मराठीचा आडमुठेपणा

मड्डम's picture
मड्डम in काथ्याकूट
8 Nov 2009 - 2:51 pm
गाभा: 

'आपला तो बाळू आणि शेजारच्‍यांचा तो कार्टा' ही आम्हा मराठी माणसांची जुनीच खोड म्हणून आपल्‍या भाषेचा अभिमान बाळगणारे आम्ही दुस-याची भाषा हवी तशी तोडून-मोडून वापरू पण जरा कुणी आपल्‍या भाषेची मोडतोड करण्‍याचा प्रयत्न केला तर मग मात्र 'जय भवानी....'

आता हेच पहा ना मराठी माणसाच्‍या दृष्‍टीने विचार करता मुंब्रापुरीचे खरे नाव 'मुंबई' असे आहे. ते जर कुणी चुकूनही बॉम्बे किंवा बंबई असे घेतले तर मात्र त्‍याची काही धडगत नाही. आठवा 'वेक अप सीड'चा करण जोहर.

अगदी राज ठाकरेच नाही तर त्याही पूर्वीपासून मुंबईला मुंबईच म्हणायचे हा ठाकरी विचार बाळासाहेबांनी मांडला आणि युती शासनाने त्‍याला कायदेशीर मंजुरीही दिली.

हे झाले आपल्‍या बाळूचे आता दुस-यांच्‍या कार्ट्याबद्दल बोलूया...

जर आपला मुंबईचे नाव बदलायला किंवा चुकीचे उच्‍चारायला विरोध असेल तर हाच न्‍याय इतर राज्‍यातील शहरांना का नको... मात्र तसे नाही. आपण बिहारची राजधानी पटना असतानाही सरळ पाटणा म्हणणार. मध्‍यप्रदेशातील भोपाल शहराला सरळ भोपाळ म्हणणार, इतकेच काय चेन्नईला मद्रास म्हणणारे आणि इंदौरला इंदूर म्हणण्‍याचा अट्टहास आपलाच ना? त्‍याच पध्‍दतीने बेंगलोर किंवा बेंगलूरूचे नाव बंगळुरू आणि ग्वाहाटीचे गुवाहाटी किंवा गौहत्ती करणारेही आपणच ना? असे अनेक नावे असू शकतील.

आता आपल्‍यापैकी अनेक जणांचे याबाबत असे मत निर्माण होऊ शकते की व्‍याकरणाच्‍या नियमानुसार ते तसे उच्‍चारले जातात. तर प्रत्येक भाषेला व्‍याकरण आणि स्‍थानिक इतिहास व भूगोल हा असतोच. मात्र काय करणार ना 'आपला तो बाळू आणि दुस-याचं ते...'

प्रतिक्रिया

नंदन's picture

8 Nov 2009 - 2:55 pm | नंदन

हा लेख वर मांडलेल्या विचारांचा प्रेरणास्रोत आहे का? तसे असल्यास तसा उल्लेख करणे श्रेयस्कर ठरावे. बाकी चालू द्या.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मड्डम's picture

8 Nov 2009 - 2:58 pm | मड्डम

तसे नाही... सहजच मित्रांच्‍या चर्चेतून समोर आलेला विषय. मात्र तुम्ही एक चांगल्‍या मुद्यांचा समावेश असलेला दुवा दिल्‍याबद्दल धन्‍यवाद

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Nov 2009 - 3:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मुंबईचे बाँम्बे करताना त्यात काहीही व्याकरण नसून युरोपेन लोकांची जड जीभ हे कारण होते/असावे. जसा निप्पॉन(?)चा जपान झाला. आजही लंडनचे लाँतू(?) होतंच.

भारताबाहेरच्या लोकांचं सोडून देऊ या... भोपालचं भोपाळ, इंदौरचं इंदूर हिंदी भाषकांना चालत नाही तर मराठी भाषिक लोकं आपले उच्चार सुधारू शकतात. पण मराठमोळ्या पुणे, औरंगाबाद, अजिंठा, वेरूळ, चाकण, महाबळेश्वर, घारापुरी, तळेगाव इ. गावांच्या नावांचे उच्चार इतर भाषिक कसे करणार ते सांगा!

अदिती

अवांतरः आम्ही 'आपला तो बाब्या ... ' शिकलो होतो; 'आपला तो बाळू दुसर्‍याचा तो राज(?)' हे मात्र जामच आवडलं!

नंदन's picture

8 Nov 2009 - 3:10 pm | नंदन

या लेखातले छायाचित्र पहा. यापुढे पाटणा-पटना हे फारच क्षुल्लक :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

आनंदयात्री's picture

9 Nov 2009 - 8:17 pm | आनंदयात्री

माझ्या मते निहॉन किंवा निहोन !!

JAGOMOHANPYARE's picture

8 Nov 2009 - 3:14 pm | JAGOMOHANPYARE

आपला तो (टी) बाळू.. दुसर्‍याचा तो ललवा!

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Nov 2009 - 3:16 pm | बिपिन कार्यकर्ते

मड्डम, तुम्ही लिहिलेले पहिलेच वाक्य... बाळ्या / कार्टा वगैरे... अजिबात पटले नाही. ही बाळ्या/कार्टा प्रवृत्ति ही एक मूलभूत मानवी प्रवृत्ति आहे. त्यात फक्त मराठी माणसाचा वगैरे काही संबंध नाही. जगात कुठेही जा... थोड्या फार फरकाने हे असेच असते सगळीकडे. मराठी माणसाच्याच माथी हे पाप कसे काय मारू शकता तुम्ही? असो.

आपल्या गावाच्या नावाच्या उच्चाराच्या बाबतीत सगळेच आग्रही असतात. तुमचे दक्षिणभारतभ्रमण मर्यादित असावे. कारण आज पर्यंत मुंबईला मुंबई म्हणणारा सौधिंडियण माणूस विरळाच. पण मद्रासला मात्र न चुकता चेन्नईच म्हणतात. शिवाय बाँबेचे मुंबई होणे याला काही लढा वगैरे दिल्याची पार्श्वभूमी आहे, आणि मुंबईवर मराठीचे वर्चस्व असावे अशीही एक किनार त्या सर्व प्रकरणाला आहे. तशी बाकी कोणत्याही नामांतराला नाही. केवळ ब्रिटिशांनी बिघडवलेले उच्चार सुधरवणे हेच कारण आहे (एक चेन्नई सोडल्यास). मला आठवते आहे की कै. श्री मधुकर सामंत (आमच्या गोरेगावतले, आणि त्यांचा माझा अल्प परिचय होता) जेव्हा बाँबेचे मुंबई व्हावे अशी कायदेशीर / न्यायालयीन लढाई लढत होते तेव्हा कोणताच पाठिंबा नव्हता त्यांना, शिवाय नाव बदलू नये या साठी अमराठी लोक त्यांचे डावपेच टाकतच होते. तेव्हा 'नाव कशाला बदलायचे, त्याने काय होणार' वगैरे लिहिणारे अमराठी मिडियावाले, बॉंबेचे मुंबई झाल्या पाठोपाठ मद्रासचे चेन्नई झाले तेव्हा एक शब्दही बोलले नव्हते. असो.

एक निरिक्षण : पुण्यातले बहुतांश मराठी जन न चुकता मुंबईला बाँबे म्हणतात असे लक्षात आले आहे. मी मुंबई म्हणत राहतो पण समोरचा/ची मात्र तितक्याच चिकाटीने बाँबे म्हणत असतो/ते.

बिपिन कार्यकर्ते

निमीत्त मात्र's picture

8 Nov 2009 - 9:45 pm | निमीत्त मात्र

पुण्यातले बहुतांश मराठी जन न चुकता मुंबईला बाँबे म्हणतात असे लक्षात आले आहे. मी मुंबई म्हणत राहतो पण समोरचा/ची मात्र तितक्याच चिकाटीने बाँबे म्हणत असतो/ते.

महाराष्ट्रात कुठेही जा... थोड्या फार फरकाने हे असेच असते सगळीकडे. पुण्याच्या लोकांच्या माथी हे पाप कसे काय मारू शकता तुम्ही? असो.

बिपिन कार्यकर्ते's picture

8 Nov 2009 - 11:06 pm | बिपिन कार्यकर्ते

श्री. मात्र,

०१. मी 'पुण्यातले' असे म्हणले, 'पुण्यातले' असे नाही.

०२. महाराष्ट्रात सगळीकडे थोड्याफार फरकाने असे असेलही, माझा संचार तेवढा नाही महाराष्ट्रात, त्यामुळे माझ्याकडे जेवढा अनुभव तेवढेच बोललो हो मी. अनुभवापेक्षा जास्त बोलता नाही मला.

०३. तुमच्या म्हणण्याप्रमाणेही महाराष्ट्रात सगळ्यांबरोबरच पुण्यातही हे होते (पुण्यात असे होत नाही असे तुम्हीही म्हणत नाही आहात.) तर मग या पापाचा (?) थोडाफार भार पुण्याच्याही माथी आहेच ना?

तरीही.... असो.

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Nov 2009 - 11:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

श्री निमित्त, मुद्दा काय आणि निमित्त काढून बोलता मात्र काय? पण एकूण मुंबईला बाँबे म्हणणे पाप आहे हे आपणच म्हणता आहात.

एकूणच कार्यकर्त्यांनी आपल्या आवाक्याबाहेरच्या गोष्टींला हात घातला नाही आहे याची दखल घ्यावी.

तरीही.... असो.

+१ ;-)

अदिती

निमीत्त मात्र's picture

8 Nov 2009 - 11:15 pm | निमीत्त मात्र

०१. मी 'पुण्यातले' असे म्हणले, 'पुण्यातलेच' असे नाही.

मग त्या म्हणण्याला काहीच अर्थ नाही. नुसते बहुतांश मराठीजण म्हणून भागले असते. पुण्याचा संदर्भ देण्याचे प्रयोजन काय?

०२. महाराष्ट्रात सगळीकडे थोड्याफार फरकाने असे असेलही, माझा संचार तेवढा नाही महाराष्ट्रात, त्यामुळे माझ्याकडे जेवढा अनुभव तेवढेच बोललो हो मी. अनुभवापेक्षा जास्त बोलता नाही मला.

मग तुमच्या निरिक्षणाला काही अर्थ नाही. मुंबईतल्या "बहुतांश" लोकांना नको तिथे बोट घालून वास घ्यायची सवय असते असे निरिक्षण मी पाहिलेल्या २-३ व्यक्तिंवरुन नोंदवू शकतो..पण त्याला काहीच अर्थ नाही.

०३. तुमच्या म्हणण्याप्रमाणेही महाराष्ट्रात सगळ्यांबरोबरच पुण्यातही हे होते (पुण्यात असे होत नाही असे तुम्हीही म्हणत नाही आहात.) तर मग या पापाचा (?) थोडाफार भार पुण्याच्याही माथी आहेच ना?

सगळ्यांच्याच माथी आहे त्यातुन पुण्यालाच अधोरेखित करण्याचा खोडसाळपणा आहे.

संदीप चित्रे's picture

9 Nov 2009 - 4:37 am | संदीप चित्रे

अरे मित्रा,
तुझे निरीक्षण बरोबर असेल तसेच मला काही मराठी मुंबईकर माहिती आहेत जे मुंबईला हटकून बाँबे म्हणतात आणि वर म्हणतात मुंबई पहिल्यापासूनच कॉस्मोपॉलिटन आहे !

बाकी तुझ्या इतर मजकूराबाबत सहमत म्हणजे जगाच्या पाठीवर सगळीकडे हेच चालू असतं इ.

अभिरत भिरभि-या's picture

8 Nov 2009 - 3:19 pm | अभिरत भिरभि-या

मुंबई हे नाव आधिकॄत असतानाही आज विविध भारतीय भाषांमधून चुकीच्या (!!) पद्धतीने लिहिले जाते यावर्ही राज साहेबांनी काहीतरी केले पाहिजे. :)
जसे
कानडी - मुंबयी
उर्दू - मम्बई (आणि पुण्याला पुन: )
बंगाली - मुम्बाई

बाकी हिंदी लोंकांमध्ये चाललेली जळजळ आवडली.

अवांतर : मद्रासचे चेन्नई तसे लौकर स्वीकारले गेले फक्त मुंबईबद्दल खळखळ आणि गोंगाट का हो ??

Nile's picture

8 Nov 2009 - 3:23 pm | Nile

काहीच्या काही! अहो वादच घालायचा आहे तर थोडाफार तरी विचार करुन मुद्दे मांडा ना. मग गुद्द्यांवर या, कसें?

सुनील's picture

8 Nov 2009 - 3:48 pm | सुनील

बाकी स्वभाषेबाबत सर्वात आग्रही (क्वचित दुराग्रही) मानले जाणारे फ्रेन्चदेखिल इंग्लिशमधील "पॅरीस" हा उच्चार चालवून घेतात हो, इंग्लीशमधेही "पारी"च म्हटले पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरलेला मी तरी पाहिला नाही!

बाकी चालू द्या..

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चेतन's picture

8 Nov 2009 - 3:57 pm | चेतन

मुंबईला आमच्या कोकणातुन लोक मम्बई मम्बय पण म्हणतात. यात फक्त शुद्धलेखनाचा फरक आहे.

मुंबई आणि बाम्बे मध्ये शुद्ध्लेखन सोडुनसुद्धा बराच फरक आहे

चेतन

देवदत्त's picture

8 Nov 2009 - 4:17 pm | देवदत्त

उगाच जमेल तिथे मराठी भाषा आणि मराठी लोकांच्या नावाने खडे फोडणे नेहमीचे झाले आहे असे वाटते.

बाकी, त्या त्या शहरांची अधिकृत नावे द्या, आम्ही ती वापरू. नव्हे वापरतोच(चेन्नई, कोलकाता).

मुलाचे बारशात ठेवलेले नावच माहित नसेल तर सर्वजण हाक मारत असलेल्या नावानेच आपण हाक मारतो ना?

जय महाराष्ट्र

विसोबा खेचर's picture

8 Nov 2009 - 4:32 pm | विसोबा खेचर

जर आपला मुंबईचे नाव बदलायला किंवा चुकीचे उच्‍चारायला विरोध असेल तर हाच न्‍याय इतर राज्‍यातील शहरांना का नको... मात्र तसे नाही. आपण बिहारची राजधानी पटना असतानाही सरळ पाटणा म्हणणार. मध्‍यप्रदेशातील भोपाल शहराला सरळ भोपाळ म्हणणार, इतकेच काय चेन्नईला मद्रास म्हणणारे आणि इंदौरला इंदूर म्हणण्‍याचा अट्टहास आपलाच ना?

येस्स. हा मुद्दा खरा आहे!

आपला,
(इंदौरप्रेमी) तात्या.

सहज's picture

9 Nov 2009 - 8:12 am | सहज

मुद्दा खरा आहे.

आणि हो, मला तरी बोलीभाषेतील बॉम्बे ऐकायला, म्हणायला छान वाटते. :-)

अवलिया's picture

8 Nov 2009 - 6:06 pm | अवलिया

खरं आहे बाबा तुझे म्हणणे !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

अमोल खरे's picture

8 Nov 2009 - 6:10 pm | अमोल खरे

आमची लॉयल्टी मुंबईशी आहे आणि मुंबईला मुंबईच म्हणायचं.........जास्त माज दाखवायचा नाही......बाकी शहरांना काय बोलायचे ते प्रत्येकाने ठरवावे. राजला बाकी बर्‍याच गोष्टी आहेत करायला. जर दुसर्‍या राज्यातील लोकांना त्यांच्या शहराला दुसर्‍या नावाने हाक मारुन राग येत असेल तर तो त्यांनी व्यक्त करावा त्यांच्या पद्धतीने. त्यांना बरे वाटावे म्हणुन आम्ही नाही लोकांना सांगत फिरणार की बाबांनो, मद्रास नाही म्हणायचं हं......चेन्नई म्हणायचं वगैरे. मला एकही साऊथ ईंडीयन मुंबईला मुंबई बोलताना दिसला नाहिये. तेव्हा राजने काय करायचे ते मिपा वर सांगण्यापेक्षा बाकी भारतात जा आणि मुंबईला मुंबईच म्हणायचे ते सांगा. ते सांगताना तुम्हाला काय अनुभव आले ते लिहा मिपा वर.........राजची शप्पथ पहिली प्रतिक्रिया मी देईन.

निखिलराव's picture

9 Nov 2009 - 9:34 am | निखिलराव

लई भारी..........
भीड भावड्या भीड तुला भीडलचं पाहिजे.......

पाषाणभेद's picture

8 Nov 2009 - 7:49 pm | पाषाणभेद

आपण सगळे महाराष्ट्राच्या बाबतीत असा बारकाईने विचार करतो. मला सांगा की वरील उल्लेख आलेल्या शहरांतले किंवा राज्यांतले किती ठिकाणी अशी चर्चा चालू आहे? किंवा हिंदी भाषी फोरम वर अशी चर्चा चालू आहे? उदाहरण सापडणार नाही. आपण मला वाटते जास्त विचार करतो सगळ्या गोष्टीचा. काही गोष्टीत आपलाच आग्रह धरायचा असतो. जर काही गोष्टी मी, मराठी, महाराष्ट्र, मराठी माणूस या बाबतीत असतील तर जास्तच आग्रही रहायला आता तरी मराठी माणसाने शिकले पाहीजे.

बोलू द्या ना इंदूर. नाहीतरी तेथे आपल्या अहिल्यादेवींचेच राज्य होते ना.

अजुन एक हक्काची आग्रह, ह्या लेखाची वरची पाटी 'मराठीचा आडमुठेपणा' पणा ऐवजी 'मराठीचा आग्रह' असा करावा.

जय मनसे प्रवृत्ती !
------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

चिरोटा's picture

8 Nov 2009 - 10:05 pm | चिरोटा

आपण मला वाटते जास्त विचार करतो सगळ्या गोष्टीचा

सहमत्.महाराष्ट्राचा लोकसंख्येत दुसरा-म्हणजे उत्तर प्रदेशच्या खालोखाल क्रमांक लागतो.म्हणजेच मराठी बोलणार्‍यांची संख्या अनेक भारतिय भाषा बोलणार्‍या लोकांपेक्षा जास्त आहे.क्षेत्रफळात तिसरा क्रमांक लागतो.खरेतर मराठी माणसाच्या मनात न्युनगंड निर्माण होण्याचे काहीही कारण नाही.
भेंडी
P = NP

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Nov 2009 - 8:16 am | llपुण्याचे पेशवेll

+१.
आपल्याला गुढग्यावर चालायची सवय झाली आहे. पुण्यात राहून हिंदी भाषकांशी बोलताना 'भांडारकर रोड' ला 'भंडारकर रोड' म्हणणारे महाभाग मी पाहीले आहेत.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

ऍडीजोशी's picture

9 Nov 2009 - 12:09 am | ऍडीजोशी (not verified)

वेळ जात नसला की असे विषय सुचतात

फारएन्ड's picture

9 Nov 2009 - 7:57 am | फारएन्ड

राज जर पाटण्यात निवडणूक लढून जाहीर वक्तव्ये करताना तेथील लोकमताचा अनादर करून "पाटणा" म्हंटला तर ते चुकीचे होईल, पण त्या त्या शहरात किंवा राज्यात न राहणार्‍या इतर भाषिक लोकांनी इतर शहरांची नावे आपल्या भाषेत जशी रूढ असतील तशी उच्चारली तर ते तेवढे चुकीचे वाटत नाही. (पाटण्यात राहणार्‍या एखाद्याने तेथे मुंबईचा उल्लेख बम्बई केला तर मला नाही वाटत मराठी लोकांना त्यात काही वावगे वाटेल). याबाबतीत मनसे, शिवसेना किंवा इतर कोणी असले काही वक्तव्य केले असेल तर माहीत नाही.

नाहीतर ही तुलना बरोबर नाही. तसेच 'आडमुठेपणा' म्हणजे तो उच्चार चुकीचा आहे हे माहीत असून मुद्दाम केला जातो असे वाटते ते ही बरोबर नाही.

मला वाटते सर्वसामान्य मराठी माणसाचा विरोध मुंबईत येउन बरीच वर्षे राहून स्थानिक मताचा आदर न करता आडमुठेपणाने बम्बई वगैरे नावे उच्चारण्याला आहे. राज किंवा इतर कोणी मुंबईत बसून पाटणा, इंदूर म्हणण्याशी त्याची तुलना कशी करता येइल?

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Nov 2009 - 8:18 am | llपुण्याचे पेशवेll

बरोबर. १००% सहमत आहे. महाराष्ट्रात राहताना उच्चार इथल्यासारखाच केला पाहीजे.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

ऋषिकेश's picture

9 Nov 2009 - 9:44 am | ऋषिकेश

अशी घालत बसलात तर हजार कुंपणे घालता येतील. प्रश्न एवढाच आहे की एकेकाळी सारी कुंपणे भेदून अटकेपार जाऊन भारताला एकत्र करणार्‍या महाराष्ट्रातील आपण लोकांनी आता स्वतःभोवती इतकी संकुचित कुंपणे घालून घ्यायला का सुरवात केली आहे?

ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?

आशिष सुर्वे's picture

9 Nov 2009 - 9:59 am | आशिष सुर्वे

आपल्या बाबांना, ''अहो बाबा'' च्याऐवजी ''अहो बाप'' म्हटलेले कसे वाटेल हो कानाला?? मला 'बॉम्बे' ऐकल्यावर अगदी तस्सेच वाटते..

अर्थात, हे माझे स्वतःचे मत आहे..

-
कोकणी फणस

सुधीर काळे's picture

9 Nov 2009 - 10:29 am | सुधीर काळे

मी स्वतः नेहमी 'मुंबई' म्हणतो व बिगरमराठी लोकांशी बोलताना मी पाहिले आहे कीं बिगरमराठी लोक आधी 'बाँबे'ने सुरुवात करतात पण मी न चुकता मुंबई म्हणतो आहे असे लक्षात आल्यावर तेही मुंबई म्हणू लागतात.
पण एक वेगळा मुद्दा मांडू इच्छितो. परदेशी वारंवार प्रवास करणार्‍यांनाही हा अनुभव आला असेल.
लंडन हे जरी आंग्लभाषेतले इंग्लंडच्या राजधानीचे नाव असले तरी पॅरिस येथील व 'मेट्झ'सारख्या फ्रांसमधील छोट्या विमानतळांवर त्या शहराचा उल्लेख 'लोंद्र (Londres)' असाच होतो व रोम वा मिलान वा त्रिएस्ते या इटलीतील विमानतळांवर त्याचा उल्लेख 'लोंद्रा Londra' असाच होतो. आपल्याकडे हिंदी भाषिक लोक लन्दन असा त्या शहराचा उल्लेख करतात. पण इंग्रजीत बोलतांना फ्रेंच व इटालियन लोक त्या शहराचा उल्लेख लंडन असाच करतात.
फ्रेंच लोक Paris या शहराचा उच्चार 'पारी' असा करतात पण आमच्याशी बोलताना न लाजता 'पॅरिस'च म्हणतात.
इटलीला इटालियन भाषेत इटालिया म्हणतात, पण इटालियन लोक बाहेर पडले तर इटलीच म्हणतात.
मी जरी स्वतः मुंबईला बाँबे म्हणण्याच्या संपूर्णपणे विरुद्ध असलो व असे पुनर्नामकरण केल्याबद्दल शिवसेनेला श्रेय देऊन तिचे कौतुकही करत असलो तरी हा मुद्दा लिहावा असं वाटलं म्हणून लिहितोय!
आणखी एक अनुभव. मुंबईचे पुनर्नामकरण झाल्यावरही 'बीबीसी'ने बाँबे म्हणणे चालूच ठेवले त्याबद्दल मी त्यांना निषेधपर पत्र लिहिले होते त्याला उत्तर देतांना त्यांनी "एकदा का ते नाव प्रचलित झाले कीं आम्ही मुंबई असा उल्लेख करू" असे उत्तरही दिले होते. (अलीकडे ते काय म्हणतात हे आठवत नाहीं.)
सुधीर
------------------------
http://tinyurl.com/yg4oklu वर दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या समारंभात मी गायलेले व की-बोर्डवर साथ दिलेले गीत ऐका!­

चिरोटा's picture

9 Nov 2009 - 10:49 am | चिरोटा

बहुतांशी परदेशी वृत्तपत्रे आता मुंबई असेच लिहितात्.कधीकधी मुंबई(formerly Bombay) असेही वाचायला मिळते.बाँबेचे मुंबई करताना ज्यांनी खळखळ केली त्यांनी मद्रास-->चेन्नई/कलकत्ता-->कोलकाता मात्र निमूटपणे स्वीकारले.अर्थात हे विरोध करणारे जास्त करुन जाहिरात,फॅशन क्षेत्रातले,पेज ३ वाले होते.त्यांच्या विरोधाला विशेष अर्थ नव्हता(बाँबेची ब्रँड व्हॅल्यु कमी होईल वगैरे!!!).बाकी सर्वसामान्य लोकांना मुंबई,मुंबापुरी काहीही चालत होते.!!
भेंडी
P = NP

आशिष सुर्वे's picture

9 Nov 2009 - 11:30 am | आशिष सुर्वे

>>
मुंबईचे पुनर्नामकरण झाल्यावरही 'बीबीसी'ने बाँबे म्हणणे चालूच ठेवले त्याबद्दल मी त्यांना निषेधपर पत्र लिहिले होते त्याला उत्तर देतांना त्यांनी "एकदा का ते नाव प्रचलित झाले कीं आम्ही मुंबई असा उल्लेख करू" असे उत्तरही दिले होते. (अलीकडे ते काय म्हणतात हे आठवत नाहीं.)
>>

अलिकडे 'बीबीसी' वाले 'मुंबई'च म्हणतात.. त्यांचे उच्चार मात्र 'मुंबय','मुम्बय' असे काहीसे असतात..
-
कोकणी फणस

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Nov 2009 - 11:46 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

'मुंबाऽय' म्हणतात राणीच्या देशातले लोक!

पण प्रश्न असा पडला आहे की भाषेचा आडमुठेपणा का भाषिकांचा? मराठीचा आडमुठेपणा का मराठींचा??

अदिती

Nile's picture

9 Nov 2009 - 11:50 am | Nile

अहो कितीही झालं तरी त्या 'मड्डम' आहेत, पण तुम्ही कशाला असा आडमुठेपणा करीत आहात आता? :)

सुधीर काळे's picture

9 Nov 2009 - 11:57 am | सुधीर काळे

अदिती/९६-मराठा/फणस-जी,
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
सुधीर
------------------------
http://tinyurl.com/yg4oklu वर दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या समारंभात मी गायलेले व की-बोर्डवर साथ दिलेले गीत ऐका!­

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Nov 2009 - 12:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हुश्श! एकदातरी माझं नाव व्यवस्थित लिहील्याबद्दल धन्यवाद!

अदिती

छोटा डॉन's picture

9 Nov 2009 - 12:06 pm | छोटा डॉन

ज्या त्या स्थानिक भागात त्या त्या स्थानिक भाषीय, सांस्कॄतीक आणि ऐतिहासीक अस्मितांचा सन्मान केला जावा ह्या मताचा मी आहे.
त्यामुळे मी मुंबईला जगात कुठेही गेले तरी मुंबईच म्हणतो.
हीच बाब मी कठोरपणे चेन्नई, इंदौर, बंगरुळु, कोलकता ह्याबाबतही पाळतो.

दक्षिण भारतात ह्याबाबत लोक फारच संवेदनाशील असतात पण उत्तर भारतात तसे एवढे प्रकर्षाने आढळत नाही.
माझे काही खुद्द बंगाली मित्र "कोलकता"चा उच्चार "कॅलकटा" असा करतात व मुंबईला बॉम्बे म्हणत असत. आता मी हळुहळु त्यांच्या मुखात मुंबई आणि कोलकता रुळवले आहे त्यांना प्रदेशवादाच्या मुद्द्यावर प्रचंड तात्विक बोर मारुन ;)
दाक्षिणात्यांच्या बाबतीत हा प्रश्न येत नाही, फक्त त्यांना मुंबई हे रुचत नाही व ते बॉम्बे म्हणत राहतात.

अवांतर : आस्थापनात एका उच्चस्तरिय मिटिंगमध्ये मी स्वतः एका मोठ्ठा अधिकार्‍याच्या प्रेझेंटेशनमध्ये असलेल्या "बॉम्बे" ह्या शब्दावर आक्षेप घेऊन तिथे "मुंबई" अशी सुधारणा सुचवली होती. त्यांनीही चुक मान्य करुन योग्य ती अ‍ॅक्शन घेतली.
थोडक्यात आपण आपल्या अस्मितेला किती महत्व देतो ह्यावर समोरचा आपले धोरण ठरवतो.
बाकी असो.

------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

सुधीर काळे's picture

9 Nov 2009 - 12:27 pm | सुधीर काळे

पहा पटतंय का!
मद्रासचे नाव बदलून चेन्नई ठेवले ते इतके वेगळे आहे की ते पटकन रुळले. पण मला माझ्या तामिळी मित्रांनी सांगितले कीं तामिळ लोक स्वतः तामिळ भाषेत त्या शहराला चेन्नई कधीच म्हणत नसत (मड्रासच म्हणायचे). पण आपण मराठीत बोलताना नेहमीच मुंबई म्हणायचो व बंगाली लोक बंगाली भाषेत बोलताना कलकत्त्याला कोलकाता म्हणायचे. बाँबे व कॅलकट्टा ही रूपें साहेबांना हे उच्चार सहजासहजी येत नव्हते म्हणून झाले व पुढे अपभ्रंशातून ते आणखी बदलले.
कलकत्ता व बाँबे हे कोलकाता व मुंबईच्या उच्चाराच्या फारच जवळ आहेत म्हणून अजूनही जुनी नावे प्रचलित राहिली आहेत. पण चेन्नई हे अगदीच वेगळे व म्हणूनच पटकन रूढ झाले.
बँगलोरची गत तीच व त्याच कारणासाठी होईल व त्याला केवळ वेळ द्यावा लागेल!
सुधीर
------------------------
http://tinyurl.com/yg4oklu वर दिवाळीच्या निमित्ताने झालेल्या समारंभात मी गायलेले व की-बोर्डवर साथ दिलेले गीत ऐका!­

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Nov 2009 - 1:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला माझ्या तामिळी मित्रांनी सांगितले कीं तामिळ लोक स्वतः तामिळ भाषेत त्या शहराला चेन्नई कधीच म्हणत नसत (मड्रासच म्हणायचे).

मित्रांमित्रांमधला फरक असेल नाहीतर माणसामाणसांमधला! माझ्या तमिळ मित्र-मैत्रिणींनी मला बरोबर उलट माहिती दिली होती.
आणि माझ्याबरोबरची कोलकात्यातली बंगाली जंता न चुकता हमखास कॅलकॅटा म्हणते, म्हणूनच मुंबैला बाँबेच म्हणणार असं प्रतिपादन करते.
ग्रामीण भागातले लोकं मूळ नावच वापरतात, प्रश्न कोणत्याही शहराचा असेल असं आणखी एक निरी़क्षण! अर्थात स्मॉल साम्पल स्टॅटीस्टीक्सवर किती विश्वास ठेवणार?

अदिती

प्रशु's picture

9 Nov 2009 - 2:51 pm | प्रशु

असले बिनबुडाचे धागे टाकणारे मराठीचे खरे शत्रु आहेत.... समजला का आता मराठीची अवस्था का वाईट आहे ते......

सूहास's picture

9 Nov 2009 - 3:19 pm | सूहास (not verified)

स्द्फ

विशाल कुलकर्णी's picture

9 Nov 2009 - 4:54 pm | विशाल कुलकर्णी

पाटणा किं पटना किं पाटलीपुत्र ? ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

रेवती's picture

9 Nov 2009 - 8:08 pm | रेवती

मुंबईला बाँबे फारसं कधी म्हणावसं वाटत नाही. 'तिकडच्या'लोकांना मात्र बाँबे म्हटल्यावर पटकन समजतं त्यामुळे तसा उल्लेख केल्यास ठिक आहे असे वाटते. बाकी चेन्नई, कोलकाता बर्‍यापैकी लवकर ओळखीची झाल्यासारखी वाटतात. पाटणा न म्हणता आपण पटना म्हणावं असं वाटतं मगच बाँबेवाल्यांना मुंबई म्हणा असं सांगणं योग्य होइल. थोडक्यात सांगायचं तर 'आपल्या बाळूला बाळूच म्हणावं तर दुसर्‍याच्या बाळूला बालू म्हणावं'.
माझी मुंबईकर मैत्रिण सारखी बाँबे म्हणत असते. मी कितीही मुंबई म्हटलं तरी ती बाँबेच म्हणते. दुसरी एक आहे जिचा जन्म मुंबईतला असला तरी तिला मराठी भषेचा गंध नाही इतकेच काय पण मातृभाषा पंजाबीही येत नाही. या दोघीही म्हणतात, " आम्हाला काहीही फरक पडत नाही."

रेवती

प्रदीप's picture

9 Nov 2009 - 8:36 pm | प्रदीप

माणसे त्यांची नावेही परदेशी गेल्यावर तात्काळ बदलतांना पाहिली आहेत. 'आमच्या येथील लोकांना माझे नाव उच्च्चारता येत नाही' असे ह्यासाठी कारण दिले जाते. माझा स्वतःचा अनुभव असा की हे असे काहीही नसते. कामाच्या निमीत्ताने माझा अनेक राष्ट्रीय लोकांशी संबंध येत असतो. चिनी, ब्रिट्स, ऑस्ट्रेलियन्स, न्यू झीलंडर्स, अमेरिकन्स इ. ह्यातील चिनी सोडले तर इतर देशीय माझे कठीण (जोड)नाव पटकन आत्मसात करतात असा माझा आजवरचा अनुभव आहे. चिनी जरा थोडे अडखळतात, पण मग सरावतात. तेव्हा नाव बदलण्यात हंशील नाही.

जे स्वत:च्या नावाचे, तेच शहराच्या नावाचेही. ब्रिट्सांच्या जिभेला 'मुंबई' हे बसले नाही, केवळ म्हणून त्याचे बाँबे झाले, ते आता पूर्ववत करण्यात शहाणपणा आहे. दुसर्‍या देशांनीही तसे केलेले आहे, आणि जग ते अजिबात खळखळ न करता स्वीकारते. ('कँटन' चे ग्वादाँग हे मूळ नाव, 'पेकिंग'चे मूळ 'बैजिंग' वगैरे).

शेवटी 'नावात काय हो असते' असले काहीतरी' येणार! तर नावत बरेच काही असते. फरक का न पडावा? अर्थात हे आपल्या बॉटमलाईनवर अवलंबून आहे म्हणा. काही जणांना कशानेच फरका पडत नसेल, त्यांच्याबद्दल काय बोलणार?

उच्चाराविषयीचा सुधीरभाऊंनी नजरेस आणलेला मुद्दा मात्र मान्य आहे. नाव स्वीकारल्यावर ते अगदी मूळ जसे आहे तसेच उच्चारले गेले पाहिजे हा अट्टाहास इतरेजनही करत नाहीत. आपणही स्वतः सगळी नावे कुठे अगदी शुद्ध उच्च्चारतो? मुंबै, पण्जी असले उच्च्चार होतातच की आपलेही.

विसोबा खेचर's picture

9 Nov 2009 - 11:36 pm | विसोबा खेचर

खरं पाहता, मुंबई असादेखील नाही, तर 'मुंबै' असा मूळ शब्द आहे! :)

आपला,
(मुंबैचा नुसताच अभिमानी नव्हे तर दुराभिमानी!) तात्या.

उच्चार चुकीचा करणे आणि मूळ नावच त्या उच्चाराप्रमाणे चुकीच्या पद्धतीने "अधिकृत" करणे या दोन भिन्न गोष्टी आहेत आणि त्यांना एकाच मापाने तोलणे हे खोडसाळपणाचे लक्षण आहे.

माझे नाव आणि तसे बहुतांशी इतर सर्वच भारतीयांची नावे, ही किमान अमेरिकेत तरी चुकीच्या पद्धतीने उच्चारली जातात. माझ्याबाबत व्यक्तीगत मी त्यांना कधी उच्चारण्यावरून (फारच चुकत नसेल तर) सुधारायला जात नाही. पण म्हणून माझे अधिकृत नाव हे त्यांच्या उच्चाराला साजेसे करायला जात नाही आणि ते देखील तसा आग्रह करत नाहीत.

मात्र मुंबईच्या बाबतीत काय दिसले होते? तर बाँबेचे मुंबई करण्यासच विरोध केला गेला होता. बर्‍याचदा त्याचे कारण हे आंग्लाळेली म्हणून वाटणारी "स्टाईल" आणि इतके पॉप्यूलर झाले तर बदलून "डाऊनग्रेड" होईल अशी वाटणारी न्यूनगंडात्मक भिती होती. त्यात जर अधिक मराठीवरील राग, मुंबई ही नुसती मराठीच वाटू नये असा असलेला अप्रत्यक्ष आग्रह वगैरे असेल तरी केवळ तेच कारण नव्हते. पण वास्तवात काय घडले? आज मुंबईहे नाव हे सहज सार्वत्रीक झाले आहे. उदाहरणादाखल विविधप्रकारच्या बातम्यातील बीबीसी, न्यूयॉर्कटाईम्स, आणि टाईम साप्ताहीकाचे दुवे पहा....

आता इतर शहरांच्या नावांबद्दलः मी तरी कधी ऐकलेले नाही की मराठी माणसाने मद्रासचे नाव चेन्नई, कलकत्त्याचे कोलकोटा का बंगलोरचे बंगळुरू करण्यावरून विरोध केला आहे.

वैयक्तीक उच्चार चुकीचे होत असतील, जुन्यापद्धतीने होत असतील पण ते मराठी माणसे बाँबे म्हणतात तेंव्हापण होते. मात्र अधिकृत लेखनात काय दिसते? लोकसत्ता, सकाळ, महाराष्ट्र टाईम्स या तीन पत्रातील दुवे पहा मुद्दामून पटना, भोपाल आणि इंदौर पुरते मर्यादीत आहेत तेच नवीन नामबदलाच्या बाबतीत दिसले. पण मुंबईच्या बाबतीत आजच्याच हिंदी वृत्तपत्रातील बातम्यांमधे काय दिसेल, ते येथे पहा. मात्र चेन्नईला हिंदी वृत्तपत्रांत चेन्नईच म्हणलेले आहे... म्हणजे बाब्या कोण आणि कार्टे कोण यातील फरक समजेल आणि कोण कसली दिशाभूल करत समाजभेद करतयं ते ही...

भाषिक, प्रांतिक भांडणे करू नयेत या मताचा मी आहे. मात्र असे जेंव्हा आकसपूर्ण वागले जाते तेंव्हा जर जनसामान्याच्या रागाचा स्फोट झाला तर त्याची जबाबदारी ही एकाच बाजूची असते असे मला वाटत नाही....आपल्याकडून याबाबत आपले काय मत आहे हे समजून घेयला आवडेल... :-)

बाकी अजून एक नाव बदलावे असे मला सतत वाटते: गंगेला ब्रिटीशांनी गँजीस करून टाकली. एरव्ही गंगेच यमुनेचैव... म्हणताना गंगा वापरणारे इंग्रजीत बोलायची वेळ आल्यावर जेंव्हा गँजीस म्हणतात तेंव्हा बाकी इतरांचे जाउंदेत हो पण "गँजीस च्या काठावरील छोर्‍याला" काय वाटेल अथवा राजकपूरची गंगेवरील गाणी गँजीस म्हणून ऐकताना काय वाटेल याचा विचार करा. :-)

अक्षय पुर्णपात्रे's picture

9 Nov 2009 - 10:20 pm | अक्षय पुर्णपात्रे

पण मुंबईच्या बाबतीत आजच्याच हिंदी वृत्तपत्रातील बातम्यांमधे काय दिसेल, ते येथे पहा.

श्री विकास, हिंदी वृत्तपत्रे मुंबईला बंबई म्हणत असतील तर ते निषेधार्ह आहे. आपण दिलेल्या दुव्यातील बातम्यांमध्ये मुख्यत: शेअर बाजाराशी संबंधित बातम्या आहेत. अजुनही मुंबई उच्च न्यायालयाला 'बाँबे हाय कोर्ट' आणि मुंबई शेअर बाजाराला 'बाँबे स्टॉक एक्सचेंज' असेच अधिकृत नाव आहे. (चेन्नई येथील उच्च न्यायालयाला अजुनही 'मड्रास हाय कोर्ट' असेच म्हटले जाते.) आपण दिलेल्या दुव्यातील 'एनडीटीवी खबर' या वृत्तसंस्थळावर मुंबईच्या वार्ताहराची बातमी असाच उल्लेख आहे.
हिंदी वृत्तपत्रांमध्ये बाँबेला बंबई म्हणण्याबाबत अट्टाहास आहे आणि त्याचे कारण त्या भाषेतील उच्चार करण्याची पद्धत आहे. (उदा. बाँबसाठी बम)

विकास's picture

9 Nov 2009 - 11:10 pm | विकास

आपले म्हणणे अशंतः बरोबर आहे असे फारतर म्हणता येईल...

बॉबे हाय कोर्ट चे नाव अजून सरकारीपातळीवर तसेच आहे. मात्र ते खटल्यामधे मुंबईच वापरतात. बॉंबे स्टॉक एक्स्चेंज जरी सरकारी नियंत्रण असले तरीही खाजगी कंपनी आहे. त्यामुळे त्यांना जे काही नाव ठेवायचे असेल ते, ते ठेवू शकतात. पण शेवटी त्यांच्या माहीती संदर्भातील लोगोत मुंबईच दिसते.

बाकी एनडीटीव्हीच कशाला नवभारत टाईम्स ज्या राष्ट्रीय वृत्तपत्रसमुहाचा भाग आहे ते मुंबईच वापरतात. पण माझा मुद्दा हा वरील (मूळ) लेखात जो चुकीचा मुद्दा बरोबर म्हणून दाखवण्यात आला आहे त्याबाबतीत आहे.

हिंदी वृत्तपत्रांमध्ये बाँबेला बंबई म्हणण्याबाबत अट्टाहास आहे आणि त्याचे कारण त्या भाषेतील उच्चार करण्याची पद्धत आहे.

तोच तर माझा मुद्दा आहे की हे चूक आहे. बोलताना बोली भाषेतील उच्चार वापरले तरी लिहीताना अधिकृत नावेच लिहीली गेली पाहीजेत. त्याच संदर्भात मी म्हणले होते की माझे नाव (अमेरिकन्स) जरी चुकीचे उच्चारत असतील तरी स्पेलींग चुकीचे लिहीले जात नाही.

अक्षय पुर्णपात्रे's picture

9 Nov 2009 - 11:34 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री विकास, मुंबई शेअर बाजाराचा येथे जाऊन अधिकृत लोगो पहावा. त्याखाली दिलेल्या माहितीतील खालील वाक्य येथे देत आहे.
The Stock Exchange, Mumbai is now Bombay Stock Exchange Limited (BSE)… a new name, and an entirely new perspective… a perspective born out of corporatisation and demutualisation.

बाकी एनडीटीव्हीच कशाला नवभारत टाईम्स ज्या राष्ट्रीय वृत्तपत्रसमुहाचा भाग आहे ते मुंबईच वापरतात. पण माझा मुद्दा हा वरील (मूळ) लेखात जो चुकीचा मुद्दा बरोबर म्हणून दाखवण्यात आला आहे त्याबाबतीत आहे.

तुमच्या मुद्द्याला मी कुठेही आक्षेप घेतलेला नाही. बहूतांश हिंदी प्रसारमाध्यमे मुंबईला मुंबईच म्हणतात. (बाँबेचे बंबई करतात.) तुम्ही तुमच्या प्रतिसादात पुढील विधान केले आहे.

पण मुंबईच्या बाबतीत आजच्याच हिंदी वृत्तपत्रातील बातम्यांमधे काय दिसेल, ते येथे पहा.

त्या बातम्यांमध्ये बंबई असे म्हणण्याचे काय कारण असावे याचे स्प्ष्टीकरण मी माझ्या प्रतिसादात देण्याचा प्रयत्न केला आहे.

बोलताना बोली भाषेतील उच्चार वापरले तरी लिहीताना अधिकृत नावेच लिहीली गेली पाहीजेत.

हेच तत्त्व मराठी भाषिकांनीही पाळावे असे तुमचे मत असावे. मराठी वृत्तपत्रात 'न्यु डेल्ही'ला 'नवी दिल्ली' असे म्हटले जाते तर हिंदीत 'नई दिल्ली' असे म्हटले जाते. जर हिंदीभाषेत बॅ, बॉ असे उच्चारच नसतील तर त्या मर्यादेलाही ध्यानात घेतले जावे इतकेच माझे मत आहे.

विकास's picture

10 Nov 2009 - 12:11 am | विकास

त्या बातम्यांमध्ये बंबई असे म्हणण्याचे काय कारण असावे याचे स्प्ष्टीकरण मी माझ्या प्रतिसादात देण्याचा प्रयत्न केला आहे.

तसा प्रयत्न तुम्ही मूळ लेखातील खालील वाक्यांसदर्भात दिलेला दिसला नाही, ज्यात निव्वळ दिशाभूल आहे:

जर आपला मुंबईचे नाव बदलायला किंवा चुकीचे उच्‍चारायला विरोध असेल तर हाच न्‍याय इतर राज्‍यातील शहरांना का नको... मात्र तसे नाही. आपण बिहारची राजधानी पटना असतानाही सरळ पाटणा म्हणणार. मध्‍यप्रदेशातील भोपाल शहराला सरळ भोपाळ म्हणणार, इतकेच काय चेन्नईला मद्रास म्हणणारे आणि इंदौरला इंदूर म्हणण्‍याचा अट्टहास आपलाच ना? त्‍याच पध्‍दतीने बेंगलोर किंवा बेंगलूरूचे नाव बंगळुरू आणि ग्वाहाटीचे गुवाहाटी किंवा गौहत्ती करणारेही आपणच ना? असे अनेक नावे असू शकतील.

हेच तत्त्व मराठी भाषिकांनीही पाळावे असे तुमचे मत असावे.

अर्थातच. आणि माझ्या माहीतीप्रमाणे इतरत्र नाव बदलण्याच्या विरोधात मराठी माणसाने अथवा मराठी माध्यमांनी कधी आवाज केल्याचे ऐकीवात नाही. तेच तत्व सर्वत्र असावे इतकेच म्हणणे आहे. ते तुम्हाला मान्य आहे का?

त्याही पुढे जाउन मी इतकेच म्हणेन की इतरत्रपण सामान्य माणसाला मुंबईच्या नाव बदलण्याचे किती पडले असेल या विषयी शंका आहे. तो फरक पाडणारे हे राजकारणी आणि तथाकथीत बुद्धीवंत आहेत असे माझे म्हणणे आहे.

अक्षय पुर्णपात्रे's picture

10 Nov 2009 - 12:17 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री विकास, मूळ चर्चाप्रस्तावावर चर्चा करावीशी वाटली नाही. नावांचा उल्लेख सामान्य लोक सोयीनुसार करतात, असे माझे मत आहे. मूळ चर्चाप्रस्तावाबाबत काहीच मत नोंदवू इच्छित नाही.

तेच तत्व सर्वत्र असावे इतकेच म्हणणे आहे. ते तुम्हाला मान्य आहे का?

हेच तत्त्व सार्वत्रिक असावे असेच मलाही वाटते पण मी एखाद्या भाषेच्या मर्यादांना विचारात घेण्यास तयार आहे.

विकास's picture

10 Nov 2009 - 12:26 am | विकास

मूळ चर्चाप्रस्तावाबाबत काहीच मत नोंदवू इच्छित नाही.

हे बरं आहे. म्हणजे माझे प्रतिसाद ज्या चर्चेस/लेखास अनुलक्षून आहेत त्याचा संदर्भ न घेताच त्यावर (माझ्या प्रतिसादावर) उपचर्चा घडवून आणायची... चांगले बुद्धीवादी आहात....

... पण मी एखाद्या भाषेच्या मर्यादांना विचारात घेण्यास तयार आहे.

मी कुठे भाषेच्या मर्यादांचा विचार करत नाही आहे? पण भाषेच्या मर्यादांचा विचार हा उच्चारात करणे एक आणि लिहीताना अथवा इतर भाषेतील मूळ शब्दांनाच त्यासाठी विरोध करत इतर भाषांचा अनादर करायचा हे पण आपल्या विचारात बसते का?

अक्षय पुर्णपात्रे's picture

10 Nov 2009 - 12:44 am | अक्षय पुर्णपात्रे

म्हणजे माझे प्रतिसाद ज्या चर्चेस/लेखास अनुलक्षून आहेत त्याचा संदर्भ न घेताच त्यावर (माझ्या प्रतिसादावर) उपचर्चा घडवून आणायची...

श्री विकास, आपल्या प्रतिसादावर चर्चा घडवण्याचीही इच्छा नव्हती. (तुम्ही ती घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि आता ती लांबते आहे.) आपल्या प्रतिसादातील केवळ एका विधानास (आक्षेप न घेता) स्पष्ट करण्याचा प्रयत्न होता. तुम्हाला ते पटले नसल्यास ठीक आहे, रोष नसावा.

विकास's picture

10 Nov 2009 - 12:50 am | विकास

(तुम्ही ती घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि आता ती लांबते आहे.)
मूळ लेखातील तृटी न दाखवता त्या दाखवणार्‍या मुद्यांसंदर्भात विषय बदलणारे मुद्दे उपस्थित केल्याने चर्चा लांबत गेली. माझ्यामुळे नाही...

पण भाषेच्या मर्यादांचा विचार हा उच्चारात करणे एक आणि लिहीताना अथवा इतर भाषेतील मूळ शब्दांनाच त्यासाठी विरोध करत इतर भाषांचा अनादर करायचा हे पण आपल्या विचारात बसते का?

याचे उत्तर देयला विसरलात का याला पण मूळ चर्चेप्रमाणे उत्तर नाही?

अक्षय पुर्णपात्रे's picture

10 Nov 2009 - 12:57 am | अक्षय पुर्णपात्रे

मूळ लेखातील तृटी न दाखवता त्या दाखवणार्‍या मुद्यांसंदर्भात विषय बदलणारे मुद्दे उपस्थित केल्याने चर्चा लांबत गेली. माझ्यामुळे नाही...

श्री विकास, विषय बदलणारे मुद्दे मलातरी वाटले नाही.

याचे उत्तर देयला विसरलात का याला पण मूळ चर्चेप्रमाणे उत्तर नाही?

विसरलो कारण हा संवाद थांबवावा असे मला वाटत होते. (इतरठिकाणी दुसर्‍या एका चर्चेवर मत मांडत असल्यानेही तसे घडले असावे. ) आता उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.

पण भाषेच्या मर्यादांचा विचार हा उच्चारात करणे एक आणि लिहीताना अथवा इतर भाषेतील मूळ शब्दांनाच त्यासाठी विरोध करत इतर भाषांचा अनादर करायचा हे पण आपल्या विचारात बसते का?

हे माझ्या विचारात बसत नाही आणि माझा त्याला विरोध आहे. मी पुर्वीच म्हटल्याप्रमाणे हिंदी प्रसारमाध्यमे बम्बई असा उल्लेख करत असल्यास ते निषेधार्ह आहे.