जेथे बघेन तेथे डोळ्यांस स्वप्न दिसते
फटकावले मला की भार्या प्रसन्न दिसते...
आहे खरी अवदसा ही वेगळीच दृष्टी !
का लागलीच कविता मज मात्र भिन्न दिसते...?
जेव्हा लिहून बघतो, जग हासतेच वेडे
जेव्हा पडीक असतो, जग खिन्न-खिन्न दिसते...
मी गुत्त्यामध्येच इतकाइतका रमून जातो;
उधळीत रंग माझे, मज सर्व नग्न दिसते...
"हणतोच", तो म्हणाला, मी ऐकलेच नाही
मी एकटाच आता, अन सर्व सुन्न दिसते...
मी लेखनास आता पेल्यात बंद केले
कोणी किती म्हणू दे "मडकेच भग्न दिसते"...
आमची प्रेरणा: अजबरावांची मस्त गझल - पाणावले तरीही
प्रतिक्रिया
6 Mar 2008 - 4:07 pm | आनंदयात्री
पहिल्यांदा "जेथे बघेन तेथे विडंबन" असे वाचले होते ... ते खरेही आहे म्हणा !!
6 Mar 2008 - 4:14 pm | बेसनलाडू
हेच खरे म्हणून तर हे सुचले :) खडे मारायची वेळ झाली ;)
(सूचक)बेसनलाडू
7 Mar 2008 - 12:07 am | सर्किट (not verified)
विडंबन आवडले.
येथील सर्व विडंबनकारांना च्यालेंज देतो. दारू, बायको ह्या दोन गोष्टींचा उल्लेख न करता विडंबन जमू शकते का ?
कळवा.
- सर्किट
7 Mar 2008 - 12:15 am | बेसनलाडू
मनातले च्यालेन्ज दिलेत. इनाम वगैरे लावले असेल, तर ५०% माझ्याकडून :)
इन फ्याक्ट असे विडंबन येथील विडंबनकार नक्कीच करू शकतात, अशी मला खात्री आहे. पण 'करायचेच नाही' आणि गुत्ते, पेले, दारू, प्रेयसी-बायकोच्या तीर्थरूपांकडून धुलाई यातच अडकून रहायचे असा आत्मघातकी निश्चय केला असेल, तर कठीण आहे.
तोवर आम्ही आमच्या विडंबनाच्या सुरनळीतून असे चणे मारतच राहू ;)
(सूचक)बेसनलाडू
6 Mar 2008 - 5:38 pm | प्रा सुरेश खेडकर
छान . आभिनंदन
================================================
मित्रांनो, येत्या रविवारी ( ९ मार्च ०८) ला संध्याकाळी ५ नंतर मी डोंबिविली येथे असून एक दीड तासांचा
स्वरचित विडंबन गीतांचा कार्यक्रम डोंबिविली किंवा जवळपास करू इच्छितो. एरव्ही मानधन स्विकारतो पण वेळेचा सदुपयोग करण्यासाठी एक कार्यक्रम नि:शुल्क करण्याचे योजिले आहे. निशुल्क कार्यक्रमासाठी संपर्क करा.
spkhedkarngp@gmail.com
अधिक माहिती साठी पहा: http://www.orkut.com/Profile.aspx?uid=44441327930350077
आणि : http://www.orkut.com/Community.aspx?cmm=28868095
8 Mar 2008 - 9:38 am | विसोबा खेचर
मी गुत्त्यामध्येच इतकाइतका रमून जातो;
उधळीत रंग माझे, मज सर्व नग्न दिसते...
वा वा!
तात्या.