आघाडीच्या पक्षांचा निषेध

देवदत्त's picture
देवदत्त in काथ्याकूट
1 Nov 2009 - 10:26 pm
गाभा: 

खरं तर निवडणूका संपल्यानंतर राजकारणावरील माझे विचार लिहायचे नाहीत असे मी ठरवले होते. पण सध्या जे काही चालले आहे त्यावर लिहावेसेच वाटते.

२२ ऑक्टो. ०९ ला च काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी ला बहुमत मिळाल्याचे सिद्ध झाले. त्यांनी २ दिवसांत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ह्यांच्या नावाची घोषणा केली.

पण आज १० दिवस झालेत तरी शपथविधी काही झाला नाही. दोन पक्षांमध्ये कोणते खाते कोणाला मिळावे (खरं तर जास्त मलई कोणाला मिळावी) ह्यावर त्यांची चर्चा चालू आहे.
शपथविधीकरीत मंडपही बांधून तयार आहे. त्याचे दररोजचे भाडे वाया जात आहे. बहुतेक नेते मुंबई-दिल्ली वार्‍या करत आहेत.
त्यात सत्यसाईबाबांच्या दर्शनाला मुख्यमंत्री दिल्लीहून परत आलेत. नुसते दर्शन नाहीच तर स्वत:च्या सरकारी निवासस्थानावर सत्य साईबाबांना आमंत्रण. (बातमी येथे आणि येथे) सत्य साईबाबांवर त्यांची श्रद्धा ह्यावर आमचा काहीच आक्षेप नाही. तुम्ही तुमच्या स्वत:च्या घरी काय करायचे ते करा. पण सरकारी निवासस्थानावर असे काही करणे चुकीचे आहे.

पण काय करणार? गेल्या १० वर्षांत जास्त काही कामे न करताही पुन्हा त्याच सरकारला निवडून आणणार्‍या जनतेचाही त्यात दोष आहेच. त्या नेत्यांना आता कळले आहे की जनतेला आपली सवय झाली आहे. आता आपण काहीही केले तरी जनता काही करणार नाही.

ह्या अशा जनतेला विचारात न घेता जनतेच्याच पैशावर सर्व काही करून नुसता वेळ आणि पैसा वाया घालवणार्‍या कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा निषेध.

ह्याच पार्श्वभूमीवर नुकतेच ऐकल्या/वाचल्यानुसार शिवसेनेने घेतलेली भूमिका योग्यच आहे असे वाटते. माझ्यामते शिवसेना व मनसेने आतापासूनच विरोधी पक्षांचा दणका दाखविला पाहिजे.

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

1 Nov 2009 - 10:52 pm | चिरोटा

माझ्यामते शिवसेना व मनसेने आतापासूनच विरोधी पक्षांचा दणका दाखविला पाहिजे

सहमत. सेनेचे मुखपत्र अजूनही पवार गँगचे कौतूक करण्यात मग्न आहे.मनसेवाले बघुया काही करतात तर्.भाजपावाले काही करतील असे दिसत नाही.इकडे कर्नाटकात त्यांची बारा वाजायची लक्षणे दिसता आहेत.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

विजुभाऊ's picture

2 Nov 2009 - 12:53 pm | विजुभाऊ

भाजपावाले काही करतील असे दिसत नाही.

तसेही ते कुठे काय करतात.
फारफार तर मुंडण करतील.

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Nov 2009 - 1:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तसेही ते कुठे काय करतात.
फारफार तर मुंडण करतील.
=))

अवांतर : विजुभौ, ते पडता पाऊस बंद करा राव आता. थंडी सुटली आहे, इकडे :)

देवदत्त's picture

2 Nov 2009 - 10:58 pm | देवदत्त

भाजपावाले काही करतील असे दिसत नाही
निदान सत्यसाईबाबा ह्या विषयात तरी नाही. गोपीनाथ मुंडे ही स्वतः बाबांच्या दर्शनाला गेले होते वर्षा बंगल्यावर, असे आजच्या एका इंग्रजी वर्तमानपत्रात वाचले.

बाकी तर आनंदच दिसत आहे.

मदनबाण's picture

1 Nov 2009 - 10:58 pm | मदनबाण

सत्यसाईबाबां असा सर्च युट्युब वर मारला आणि हे मिळाले.

http://www.youtube.com/watch?v=NOhxftt5Hn4

मदनबाण.....

अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

मुक्तसुनीत's picture

1 Nov 2009 - 11:04 pm | मुक्तसुनीत

लेखातल्या भावनांशी सहमत आहे. १० दिवस सरकारच अस्तित्त्वात नसणे.. सट्टेसाईबाबांचे नाटक. सगळा प्रकार शिसारी आणणारा आहेच; पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे आ वासून पडलेल्या शेकडो प्रश्नांची कसलीही क्षिती न बाळगता लोकांच्या पैशाचा , राज्यव्यवहारव्यवस्थेचा अपव्यय... हे सारे दशकानुदशके चालले आहे हेदेखील खरेच. पण तरी क्षम्य नाहीच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Nov 2009 - 12:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखातल्या भावनांशी सहमत आहे, तसेच मुसुच्या भावनेशी सहमत आहे.

काँग्रेसने लवकरात लवकर राष्ट्रवादीला हवी असतील ती खाते देऊन शपथविधी सोहळा आटोपून आघाडी सरकारने विकासकामांची दणक्यात सुरुवात करावी असे वाटते.

बोलो श्री सत्यसाईबाबा की.... बोलो श्री सत्यसाईबाबा की.... बोलो श्री सत्यसाईबाबा की.......

...... .......... .........

पुरोगामी महाराष्ट्रातून एकही जयजयकाराचा आवाज येऊ नये...छ्या...!

-दिलीप बिरुटे
(व्यथीत)

अमोल केळकर's picture

2 Nov 2009 - 12:28 pm | अमोल केळकर

असे ही वाचनात आले की शपथविधी समारंभासाठे जो शामियाना उभारला आहे त्याच्या भाड्यापोटी दिवसाला काही लाख रुपये मोजायला लागत आहेत.

अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

वि_जय's picture

2 Nov 2009 - 12:51 pm | वि_जय

सत्य-साईबाबा प्रकरणात 'मनसे' गप्प का?

रस्त्यावर उतरून जनतेची बा़जू मांडेन असे सांगणारे जनतेच्या पैशाचा अपव्यय होतांना गप्प का?

कि, निवडणूकीप्रमाणे इथेही 'साटेलोटे'?

टारझन's picture

2 Nov 2009 - 1:02 pm | टारझन

बाझवला एकेकाच्यामायला साला !!
एखादी पावर असती तर जेवढी धेंडं निवडून आलीत सगळ्यांच्या गौर्‍या पोचवल्या असत्या !!

-- (चित्तबेभान) टित्तर

अवलिया's picture

2 Nov 2009 - 1:22 pm | अवलिया

गौ-या नाही रे ... गोव-या... !!
दोन्ही मधे लै फरक आहे.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

टारझन's picture

2 Nov 2009 - 1:27 pm | टारझन

;)

समंजस's picture

2 Nov 2009 - 1:11 pm | समंजस

परत एकदा परशुरामानी अवतार घेण्याची वेळ आलेली दिसतेय :W

अनामिका's picture

2 Nov 2009 - 2:33 pm | अनामिका

तत्वा साठी युती करणे आणि सत्तेसाठी आघाडी करणार्‍या राजकिय पक्षांमधला हाच तर मुलभुत फरक आहे..... :?

अवांतर-कुणाच्या पक्षीय भावना दुखावल्या जात असतील तरी त्याला मी काही करु शकत नाही.तेंव्हा शक्य असल्यास सदरची प्रतिक्रिया जरा हलकेच घ्यावी" ~X(

सगळा अट्टाहास व विलंब कशासाठी तर मलिदा खाता येणारी खाती पदरात पाडुन घेण्यासाठी . निवडणुकीत पाण्यासारखा पैसा ओतलाय मग आता तो वसुल नको करायला?..... निवडणूकांचे निकाल लागुन झाले की चोर्‍या,दरोडे यांचे प्रमाण का वाढते ? :W मला कायम सतावित आलेला हा प्रश्न आहे.
रातोरात एका लग्नसमारंभाच्या कार्यालयाला कॉलेजमधे रुपांतरीत करणार्‍या माणिकराव ठाकरे ,तसेच आदिवासींना भाकड शेळ्यामेंढ्या शासकिय योजने अंतर्गत वाटुन स्वतःचे गल्ले भरण्यात धन्यता मानणारे तत्वशुन्य आणि खाबुगिरी करणारे नेते (कोणाकडे होते हे पशुसंवर्धन आणि आदिवासी विकास खाते? :< बहुदा कुणीतरि गावित म्हणुन महाभाग असावेत,ह्यांची नावे कोण लक्षात ठेवणार?)महाराष्ट्राला मिळाल्यावर महाराष्ट्राचे हेच व्हायचे .अजुन द्या निवडुन म्हणाव.१० वर्षे सोसलत अजुन५ वर्षॅ झेला यांना .स्वतःला मारे पुरोगामी म्हणवत ,व शाहु फुले आंबेडकरांच्या नावाच गजर करत मतांचा जोगवा मागणार्‍या व निवडुन येताच जनतेच्या पैशाची उधळापट्टि करत बुवाबाजी करणार्‍यांच्या भजनी लागणार्‍या नेत्यांकडुन सर्वसामान्य जनतेने अपेक्षा तरी कसली करायची?
जनतेच्या प्रश्नांची किती व स्वतः जनतेची किती पत्रास हि आघाडि ठेवते हे पुर्ण समजायचे बा़की आहे अजुन!!!!
जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची भाषा करणार्‍यांचे साधे निषेध पत्रक देखिल निघु नये ?कि फक्त १३ आमदार निवडुन आले यावरच समाधान मानण्यात आणि विजयोत्सव साजरा करण्यात अजुन व्यग्र आहेत शिलेदार.....सरदार?

"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Nov 2009 - 11:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>रातोरात एका लग्नसमारंभाच्या कार्यालयाला कॉलेजमधे रुपांतरीत करणार्‍या माणिकराव ठाकरे...

हम्म, ती बातमी तर भ्रष्टाचाराचा कळस आहे. सामान्य माणसाचे जाऊ द्या ! कमीत-कमी, 'ना शिवसेना हरली, ना मी अपराधी' असा खुलासा करणा-यांनी तरी त्यांच्या विरुद्ध बोंब ठोकली पाहिजे होती. पण तेही मराठी माणसावर पराभवाचे खापर फोडून पसार झाले, हल्ली सेना नेतेही कुठे दिसत नाही. आणि त्यांचे शिवसैनिकही.

शिवसेना कोणाची ? हा विवेक गिरधारींचा लेख मस्त आहे !!!

-दिलीप बिरुटे

अनामिका's picture

3 Nov 2009 - 1:34 am | अनामिका

बिरुटे सर !
आंम्ही लोकमत वाचत नाहि फक्त सामनाच वाचतो........ :))
'ना शिवसेना हरली, ना मी अपराधी' सध्या ते पुढे कसे होणार या विवंचनेत आहेत.
बाकी गिरिधारींचा लेख [(
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

सुहास's picture

3 Nov 2009 - 12:49 am | सुहास

तत्वा साठी युती करणे आणि सत्तेसाठी आघाडी करणार्‍या राजकिय पक्षांमधला हाच तर मुलभुत फरक आहे.....

=))
हा सगळ्यात मोठा विनोद आहे.. हे पहा बाई, सध्याच्या राजकारणात तत्व फक्त पैसा/सत्ता आहे.. पिंपरी-चिंचवड मध्ये कार्यकर्त्यांवर हल्ले होत असताना या तत्वाच्या युतीने पुणे प्याटर्न का नाही मोडला हो? की फक्त १० किमी गेल्यावर तत्वे बदलली..? अशा बर्‍याच गोष्टी आहेत.. तुमच्या युतीबद्द्ल कदाचित प्रखर भावना असतीलही, पण शेवटी सगळे "एकाच माळेचे मणी".. आता 'कोहिनूर'वाल्या जोशी काकांनी नव्हते का सांगितले गणपती दूध पितो म्हणून, मग चव्हाणांनी सत्य साईबाबा आणला तर चालेल असे म्हणून गप्प बसायचे एवढेच (दुर्दैवाने) आपल्या हाती आहे, नाही का?

अवांतरः माझ्या दॄष्टीने आघाडी काय आणि युती काय, दोघेही दरवडेखोरच!

--सुहास

अनामिका's picture

3 Nov 2009 - 1:26 am | अनामिका

बघा मी अधिच सांगितल नव्हत हलकेच घ्या म्हणुन.... 8}
असो व्यक्ती तितक्या प्रकृती(प्रवृत्ती).
:?
आणि हिंदुस्थानात व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि मतस्वातंत्र्य देखिल तेंव्हा आपली मते मांडायची मुभा प्रत्येकाला आहे. ;;)
चला म्हणजे थोडक्यात काय तर महाराष्ट्रावर दरवडेखोरांचे राज्य येणार आहे .......म्हणा दरवडेखोर निवडुन आधिच आणलेत जनतेने आता फक्त स्थानापन्न होण्याचा अवकाश आहे.कसें?
आता गणपती आणि सत्यसाई यांची देखिल तुलना करायची का? म्हणजे संपलेच सगळे....आणि जोशी सरांचे सोडा हो ! हल्ली त्यांचे विद्यार्थी देखिल त्यांना जुमानत नाहि असे समजते......आताशा ते असंबद्ध असे बरेच काही बोलतात....ते कुणीही मनावर घेत नाही.

चव्हाणांनी सत्य साईबाबा आणला तर चालेल असे म्हणून गप्प बसायचे एवढेच (दुर्दैवाने) आपल्या हाती आहे, नाही का?
ह्या विधानाशी मात्र २००% सहमत
जय हिंद!
जय महाराष्ट्र!
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

सुहास's picture

3 Nov 2009 - 1:53 am | सुहास

चला म्हणजे थोडक्यात काय तर महाराष्ट्रावर दरवडेखोरांचे राज्य येणार आहे

येणार आहे नव्हे, आधीपासूनच आहे गेली १५ वर्षे..! :)

गणपती आणि सत्यसाई यांची देखिल तुलना करायची का?

अहो, गणपती दूध पितो हे जोशीसर जेव्हा म्हणाले तेव्हा ते मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, हे आठवते का? त्यावेळी ही त्यांचे कुणी मनावर घेत नव्हते का? मग राज्य काय 'रिमोट कंट्रोल' ने चालायचे काय? :)

--सुहास

अडाणि's picture

3 Nov 2009 - 6:07 am | अडाणि

अरे मित्रा सुहास,
अवघड जागीच्या खपल्या नको काढूस आता...

शेवटी सगळे "एकाच माळेचे मणी"

हेच आम्ही बरेच दिवस सांगत आहोत, परंतु असे विचार मांडले कि काही लोकांच्या नाकाला मिरच्या झोंबतात !!!

असो... म्हणतात ना "जब दिल टूट जाता है तो उसका असर सिधा दिमाग पे होता है" अशी काहींची अवस्था आहे. (हे सामनातून निकालाच्या दुसर्‍याच दिवशी प्रचंड प्रमाणात सिध्ध करून दाखवलेले आहे !!!)

परवा लोकमत वर 'हिंदुह्रुदयसंम्राटांची' मुलाखत झाली. त्यात त्यांनी सांगीतलेल्या ह्या गोष्टी :

  1. ह्या गुंडाला , ज्याचा कुठेही एन्काउंटर झाला असता, त्याला मुख्यमंत्री बनवले ...
  2. शिवसेनेच्या स्थापनेनंतर साहेबांना पहिल्यांदा पुण्यात जोशी सर भेटले होते (हे साहेब म्हणजे सम्राट बर का) तेव्हा पायत फाटकी चप्पल, मळलेले कपडे घालून आले होते सर... (परंतु जशी जशी शिवसेना वाढत गेली तसा सरांचा भरभराटीचा आलेख प्रचंड वेगाने वाढत गेला - ईतका कि शेकडो कोटींना गिरण्यांच्या जमिनी घेतल्या) ...

शिवसेना, भाजपाचे "मि नाही त्यातली आणि कडी लावा आतली" ह्या प्रकारचे जे राजकारण चालू आहे त्यामुळेच लोकांनी आघाडीला बहुमत दिले असावे. आपले ज्यु. साहेब (ना-राज) पण ह्यात लवकरच आलेले दिसतील (अजून पर्यंत नाहित कारण खायला सत्ताच मिळालेली नाहिये !!! त्यामुळे थोडा धीर धरा...)

-
अफाट जगातील एक अडाणि.

यन्ना _रास्कला's picture

2 Nov 2009 - 3:40 pm | यन्ना _रास्कला

दिलेल्या मधल्या ज्या लोकानी कॉ आनी रा. कॉ ला मत दिल त्येनी येक्येक सोताच्याच मुस्काडीत मारुन घ्येत्ली पाहीजे गप्गुमान.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
न येसा रावन आनी येसा हनम्या. हनम्या रावनाला बघुन क बोल्तो माहितीयेका. का र ए बायकाचोर, दुस्र्याच्या बाय्का पलवतस. देउ का तुला पोकल बाम्बुचे फट्के देउ का. सोर्तोस कि नाय वैनीला सोर्तोस कि नाइ.

धमाल मुलगा's picture

2 Nov 2009 - 4:55 pm | धमाल मुलगा

=)) =)) =))
यन्नाआन्ना :) येक लंबर बोल्लात!
खरं तर ही हसण्यासारखी गोष्ट नव्हे, पण आपलं हे टायमिंग पाहुन हसु आलं.

बाकी, ह्या आघाडीच्या माकडचाळ्यांपुढं काय बोलावं? जो तो फक्त 'माझंच घोडं आन जाऊंदे पुढं' ह्यातच रमलेला... फार काही नाही, 'गेल्या पानावरुन पुढे चालु' अशी गत आहे.

-(सोत्ताच्या मुस्काडीत मारुन घ्यायची वेळ न आलेला ;) ) ध.

लोकसत्तेतील ही बातमी/लेख अस्वस्थता आणणारा आहे.

निष्काळजी नेते अन् ‘काळजीवाहू’ जनता!

निवडणूक संपताच गावोगावचे ‘लोड शेडिंग’ अचानक वाढले. साखरेच्या किमती किलोमागे ५० रुपयांकडे झेपावू लागल्या. नक्षलवाद्यांचे थैमान, अपुरा पाऊस, वाळून चाललेली पिके, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच डोक्यावर घागरी-कळशा घेऊन वणवण हिंडणाऱ्या मायबहिणी .. संपूर्ण धूरकट रंगाने रंगलेले राज्याचे हे एक चित्र. तर सत्यसाईबाबांच्या चरणी लीन होण्यासाठी कमरेत वाकलेले काळजीवाहू मुख्यमंत्र्यांपासून अनेक वरिष्ठ नेते, भारत- ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्याचा मनमुराद आनंद लुटण्यात व्यग्र असलेला राज्याचा ‘जाणता राजा’, मंत्रिपदांच्या साठमारीत भान हरपलेले दोन्ही काँग्रेसचे गावोगावचे सरदार आणि केरळमधील पोटनिवडणुकांच्या धामधुमीत अडकलेले काँग्रेसचे राज्याचे प्रभारी ए. के. अँटनी, झारखंडमधील उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत मग्न असलेल्या सोनिया गांधी ..

...उर्वरीत तेथेच वाचा...

ज्या कुणी जवळपास ५० टक्के मतदार लोकांनी मतदान करून ह्या आघाडीला घसघशीत जागा आणि बहुमत दिले त्यांनी पूर्ण विचाराअंतीच हा निर्णय घेतला असणार. त्यामुळे "मलई"वाल्या खात्यांकरता लठ्ठालठ्ठी, ताबडतोब वाढलेली महागाई, वीजटंचाई, पाणी टंचाई हे सगळे मतदार राजाने विचारपूर्वक स्वत:च्या हाताने निवडलेल्या गोष्टी आहेत.
उगाच परमपवित्र जनताजनार्दनाच्या निर्णयावर शंका घेण्याचा विचारही मनात आणणे हे पाप आहे. आता पुढच्या निवडणूकीपर्यंत हे असेच स्वीकारायचे.
जय सत्यसाईबाबा.

देवदत्त's picture

3 Nov 2009 - 8:39 am | देवदत्त

ज्या कुणी जवळपास ५० टक्के मतदार लोकांनी मतदान करून ह्या आघाडीला घसघशीत जागा आणि बहुमत दिले त्यांनी पूर्ण विचाराअंतीच हा निर्णय घेतला असणार
विचार केला की अविचार ? :?

आता हे आघाडीचे लोक काय पुन्हा हल्ला होण्याची वाट पाहत आहेत काय की जेणेकरून आता एक आणि नंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री, गृहमंत्री बदलण्यापेक्षा नंतरच एका वेळीच ठरवू? :(

'कोहिनूर'वाल्या जोशी काकांनी नव्हते का सांगितले गणपती दूध पितो म्हणून,- इति.. श्री सुहास राव.

सुहासराव आपल्याला आठवत असेल तर बघा राव, जोशीकाका मुख्यमंत्री असतांना त्यांच्या खाजगी निवासस्थानी 'ओशीयाना' येथे गणपती दुध प्यायला होता तो ही अर्धा चमचा बर का!
'वर्षा' निवसस्थानी सरकारी पाहूणचार झोडून्, गरीब जनतेचा लाखो रुपयांचा चुराडा करुन नव्हे.

आणी गणरायाची आणी सत्यसाईची तुलना करताय राव.
जनाची नाही तर मनाची तरी ठेवा...

टारझन's picture

3 Nov 2009 - 1:16 pm | टारझन

भोक्कारचोट आहे तो सत्यसाही ...*त्त्या साला .. काय झिपर्‍या वाढवून ठेवल्यात .. आणि केसांना कंगवा माहित आहे का ?
फोकलीच्याने स्वतःच्या नावात आमच्या साईबाबांचं नाव घेतलं तेंव्हाच डोक्यात गेला होता !! म्हणे सत्यसाईबाबा !!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Nov 2009 - 5:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आपले अंनिस-काका कुठे गेले? त्यांना माहिती आहे का अंनिसने याबद्दल काही प्रसिध्दीपत्रक तरी काढल्याचं?

अदिती

विनायक प्रभू's picture

3 Nov 2009 - 5:28 pm | विनायक प्रभू

यमा लवकर ये

देवदत्त's picture

4 Nov 2009 - 3:52 pm | देवदत्त

येत्या ४८ तासांत सरकार स्थापनः मुख्यमंत्री

आज १३ दिवस झालेत. काळजीवाहू सरकारचीही मुदत संपली.
तरीही ह्यांना अजून २ दिवस पाहिजेत? तेच मग १३ दिवसांत का नाही केले?