आयुख

स्पंदना's picture
स्पंदना in दिवाळी अंक
11 Nov 2012 - 12:10 pm

चित्र रेखाटायच्या आधी
मनात बरेच मनसुबे
हे $$ सुंदर, असं सुरेख रेखाटू ...
तशी अंगात ज्वानीची रगही असते
नसानसात धडक्या मारणारं
उसळतं रक्तही भरीस पाडतं
आतापावेतो तसे आपण
दुसर्‍याच्या चित्रातले
त्यांचे मनसुबे कधी धुळीला लावलेले
तर कधी त्यांच्या मनाजोगता रंग ल्यायलेले
अन् कधी तर अवचित चक्क रंगबहार साधलेले
पण आता परिस्थिती वेगळी
हाती कुंचला अन् मनी रेखाटन
समोरच्या रंगांचा मर्यादितपणासुद्धा
ते आवेगी रेखाटन रोखू नाही शकत
धमकच असते तशी त्या वयाची
मग हळूहळू जाणवू लागतं
आपलं अपुरेपण
समोरच्या रेखाटनात उमटलेल्या
आपल्याच त्रुटी
आपल्याच भरकटलेल्या पाऊलखुणा
कधी चुकलेली कागदाची निवड
कधी चुकलेली रंग छटा
सारी सरमिसळ....
कुठे फिसकटलेले फराटे
कुठे निसटलेले आलेख
अन् कधीकधी तर उमटलेले ओरखडे
कधी परक्यांचे, कधी आप्तांचे
अन् कधी आपले स्वत:चेच
चित्र घडत जातं
तसं कधीकधी वाटतं
बदलावं हे सारं
काढावं नवीन काही
आता जाणिवांचे कंगोरे घेऊन
कदाचित काही चांगलं उमटेल
पण,
हाती तोच एक कागद
तेच चार कुंचले
अन् समोर पसरलेलं
सुटका नसलेलं
तेच एक चित्र
आपलं....

footer

प्रतिक्रिया

पैसा's picture

12 Nov 2012 - 9:02 pm | पैसा

अपर्णा स्पेशल कविता. पण आजूबाजूचे कागद पाह्यले की आपला कागद फार चांगला वाटू लागतो!

अगदी कसंकसं वाटत होतं वाचताना. पैसाताईशी सहमत. आपला कागद किती चांगला असं सगळ्यांना बाकीच्यांशी तुलना करत वाटत असतं तशीच कोणीतरी आपल्याशीही तुलना करू स्वत:ला चांगलं म्हणत असतील अशी भीती वाटली.

पण,
हाती तोच एक कागद
तेच चार कुंचले
अन् समोर पसरलेलं
सुटका नसलेलं
तेच एक चित्र
आपलं.......जबरदस्त प्रामाणिकपणा; very poignant evolution of the "self"!

[अवांतरः आयुख हा शब्द आयुष्य + दु:ख असा योजला आहे का? की 'आयुष्य'चंच रूप आहे?

अति-अवांतरः Observer effect नुसार प्रयोगाचं निरीक्षण करण्याने प्रयोगाचा निष्कर्षही बदलतो म्हणतात, तसं असेल तर आपण चितारलेलं चित्र अनपेक्षित असं होण्यात आपलाही सहभाग असणारच. ]