुण्याला जुलै आणि ऑगस्ट मध्ये आहे म्हणून मी काही येऊ शकत नाही.
तुमच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा...

खूप मज्जा करा....आमच्यासारखी जी मंडळी जी येऊ शकत नाहीत त्यांची आठवण ठेवा...
महत्वाचे सर्व फोटो मिसळपाव वर लोड करा...

ते सर्व फोटो एकत्र मिसळपाववर पाहायला मिळतील अशी व्यवस्था तात्यांनी करावी....अशी मी तात्यांना विनंती करते...ते फोटो येइपर्यंत तात्यांची तयारी झाली असेल.
तसेच खाली त्यांची (फोटोत कोण आहेत्?)नावे पण येऊ देत अशी व्यवस्था होते का पाहा?

कोणती तरी पंच लाईन ठरवा....मस्तपैकी.
कारण मि.पा.चे पहिले संम्मेलन आहे ना?

केशवसुमार's picture

11 Mar 2008 - 3:41 pm | केशवसुमार

ते संमेलन वगैरे काही म्हणू नका..
नाहीतर मागच्या वेळे गत नाट लागायची..
केशवसुमार

स्वाती राजेश's picture

11 Mar 2008 - 3:45 pm | स्वाती राजेश

घरगुती कार्यक्रम म्हणूया का?
मि.पा.च्या कुटुंबाचे गेट टुगेदर...कसे?

स्वाती राजेश's picture

11 Mar 2008 - 3:55 pm | स्वाती राजेश

१.संस्कृती..
२. मनाली ...संस्कृतीच्याच रोडला
३.अभिरुची ...सिंहगड रोड पण तिथे हॉट ड्रिंक्स अलाऊ करतात का ते माहित नाही.
४. सायलेंट व्हॅली.....
नाहीतर एखादे छोटे कार्यालय घेऊन जेवणाची ओर्डर देता येते का? हे पाहावे.

धमाल मुलगा's picture

11 Mar 2008 - 4:18 pm | धमाल मुलगा

वा वा!!!!!
स्वातीताई, थ्या॑क्यू हा॑ :-)
आईडियाची कल्पना चा॑गली आहे.

के.सु.या॑नी सुचवलेला पर्यायही चा॑गला आहे.
माझ्या ओळखीत एकजण आहेत, त्या॑चा सि॑हगड पायथ्याचा ब॑गला ते भाड्याने देतात, बघतो चौकशी करुन.

इनोबा / विवेकवि / छत्रपति,
स्वातीताईने सुचवलेल्या पर्याया॑ची माहिती काढता येईल का?

माझ्या माहितीप्रमाणे अभिरुची स॑ध्याकाळी ब॑द होत॑.
स॑स्कृती देखील ९ वाजेपर्य॑त चालू असत॑ आणि बहुधा 'गरम पेय' ह्याची तिथली व्याख्या चहा-कॉफी, सार-आमटीपर्य॑तच मर्यादीत आहे. माझी गरम पेयास हरकत नाही, असल्यास सोवळ॑-ओवळ॑ही नाही. आणि नसल्यास पर्वा नाही. :-)

इनोबा म्हणे's picture

11 Mar 2008 - 4:42 pm | इनोबा म्हणे

धमु तुला फोन करतो.मग बोलू.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

विवेकवि's picture

11 Mar 2008 - 4:08 pm | विवेकवि

आपण फोन वर बोलु..

विवेक वि.

विजुभाऊ's picture

11 Mar 2008 - 4:16 pm | विजुभाऊ

मंडळी गड येन्गायला नका लौ ......
ठिकाणसुद्धा अगदी निगडी किंवा कोरेगाव पार्क / भोसरी / फुरसुंगी असे लांबचे नको...शक्यतो सर्वान सहज येता यावे( आणि जाताही) असे असेल तर बरे.

झकासराव's picture

11 Mar 2008 - 7:28 pm | झकासराव

२२ ला जमेल अस दिसतय.
अजुन तरी काही नाट लागलेला नाहिये.
३० तारखेच्या रविवारी नाट लागला :(
माझी तारीख सध्याची २२ ला संध्याकाळ किंवा २३ ला दिवसभरात कधिही.
फकस्त ठिकाण जास्त लांब असेल तर त्रासदायक होइल.
मी निगडीला राहतो रे म्हणून.
मध्यवर्ती ठिकाण आणि जेवण खाण्याची चांगली व्यवस्था (शिवाय काहि लोकांच्या आवडीनुसार रंगीत द्रव्याची व्यवस्था) असावी अस आहे.
शिवाय निवांत पणे बसता याव गडबड नको.
अस ठिकाण मिळण कठिण आहे रे मुलानो.
थोड शहराबाहेर एखादा धाबा किंवा हॉटेल बघाव लागेल मग. अर्थात मग ते लांब होइल.
आता कस कस जमवायच ते बघा. मला तर शहरातली हॉटेल्स माहित नाहीत.
कार्यक्रमाची थोडक्यात रुपरेषा आली तर जास्त बरे पडेल अस मला वाटत.

धमाल मुलगा's picture

12 Mar 2008 - 2:59 pm | धमाल मुलगा

झकासराव,
धन्यवाद, २२ ला येऊ शकता हे सा॑गितल्याबद्दल.
जेव्हढे जास्त आप्त जमतील तेव्हढी जास्त मजा येईल नाही का?

असो,
डॉन, विजुभाऊ ,इनोबा, विवेक या॑च्याशी केलेल्या चर्चेवरून अस॑ निष्पन्न झाल॑ आहे की 'सि॑हगड मुळीच नको' कारण

१.ला॑बून येणार्‍या॑चा प्रवासाचा त्रास जरा जास्त वाढेल.
२.उगाच पोलिसमामा॑चा ससेमिरा (कशात काही नसतानाही) मागे लागण्याची शक्यता.

सर्वसाधारण सर्वा॑ना बर॑ पडेल अश्या पर्यायाच्या शोधात आहोतच, काही सापडलेही आहेत, फक्त भेट देऊन खारतजमा करणे बाकी आहे.

कार्यक्रम साधारणतः स॑ध्याकाळी ७ ते ११ (कोण रे तो ११ म्हणाल्यावर हसतोय फिदीफिदी?) करावा अस॑ बर्‍याच जणा॑च॑ म्हणण॑ आहे. आणि ते योग्यही ठरेल.

आपल्या प्रतिक्रिया स्वागतार्ह आहेत.

छोटा डॉन's picture

12 Mar 2008 - 5:14 pm | छोटा डॉन

"डॉन, विजुभाऊ ,इनोबा, विवेक या॑च्याशी केलेल्या चर्चेवरून अस॑ निष्पन्न झाल॑ आहे की 'सि॑हगड मुळीच नको'"
हेच म्हणतो, कारण आपण काहीही वंगाळ न करता फुकट "खाया पिया कुछ नही , ग्लास फोडा बारा आणा " असे व्हायचे ...
हा ना राव, त्या नांगरे पाटलांशी कुठे पंगा घेता ...

माझे पर्याय :
१. कल्याणीनगर " कार्निव्हल " : - साधारणता १०~१५ माणसांसाठी उत्तम सोय, बसण्यासाठे झोपड्यासारखी जागा, बाहेरचे 'पार्सल ड्रिंक्स' अलाऊड आहे [ पैसे वाचतील ] , जाण्यायेणास सोईचे व हॉटेल खरच मस्त [ शाकाहारी व मासांहारी दोन्हीसाठी, फक्त मिसळ मिळणार नाही ], रेट्स साधारणता जंगली महाराज रोडच्या तुलनेत २०-२५ % जास्त पण रिअली वर्थ....

२. चांदणी चौक - अप & अबाउव :- वरची सर्व कारणे व महत्त्वाचे म्हणजे वरचे 'गार्डन ' बसायला उत्तम ....

बाकीचे पुण्यातल्या लोकांनी खारीरजमा करावी ...

कार्य सिद्धीस नेण्यास "आई जगदंबा " समर्थ आहेच ....

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विवेकवि's picture

12 Mar 2008 - 5:20 pm | विवेकवि

दादानू आपला विचार मला पटत नाही
त्यातून मी ध.मु शी बोलतो...

विवेक वि.

इनोबा म्हणे's picture

12 Mar 2008 - 5:21 pm | इनोबा म्हणे

कार्य सिद्धीस नेण्यास "आई जगदंबा " समर्थ आहेच ....
आई जगदंबा पण पार्टीला येणार ह्ये आधी का नाही सांगीतलं(आई माफ कर)

चांदणी चौकापुढे बेस्ट्....धमुशी आजच बोलणं झालं आहे.शनिवारी तो पुण्यात आला की आम्ही दोघे जाऊन खातरजमा करुन घेतो.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

विजुभाऊ's picture

12 Mar 2008 - 5:58 pm | विजुभाऊ

.....रविराज / रणजीत / श्रेयस या ठिकाणी तसेच कर्वे रोड इन्कम टॅक्स ओफ्फिस मागे( होटेल चे नाव विसरलो) आपण साधारण १५/२५ जण असू तर आपल्याला मिटीन्ग हॉल फुकट मिळतो अर्थात जेवण घेतले तर्.....फक्त तसे बूकिन्ग करावे लागते.....बघता का जरा...(पार्टी अस उल्लेख न करता ग्रुप मिटींग आहे हे आवर्जुन सांगावे)

शेखर's picture

12 Mar 2008 - 6:32 pm | शेखर

नळस्टॉप जवळच्या शांग्रिला गार्डनच्या गच्चीवर एकदा पार्टी केली होती..... गरम पेयाची पण सोय आहे..... आणी वर कोणी डिस्टर्ब करायला येत नाही.....

जमतय का बघा....

विजुभाऊ's picture

12 Mar 2008 - 6:38 pm | विजुभाऊ

"शांग्रिला गार्डन " बरोबर हेच नाव

छोटा डॉन's picture

12 Mar 2008 - 7:07 pm | छोटा डॉन

हेच म्हणतो ....

अवांतर : शांग्रिला = शांग + रिअला = शाही खून [ म्हणजे राजघराण्यातील रक्त म्हण्जे राजवंश....]
च्यायला जमतयं आमच्यासाठी ....

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

केशवसुमार's picture

12 Mar 2008 - 6:47 pm | केशवसुमार

चर्चा पुरे.. उगा लावलय कवाचान हे नको.. ते नको...अता बिगीबिगी निघा आणि लगेच बुकिंग करून टाका.. भारतात लोकशाहीने काही होनार नाही.. नुसते फाटे फुटतील
काय कलं..की घेऊ रिमोट हाता मधे?
चला निघा.. पटपट..
केशवसुमार ठाकरे..

विजुभाऊ's picture

12 Mar 2008 - 6:52 pm | विजुभाऊ

केशवसुमार ठाकरे..
या पेक्षा केशवसुमार ठोकरे.. असे आडनाव लाव केश्या

केशवसुमार's picture

12 Mar 2008 - 6:58 pm | केशवसुमार

एकदम जनशन नाव हाये..
केशवसुमार ठोकरे..

इनोबा म्हणे's picture

12 Mar 2008 - 6:55 pm | इनोबा म्हणे

रविराज / रणजीत / श्रेयस /शांग्रिला गार्डन
च्यायला समदी आपल्या एरीयातलीच...

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

विसोबा खेचर's picture

12 Mar 2008 - 7:06 pm | विसोबा खेचर

धमाल्या, छोटा डॉन आणि इतर प्रभूती,

अरे पोरांनो, आता चर्चा पुरे झाल्या. आता एकदाच काय तो आपापसात पोष्टकार्ड पाठवून, फोनाफोनी करून फायनल तारीख आणि फायनल स्पॉट ठरवा आणि जाहीर करा.

आपण सगळे जरी एकाच संस्थळावरचे असलो तरी वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे, वेगवेगळ्या कमिटमेन्टस्, कामधंदे असणारी मंडळी आहोत त्यामुळे सगळ्यांना येणे शक्य होईल असे नाही. ज्यांना यायला जमेल ते येतीलच परंतु प्रत्येकाकरताच जर थांबत बसलं (त्यात मी ही आलो,) तर कट्टा होणं मुश्कील आहे. तुम्ही सगळे मनापासून प्रयत्न करताय हे मान्य, तसेच तुमच्या उत्साहालाही मनापासून दाद देतो, परंतु आता लवकर काय ते फायनल ठरवा आणि पुढच्या तयारीला लागा ही आग्रहाची विनंतीवजा सूचना...

आपलाच,
तात्या.

शरुबाबा's picture

13 Mar 2008 - 3:52 pm | शरुबाबा

खूप मज्जा करा....आमच्यासारखी जी मंडळी जी येऊ शकत नाहीत त्यांची आठवण ठेवा...
महत्वाचे सर्व फोटो मिसळपाव वर लोड करा...

धमाल मुलगा's picture

13 Mar 2008 - 4:09 pm | धमाल मुलगा

खूप मज्जा करा....आमच्यासारखी जी मंडळी जी येऊ शकत नाहीत त्यांची आठवण ठेवा...

बास का शेठ, प्रोक्षणात ॐ शरुबाबाय नमः करतो ना :-)

महत्वाचे सर्व फोटो मिसळपाव वर लोड करा...

हम्म...'महत्वाचे' हा शब्द महत्वाचा, नाही का ?

डॉ.प्रसाद दाढे's picture

13 Mar 2008 - 9:44 pm | डॉ.प्रसाद दाढे

शा॑ग्रिला गार्डन चा॑गले आहे आणि मध्यवर्ती (म्हटले तर 'मद्य वरती' सुद्धा) आहे..पाहा विचार करून

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Mar 2008 - 12:21 am | llपुण्याचे पेशवेll

खा मटार उसळ खा.. शिकरण खा.. :) आमच्या सदिच्छा कायम तुमच्या बरोबर आहेत. :) फक्त फोटू मात्र लावा मि.पा.वर. आम्ही ईकडूनही बघू आमच्या राजधानीतली मौज.

पुण्याचे पेशवे

ब्रिटिश टिंग्या's picture

14 Mar 2008 - 12:25 am | ब्रिटिश टिंग्या

खायचं ठीक आहे धनंजयराव....पण प्यायचं काय?
आपला,
(नामबंधु) छोटी टिंगी ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Mar 2008 - 12:31 am | llपुण्याचे पेशवेll

खुशाल प्या हो पाण्यासारखी पण सुरुवात करण्यापूर्वी २ थेंब बोटाने चषकाच्या बाहेर उडवा आमच्या नावाने. :)

-असुरावादी
पुण्याचे पेशवे

मी भुइनळा's picture

14 Mar 2008 - 1:09 pm | मी भुइनळा

मला चालेल... आम्ही अवश्य येणार...
(९९७०१५२१५८)

आपलाच,

भुइनळा

म॑डळी,

आपल्या भेटीच्या कार्यक्रमाचे स्थळ पक्के झाले आहे.

तारिखही सर्वा॑च्या सोयीची अशी २२ मार्च निवडण्यात आलेली आहे. (धुलिव॑दन....करा लेको धूळवड)

सर्वा॑नी आपापले पोस्टहापिस पहावे...व्य.नि.ने इतर माहिती जसे की ठिकाण, व्यवस्था इ.इ. देत आहे.

कृपया आपणापैकी कोणि शाकाहारी असल्यास कळवावे, तसेच आपण सुरावादी की असुरावादी तेही कळवावे. त्याप्रमाणे व्यवस्था करणे बरे पडेल.

धन्यवाद.
आपला,
-ध मा ल.
तराळ / ग्रामशेवक / दव॑डीवाला/ इ.इ.
मिसळपाव ग्रामप॑चायत, मौजे मिसळपाव (बुद्रुक आणि खुर्द )

धमाल मुलगा's picture

19 Mar 2008 - 5:03 pm | धमाल मुलगा

ज्या कोणास नजरचुकीने व्य.नि. पाठवायचा राहिला असेल, आणि जे येणार आहेत, त्या॑नी कृपया मला खरड / व्य.नि. / फोन करावा. म्हणजे योग्य ती माहिती देता येइल.

धन्यवाद.

आपला कृपाभिलाषी,
-ध मा ल

९३७ ००५ ६४२७
९७६ ६२५ ४५२५

सुधीर कांदळकर's picture

19 Mar 2008 - 10:32 pm | सुधीर कांदळकर

आणि सर्वांचा आनंद शतगुणित होवो ही शुभेच्छा.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

सचिन's picture

20 Mar 2008 - 12:17 am | सचिन

कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेच....
(तेव्हा आम्ही नाही आलो तरी चालेल...!)
शुभेच्छा !!

बेसनलाडू's picture

20 Mar 2008 - 11:13 am | बेसनलाडू

या मिपा कट्ट्यास काही दिवसांच्या अंतराने मुकणार याचे वाईट वाटते आहे; पण मिपाकर भरपूर धमाल करतील, येथे सविस्तर वृत्तांत व प्रकाशचित्रे टाकतील, अशी आशा आहे.
माझा एप्रिलच्या मध्यावर साधारण २०-२१ दिवसांचा भारत दौरा ठरलेला आहे. १४ एप्रिल ते ४ मे दरम्यान मुंबई-ठाणे-पुण्याच्या आसपासचे मिपाकर सवडीनुसार भेटण्यास उत्सुक असतील, तर खरडीतून / पोष्टकार्डातून कळवा. भेट घेणे शक्य असल्यास त्यादृष्टीने बेत करणे शक्य होईल का ते पाहतो.
कळावे.
(प्रवासी)बेसनलाडू

सखाराम_गटणे™'s picture

21 Dec 2008 - 4:41 pm | सखाराम_गटणे™

पुन्हा करा बेत आता एकदा.

----
सखाराम गटणे