(गणित)-१

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
6 Mar 2008 - 6:08 pm

बरेच दिवस जालावर कच्या मालाचा तुटवडा होता आणि काल अजानक आभाळ फाटले..दोन तीन कविता हतावेगळ्या केल्या नंतर गणित ही मृण्मयीताईंची अप्रतिम गझल वाचून आम्ही आता याची काय 'मोडतोड' करावी ह्या विचारतच होतो तेव्हढात अदितीताईंनी त्यांच्या अल्पमतीप्रमाणे केलेली एकदम अप्रतिम मोडतोड (गणित) वाचनात आली
विडंबनाचा च्या त्या 'मोडकातोड'का प्रयत्नाची आम्ही केलीली ही मोडतोड गोड मानून घ्यावा ही विनंती
--केशवसुमार

तुझे नाव कैसे करावे वजा
तुझे काव्य म्हणजे आम्हाला मजा

कशाला पुन्हा काव्य हाराकिरी?
जुन्या 'मोडतोडी' पुन्हा वाच जा

स्मृतींनीच त्या देह कंपून जातो
बऱ्या जाहल्या ना कधी त्या इजा

कधीचीच मी लेखणी सोडली
परी थांबवावीस मला तू सजा

नवे नाव घेऊन ही पाहीले पण
तिथे ही तुझी रे, घरे काळजा!

'लिहावे अता' वाटले "केशवा"ला
क्षणी या स्थळा सोडुनी दूर जा

--केशवसुमार
(माघ वद्य १४शके १९२९,
६ मार्च २००८)

प्रतिक्रिया

वडापाव's picture

7 Mar 2008 - 2:55 pm | वडापाव

कविता आवडली.

स्मृतींनीच त्या देह कंपून जातो
बऱ्या जाहल्या ना कधी त्या इजा

मस्तच!!

आपला नम्र,
वडापाव

आनंदयात्री's picture

7 Mar 2008 - 3:14 pm | आनंदयात्री

यावेळी ते दारु, गुत्ता वैगेरे नाही, तरी पण विडंबनाचे विडंबन आवडले.

आता आम्ही एका म्हणीचे विडंबन केलेय,

म्हणः रात्र थोडी सोंगे फार
विडंबनः कविता थोड्या विडंबने फार ..

वा वा आमच्या प्रतिभेला आम्हीच त्रिवार सलाम करतो ..

विसोबा खेचर's picture

8 Mar 2008 - 9:30 am | विसोबा खेचर

म्हणः रात्र थोडी सोंगे फार
विडंबनः कविता थोड्या विडंबने फार ..

म्हणीचे विडंबन आवडले! :)

केशवाचे विडंबनही छानच,

तात्या.