गेली २ वर्षे मी मिपा ची चाहती आहे. पण लेखन वगैरे आपला प्रांत नसल्यामुळे कधी तसा विचार केला नाही. अहो, शाळेत कधी निबंध धड लिहिता आला नाही. पण आज मी जी पाककृती इथे देत आहे ती जेव्हा मी चाखली आणि स्वतः करून पाहिली, तेव्हाच ठरवले की मिपावर ही पाककृती शेअर करायची. ही पाककृती माझ्या मित्राच्या आत्याची आहे. मिपाकरांना आवडल्यास आत्या पर्यंत नक्की पोचवीन.
साहित्य:
१ स्टिक किंवा १२ टेबलस्पून अनसॉल्टेड बटर
१ १/२ कप ग्रॅहाम क्रॅकर क्रंब्स (बिस्किटाचा चुरा - मारी चालेल)
१ १/३ कप चॉक्लेट चिप्स
१ कप बटरस्कॉच चिप्स
१ कप अक्रोड किंवा पेकान चे छोटे तुकडे
१ कॅन (१४ औंझ) गोड कंडेन्स्ड मिल्क
१ कप खोबर्याचा कीस
बेकिंग पॅन - जरा पसरट पॅन घ्यावा. मी १३X९ चा घेतला होता.
कृती:
प्रथम बटर बेकिंग पॅन मध्ये वितळवुन घ्या. वितळ्लेल्या बटर वर ग्रॅहाम क्रॅकर क्रंब्स एक सारखे पसरवून घ्या. त्यावर चॉक्लेट चिप्स, बटरस्कॉच चिप्स, अक्रोड किंवा पेकान चे तुकडे असे एकावर एक थर द्या. आता या थरांवर अर्धे कंडेन्स्ड मिल्क काळजीपूर्वक ओता. त्यावर खोबर्याचा कीस पसरवा. आता उरलेले कंडेन्स्ड मिल्क काळजीपूर्वक ओता. २५-२८ मिनिटे ३५० डिग्री फॅ. वर बेक करा. पूर्णपणे थंड झाल्यानंतरच वड्या कापाव्यात. वरील साहित्याच्या अंदाजे ४०-४५ वड्या होतात.
टीपा:
कंडेन्स्ड मिल्कचा पूर्ण कॅन वापरून बर्फी जरा जास्त गोड वाटली. फार गोड आवडत नसेल तर कॅन ३/४ च वापरावा.
काचेचा पॅन वापरणार असाल तर ओवन चे तापमान कमी ठेवावे.
ही बर्फी फारच छान लागते. सगळे साहित्य हाताशी असेल तर एकदम झटपट बनते ही बर्फी.
मी लेकाच्या वाढदिवसाच्या पार्टीला केली होती आणि सगळ्यांची वाहवा मिळवली होती. :)
फोटू पार्टी नंतर घेतल्यामुळे फोटूत फक्त ३च वड्या आल्या आहेत. ;)
प्रतिक्रिया
10 Nov 2009 - 11:32 am | सहज
सानिकातै मिपावर स्वागत! पहिल्यावहिल्या लेखाबद्दल अभिनंदन.
मिपाच्या नियमीत वाचक आहात हे "सचित्र" पाकृ दिल्यामुळे कळले. :-)
बाकी बर्फी लेबनीज मिठाई सारखी दिसते आहे. छान :-)
अजुन लेखन येउ दे!
10 Nov 2009 - 12:48 pm | पर्नल नेने मराठे
हो हो मलाही बकलावा वाटली.
चुचु
10 Nov 2009 - 2:23 pm | गणपा
सहजरावांशी आणि चुचुशी सहमत.
मिपावरील पहिल्या लेखना बद्दल अभिनंदन.
येउद्यात आपल्या पाककृत्या लेख कविता....
11 Nov 2009 - 4:59 am | प्रभो
मिपावरील पहिल्या लेखना बद्दल अभिनंदन.
येउद्यात आपल्या पाककृत्या लेख कविता....
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
10 Nov 2009 - 11:36 am | मसक्कली
चान... =D>
बच्चे कम्पनी खुश होयिल खुप... :D
<:P <:P <:P
10 Nov 2009 - 1:23 pm | विसोबा खेचर
माफ करा, आम्हाला उत्तम खवा असलेलीच बर्फी आवडते..
मिपावर स्वागत..
तात्या.
10 Nov 2009 - 7:06 pm | रेवती
वेगळीच पाकृ!
बकलावाची आठवण झाली.
मिपावर आपले स्वागत!
रेवती
10 Nov 2009 - 7:12 pm | सूहास (not verified)
गेली २ वर्षे मी मिपा ची चाहती आहे.>>>
व्वा !!
मला तर दोन वर्षे न लिहीण्याचा मोह आवरला नसता :T !! मी सदस्यत्व घेतल्यानंतर लगेचच दोन ओळींचा धागा काढला होता...
असो ..पाकृ एकदम मस्त ...
आणी लिहीत रहा (कमीत कमी पाकृ तरी.. :) )
सू हा स...