माझ्या छोट्या मैत्रिणीस ...

फटू's picture
फटू in जे न देखे रवी...
7 Mar 2008 - 10:58 am

त्या दिवशी आपण पहिली बस सोडली
आणि योगायोगाने आपली भेट झाली
तू असशील सतरा अठराची आणि मी
माझ्या वयाची गद्धे पंचवीशी गाठलेली

तेव्हा तुझं नावही न विचारता राजा
लगेच फालतू बडबड सुरू केली मी
माझ्याच कॉलेजची आहेस तू, कळलं
अन् गोष्ट तेव्हा डबल ई पर्यंत नेली मी

लगेच कळला, तसा खेळकर स्वभाव तुझा
खूपशी निरागस आणि तशी बरीचशी बडबडी
(पुढे पुढे कळलं, तू अशीही आहेस , म्हणजे...
अगदी थोडीशी भडकू अन् थोडीशी चिडचीडी)

खरं सांगू, तेव्हा तसं खोटं बोललो मी तुझ्याशी
बसमध्ये इतरांसाठी सहसा मी उभा राहत नाही
(त्यादिवशी तुझ्यासाठी उभा राहिलो मी, कारण
मुलीला इंप्रेस करण्याची संधी नेहमी येत नाही)

चार तासांचा प्रवास थोडासा त्रासदायकच झाला
हरवली असशील नंतर तू असाइनमेन्ट्स मध्ये
मीही तसं विसरलोच होतो नंतर ते सारं, कारण
माझाही प्रत्येक दिवस नंतर प्रोग्रॅमिंग मध्ये बुडाला

कसं आणि कधी कळलं नाही मला
पण आपली बोलाचाल होऊ लागली
थकली भागली सांज माझी, तुझ्या
खळालत्या हास्यामध्ये न्हावू लागली

काहीतरी खटकलं तेव्हा आणि
तू बोलणंच बंद केलं माझ्याशी
मोकळेपणाने बोलली असतीस तर
मीच बोलणं सोडलं असतं तुझ्याशी

नाजूक धागा आपल्या निरागस मैत्रीचा
केव्हाच अलगद हळुवारपणे तुटला आहे
माझ्या मनाचा एक अबोलसा कोपरा
तसा उलगडता उलगडता मिटला आहे

आजही इथे साता समुद्रापलीकडे, कधीतरी
मिटलेल्या पापण्यामध्ये उभी राह्तेस तू
अवखळ अन् अल्लड हसू चेह~यावर खेळवत
जणू माझ्या नजरेत नजर मिसळून पाहतेस तू

कधी होवो ना होवो भेट यापुढे आपली
तुझं निखळ हसू मनात घूमेल् माझ्या
येता अवचित कुठून मंद झुळुक वा~याची
तुझी निरागस बडबड कानात गुंजेल माझ्या

टीपा :
डबल ई - इलेक्ट्रीकल इंजिनीअरिंग, अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाला हा विषय असतो.
असाइनमेन्ट्स - अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ
प्रोग्रॅमिंग - संगणकासाठी आज्ञावली (प्रोग्राम) लिहिण्याची क्रिया

प्रतिक्रिया

तात्या विन्चू's picture

7 Mar 2008 - 1:30 pm | तात्या विन्चू

सुरेख जमलीय सतीशभाऊ......सत्यकथेवरती आधारीत आहे का हो???

आमच्याही काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या ईन्जीनीअरीन्गच्या दिवसान्च्या.......

आपला,
ओम फट स्वाहा....
तात्या विन्चू

विसोबा खेचर's picture

8 Mar 2008 - 9:23 am | विसोबा खेचर

कधी होवो ना होवो भेट यापुढे आपली
तुझं निखळ हसू मनात घूमेल् माझ्या
येता अवचित कुठून मंद झुळुक वा~याची
तुझी निरागस बडबड कानात गुंजेल माझ्या

वा वा!

गावडे साहेब, छानच लिहिलं आहे....

तात्या.

नन्दु's picture

8 Mar 2008 - 10:49 am | नन्दु

सुरेख कविता ,, मन आगदी आठवणी नि भरुण आले
नाजूक धागा आपल्या निरागस मैत्रीचा
केव्हाच अलगद हळुवारपणे तुटला आहे
माझ्या मनाचा एक अबोलसा कोपरा
तसा उलगडता उलगडता मिटला आहे

वा !! क्या बात हे
आगदी मनाला चटका लावत

कधी होवो ना होवो भेट यापुढे आपली
तुझं निखळ हसू मनात घूमेल् माझ्या
येता अवचित कुठून मंद झुळुक वा~याची
तुझी निरागस बडबड कानात गुंजेल माझ्या
हे तर अप्रतिमच

सखाराम_गटणे™'s picture

21 Dec 2008 - 4:33 pm | सखाराम_गटणे™

छान आहे कवीता,

फटु अजुन काही तरी टाक.

----
सखाराम गटणे

लवंगी's picture

22 Dec 2008 - 2:21 am | लवंगी

आवडली..

नाजूक धागा आपल्या निरागस मैत्रीचा
केव्हाच अलगद हळुवारपणे तुटला आहे
माझ्या मनाचा एक अबोलसा कोपरा
तसा उलगडता उलगडता मिटला आहे
.. कस छान हळूवारपणे मांडलय

शितल's picture

22 Dec 2008 - 2:32 am | शितल

कविता आवडली.:)

मदनबाण's picture

22 Dec 2008 - 5:37 am | मदनबाण

काहीतरी खटकलं तेव्हा आणि
तू बोलणंच बंद केलं माझ्याशी
मोकळेपणाने बोलली असतीस तर
मीच बोलणं सोडलं असतं तुझ्याशी

व्वा..मित्रा,, लयं मस्त...

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -