मदत हवी आहे

खडूस's picture
खडूस in काथ्याकूट
16 Nov 2009 - 8:27 am
गाभा: 

माझ्याकडे जुन्या पद्धतीचा HMV चा (साधारण ३० वर्षे जुना) record player आहे. पण आता कालौघात त्याची पिन खराब झाली आहे.
पुण्यात त्याची पिन कुठे मिळेल हे जाणकार सांगू शकतील काय?

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

16 Nov 2009 - 8:32 am | विसोबा खेचर

पुण्यात माहीत नाही, परंतु मुंबैच्या चोरबाजारात मिळेल. गोलदेवळाजवळ जो नळबाजार आहे त्यालाच 'चोरबाजार' म्हणतात..

आपला,
(माहीतगार मुंबैकर) तात्या.

जी वस्तू कुठेच मिळत नाही ती चोरबाजारात नक्कीच मिळते... 8>
(लग्नासाठी मुलगा / मुलगी सोडून ... 8| )
बाकी खडूस माणसाला मदत कशी करावी बरे या संभ्रमात #o

~ वाहीदा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Nov 2009 - 9:29 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आमच्या घरी फिलिप्स कंपनीचा रेकॉर्ड प्लेयर आहे, त्याची दुरूस्ती आम्ही ठाण्यातल्या स्टेशनजवळच्या एका दुकानातून करून घ्यायचो. फिलिप्सच्या पिना एच.एम.व्हीलाही चालत असतील तर त्या दुकानात किंवा फिलिप्सच्या दुकानातही पिना मिळाव्यात.

अदिती

खडूस's picture

21 Jan 2010 - 9:54 am | खडूस

पुण्यात पिन मिळाली नाही. फिलिप्सच्या पिना एच.एम.व्हीला चालतील असे दुकानदार म्हणाला. पुढच्या आठवड्यात ठाण्याला चक्कर मारणार आहे. दुकानाचा पत्ता द्याल का प्लीज?
धन्यवाद

- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत

Nile's picture

16 Nov 2009 - 9:32 am | Nile

पुणे रेडीओ हाउस, प्रकाश डीपार्मेंटल स्टोअर समोर, पुणे येथे चौकशी करुन पहा, नाही मिळाले तर कुठे मिळेल (हे स्वत:च्या रीस्कवर) विचारुन पहा! ऑल दी बेस्ट! ;)

निखिलराव's picture

16 Nov 2009 - 9:38 am | निखिलराव

पासोड्या विठोबा लेन.........

jaypal's picture

16 Nov 2009 - 11:19 am | jaypal

निखिलजी "युनिक पासोड्या विठोबा लेन" हे ठिकाण विठठल वाडी , काळबादेवी , मुंबइ इथलेच का?
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

विजुभाऊ's picture

16 Nov 2009 - 5:42 pm | विजुभाऊ

युनिक पासोड्या विठोबा लेन"
हे पुण्यातले ठीकाण आहे.


जय महाराष्ट्र.....

दिलीप वसंत सामंत's picture

16 Nov 2009 - 1:58 pm | दिलीप वसंत सामंत

ebay.in या साइटवर TURNTABLE असा सर्च देऊन पहा. स्टायलस न मिळल्यास नवीन अगर वापरलेला रेकॉर्ड प्लेअर मिळू शकेल. या साइट वरून मी SONY PS LX-3 हा रेकॉर्ड प्लेअर व SONY TC 530 हा टेपरेकॉर्डर घेतला आहे. तसेच त्याच साइट वर परदेशातून अशा वस्तू मागविण्याची सोय तेही पहावे. मात्र या साइट नेहमी पहाव्या लागतील. तसेच indialist.com, quikr.com या साइट नेहमी पहाव्यात किंवा तेथे जाहिरात द्यावी. अशा जाहिरातीस मला उत्तर मिळाले आहे.

यावरून - कोणाकडे जुन्या REEL TO REEL या पद्धतीचा TAPERECORDER असल्यास हवा आहे sdv2307@yahoo.in वर संपर्क करावा अगर येथे माहिती द्यावी.

केळ्या's picture

21 Nov 2009 - 1:00 pm | केळ्या

मुंबईत पूर्वी Lamington Road वर जुनी पिन देऊन त्यावर नवा डायमंड लाऊन मिळायचा.गेल्या काही वर्षातील परिस्थिती माहित नाही.
बाजारात जाऊन पिन मागितली तर मात्र दुकानदार कनवाळूपणे बघून ,"नाही" सांगतात.