(नसतेस घरी तू जेव्हा )

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
6 Mar 2008 - 1:05 am

आमची प्रेरणा संदिप खरे यांची अप्रतिम कविता नसतेस घरी तू जेव्हा

नसतेस घरी तू जेव्हा
जीव हलका हलका होतो
पीण्याला जमती सारे
अन्‌ एकच गलका होतो

नभ फाटून वीज पडावी
जल्लोश तसा मी करतो
ही शुद्ध जरा क्षीण होते
अन्‌ पती बोलका होतो

येताच विड्या ओठांशी
मी दचकून बघतो मागे
खिडकीशी थांबून ओढा
मग गंध तयांचा जातो

तव घरात अवतरण्याच्या
मज स्मरती घातकवेळा
घर भरभर अवरून सगळे
मी पुन्हा सात्त्विक होतो

तू सांग सख्या मज काय
तू केले मी नसताना ?
माझा मग जीव उगाच
भात्यासम धडधड करतो

ना अजून झालो चालू
ना हुशार अजुनी झालो
तुज पाहून मी डगमगतो
अन् चरणा वर तव पडतो !

प्रतिक्रिया

सुवर्णमयी's picture

6 Mar 2008 - 1:06 am | सुवर्णमयी

वा! क्या बात है!

चतुरंग's picture

6 Mar 2008 - 1:11 am | चतुरंग

आज घरी कोणी दिसत नाहीये!:)) एकामागून एक धोबीपछाड सुरु आहेत म्हणून विचारतोय!
हायक्लास विडंबन!!

चतुरंग

इनोबा म्हणे's picture

6 Mar 2008 - 1:12 am | इनोबा म्हणे

भन्नाट,रे केश्या....
नसतेस घरी तू जेव्हा
जीव हलका हलका होतो
पीण्याला जमती सारे
अन्‌ एकच गलका होतो

लईच जबरा...

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा(मिसळबोध)

सर्किट's picture

6 Mar 2008 - 1:17 am | सर्किट (not verified)

तू सांग सख्या मज काय
तू केले मी नसताना ?
माझा मग जीव उगाच
भात्यासम धडधड करतो

आहाहा ! अती सुंदर !!

- सर्किट

प्राजु's picture

6 Mar 2008 - 1:51 am | प्राजु

काय केशव, आज एकदम धडाधड विडंबने येत आहेत...
खरं सांगायचं तर मला ते "नसतेस घरी तू जेव्हा" इतके नाही आवडत. पण विडंबन एकदम जबरा.. हेच जास्ती आवडले.
- (सर्वव्यापी)प्राजु

विसोबा खेचर's picture

6 Mar 2008 - 9:47 am | विसोबा खेचर

तव घरात अवतरण्याच्या
मज स्मरती घातकवेळा
घर भरभर अवरून सगळे
मी पुन्हा सात्त्विक होतो

वा वा! क्या बात है...

अवांतर -

मी पुन्हा सात्त्विक होतो

च्या ऐवजी,

पुन्हा मी सात्विक होतो

असे चालेल का?

आपला
(कवितेतलं फारसं काही न समजणारा) तात्या.

केशवसुमार's picture

6 Mar 2008 - 9:50 am | केशवसुमार

म्हणताना
'मी पुन्हा सात्त्विक होतो' हे जस्त चपखल बसते आहे..
आपला
(गाण्यातल फारस काही न समजणारा)केशवसुमार

विसोबा खेचर's picture

6 Mar 2008 - 10:00 am | विसोबा खेचर

बॉस.

धोंडोपंत's picture

6 Mar 2008 - 12:04 pm | धोंडोपंत

वा वा केशवराव,

अप्रतिम विडंबन . झकास . मजा आली.

आपला,
(आस्वादक) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Mar 2008 - 12:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपले एकापेक्षा एक सरस विडंबने वाचायला मिळत आहेत, आमची सुटी कारणी लागली :)

नसतेस घरी तू जेव्हा
जीव हलका हलका होतो
पीण्याला जमती सारे
अन्‌ एकच गलका होतो

आपल्या विडंबनाची एकदा सुरुवात जोरदार झाली की, उत्तरार्ध, आणि शेवट लाजवाब होतो, हा आमचा अनुभव आहे.
सारांश, विडंबन आवडले :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहज's picture

6 Mar 2008 - 12:50 pm | सहज

मस्त

केशवसुमार's picture

7 Mar 2008 - 9:45 am | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
केशवसुमार

तात्या विन्चू's picture

7 Mar 2008 - 9:53 am | तात्या विन्चू

माझ्या मते, जर हे विडम्बन खुद्द सन्दीप खरेनीदेखील वाचले, तर त्यानाही हसू आवरणार नाही.

फार झक्कास जमलय! लगे रहो!

आपला,
ओम फट स्वाहा....
तात्या विन्चू

झकासराव's picture

7 Mar 2008 - 11:12 am | झकासराव

जबराट विडंबन आहे हे :)

धमाल मुलगा's picture

7 Mar 2008 - 9:45 pm | धमाल मुलगा

खल्लास्स्स .... एक से बढकर एक.
जियो केशवराव...

नंदन's picture

8 Mar 2008 - 4:05 pm | नंदन

सही जमलंय विडंबन.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

स्वाती राजेश's picture

8 Mar 2008 - 4:15 pm | स्वाती राजेश

मस्त विडंबन झाले आहे.
खासच....

आजानुकर्ण's picture

18 Mar 2008 - 5:39 pm | आजानुकर्ण

झकास विडंबन आचार्य. अत्यंत आवडले.

(हसरा) आजानुकर्ण

दवबिन्दु's picture

11 Apr 2009 - 11:08 am | दवबिन्दु

फुल्टु मजा आलीव. :) :) :)

प्रकाश घाटपांडे's picture

11 Apr 2009 - 1:20 pm | प्रकाश घाटपांडे

बेष्टच एका वर्षानी जालिंदरबाबाच्या कृपने पुन्हा काव्याचा आनंद घेता आला.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

परिकथेतील राजकुमार's picture

11 Apr 2009 - 1:26 pm | परिकथेतील राजकुमार

झकासच ! एकदम एव्हरग्रिन विडंबन.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

निखिलराव's picture

11 Apr 2009 - 1:29 pm | निखिलराव

नभ फाटून वीज पडावी
जल्लोश तसा मी करतो
ही शुद्ध जरा क्षीण होते
अन्‌ पती बोलका होतो

जय हो...........

संध्यानंदन's picture

11 Apr 2009 - 4:00 pm | संध्यानंदन

एकदम नादखुळा..............

संध्यानंदन's picture

11 Apr 2009 - 4:00 pm | संध्यानंदन

एकदम नादखुळा..............

संध्यानंदन's picture

11 Apr 2009 - 4:00 pm | संध्यानंदन

एकदम नादखुळा..............

समिधा's picture

11 Apr 2009 - 10:49 pm | समिधा

एकदम मस्त विडंबन

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

मीनल's picture

12 Apr 2009 - 6:22 am | मीनल

ओरिजिनल गाण खूप आवडत.
विडंबने फारशी आवडत नाहित. पण हे आवडल.

मीनल.

सिद्धू's picture

12 Apr 2009 - 11:33 am | सिद्धू

लय भारी विडंबन केशवसुमार !!!!!

मदनबाण's picture

12 Apr 2009 - 12:25 pm | मदनबाण

येताच विड्या ओठांशी
मी दचकून बघतो मागे
खिडकीशी थांबून ओढा
मग गंध तयांचा जातो
हा.हा.हा.... करेक्ट. :)

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

अभिज्ञ's picture

12 Apr 2009 - 6:09 pm | अभिज्ञ

उच्च विडंबन.
लगे रहो

अभिज्ञ.

सुधीर कांदळकर's picture

12 Apr 2009 - 7:01 pm | सुधीर कांदळकर

व्रात्य नवर्‍याच्या सोनेरी अनुभवाची रम्य आठवण ताजी केली.

पण खिडकीत उभें राहून धूम्रपान केलें तर लक्षांत ठेवा पडद्यांना धूम्रकाष्ठाचा - सिगारेटचा वास येतो. पण मूळ कविता अग्निकोल्ह्यावर दिसत नाहीं.

सुधीर कांदळकर.

चन्द्रशेखर गोखले's picture

12 Apr 2009 - 7:34 pm | चन्द्रशेखर गोखले

बेफाम, फण्टास्टिक, लै भारी !!!

बट्ट्याबोळ's picture

12 Apr 2009 - 8:45 pm | बट्ट्याबोळ

सुंदर !!!!

अत्र्यांनंतर तुम्हीच !!!

उमेश कोठीकर's picture

13 Apr 2009 - 4:47 am | उमेश कोठीकर

चरणांवर तव पडतो.....! हा हा हा. येथ शरण आलेया काय मरण असे? :''(

इंटरनेटस्नेही's picture

26 Oct 2010 - 3:40 pm | इंटरनेटस्नेही

जबरी!

पैसा's picture

26 Oct 2010 - 9:01 pm | पैसा

इंट्या, तुझं उत्खननाचं काम असंच जोरात चालू ठेव म्हणजे आम्हाला आयतेच जुने चांगले धागे वाचायला मिळतील.

आता वाचलं हे विडंबन!
खी खी खी!
हा धागा वर येण्यास कारणीभूत ठरलेले इंटरनेटस्नेही, वय वर्षे २२ यांचे आभार!;)

प्यारे१'s picture

4 Oct 2013 - 2:29 am | प्यारे१

हा हा हा....
केसु ह्यांचं जबरा विडंबन वाचण्याचा योग आला.

>>>इंटरनेटस्नेही, वय वर्षे २२
आता वाढलं असेल अशी अपेक्षा आहे. मात्र हल्ली हे आदरणीय सलग एकच जीन्स ४५ दिवस न धुता वगैरे वापरण्याचा विक्रम करत आहेत असं विशेष सूत्रांकडून समजतं.

नगरीनिरंजन's picture

26 Oct 2010 - 9:04 pm | नगरीनिरंजन

फर्मास!

मराठमोळा's picture

26 Oct 2010 - 11:35 pm | मराठमोळा

:D
लै भारी. लग्न झालेल्या स्वातंत्र्य हिरावुन घेतलेल्या पुरुषांच्या व्यथेला वाचा फोडलीत. :)

Pearl's picture

8 Dec 2010 - 2:44 pm | Pearl

मस्तच विडंबन!
वाचताना मस्त मजा आली.
ओरिजनल कवितेइतकेच विडंबन पण आवडले :)

सूड's picture

8 Dec 2010 - 5:06 pm | सूड

वाह वाह !!

मेघवेडा's picture

8 Dec 2010 - 5:12 pm | मेघवेडा

>> तव घरात अवतरण्याच्या
मज स्मरती घातकवेळा

=)) =))

याच दोन ओळींवर अडकलीये गाडी केव्हाची! जबरदस्त मजा येते आहे म्हणताना!

निरन्जन वहालेकर's picture

3 Oct 2013 - 5:09 pm | निरन्जन वहालेकर

व्वा ! क्या बात है ! खतर्नाक विडम्बन ! ! मजा आली ! ! !

अद्द्या's picture

4 Oct 2013 - 2:31 pm | अद्द्या

=))

वासु's picture

4 Oct 2013 - 4:21 pm | वासु

ती नसताना असा आनन्द घेता तर......!!!

एस's picture

5 Oct 2013 - 2:21 pm | एस

पुनःपुन्हा वाचतो आहे आणि हसूनहसून गडाबडा लोळतो आहे... हे जबराट विडंबन मूळ कवितेइतकेच खास आहे यात तिळमात्र (किंवा थेंबमात्र) ही शंका नाही... हा धागा उत्खनन करून परत वर काढल्याबद्दल मिपापुरातत्त्वखातेप्रमुख श्री वहालेकरांना धन्यवाद.

आणि केशवसुमार, टोपी काढून वर भिरकावली गेली आहे. क्या बात है. :D