या गो दांड्यावरनं नवरा कुनाचा येतो
हे एक अत्यंत लोकप्रिय गाणे आहे. पण सुरुवातीच्या तीन चार ओळीनंतरचे शब्द मला माहीत नाहीत. ते पूर्ण कोणाला ठाऊक आहे कां किंवा ते कोठे मिळेल?
या गो दांड्या वरुन बघते नवरा कुनाचा येतो
त्याच्या करवल्या गो करवल्या नाजूक साजूक
या गो दांड्या वरुन बघते नवरा कुनाचा येतो
त्या नेसल्या गो नेसल्या पैठणी शालू
या गो दांड्या वरुन बघते नवरा कुनाचा येतो
त्यान्चे भाउबंद गो भाउबंद फेटेवाले....
या गो दांड्या वरुन बघते नवरा कुनाचा येतो
रिकाम्यावेळी ( म्हणजे जनरली दिवसभर ) गुणगुणण्यासाठी आम्हाला अशा प्रकारची गाणी हवी असतात. एका मंगलकार्यासाठी "मुंबईला" गेले असताना आम्ही हे गाणे प्रथम ऐकले होते व मला ते खूप आवडले होते.....
"आमंदघना ने" पून्हा त्याची याद ताजा केली व नंतर त्याची पूर्ण "स्क्रीप्ट' दिली त्याबद्दल धन्यवाद ....
त्यांचा वर्हाडी फेटेवाला छोटा डॉन
[ आम्हाला इथे भेट द्या "http://chhota-don.blogspot.com/ "]
याव्यतिरिक्त आमची कोठेही शाखा नाही ...........
प्रतिक्रिया
6 Mar 2008 - 12:17 pm | राजमुद्रा
खूप छान आहे हे गाणे! मलाही आवडेल, मिळाले तर :)
राजमुद्रा :)
6 Mar 2008 - 2:07 pm | नंदन
ह्या दुव्यावर हे गाणे ऐकायची तसेच उतरवून घ्यायची सोय आहे. वेसावकर आणि मंडळी यांच्या कोळीगीतांच्या ध्वनिफीतीतही हे गाणे आहे.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
6 Mar 2008 - 4:10 pm | राजमुद्रा
धन्यवाद नंदन!
राजमुद्रा :)
6 Mar 2008 - 10:18 pm | आनंद घारे
आपण दिलेले संकेतस्थळ सापडले पण तेथून डाउनलोड करणे जमले नाही. पुन्हा प्रयत्न करीन.
6 Mar 2008 - 5:04 pm | विजुभाऊ
या गो दांड्या वरुन बघते नवरा कुनाचा येतो
त्याच्या करवल्या गो करवल्या नाजूक साजूक
या गो दांड्या वरुन बघते नवरा कुनाचा येतो
त्या नेसल्या गो नेसल्या पैठणी शालू
या गो दांड्या वरुन बघते नवरा कुनाचा येतो
त्यान्चे भाउबंद गो भाउबंद फेटेवाले....
या गो दांड्या वरुन बघते नवरा कुनाचा येतो
6 Mar 2008 - 10:15 pm | आनंद घारे
आठवणीतली गाणी या सं.स्थळावर खालील ओळी मिळाल्या. यात नवरदेवाच्या 'बाराती'चे सुरेख वर्णन आहे. मला याच हव्या होत्या.
या गो दांड्यावरना बोलते नवरा कुनाचा येतो
त्यांच्या करवल्या गो, करवल्या नाजुक-साजुक
त्या नेसल्या गो, नेसल्या पैठणी सार्या
त्यांच्या डोईमंदी, सायलीच्या गो येन्या
पायी पैंजण गो, वाजती रुणझुण छुनछुन
त्या चालल्या गो, चालल्या ठुमकत ठुमकत
त्यांचे वर्हाडी गो, वर्हाडी फेटेवाले
त्यांचे यजमान गो, यजमान चष्मेवाले
त्यांचे भाऊबंद गो, भाऊबंद घोरेवाले
त्यांनी उरविले, उरविले दारुगोले
7 Mar 2008 - 8:56 am | धोंडोपंत
वा वा वा वा,
कोलीवारा रं राहिला दूर
डोला लोटिला पान्याचा पूर
संबाल संसार सारा...........संबाल संसार सारा
माझ्या सारंगा राजा सारंगा डोलकरा रं धाकल्या दिरा रं,
चल जावया घरा.
मंडली, अजुन कोलीगीते येऊ द्या
आपला,
(दर्यासारंग) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
7 Mar 2008 - 9:05 am | विसोबा खेचर
या गो दांड्यावरनं नवरा कुनाचा येतो
वा वा! आमचंही हे अतिशय आवडतं गाणं आहे...
आपला,
तात्या कोळी.
7 Mar 2008 - 9:22 am | छोटा डॉन