झेप

अर्चना देशमुख's picture
अर्चना देशमुख in जनातलं, मनातलं
6 Mar 2008 - 8:56 am

एकदा सहज TV समोर बसून कार्यक्रम बघत होती. आणि केव्हा लक्ष दुसरी कडे केंद्रित झाले समजलेच नाही .आणि मी त्या विचार मधे गुरफ़टून गेले. अमेरिकेत आल्यावर मला एकच प्रश्न नेहमी असायचा की इथे आल्या नंतर मुलींच्या अभ्यासचे कसे व्हायचे? मी ठाण्याला होते तेव्हा ही जबाबदारी बिनदिक्कत निभवायची मला कधीही ह्या गोष्टींची चिंता नसायची. मी दिवसभर साँस बहुच्या सीरियल आणि माज्या कीटी पार्ट्या पण एन्जॉय करायची. मुलिंचा अभ्यास तर माझ्या डाव्या हाताचा खेळ असायचा.
अमेरिकन स्कुल च्या अँड़्मिशनचे दिव्य पार पाड्ल्यानन्तर मी जेव्हा तिचा अभ्यासक्रम बघितला तेव्हा मलाच जास्त टेंशन आले आणि मी चिंताग्रस्त झाली. अभ्यास कठिन नव्हता पण अभ्यासाची पध्हत मात्र निराळी होती. माझी थोरली जी पाचवीत आहे .तिला सुरवातीला शाळेमध्ये खूप त्रास होत होता. तशी ती होलिक्रॉस कॉन्वेंट स्कुलची असल्या मुळे इंग्लिशचा प्रोब्लेम नव्ह्ता. मी वीचार करीत होते की सुरवात कशी आणि कुठून करावी? तीला कसे समजवावे की जेन्हेकरून तिला त्रास होणार नाही. मनात सारखा विचार असायचा की तिचा तो त्रास कसा कमी करावा, तिला कशा प्रकारे मदत करावी?. असा विचार करता करता तिचा अभ्यास केव्हा सुरु झाला आणि त्या अभ्यासाचा शेवट केव्हा झाला हे माझ्या लक्षात येइपर्यंत तिने आकाशात मोठी "झेप" घेवून तिने मला चकित केले.

प्रतिक्रिया

सर्किट's picture

6 Mar 2008 - 9:05 am | सर्किट (not verified)

शीर्शक वाचून वाटले कविता आहे, म्हणून केसुच्या आधी आपले विडंबन टाकावे म्हणून वाचले, पण हे तर गद्य दिसते..

पूर्ण झाल्यावर एखादे गद्य विडंबन टाकू..

वाचतो अहे..

चालू द्या..

- सर्किट

पिवळा डांबिस's picture

6 Mar 2008 - 10:33 am | पिवळा डांबिस

माननीय अर्चनाताई,

आज मिसळपाववर प्रथमच तुमचे नांव व लिखाण पाहिले. तेंव्हा मिसळपाववर तुमचे मनःपूर्वक स्वागत!!!
तुम्ही येथे मनमोकळेपणे लिहावे ही विनंती...

पण एक धोक्याची सूचना देऊन ठेवतो. इथली मेंबरं म्हणजे अगदी इरसाल मंडळी आहेत. तुम्ही वर जे लिहिले आहे त्याचा आगा-पीछा काही लागत नाही हो! हा पुढे येणार्‍या अनेक भागांपैकी पहिला भाग जर असेल तर शेवटी क्रमशः असे लिहा म्हणजे आम्हाला समजेल. वर दिलेला लेख(?) जर परिपूर्ण (स्टँड अलोन) असेल तर कठीण आहे!! अहो वाचकांनी त्यातून काय अर्थबोध घ्यायचा?

तुमचा हा पहिलाच प्रयत्न असल्याने आम्ही 'पहिला डाव देवाचा' असे म्हणतो व गप्प रहातो. पण असे 'हाफ व्हॉलीज" दिलेत तर षटकार मारायचा मोह अनावर होतो हो!!!:))

तुम्हाला कल्पना येणार नाही पण आम्ही समजू शकतो की वर सर्किटरावांनी किती संयम बाळगलाय प्रतिक्रिया देतांना ते!!!!:))

असो, तुमचे पुनः स्वागत!

आपला,
पिवळा डांबिस
(आम्हाला डांबिसकाका असेही म्हणतात)

अनिला's picture

6 Mar 2008 - 12:55 pm | अनिला

पण एक धोक्याची सूचना देऊन ठेवतो. इथली मेंबरं म्हणजे अगदी इरसाल मंडळी आहेत. तुम्ही वर जे लिहिले आहे त्याचा आगा-पीछा काही लागत नाही हो! हा पुढे येणार्‍या अनेक भागांपैकी पहिला भाग जर असेल तर शेवटी क्रमशः असे लिहा म्हणजे आम्हाला समजेल. वर दिलेला लेख(?) जर परिपूर्ण (स्टँड अलोन) असेल तर कठीण आहे!! अहो वाचकांनी त्यातून काय अर्थबोध घ्यायचा?

मी दिवसभर साँस बहुच्या सीरियल आणि माज्या कीटी पार्ट्या पण एन्जॉय करायची. मुलिंचा अभ्यास तर माझ्या डाव्या हाताचा खेळ असायचा.
हे वाक्य म्हणजे पिकलेली आई बोलतेय.

विसोबा खेचर's picture

6 Mar 2008 - 12:00 pm | विसोबा खेचर

अर्चनाताई,

लेख छान आहे..

मी ठाण्याला होते तेव्हा ही जबाबदारी बिनदिक्कत निभवायची मला कधीही ह्या गोष्टींची चिंता नसायची.

अरे वा! आपण ठाण्याच्या का? मीही ठाण्याचा बरं का! :)

एकदा सहज TV समोर बसून कार्यक्रम बघत होती.
अमेरिकन स्कुल च्या अँड़्मिशनचे दिव्य पार पाड्ल्यानन्तर मी जेव्हा तिचा अभ्यासक्रम बघितला तेव्हा मलाच जास्त टेंशन आले आणि मी चिंताग्रस्त झाली.

आम्हाला आपल्या वैयक्तिक जातीपातीत काहीही रस नाही कारण इथे येणार्‍यांची मिसळपाव ही एकच जात असते आणि मिसळधर्म हा एकच धर्म असतो असे आम्ही मानतो. तरीही एक उत्सुकता म्हणून विचारतो की आपण सी के पी किंवा पाचकळशी आहात का? कारण ह्या जातीतली मंडळी बहुत करून 'मी गेली', 'मी आली' असे शब्दप्रयोग वापरतात असे आमचे निरिक्षण आहे. अर्थात, आमच्या कानाला हे शब्दप्रयोग गोडच लागतात, तसेच बोलीभाषा या विषयात आम्हाला प्रचंड रस असल्यामुळे केवळ उत्सुकतेपोटी आम्ही हे विचारत आहोत. कृपया गैरसमज नसावा. उत्तराची अपेक्षा आहे परंतु आग्रह नाही!

अभ्यास कठिन नव्हता पण अभ्यासाची पध्हत मात्र निराळी होती. माझी थोरली जी पाचवीत आहे .

आणि धाकटी कितवीत आहे? :)

बाय द वे, पध्हत हा शब्द आवडला. आपण त्या सोकॉल्ड शुद्धलेखनाची आणि व्याकरणाची पार फुल्टूच करून टाकली आहे याचा आम्हाला अत्त्यानंद (मनोगती नव्हे!) झाला आहे! :)

हे माझ्या लक्षात येइपर्यंत तिने आकाशात मोठी "झेप" घेवून तिने मला चकित केले.

याचा अर्थ कळला नाही, कृपया खुलासा करावा...

असो, मिसळपाववर आपलं मनापासून स्वागत....

तात्या.

पिवळा डांबिस's picture

7 Mar 2008 - 5:31 am | पिवळा डांबिस

अरे वा! आपण ठाण्याच्या का? मीही ठाण्याचा बरं का! :) आपण त्या सोकॉल्ड शुद्धलेखनाची आणि व्याकरणाची पार फुल्टूच करून टाकली आहे याचा आम्हाला अत्त्यानंद झाला आहे! :)
वा, वा!!
सगळे व्याकरणफुल्टू ठाण्याचे असतात हे बघून आम्हांलाही अत्यानंद झाला आहे!!! :))
(इथे आमच्या ठाणेकरीण बायकोने आमच्या पाठीत धपाटा घातला आहे..:)))

आपण सी के पी किंवा पाचकळशी आहात का? कारण ह्या जातीतली मंडळी बहुत करून 'मी गेली', 'मी आली' असे शब्दप्रयोग वापरतात असे आमचे निरिक्षण आहे.
ओ तात्या, ते सी.के.पी. नव्हेत, ते पाचकळशी (एस्.के.पी.)तसे म्हणतात. सी.के.पी. "मी गेले, मी आले" असेच म्हणतात. सी.के.प्यांच्या भावना दुखावल्याबद्दल आमच्या समस्त सासुरवाडच्या वतीने आम्ही तुमचा जाहीर निषेध करीत आहोत. (काय करणार, दोन वेळच्या मांसाहारी जेवणाचा प्रश्न आहे!):))
"अरे या तात्याला धरून जरा बाळासाहेब ठाकर्‍यांच्या पुढे उभा करा रे! मातोश्री लांब पडत असल्यास ठाण्यातल्या ठाण्यात निदान सतीश प्रधानांच्या पुढे तरी उभा करा..." :))
आपला (सीकेप्यांचा जावई),
पिवळा डांबिस

विजुभाऊ's picture

6 Mar 2008 - 1:58 pm | विजुभाऊ

हे माझ्या लक्षात येइपर्यंत तिने आकाशात मोठी "झेप" घेवून तिने मला चकित केले.

लै झ्याक अर्चना मावशी.....म्हणजे तुम्ही तिची पुस्तके वाचुन संपवायच्या आतच तिचे वर्ष संपले.....असे पालक पहिजेत्.....मुलाना वाटले तर पहिजे कि आई अभ्यास घेतेय्....अन्....नाय तर आमच्या वेळचे पालक्............अभ्यास घ्यायला बसायचे का धपाटे घालायची प्रॅक्टीस करायला बसायचे कोणास ठौक.
पालकांचे धपाटे खाउन मज्बूत झालेला
विजुभाऊ