बदाम बर्फी

खान्देशी's picture
खान्देशी in पाककृती
5 Nov 2009 - 10:22 pm

खान्देशात थंडी म्हटली कि चंगळ असते. येणाऱ्या कडक उन्हाळ्यासाठी शरीराला तयार करायला वेग वेगळे पौष्टिक पदार्थ जसे शुद्ध तुपातले मेथीचे लाडू ,डिंकाचे लाडू ,सुक्या मेव्याचे लाडू आजही घरोघरी बनवले जातात. हाताचे न राखून पाहुणचाराला सुद्धा ह्या गोष्टी दिल्या जातात. तसाच एक पौष्टिक पण बनण्यास सोप्पा पदार्थ इथे देत आहे ..

बदाम बर्फी

साहित्य :- एक कप बदाम, १/२ कप दुध , एक कप साखर, दोन चमचे साजूक तूप, १/२ चमचा वेलदोडा पूड

कृती :- बदाम कोमट पाण्यात १०-१५ मिनिट भिजत घाला. मग बदामाची सालपटे कडून टाका. बरोबर अर्धा कप दुध आणि बदाम, साखर व वेलदोडा पूड
ग्रैंड करा. मस्त बारीक पेष्ट झाली पाहिजे.
जाड बुडाच्या पातेल्यात तूप टाकून थोडे गरम झाल्यावर बदामाची पेष्ट ओतून मंद आचेवर मिश्रण हलवत राहा. साधारण १०-१५ मिनिटात मस्त गोळा तयार होईल. तूप लावलेल्या ताटली मध्ये मिश्रण पसरून थोडे थंड झाल्यावर वड्या हव्या त्या आकारात पाडा. डेकोरेशन साठी प्रत्येक वडी वर एखादा बदाम खोवला तरी चालेल.

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

5 Nov 2009 - 10:27 pm | चिरोटा

मस्त दिसतेय. पाकृ एवढी सोपी असेल असे वाटले नव्हते. करुन बघायला पाहिजे.
(बर्फी प्रेमी) भेंडी
P = NP

प्रभो's picture

5 Nov 2009 - 10:52 pm | प्रभो

मस्त रे...
(बदाम प्रेमी)प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

मदनबाण's picture

5 Nov 2009 - 10:57 pm | मदनबाण

मस्त... :)

मदनबाण.....

आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.

रेवती's picture

5 Nov 2009 - 11:28 pm | रेवती

पौष्टिक पाकृ पाहून आनंद झाला. फोटोही मस्त!

रेवती

चित्रा's picture

6 Nov 2009 - 10:10 am | चित्रा

छान आहे पाककृती. फोटोही आवडला.
याला वर्ख लावतात का? का तो फक्त काजूकतलीलाच?

बाकी बदाम बर्फी मस्त झाली आहे.

वेताळ

sneharani's picture

6 Nov 2009 - 12:02 pm | sneharani

मस्तच... अगदी सोपी आहे,
फोटोदेखील छान..!

गणपा's picture

6 Nov 2009 - 4:21 pm | गणपा

मस्त आणि तितकीच सोप्पी कृती.
फोटु पण झक्कास आलय.
जियो खान्देशी....
जियो शब्द तात्याकडुन उधार

खान्देशी's picture

7 Nov 2009 - 12:32 am | खान्देशी

खाव्वय्यांचे धन्यवाद!!!

@चित्रा
वर्ख लावायची आयडिया छान!

@वेताळ
काजू कतली साठी थोडा द्राविडी प्राणायाम करावा लागतो.

प्रतिक्रिया देत नव्हतो [( शेवटी न राहवून देतोच आहे! L)
फारच छान दिसताहेत वड्या. कापल्यादेखील आहेत अगदी निगुतीनं. सुरेख! :)
(चांदीच्या वर्खाशिवायच सुरेख दिसताहेत.)

(बदाम राजा)चतुरंग

अवलिया's picture

7 Nov 2009 - 12:18 pm | अवलिया

मस्त !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

7 Nov 2009 - 2:23 pm | भाग्यश्री कुलकर्णी

छानच आहेत वड्या.पध्दतही सोपी आहे.

स्वाती२'s picture

7 Nov 2009 - 6:02 pm | स्वाती२

छान सोपी पाकृ आवडली.

मसक्कली's picture

10 Nov 2009 - 11:24 am | मसक्कली

सोपी अन मस्त... :)