फसवणूकी पासून सावधान

स्वाती२'s picture
स्वाती२ in काथ्याकूट
17 Nov 2009 - 3:41 am
गाभा: 

जस जशी अमेरिकेतील अर्थव्यवस्था बिकट झाली तसे फसवणूकीचे प्रकारही वाढायला लागले. त्यात सणासुदीचा/खरेदीचा हंगाम म्हणजे अधिकच भर पडते. सध्या आमच्या भागात दोन प्रकारचे फसवणूकीचे प्रकार सुरु आहेत. पोलिसांनी या बाबत अ‍ॅलर्ट दिलेय. अमेरिकेच्या इतर भागातही असे घडू शकते म्हणून मिपाकरांना सावधानीचा इशारा.
१. फोन वरील व्यक्ती तुम्हाला $५०० चे वालमार्टचे गिफ्ट कार्ड नविन मार्केटिंग स्किम म्हणून पाठवत असल्याचे सांगते. नाव, पत्ता पडताळून पाहाते. नंतर ३-४ डॉलर रक्कम हँडलिंग फी म्हणुन पडेल असे सांगून क्रेडिट कार्डच्या नंबराची मागणी होते. आमच्या गावात ४-५ केसेस झाल्या.
असे काही तुमच्या बाबतीत झाल्यास लगेच स्थानिक पोलिस स्टेशनला कळवा.

२. फोन वरील व्यक्ती कोर्ट सिस्टिम मधील आहे असे भासवते. ज्युरी ड्युटी साठी रिस्पॉन्स दिला नाही तेव्हा तुमच्या नावाने अ‍ॅरेस्ट वॉरंट निघतेय असे सांगते. जन्म तारीख आणि सोशल सिक्युरिटी नंबर द्या. रेकॉर्ड बघून वॉरंट रद्द करता येइल का ते बघू असे सांगितले जाते. अशा वेळी फोन कट करा आणि स्थानिक कोर्टात फोन करून चौकशी करा.

प्रतिक्रिया

ह्म्म्म्..डिप्रेशन इज हिटिंग हार्ड! :(

(स्विंडलर)चतुरंग

सुधीर काळे's picture

17 Nov 2009 - 7:55 am | सुधीर काळे

धन्यवाद, स्वातीताई!
मी माझ्या मुलांना पाठवतोय!
सुधीर
------------------------
सीना हो ज़ख्म ज़ख्म तो ढलते हैं कैसे गीत? फुर्सत अगर मिले तो कभी बाँसुरीसे पूछ!

विंजिनेर's picture

17 Nov 2009 - 7:58 am | विंजिनेर

ह्मम्म... फोनवरून फसवण्यात काय मज्जा नाय बघा..
आपल्या पुण्या मुंबैत बांगड्यांना पॉलिश करून देतो म्हणून डोळ्यादेखत सोन्याच्या लंपास करून पितळ्याच्या आपल्या पदरात टाकणारे खरे चोर ;)

(कशाचाही 'जाज्वल्य अभिमान' असणारा)विंजिनेर

पर्नल नेने मराठे's picture

17 Nov 2009 - 9:59 am | पर्नल नेने मराठे

8| होहो माझ्या मैत्रिणीच्या आजिला असेच फसवले होते.

चुचु

स्वाती२'s picture

17 Nov 2009 - 7:21 pm | स्वाती२

ते चोर फक्त सोनच नेतात तेही तुमच्याकडे असले तर. पण हे चोर तुमच्या नावाने कर्ज करून ठेवतात.

धमाल मुलगा's picture

17 Nov 2009 - 7:34 pm | धमाल मुलगा

>>पण हे चोर तुमच्या नावाने कर्ज करून ठेवतात
ऑबॉबॉबॉबॉबॉ................ अवघड आहे बॉ.
आधुनिक ठकसेनच म्हणायचे की हो हे!

उमराणी सरकार's picture

18 Nov 2009 - 10:25 am | उमराणी सरकार

मॅडम, असे कसे कर्ज करून ठेवतात? बँकींग डबघाईला आले का तिथे? का कोणी कर्ज घेत नाही म्हणून के.वाय.सी न करताच कर्ज देणे सुरू झाले आहे?
उमराणी सरकार

न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे

चतुरंग's picture

18 Nov 2009 - 9:32 pm | चतुरंग

नाव, खातं, क्रेडिट कार्ड सगळे डीटेल्स तुमचे; वापरणारा दुसराच! ;)

चतुरंग

उमराणी सरकार's picture

19 Nov 2009 - 8:37 am | उमराणी सरकार

अहो पण कसे वापरणार? कार्ड तर प्रत्यक्ष तुमच्या ताब्यात. त्याचा सी.व्ही.व्ही फक्त तुम्हालाच माहीती.
जर असे काही होत असेल तर त्याला त्या व्यक्तीचा निश्काळजीपणाच कारणीभूत आहे. उगाच त्या ठकसेनाच्या नावाने बोंबाबोंब करण्यात अर्थ नाही.
उमराणी सरकार

न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे

रेवती's picture

17 Nov 2009 - 8:26 pm | रेवती

अश्या बातम्या वर्तमानपत्रात रोज असतात, त्या वाचल्या जातात. त्यावर "काय तरी बाई वाईट लोक! वाईट दिवस आले रे देवा!" असंही म्हटलं जातं तरीही दारावर हे लोक आले की पुन्हा याच बायका आपल्या बांगड्या घेऊन जाणार पॉलिश करायला. पुन्हा एक बातमी.........
पुण्यातल्या आमच्या समोरच्या फ्लॅटमधील ८ महिन्याच्या गरोदर बाईला ती घराला कुलुप लावत असताना लुबाडले. तिचे मंगळसुत्र ओढताना नको तो घोळ झाला आणि जिन्यावरून गडगडत खाली आली ती!

रेवती

रेवती's picture

17 Nov 2009 - 8:29 pm | रेवती

माहिती देऊन सावध केल्याबद्दल स्वातीताईचे आभार!
आमच्या टाऊनमध्येही भुरट्या चोर्‍या वाढल्याची बातमी होती काही महिन्यांपूर्वी!

रेवती

संदीप चित्रे's picture

17 Nov 2009 - 9:14 pm | संदीप चित्रे

माहितीबद्दल धन्स स्वातीताई

लोक अजूनही आहेत हे वाचून मजा वाटली. तरीबरं "देअर ईज नो सच थिंग अ‍ॅज फ्री लंच" अशी म्हण हीच लोकं वापरतात.

दुसरा प्रकार जास्त सिरियस आहे. तो माझ्या बाबतीत झाला आहे. पण मी नागरीक नसल्यामुळे "उखाड जो उखाडना है!" असं इंग्लिश मधे म्हणून कटवला :)

अमोल केळकर's picture

18 Nov 2009 - 10:07 am | अमोल केळकर

बाप रे अमेरिकेत पण ?

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

मग आता सभ्य समाज उरला तरी कोणत्या देशात? आता कस होणार ह्या पृथ्वीच ?

वेताळ

विंजिनेर's picture

18 Nov 2009 - 1:06 pm | विंजिनेर

मग आता सभ्य समाज उरला तरी कोणत्या देशात?

हा हा हा.. लय भारी... अमेरिकेत सभ्य माणसे राहतात होय? मला वाटलं तिथे फक्त हिरव्या नोटांचा माज असलेले, कृतघ्न असे अनिवासी टीमकीवादक राहतात... =))

अवलिया's picture

18 Nov 2009 - 1:10 pm | अवलिया

मला वाटलं तिथे फक्त हिरव्या नोटांचा माज असलेले, कृतघ्न असे अनिवासी टीमकीवादक राहतात...

त्यांनाच विचारवंत सभ्य म्हणतात ;)

--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.

निमीत्त मात्र's picture

19 Nov 2009 - 8:47 am | निमीत्त मात्र

प्रतिसाद संपादित. वैयक्तिक संवादाकरता कृपया खरडवही/व्य निचा वापर करावा..

तात्या.

निमीत्त मात्र's picture

19 Nov 2009 - 9:07 am | निमीत्त मात्र

कालच्या की परवाच्या यूएस न्यूजच्या पहिल्या पानावर बातमी होती. असे प्रकार वाढत आहेत, सावध रहावे. स्टिम्युलस प्याकेजमधून सरकार पैसे देत आहे अमूक अमूक माहिती द्या असले फोनही येत आहेत तेव्हा जागरुक राहावे.

विसोबा खेचर's picture

19 Nov 2009 - 10:52 am | विसोबा खेचर

काही प्रतिसाद उडवले आहेत. कुणावरही वैयक्तिक चिखलफेक नको अशी निमित्तमात्रना सूचनावजा विनंती..

तात्या.

संदीप शल्हाळकर's picture

19 Nov 2009 - 1:25 pm | संदीप शल्हाळकर

परवा पुण्यात रात्री - अपरात्री एटीएम सेंटर मधुन एटीएम मशिनच चोरिला गेली... घ्या आता.... काय बोलता ....