अल्पमोली बहुगुणी "आले पाचक"

jaypal's picture
jaypal in पाककृती
6 Nov 2009 - 1:09 pm

नमस्कार मंडळी
तात्याच्या हाटेलात वेगवेगळ्या बल्लवाचार्यांचे वेगवेगळे शाकाहरी व मांसाहारी पदार्थ खाल्याने माझे पोट आनंदाने बहरले(फुगले,तटतटले). हा बहर काही केल्या ओसरेचना. :''(
मग काय चालु केला आपला जुनाच उपाय "आले पाचक"
आपल्या साठी "आले पाचक" पाक क्रुती सविनय सादर
साहीत्य

१. रसदार पिवळे धम्मक लिंबु

२. ताजे आले

३. काळे मीठ

प्रथम लिंबु व आले स्वछ धुवुन घ्यावे.(शक्यतो आल्याची साल तशीच असुद्यावी आल्याला उगीचच नाही indian ginseng म्हणतात.)
२/३ इंच लांब आल्याचे बारीक काप करावेत. त्या मधे ५/६ चमचे लिंबु रस घालावा.
या मिश्रणात आवडीनुसार (अर्धा चमचा) काळे मीठ घालावे. ३०/४० मिनीटे मुरुद्यावे.(साधारण गुलाबी रंग येतो या मिश्रणाला. मला आवडते म्हणुन मी यात थोड्या ओल्या हळदीचे तुकडे देखिल टाकतो.)
लहान मुले देखिल आवडिने खातात. फ्रीज मधे साधारण आठवडाभर टिकते पण शक्यतोवर ताजे करुनच खावे.
गणपा शेठ येउद्यात रेशीप्या आम्हिपण तयारीत (तयारीचे म्हणा हवे तर) आहोत.
हे घ्या अल्पमोली बहुगुणी "आले पाचक" आपल्या उदर सेवेशी तयार.

ता.क. :
हे पाचक अपचन, वायुविकार, चव नसणे इत्यादि पचन विकारात अत्यंत गुण्कारी असुन अश्या प्रकारचे त्रासेस होत असल्यास क्रुपया सोडा पिउ नये, तर सारखे गरम (कोमट नव्हे) पाणि प्यावे खुप चंगला फरक पडतो. स्वानुभवावरुन सांगतो.

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Nov 2009 - 1:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अरे व्वा! 'इनो'ला देशी रसायनांची टक्कर ... चला निवासी-अनिवासी भांडणासाठी आणखी एक धागा!

सॉरी हो जयपाल ... पण ही &ही प्रतिसाद टाकण्याचा मोह आवरला नाही.

अदिती

प्रभो's picture

6 Nov 2009 - 2:17 pm | प्रभो

पहिलाच प्रतिसाद ही & ही.... =)) =))
कंपूचे काय म्हणणे आहे यावर???

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

फक्त साध मीठ घातल तरच येतो....काळ्या मीठा मध्ये असे काही घटक आहेत की त्याने गुलाबी रंग येत नाही..छान गुलाबी रंग हवा असेल तर..साध मीठ वापरायच..मी परवाच केल आहे आल्याच पाचक.. :-)

ब्रिटिश टिंग्या's picture

6 Nov 2009 - 2:29 pm | ब्रिटिश टिंग्या

jaypalसाहेब!

आमच्या काही (खरं म्हणजे बर्‍याच) आंतरजालीय विरोधकांना याचा उपयोग होईल! :)

"सर्व प्रकारच्या पोटदुखिवर" जालिम उपाय
कोणाचाही उदरशुळ शमवा
==========================================
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

गणपा's picture

6 Nov 2009 - 4:18 pm | गणपा

मस्त रे जयपाल.
साबणाच्या पाण्याच्या चवी सारख इनो झक मारते या पुढे.

हरकाम्या's picture

6 Nov 2009 - 8:22 pm | हरकाम्या

भाउ याचं "पेटंट " घेउन टाक.

JAGOMOHANPYARE's picture

6 Nov 2009 - 9:01 pm | JAGOMOHANPYARE

लई भारी..... घरी आई नेहमी करते.

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

स्वाती२'s picture

6 Nov 2009 - 9:53 pm | स्वाती२

मस्त! मी करते नेहमी. मी हळदीच्या बरोबर आंबेहळद पण घालते.

हा प्रयोग मी सुद्धा केला होता पण आंबेहळदीला थोडासा (चीकुसारखा) चिकट पणा असल्याने घश्यात खवखवते म्हणुन पुन्हा वापरली नाही.

==========================================
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

पक्या's picture

7 Nov 2009 - 12:01 am | पक्या

आले पाचक छान.

'अश्या प्रकारचे त्रासेस' :O -
त्रासेस शब्द गमतीत वापरलाय की तुम्ही त्रास चे अनेकवचन असेच करतात?

पक्याशेठ
त्रास चे अनेकवचन गमतीत मी असेच करतो.
==========================================
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

वैशू's picture

7 Nov 2009 - 12:02 am | वैशू

माझ्या सासूबाईंचा पण हा बरसोंसे आजमाया हुआ नुस्खा आहे.आणि खरोखरच खूप उपयुक्त आहे. :)

टुकुल's picture

7 Nov 2009 - 12:09 am | टुकुल

भारी आहे..
पहिल्यांदाच ऐकले.. ट्राय करुन पाहतो..

--टुकुल.

मदनबाण's picture

7 Nov 2009 - 12:51 pm | मदनबाण

तोंडाला चव नसली तरी,आले लिंबाच्या या रसाने गेलेली चव परत यायला मदत होते... घरच्या घरी पटकन बनवता येणारा मस्त पाचक पदार्थ.

मदनबाण.....

आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

7 Nov 2009 - 2:17 pm | भाग्यश्री कुलकर्णी

आमची आजी काहिही होत असलं तरी पहिल्यांदा हेच द्यायची औषध म्हणुन.

मसक्कली's picture

10 Nov 2009 - 12:12 pm | मसक्कली

>>>'अश्या प्रकारचे त्रासेस' - :O
त्रासेस शब्द गमतीत वापरलाय की तुम्ही त्रास चे अनेकवचन असेच करतात?

=)) =)) =))

आसे विचारुन त्याना त्रासेस' देउ नका.. ;) >:)

मसक्कली's picture

10 Nov 2009 - 12:15 pm | मसक्कली

>>>आमची आजी काहिही होत असलं तरी पहिल्यांदा हेच द्यायची औषध म्हणुन

=)) =)) =))

१ औषध सगळ्याच त्रासेस वर... :B :B :B

=)) =)) =))