हे संगीत कुठे ऐकले आहे?

हुप्प्या's picture
हुप्प्या in काथ्याकूट
5 Nov 2009 - 10:16 pm
गाभा: 

http://www.youtube.com/watch?v=VX-qDsTNLvg

ही क्लिप ऐका. ह्यातले संगीताचे काही तुकडे कुठल्या मराठी गाण्यात ऐकले आहेत आठवते का?

प्रतिक्रिया

दशानन's picture

5 Nov 2009 - 10:19 pm | दशानन

[(

नाही.

पीस हा "अखेरचा हा तुला दंडवत" या गाण्यातला वाटला.

प्रमोद देव's picture

5 Nov 2009 - 10:56 pm | प्रमोद देव

सहमत आहे.

कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!

रामपुरी's picture

6 Nov 2009 - 2:50 am | रामपुरी

"अखेरचा...." मधीलच आहे असं वाटतंय.

इथे नक्की कुणी उचलेगिरी केली म्हणायची?

(तसेही चोरीला चोरी म्हणायचे दिवस नाही राहीले म्हणा आता... हल्ली त्याला जाणकारी म्हणतात)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Nov 2009 - 10:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मधेच एकदम 'रहे ना रहे हम' सारखं वाटलं. पण माझ्यासारख्या दगडांची मतं विचारात नका घेऊ.

अदिती

संजय अभ्यंकर's picture

6 Nov 2009 - 3:00 pm | संजय अभ्यंकर

चित्रपटः ममता, संगीतः रोशन.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

दिलीप वसंत सामंत's picture

5 Nov 2009 - 11:18 pm | दिलीप वसंत सामंत

क्लिप ऐकली पण लक्षात येत नाही. पण ह्यावरून आठवले माझ्याकडे MUSIC FOR AN ARABIAN NIGHT ही RON GOODWYN ची एल. पी. आहे त्यात BAREFOOT GIRL हे संगीत आहे त्यावरून एक हिंदी गाणे सरळ सरळ घेतले आहे. त्याची क्लिप यू ट्यूब वर RON GOODWYN असा सर्च देऊन BAREFOOT GIRL यावर क्लिक केल्यास ऐकता येईल.

टारझन's picture

5 Nov 2009 - 11:26 pm | टारझन

पुसटसं आठवतंय खरं ....

--(पुसट) टारझन

चिंतामणराव's picture

5 Nov 2009 - 11:49 pm | चिंतामणराव

अगदी बरोबर "अखेरचा...." मधलाच पीस आहे

चिंतामणराव .....आमचा हरी आहे...

भडकमकर मास्तर's picture

6 Nov 2009 - 12:36 am | भडकमकर मास्तर

०१ ते ०८ सेकंदाच्या अवकाशात तैत्तिरीय संहितेतील काही रचनांचे एका रशियन विद्वानाने रशियनमध्ये भाषांतर केले होते , चाल लावून , त्यात काही संगीताचे तुकडे असे होते असे वाटते....
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Nov 2009 - 11:02 pm | बिपिन कार्यकर्ते

:O :O :O

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Nov 2009 - 6:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मास्तर, तुम्ही जालिंदर बाबांकडेच संगीत शिकला होतात ना!

अदिती

घाटावरचे भट's picture

6 Nov 2009 - 1:38 am | घाटावरचे भट

०.१० ते ०.१९ मधला तुकडा आणि लताबाईंच्या 'आकाश के उस पार भी' गाण्याचा सुरुवातीचा तुकडा अगदी सारखा आहे (अगदी वाद्यदेखील तेच आहे (स्ट्रिंग्ज आन्साम्बल बहुधा)).

हुप्प्या's picture

6 Nov 2009 - 10:41 am | हुप्प्या

मलाही वर म्हटल्याप्रमाणे ह्यातले काही तुकडे अखेरचा हा तुला दंडवत ह्या गाण्यातील एका संगीताच्या तुकड्यासारखे ह्बेहूब वाटले.
हा योगायोग नसावा.
"अखेरचा हा..." इथे ऐका.
http://www.youtube.com/watch?v=zOU-QH4so8Y

(ह्या गाण्यातील प्रतिध्वनी उषा व मीना ह्या मंगेशकर भगिनींचा आहे.)

जे.पी.मॉर्गन's picture

6 Nov 2009 - 4:38 pm | जे.पी.मॉर्गन

कुमार शानूचे 'जब कोई बात बिगड जाये' ह्याच जातीचं आहे का हो?

दिलीप वसंत सामंत's picture

10 Nov 2009 - 6:38 pm | दिलीप वसंत सामंत

YOUTUBE वर RON GOODWYN असा सर्च देऊन "MURDER SHE SAYS MARPLE'S THEME' हे संगीत ऐका. यावरून किशोरकुमार चे "प्यार बांटते चलो" या गाण्यात काही भाग आहेत.
तसेच JIM REEVES च्या "NUMBER 54 HOUSE OF BAMBOO" यावरून "नंबर ५४ द हाऊस विथ द बांबू डोअर" व "PAPA SHE LOVE MAMA , MAMA SHE LOVE PAPA" या गाण्यावरून "पपा सांगा कुणाचे" अशी दोन मराठी गाणी आहेत (चित्रपट - "घरकुल")अशी अनेक उदाहरणे असतील.
भारतीय संगीतात रागदारीवर, लोकगीतावर अगर लोकसंगीतावर आधारित असल्यास सारख्या सुरावटीची अगर चालीची गीते आढळून येतील.
काही वर्षापूर्वी पु. ल. नी घेतलेल्या एका मुलाखतीत किंवा चर्चेत (मला वाटते माणिक वर्मा यांचे बरोबर)
गाण्यांतील सारखे पणा दाखवण्यासाठी एकाच चालीतील गाण्यांची खालील उदाहरणे दिली होती.

यदुमनी सदना / ननदिया काहेको.

नाही मी बोलत आता नाथा / हमसे ना बोलो राजा.

बाई मी विकत घेतला शाम / माई मैने गोविंद लीनो मोल.

एका मराठी सिनेमात "SOUND OF MUSIC" मधील "DO RE MI"
या गाण्यावर "सा रे ग म" असे गाणे आहे