इन्द्राय स्वाहा,तक्षकाय स्वाहा.

कलंत्री's picture
कलंत्री in काथ्याकूट
18 Nov 2009 - 7:46 pm
गाभा: 

काही समस्या पुरातन असतात आणि त्या त्या काळात त्यावर काढले गेलेले उत्तरही नेहमीच वादात अडकलेले असते असे आढळते.

पुराणामध्ये एक दाखला आहे, इंद्राने तक्षकाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आणि ऋषींनी तक्षकाचा बचाव करशील तर तुलाच ( इंद्राला) स्वाहा करु असे सांगितले, पण इंद्रसारख्या देवांच्या राजाला स्वाहा कसे करणार असे आढळले. शेवटी इंद्रही राहिला आणि तक्षकही राहीला असे पुराणातील अभ्यास सांगतो.

तसेच काहीसे सचिन आणि ठाकर्‍यांच्या वादात घडले. सचिनने विनाकारणच मूंबई सर्वांची असे मत व्यक्त केले आणि माध्यमानी जसे काही मराठीमाणूस आपणास भारतीयाच्या भुमिकेपेक्षा श्रेष्ठ समजतो आणि ठाकरे म्हणजे देशाचे शत्रूच आहे असे त्यांना आणि देशातील विचारवंताना हवेहवेसे मत मांडायला सुरवात केली. नकळतच मराठ्यांच्या दुहीचे, मतमतांतराचे दर्शन झाले.

सचिन आणि ठाकरे या दोन प्रवृत्ती आहे, एक राजकारणाचे प्रतिनिधीत्त्व करतो तर दुसरा खेळाचे प्रतिनिधीत्त्व करतो. दोन्ही मान्यवरांचे क्षेत्र आणि योगदान वेगळे आहे.

सचिनची प्रतिक्रिया अथवा मत काहीही असो, परंतु त्यावर जो काही निष्कर्ष काढला गेला तो मराठी माणसांवर अन्याय करणारा आहे.

सचिनच्या एका मताने सावरकर, गोखले, विनोबा, आंबेडकर ते यशवंतराव यासर्वाच्या मराठी असूनही देशाच्या योगदानावर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले किंवा मराठ्यांनी देशासाठी काहीच केले नाही, संकुचित प्रांतप्रेमी असा ठसा माध्यमांना निर्माण करता आला.

सचिनने हा प्रश्न टाळायला हवा होता अथवा मूंबईच का सर्व देश सर्व देशवायीयांसाठी आहे असे उदार वादी मत व्यक्त क्रावयाला हवे होते.

सचिन खेळाच्या बाबतीत निवृत्तीच्या जवळ असेल आणि एखाद्या पक्षाच्या वळचणीला जाऊन काही पद मिळवायचे असेल तर वेगळीच गोष्ट आहे आणि आपण सर्वजण त्याच्या जाळ्यात अडकलो असे ही मान्य करावयाला हवे.

त्याचबरोबर उद्धव किती दिवस मौन ठेवणार हेही समजत नाही. अश्या प्रतिक्रिया त्याने द्यायला हव्या, बाळासाहेबच्या भुमिकेशी मी पूर्णपणे सहमत आहे, या वयातही त्यानी असा वार आणि प्रतिकार करावा हे त्यांच्या लढाऊ बाण्याचे निदर्शक आहे.

बाळासाहेबातील कलावंतच त्यांच्यातील राजकारण्याचा पराभव करत असतो असे परत एकदा सिद्ध झाले असे म्हणा तर ( पुल, नाना पाटेकर आणि आता सचिन).

असे प्रकार बघितले तर, मराठ्यांचे नष्टचर्य अजून किती दिवस चालणार हे एक तो देवच जाणो?

प्रतिक्रिया

सूहास's picture

18 Nov 2009 - 7:49 pm | सूहास (not verified)

#o #o
#o
#o
#o
#o
#o
#o
#o #o

सू हा स...

प्रशु's picture

18 Nov 2009 - 7:57 pm | प्रशु

कलंत्री ह्याच्याशी सहमत....

प्रशु's picture

18 Nov 2009 - 8:06 pm | प्रशु

कलंत्री ह्याच्याशी सहमत....

सरकार चित्रपटात शंकरच्या तोंडी एक वाक्य आहे जे तो सरकारला ए॑कवतो कि'महाराष्ट्रापेक्षा कोणी मोठा नाहि, मि स्वतःहि नाहि'.
तेच येथे लागु पडते, प्रश्न जेव्हा मराठी, मुंबई आणी महाराष्ट्राचा असेल तेव्हा महाराष्ट्रापेक्षा कोणी मोठा नाहि, ठाकरेहि नाहि आणी सचीनहि नाहि.

jaypal's picture

18 Nov 2009 - 8:19 pm | jaypal

म्हणुन मी काही बोलणार नाही

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

श्रावण मोडक's picture

19 Nov 2009 - 12:07 am | श्रावण मोडक

असहमत, पण फक्त चित्राशी सहमत!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Nov 2009 - 8:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठी माणसाचा महाराष्ट्र, काश्मिरींचा काश्मिर, मग भारत कोणाचा ?
असा काही तरी प्रश्न शशी थरुर ने विचारला. काय उत्तर द्याल ?
[नेमकं त्याचं वाक्य मला सापडेना] :(

>> उद्धव किती दिवस मौन ठेवणार हेही समजत नाही.
:| त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीही नसावं !
>>या वयातही त्यानी असा वार आणि प्रतिकार करावा हे त्यांच्या लढाऊ बाण्याचे निदर्शक आहे.

शिवसेना कशाच्या तरी निमित्तानं फ्रंटवर येण्याचा प्रयत्न करते आहे. पण दुर्दैवाने ते बॅकफूटवरच जात आहेत असे वाटते.

-दिलीप बिरुटे

विजुभाऊ's picture

19 Nov 2009 - 9:20 am | विजुभाऊ

मराठी माणसाचा महाराष्ट्र, काश्मिरींचा काश्मिर, मग भारत कोणाचा ?
असा काही तरी प्रश्न शशी थरुर ने विचारला. काय उत्तर द्याल ?

बीहारींचा. दक्षीण भारत सोडला तर सर्वत्र त्यानी आक्रमणाचे थैमान घातलय. त्यांचे नेते खात बसतात आणि भुकेली प्रजा रेल्वे ने दुसर्‍या राज्यात सोडतात


जय महाराष्ट्र.....

बहुगुणी's picture

18 Nov 2009 - 9:54 pm | बहुगुणी

Tharoor's posting on social networking site 'twitter.com' read: "on Sachin & Sena, my late dad Chandran Tharoor said in 66 -- with Maharashtra 4(for) Maharashtrians & Kashmir 4(for) Kashmiris, where is India for Indians?"

संदर्भ

आण्णा चिंबोरी's picture

18 Nov 2009 - 10:29 pm | आण्णा चिंबोरी

हा सगळा माध्यमांचा संधीसाधूपणा आहे.

ठाकरेचा आक्षेप मुंबई ही सगळ्यांची आहे या सचिनच्या मतावर होता.

माध्यमांनी बातमी रंगवताना स्वतःची पावशेर टाकून ठाकरेचा आक्षेप सचिनच्या आय ऍम इंडियन या वाक्यावर आहे असे जाहीर केले आणि लगेच सेना विरुद्ध सचिन आणि उर्वरित देश असे एसेमेस घ्यायला सुरुवात केली.

बाळ ठाकरेने अयोग्य वेळी तोंड उघडले असे वाटते. राज ठाकरे मात्र छान गप्प बसला.

छोटा डॉन's picture

18 Nov 2009 - 10:47 pm | छोटा डॉन

आण्णाशी सहमत.

१. सचिनने ह्या प्रश्नातली खोच ओळखुन ह्याला तेवढेच पोलाईट किंवा कमीत कमी हवे तसे वाकवता न येणारे उत्तर दिले असते तर हा वाद वाढलाच नसता. अगदी सचिनने "'मी मराठी आहे आणि मुंबैकर आहे आणि मुंबै ही सर्वप्रथम मराठी माणसाचीच आहे!" असे प्रखर महाराष्ट्रवादाचे उत्तर देणे अपेक्षित नसले तरी कमीत कमी हा चेंडु सोडुन द्यायला अथवा शांतपणे पोलाईटली तटवायला हवा होता.
सचिनला आम्ही देव मानतो व त्याच्या प्रत्येक गोष्टीवर अथवा कॄतीवर आम्ही डोळे झाकुन विश्वास ठेवतो की नाही?
होय ना, मग आमच्या देवानेच जरा जपुन वागायला नको का ?
देवाने देवासारखेच पोलाईट रहायला नको का ?
(ह्या बाबतीत आमच्या पवारकाकांचा हातखंड आहे, एकदा त्यांनी रिलायन्सबाबत वारंवार प्रश्न विचारुन त्रास देणार्‍या पत्रकाराला भर पत्रकार परिषदेतच "Are you agent of Relience ?" असे विचारुन त्याच्याच धोतराखाली फटाकड्याची माळ लावली होते. सचिनने असेच समकक्ष केले असते तर ते सर्वांच्याच सोईचे झाले असते. असो.)

२. बाळासाहेब ठाकरे ह्यांचे तसे पहायला गेले तर काय चुकले ?
एखाद्या फालतु माणसाने ( नीट वाचा, मी इथे कुठल्याही राजकारण्याचे नाव घेतले नाही. फक्त राजकारणीच फालतु असतात असा माझा अजिबात दावाही नाही.) हे करणे आणि सचिनसारख्या "आयकॉन"ने हे करणे ह्यात फरक आहे.सचिन जेव्हा एखादे वाक्य उच्चारतो तेव्हा ते त्याचे वैयक्तिक मत रहात नाही तर ती एखाद्या समाजाची समुहभावना म्हणुन ओळखली जाते.
मग अशा परिस्थीतीत जेव्हा शिवसेना की जी नेहमी मुंबई महाराष्ट्रात अणि मराठी माणसांचीच रहावी ह्यासाही झटली आहे किंव झटते आहे त्यांनी मैदानात उतरणे हे काय चुक आहे ? ते स्टेटमेंट देणारा कोणीही असो, मात्र त्यातल्या भावना जर मराठी माणसाला दुखावणार्‍या असतील तर त्यावर शिवसेनचा आसुड बरसणारच. ह्यात चुक आहे ते काय ? ह्याच स्वभावधर्माला किंवा कर्तव्याला जागुन बाळासाहेब मैदानात उतरले व त्यांची मुळातच सचिनवर माया असल्याने त्यांनी सचिनला आपलेपणाने त्या पत्रात बरेच काही समजावुन सांगितले की ज्यातले बरेच मुद्दे पटण्यासारखे आहेत.

३. त्यानंतर जो मिडिया आणि इतर चिल्लर नेतेमंडंळी शिवसेनाप्रमुखांवर ज्या पद्धतीने बरसली ते पाहुन मात्र आश्चर्य वाटले. "आयत्या बिळावर नागोबा" कशाला म्हणतात ते लक्षात आले. ना ह्यांना सचिनशी , ना बाळासाहेबांशी, ना मराठी माणसाच्या कल्याणाशी देणेघेणे, जर काही असेल तर ते मात्र मुंबईतुन मिळणार्‍या प्रचंड मलिद्याशी मात्र ह्यांना "देणे" नसले तरी "घेणे" नक्कीच आहे व सध्या सर्व अट्टाहास त्याचसाठी चालला आहे असे वाटतेय. पण तेवढ्यात २ बाईट्स देऊन उगाच मिडियावर झळकण्याच्या ह्यांच्या माकडचाळ्याचा मात्र आम्हाला प्रचंड वैताग आला.

४. हा वाद आता इथेच संपवणे उत्तम. उगाच विषयाला फाटे फुटत राहिले तर गरज नसताना उगाच तेढ निर्माण होईल. झाले तेवढे झुप झाले हे सर्वांनीच समजुन घेणे उत्तम.

ता.क. :यांच्यासाठी हा सर्व अट्टाहास केला गेला तो "मनसे" मात्र ह्या वादापासुन दुर राहण्याचा हुशारीपणा आणि परिपक्वपणा दाखवण्यात येशस्वी झाला आहे.

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

निमीत्त मात्र's picture

18 Nov 2009 - 11:24 pm | निमीत्त मात्र

ठाकरेचा आक्षेप मुंबई ही सगळ्यांची आहे या सचिनच्या मतावर होता.

जोही चूकीचाच आहे! मूळात मुंबई कुणाची हे सांगंणारा ठाकरे कोण?

आण्णा, मुंबई महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र भारतात...तेव्हा मुंबईही भारतातच.विषय संपला! आम्ही सचीनशी सहमत आहोत.

llपुण्याचे पेशवेll's picture

19 Nov 2009 - 10:42 am | llपुण्याचे पेशवेll

जोही चूकीचाच आहे! मूळात मुंबई कुणाची हे सांगंणारा ठाकरे कोण?
तो चूकीचा आहे हे सांगणारे तुम्ही कोण?
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

विसोबा खेचर's picture

18 Nov 2009 - 11:38 pm | विसोबा खेचर

सगळे भडवे यूपीबिहारवाले लोक, पत्रकार, मिडियावाले एक नंबरचे मराठीद्वेष्टे,मुंबैद्वेष्टे, आणि महाराष्ट्रद्वेष्टे आहेत मादरचोद!

तात्या.

छोटा डॉन's picture

18 Nov 2009 - 11:40 pm | छोटा डॉन

तात्यांशी १००% सहमत.
आमच्या अशाच भावना आहे त्यातला "खास" शब्दांसह.

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

अवलिया's picture

19 Nov 2009 - 9:09 am | अवलिया

तात्यांशी १००% सहमत.
आमच्या अशाच भावना आहे त्यातला "खास" शब्दांसह.

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

निखिल देशपांडे's picture

19 Nov 2009 - 9:20 am | निखिल देशपांडे

तात्यांशी १०००% सहमत
आमच्या अशाच भावना आहे त्यातला "खास" शब्दांसह.

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

योगी९००'s picture

19 Nov 2009 - 10:47 am | योगी९००

तात्यांशी १००००% सहमत
आमच्या अशाच भावना आहे त्यातला "खास" शब्दांसह.

खादाडमाऊ

प्रभो's picture

19 Nov 2009 - 7:06 pm | प्रभो

तात्यांशी १००००% सहमत
आमच्या अशाच भावना आहे त्यातला "खास" शब्दांसह.

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

धमाल मुलगा's picture

19 Nov 2009 - 7:33 pm | धमाल मुलगा

१००^n% पुर्ण सहमती!
बाझवला तिच्यायला! हे दिडदमडीचे पोटं जाळायला इथं येणार आणि इथंलच खाऊन पुन्हा इथल्याच लोकांवर पार स्वतःच्या बुडाला आग लागल्यासारखं बेंबीच्या देठापासून बोंबलत राळ उडवणार साले भोसडीचे!

नुसतं 'मराठी' इतकं उच्चारलं तरी ह्या पत्रकार्/क्यामेरामन लोकांना गाव पेटल्याचे भास व्हायला लागतात!

परिकथेतील राजकुमार's picture

19 Nov 2009 - 7:36 pm | परिकथेतील राजकुमार

तात्या मनातल्या भावना शब्दात उतरवल्यात हो !!

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

मी-सौरभ's picture

20 Nov 2009 - 12:16 am | मी-सौरभ

.......................

सौरभ

विकास's picture

19 Nov 2009 - 1:29 am | विकास

आधी निवडणूकीत मतं देताना (बाळासाहेब) ठाकर्‍यांना विचारात घेयचे नाही मग नंतर त्यांच्या मतांचा इतका विचार कशाला करायचा? :-)

बाळासाहेब हे काही पहील्यांदाच कुणाच्या विरुद्ध बोललेले नाहीत. सगळ्यात जास्त त्यांच्या बोलण्याने मराठी माणसातच "राडा" केला होता जेंव्हा त्यांनी कलंत्री साहेबांनीपण म्हणल्याप्रमाणे, पुलंवर टिका केली होती तेंव्हा... त्यापुढे हे काहीच नाही. अजून आठ दिवसात सचीन, बाळासाहेब आणि उद्धव असा एक हसतमुख फोटो दिसला तर आश्चर्य वाटायचे काहीच कारण नाही. त्या दोघांना ते कुणाला उद्देशून बोलत आहेत ते चांगले कळते आहे असे वाटते - अर्थात दोघांचे श्रोतृवर्गच वेगळे आहेत त्यामुळे दोघे "म्युच्युअली एक्स्लुजिव्ह" आहेत. ;)

इतके बोलणे मनाला लावून घेण्यासाठी ना ठाकरे "बाळ" आहेत ना सचीन...

नर्मदेत ला गोटा's picture

19 Nov 2009 - 10:20 am | नर्मदेत ला गोटा

"पुराणामध्ये एक दाखला आहे, इंद्राने तक्षकाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आणि ऋषींनी तक्षकाचा बचाव करशील तर तुलाच ( इंद्राला) स्वाहा करु असे सांगितले, पण इंद्रसारख्या देवांच्या राजाला स्वाहा कसे करणार असे आढळले. शेवटी इंद्रही राहिला आणि तक्षकही राहीला असे पुराणातील अभ्यास सांगतो"

ऋषींनी तक्षकाचा बचाव करशील तर तुलाच ( इंद्राला) स्वाहा करु असे सांगितले, आणि इंद्राने तक्षकाचा बचाव करणे बन्द केले. तक्षकाला दुर केले.

आसो..

आता लोक मरठी माणसे एकमेकाशी कसे भान्ड्तात ते बघता आहेत.
(दोन बोके, माकड आणी लोणी -- गोष्टीची आठवण झाली)

llपुण्याचे पेशवेll's picture

19 Nov 2009 - 10:44 am | llपुण्याचे पेशवेll

+१
इंद्र तक्षकाला वाचवायला मधे पडला तेव्हा इंद्रासकट तक्षकाच्या आहुती द्यायचे मंत्र म्हटले तेव्हा इंद्र समोर हजर झाला. अशी कथा आहे.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984