सल्ला

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in काथ्याकूट
9 Nov 2009 - 9:29 am
गाभा: 

सल्ला देतो तो सल्लागार.
सल्ला मागतो तो सल्लामाग.
ज्याच्या सल्ल्याने दारोदार भीक मागायची पाळी येतो तो सल्लादार.
उदा: शेअर बाजारच्या चॅनेल्स वरती मिळणार्‍या टीप्स.
आणखी एक सल्ला जो खाटीक मारतो तो - सल्लामार.

"एक सल्ला हवा आहे. घरातल्या बायकांचे संतुलन बिघडले तर काय करावे"?
बायका? मला एकावेळी अनेक बायकांशी डील करायचा अनुभव नाही हो. हे जमणारे लोक फार महान असतात. मला एकावेळी एकच बाईशी डील करायला जमते.(२०० कि.मी परीघात)
" तसे नाही हो. बायका म्हणजे सासु, मेहुणी आणि बायको"
कठीण प्रसंग आहे.एकाच वेळी तिघींचे संतुलन बिघडण्यासारखे काय झाले बॉ?
"म्हणुनच सल्ला मागतो आहे."
स्वानुभवावरुन मी फक्त बायको बद्दल सांगु शकेन. सासु आणि मेहुणी बद्दल आणखी कुणाला विचारा. त्याचा मला अनुभव नाही. ह्या दोन प्रदेशात मी 'हाय हॅलो बाय' तंत्र वापरतो.
"एक तर सांगा"
तुमचे वय काय? लग्नाला किती वर्ष झाली? मुले किती? बायको पण कामाला जाते का? संतुलन बिघडायला नेमका ट्रिगर काय?
"पहील्या ३ प्रश्नाचा संबंध काय"?
हे बघा ,नविन लग्न असेल तर जरा त्रास होतो. साधारण १० वर्षांनंतर सवय होते. अंगवळणी पडते. आणि तुम्हीच इतरांना ह्या बाबतीत सल्ले देता. २ मुले असतील तर संतुलन परत आणणे जरा जास्त अवघड असते. ते राहु दे. ट्रिगर सांगा.
" माझी नोकरी गेली. फक्त ४ महीन्याचा त्रास आहे. दुसरी जास्त पगाराची मिळेल."
अशी अचानक नोकरी कशी काय गेली?
" मला बॉस ची चाटायची सवय नाही म्हणुन. नसते काँप्रमाइ़ज आयुष्यात करणार नाही. बुद्धी आहे. कुठेही मिळेल दुसरी नोकरी. पण कणा वाकवणार नाही. बिनडोक आहे बॉस. टॅलंटची कदर नाही."
( आणखी एक अहं ब्रम्हास्मी)
म्हणजे असुरक्षिततेच्या भावनेतुन झालेले असंतुलन आहे तर.
" लग्नाला ७ वर्ष झाली आहेत. एक मुलगी आहे ५ वर्षाची. बायको हाउस वाईफ आहे."
(शाळेच्या अ‍ॅडमिशनची वेळ डोनेशन ५००००-१०००००)
काही सुचना देतो , बघा पाळता येतात का?
१. घरात सिगारेट ओढु नका. दारुकाम बंद. सिगारेट ओढुन आल्यावर कमीत कमी तोंडाचा वास गेल्यावरच घरी या.
२. शक्यतो रोज काहीतरी कामानिमित्त बाहेर पडा.
३. सर्वप्रकारच्या पैसे कमावायच्या स्किम पासुन लांब राहा.
४.घर कामात जर बायकोची इच्छा असेल तरच मदत करा.
५. पुन्हा नोकरी लागेपर्यंत घरी कुणाही मित्र मंडळीना शक्यतो बोलवु नका.
६. बायकोसमोर मित्रांबरोबरच्या फोनवरच्या 'मी तुर्रमखान' टाइप चर्चा टाळा.
७. उगाच खोटे खोटे प्रेमळ संवाद टाळा. त्यात वाद वाढण्याची शक्यता असते.
८.आपला खर्च कमी करा. बायकोला खर्च कमी कर अजिबात सांगु नका. हे सहा महीन्याची तरतुद आहे असे गृहीत धरुन सांगत आहे.
९.जमल्यास काही पार्ट टाइम नोकरी करा.
१०. "मेल इगो" ही एक कविकल्पना आहे असे कमीत कमी नोकरी मिळेपर्यंत स्वतः ला समजवा. सर्व काही सुरळीत होइल.
११. 'सेंसीटीव' इश्युज मधे 'आग्रही' होउ नका. ते कुठेही पळुन जात नाही. उगाच जुलुमाचा रामराम करुन त्रास कशाला वाढवायचा?
१२. दुसरी नोकरी लागल्यावर परत तिथे सुद्धा तुमचा बॉस बिनडोक असेल तर नोकरी सोडायच्या आधी तिसर्‍या नोकरीची व्यवस्था करुनच दुसरी सोडा.
१३. शक्यतो खर्च भागवण्याकरता बायकोच्या दागिन्याला हात लाउ नका.
१४.घरात बसुन टीवी पहाणे संपुर्णपणे टाळा.
जाता जाता: लग्न झाल्यावर हे "संतुलन" म्हणजे काय असते हो?

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

9 Nov 2009 - 10:42 am | पर्नल नेने मराठे

बायकोसमोर मित्रांबरोबरच्या फोनवरच्या 'मी तुर्रमखान' टाइप चर्चा टाळा.
:D मस्त

चुचु

सुहास's picture

9 Nov 2009 - 10:54 am | सुहास

अतिशय "प्रॅक्टीकल" सुचना.. आवडल्या.. :)

-- सुहास

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Nov 2009 - 11:02 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

यातल्या बर्‍याचशा सूचना उदा. दारू, सिगरेट, "मी तुर्रमखान"टाईप चर्चा, मेल इगो वगैरे, या सर्वकालिक नाहीत का?

"माझं काम पैसे कमावून आणणं आहे ते मी करतो. मी का चहाचा कप धुवून ठेवू?" हे ऐकलं त्या पोरांशी मैत्री तोडून जावं असं मनापासून वाटतं.

अदिती

चतुरंग's picture

9 Nov 2009 - 9:12 pm | चतुरंग

(सार्वकालिक)चतुरंग

चिरोटा's picture

9 Nov 2009 - 11:05 am | चिरोटा

सहमत आहे.
शक्यतो रोज काहीतरी कामानिमित्त बाहेर पडा
आणि काम असो वा नसो घरी परतताना खूप काम करुन आल्यासारखा चेहरा ठेवा . कामाला लॅपटॉप नेत असाल तर घरी आल्यावर जेवून ताबडतोब लॅपटॉप चालु करुन खूप काम असल्यासारखे भासवता येईल.
भेंडी
P = NP

नंदन's picture

9 Nov 2009 - 11:17 am | नंदन

( आणखी एक अहं ब्रम्हास्मी)

-- क्या बात है! एकदम मार्मिक टिप्पणी.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सहज's picture

9 Nov 2009 - 11:42 am | सहज

सल्लुमियांशी सहमत!

नेहमी आनंदी's picture

9 Nov 2009 - 11:51 am | नेहमी आनंदी

चांगल्या सूचना.

अवलिया's picture

9 Nov 2009 - 12:43 pm | अवलिया

चालु द्या !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

अतिशय प्रॅक्टीकल!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

प्रभो's picture

10 Nov 2009 - 7:07 am | प्रभो

चालु द्या !

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!