✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी शेवट

अ
अबोली२१५ यांनी
Mon, 12/12/2016 - 19:05  ·  लेख
लेख

Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी १
Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी २
Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ३
Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ४
Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ५
मी सर्वसामान्य आहे जी फक्त २. ५० ची धावपळ केलीय पण असे काही जण आहेत ज्यांनी यात आपल्या जमिनी विकल्या, घर गहाण ठेवली आहेत, जे नुकतेच जॉब ला लागलेत ज्याचं सर्व काही होणे बाकी आहे त्यांनी १२ ते १५ लाखाची लोन केलीय त्याची अवस्था माझ्या पेक्षा जास्त वाईट आहे. मी कोणाच्याही ही प्रचारासाठी धागा काढला नाही आहे. Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी शेवट हे अकाउंट चालू करून त्यामध्ये पैसे भरायला मला कमीतकमी 1-2 आठवड्याचा अवधी लागणार होता. त्या साठी मी परत Mr परेशशी काही कॉन्टॅक्ट होतो का ते पाहत होती. मी माझ्या मैत्रिणीला whatapp वरून मेसेज पाठवत होती फोन करत होती कि माझ्या नवऱ्याला Mr. परेशशी बोलायचं आहे तर तू त्याचाशी कॉन्टॅक्ट करून दे. पण तिने दोन दिवस कोणताच रिप्लाय दिला नाही. तिने दोन दिवसांनी मेसेज केला कि ते बिझी आहेत त्यामुळे ते फोन वर येणार नाही तुमच्या ज्या काही query त्या कागदावर लिहून आण. मी २ मीटिंगला त्या समजावून सांगेन (मला येथे वाटलं कि तो माझ्या नवऱ्याला घाबरलेला आहे) तो फोनवर यायला तय्यारच नव्हता. मी तोपर्यन्त मी बँकेत पैसे भरायला सुरवात केली होती. मी पैसे एकदम भरले असते तर मला pan card दाखवावं लागणार होत म्हणून मी ३ हफ्त्यात बँकेत पैसे जमा करायचं असं ठरवलं. मी तीन दिवस जाऊन पैसे भरू लागली होती. या दरम्यान माझी मैत्रीण पण मुंबई बाहेर गेली होती त्यामुळे मला जरा बँकेत पैसे भरायला निवांतपणा मिळाला. माझ्या नवऱ्याने माझ्या आणि माऊच्या FD वर लोन काढलं आणि ते पैसे Nationalised बँकेतील अकाउंटमध्ये NEFT केले. माझी मैत्रीण परत बाहेरून आल्यावर मला फोन केला कि काय झालं तू बँकेत पैसे जमा केलेस का? त्यावर मी बोलली हो झालेत तू पुढची मीटिंग घे. त्यावर ती बोलली माझे senior बिझनेस पार्टनर (Mr परेश नाही) तुला भेटतील मी त्याची वेळ घेते तू माझी मैत्रीण आहेस त्यामुळे ते तुला भेटत आहेत. ते कोणालाच भेटत नाहीत. ते माझे गुरु आहेत त्याच्यामुळे मी बिझनेस शिकली (पण हे तर तू Mr परेश बद्दल पण बोलत होतीस???) तुझ्यापेक्षा मीच जास्त excited त्यांना भेटला. खूप दिवसांनी भेटत आहेत ते मला. त्यांचे भारतात खूप ठिकाणी त्याचे बिझनेस सेन्टर आहेत त्यांनी खूप लोकांना या बिझनेस आणलाय त्यामुळे खूप लोक त्याच्यामुळे sucessful झाली आहेत.(????????) (मैने क्या क्या पापड बेले है। तुम्हे क्या बताऊ ) मी तिला भानवनिक होऊन सांगितलं कि माझ्या माऊच्या FD वर लोन काढलंय त्यावर अग तू फक्त २. ७० लाखाचं गुंतवतेस मी माझ्या सासऱ्या आणि वडिलांकडून काही पैसे उधार घेतले त्यात मी माझे असे १० लाख यात गुंतवले आहेत ( मला अजूनही या गोष्टीवर विश्वास वाटत नाही आहे.) मी: तिला विचारलं मग तुझे पैसे रिकव्हर झाले? ती: हो मी : मग दुबईला पण तुला त्याने पाठवलं का बिझनेससाठी? ती : ते कशाला पाठवतील माझी मी गेले होते बिझनेससाठी. बिझनेस माझा आहे मी : म्हणजे ? ती : (थोडी गडबडली ) अग कॉन्फरन्स होती म्हणून गेली होती. बर ते जाऊ दे उद्या मी तुला फोन करते appointment कधी आहे ते सांगते by असं म्हणून तिने फोन ठेऊन दिला. तिने दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं कि उद्या ११. ०० वाजता आपल्याला Dr. प्रशांत आपल्याला भेटणार आहेत. ते अम्यक्या अमक्या कॉलेज मधून डॉक्टरेट केली ते केम मध्ये consultancy करायचे पण जेव्हा पासून ते या बिझनेस मध्ये आले आहेत तेव्हापासून त्यांनी हे सर्व सोडून दिलाय (strange ????? एक doctor हे सर्व सोडून बिझनेस करतोय ????) उद्या तुम्ही दोघे सुट्टी घ्या आणि दोघेही फॉर्मल मध्ये या. तुझ्या नवऱ्याला सांग कि clean shaven look आणि polish shoes घालून ये (काय विंचु सदृश राशी असणाऱ्या माझ्या नवऱ्याला मी हे सांगु... घास कोरडा पडलाय हि बाई काय सांगतेय असं कुठे असत काहीतरी सॉलिड झोल आहे..... ) मी म्हटलं अरे त्यांचं नाव काय बोललीस DR प्रशांत चांदोरकर आणि मी हे नाव गुगल्याला विचारलं आणि माझ्या पायाखालची जमीन सरकायला लागली. त्याने Qnet मधले Scams आणि compliant चा पाढा वाचायला त्याने सुरवात केली MLM Company (multi-level marketing (MLM) किंवा Qunet, GoldQuest, QuestNet,Transview Enterprises India Pvt Ltd,Vihaan Direct selling (India) Pvt Ltd, QI Ltd and QI group अशा अनेक नावाने चालवत आहेत. विजय ईश्वरन आणि जोसेफ बिस्मार्क मिळून हि कंपनी चालवतात. या दोघांनी मिळून Rs425 crore चा QNet scam केलाय. यांचे individual representative (IR) असतात. कॉफेशॉप आणि बरिस्ता हे त्याचे अड्डे आहेत. हे लोकांनकडून पैसे घेतात आणि दुसऱ्या लोकांना फसवाचं ट्रेनिंग देतात जर तुम्ही जर नाही फसवलत तर तर तुमचे पैसे अक्कल खाती जमा. याची टार्गेट जवळच्या व्यक्तीं आहेत (friends, नातेवाईक )आता पर्यंतच्या जास्त कॉम्प्लेइंट्स हे जवळच्या व्यक्तींनी फसवल्याच्या आहेत. हे दुबईचा टूरच package पण देतात यात, हे टूर package इतर ट्रॅव्हल कंपन्या (दुबई टूर package) देतात त्यापेक्षा जास्त महाग असत.(दुबईला गेल्यावर कळत कि त्यांची ऑफिसेस सेंटर्स असं काहीच नाही आहे. काही काही देशात Qunet यावर बंदी आहे. ) तुम्ही जर लोकांना फसवलं सुरवात केली कि त्यावर तुम्हाला कमिशन मिळत जर तुम्ही २. ५० लाख केले तर तुम्हाला २०,००० कमिशन, १० लाख केले तर ३०,००० कमिशन असे याचे कमिशन रेट्स आहेत. मी धावत जाऊन नवऱ्याला फोन केला तर तो म्हणाला तू यात पैसे नको गुंतवू. मी पण त्याला तेच बोलली कि मी यात पैसे नाही गुंतवणार तो तुला कस कळलं अरे मी गूगल केलं आणि मी तुला कस कळलं अरे माझ्या मित्राच्या मित्राने ११ लाख गुंतवले ४ महिन्या पूर्वी आणि तो engineer आहे पण त्याला एक रुपया पण परत मिळालेला नाही आणि एक मित्र दुबई ला गेलेला पण तिकडे त्यांचं ऑफिसेस, सेंटर वैगरे काहीच नाही आहे. Mr परेश आपल्या गल्लीत पण राहत नाही.. हे बघ आम्ही एकत्रच आहोत. मी त्याला बोलली मी ठेवते १५ मिनीटांनी फोन करते, तो बोलला तू काय करणार आहेस मी सांगते तुला सध्या मला एकीला फोन करायचा आहे. मी माझ्या मैत्रिणीला फोन केला "मी तुझ्यावर जास्त विश्वास ठेवला हा सगळा fraud आहे. Mr प्रशांत चांदोरकर पण एक नंबरचा fraud आहे. तुमचा ऑनलाईन काहीही बिझनेस नाही आहे. तुमचा हा बिझनेस लोकांना फसवाचा आहे. तू मला फसवलास तर तुला तुझं कमिशन मिळणार. पण तू तुझ्या मुलीचा विचार कर... मैत्रिणी : अरे तू असं कस बोलू शकतेस.(तोंडाने... परत भेट मला... ) अरे मला तुझं बोलणं ऐकूच येत नाही आहे. थांब मी तुला फोन करते. या नंतर तिचा फोन मला अजून पर्यंत आलेला नाही. मी तिला फोन केला (कारण ती माझी मैत्रीण होती मला यातून तिला बाहेर काढायच होत पण .... ) तिने तो उचला हि पण तिचा हसरा आवाज ऐकून मला तिला जे सांगायच होत ते सांगताच आलं नाही कदाचित तिने घेतलेले पैसे तिला परत कारण अपरिहार्य आहे. जो पर्यंत ती अजून १० जणांना फसवणार नाही तो पर्यंत तिची यातून सुटका नाही आहे. फसवणारी लोक आपलीच असतात आणि फसली जाणारी लोक पण आपलीच असतात. वाईट इतकाच आहे कि तुटते हुए ख्याब कभी आवाज नाही करते| पर ख्याब देखाना कभी बुरा भी नाही है । माझ्या एवढ्या उपदव्याप बघून माझा नवऱ्याने मला तू तुझ्या क्षेत्रातला बिझनेस करू शकतेस आणि तू कर. तू निर्णय घेऊ शकतेस असं म्हणून माझ्या बिझनेससाठी जागा शोधायला सुरवात केलेय…..
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
अर्थकारण
अर्थव्यवहार
गुंतवणूक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिसाद
बातमी
अनुभव
माहिती
संदर्भ

प्रतिक्रिया द्या
30110 वाचन

💬 प्रतिसाद (63)

प्रतिक्रिया

आवडले!

पैसा
Mon, 12/12/2016 - 19:13 नवीन
अशीच जिद्द ठेवून काम करा. नशीब की यातून वाचलात. तुम्हा दोघींच्या कॉमन मैत्रिणी असतील त्यांना याबद्दल नक्की सावध करा. माझी मैत्रीण आहे, तिच्याबद्दल वाईट कसे बोलू म्हणून गप्प राहू नका. या घोटाळ्यात मायकेल फरेरासकट बर्‍याच जणांना अटक झाल्याच्या बातम्या आहेत.
  • Log in or register to post comments

हुश्श..

गवि
Mon, 12/12/2016 - 19:22 नवीन
हुश्श..
  • Log in or register to post comments

हा हा हा...

अबोली२१५
Mon, 12/12/2016 - 19:26 नवीन
हा हा हा हा आता पर्यंतचा सर्वात छान प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अगदी असेच वाटले... नुकसान

पिलीयन रायडर
Mon, 12/12/2016 - 19:31 नवीन
अगदी असेच वाटले... नुकसान झाले नाही हे वाचुन बरे वाटले..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

+१

तुषार काळभोर
Tue, 12/13/2016 - 17:15 नवीन
हुश्श!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

finally

जव्हेरगंज
Mon, 12/12/2016 - 19:24 नवीन
finally
  • Log in or register to post comments

तुमचे पैसे वाचलेत हे वाचुन

कानडाऊ योगेशु
Mon, 12/12/2016 - 19:27 नवीन
तुमचे पैसे वाचलेत हे वाचुन आनंद झाला.खरेतर हा फायदाच झालेला आहे. बाकी क्लायमॅक्स सांगायला तुम्ही फार अधीर झाला होतात असे वाटते आहे विशेषतः हा शेवटचा लेख वाचुन.
  • Log in or register to post comments

अगदी हेच

सुमीत
Mon, 12/12/2016 - 20:22 नवीन
अगदी हेच सांगायचे आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

whatsapp वर शेयर करू का?

लालगरूड
Mon, 12/12/2016 - 19:44 नवीन
whatsapp वर शेयर करू का? मलापण एक जण मित्र घेऊन गेलता एका चुत्या कडे.आमचं एक प्राॅडक्ट घ्या 14000 आणि नंतर अजून कस्टमर आणा आणि 1000 कमिशन घ्या. matrix. फुल हरभर्याच्या झाडावर चढवतात
  • Log in or register to post comments

लिंक शेयर करू शकतो

सुमीत
Mon, 12/12/2016 - 20:27 नवीन
दोन महाभाग भरीस पाड्णार होते, पन मूळात असल्या थेयरी वर विश्वास नाही ठेवत ,,, वाचलो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लालगरूड

हो चालेल

अबोली२१५
Tue, 12/13/2016 - 13:16 नवीन
हो चालेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लालगरूड

हुश्श्य!

मास्टरमाईन्ड
Mon, 12/12/2016 - 19:45 नवीन
तुम्ही वाचलात हे वाचून फार आनंद झाला.
  • Log in or register to post comments

अंत भला तो सब भला. :)

संदीप डांगे
Mon, 12/12/2016 - 19:48 नवीन
अंत भला तो सब भला. :) भविष्यातल्या खर्‍याखुर्‍या यशासाठी खर्‍याखुर्‍या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

तू निर्णय घेऊ शकतेस असं

जिन्क्स
Mon, 12/12/2016 - 20:00 नवीन
तू निर्णय घेऊ शकतेस असं म्हणून माझ्या बिझनेससाठी जागा शोधायला सुरवात केलेय….. कंचा बिझनेस?
  • Log in or register to post comments

मी पहेलेच बोल्लेलो !

संजय क्षीरसागर
Mon, 12/12/2016 - 20:20 नवीन
बहुदा त्या मैत्रिणीचे अडकलेले पैसे तो मॅन, लेखिकेचे आले की देणार असावा !
  • Log in or register to post comments

व्वा! !

निरंजन._.
Mon, 12/12/2016 - 20:29 नवीन
तुम्ही सहीसलामत सुटलात हे बघून बरं वाटलं! आणि इथे येऊन आमचं प्रबोधन केल्याबद्दल मनःपूर्वक आभार. तुमची लेखनशैली वेगळ्या धाटणीची आहे. लिहीत रहा.
  • Log in or register to post comments

जी मैत्रीण फसवायचा विचार करू

सप्तरंगी
Mon, 12/12/2016 - 20:55 नवीन
जी मैत्रीण फसवायचा विचार करू शकते ती अजूनही मैत्रीण आहे असा विचार मी तरी करू शकत नाही, अश्या फसवणाऱ्या/ गंडवणाऱ्या लोकांशी परत इतके चांगले वागावे हेच मला पटत नाही, अश्या लोकांपासून सावध राहा अबोली. तू या scam मध्ये फसली नाहीस हे हि असे थोडके.
  • Log in or register to post comments

असेच बोलतो.

बोका-ए-आझम
Mon, 12/12/2016 - 21:19 नवीन
तुमच्या ' तथाकथित ' मैत्रिणीने तुमचा वापर करुन घ्यायचा प्रयत्न केला आणि जेव्हा तुम्हाला सत्य समजलं तेव्हा थंडपणे संबंध तोडून टाकला. यावरून ती काय लायकीची मैत्रीण होती ते समजतंच. अशा व्यक्तीला मित्र म्हणणं हा मैत्रीसारख्या भावनेचा अपमान आहे.असो. तुम्ही यात फसला नाहीत आणि वेळीच सावध झालात हे फार छान झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सप्तरंगी

पैसे बुडण्याअगोदर खरी गोष्ट

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 12/12/2016 - 21:12 नवीन
पैसे बुडण्याअगोदर खरी गोष्ट समजली हे उत्तम झाले. एमएलएम मार्केटिंग आणि कमी पैसे-श्रम-वेळात बक्कळ फायदा देणार्‍या कोणत्याही योजनेबद्दल, कितीही आकर्षक वाटली किंवा कितीही विश्वासू माणसातर्फे माहिती मिळाली तरी, सत्य बाहेर येईपर्यंत हजार चौकश्या करा. नवीन व्यवसायातील यशासाठी अनेकानेक शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

First law of economics—

सुबोध खरे
Mon, 12/12/2016 - 21:37 नवीन
First law of economics— Money cant be generated, It cant be lost. It just changes hands
  • Log in or register to post comments

छान.

खेडूत
Mon, 12/12/2016 - 21:52 नवीन
छान. मलम योजनेत फसवणूक टळल्याबद्दल अभिनंदन. आता आपण इतरांना सावध/ परावृत्त करावे. हेराफेरी चित्रपटात सही करण्यापूर्वी दरवेळी सुनील शेट्टीला एकट्यालाच, ''गोलमाल है भाई सब गोलमाल है''हे गाणं ऐकू येतं तसं आपल्यालाही यायला हवं!
  • Log in or register to post comments

मलम!

अनिरुद्ध.वैद्य
Tue, 12/13/2016 - 21:36 नवीन
मस्त नाव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

"चुनेट"स्कीम मध्ये चुना लावून न घेतल्याबद्दल अभिनंदन !

माम्लेदारचा पन्खा
Mon, 12/12/2016 - 22:13 नवीन
तुमच्यासारखेच इतरही लोक वेळीच शहाणे होवोत हीच सदिच्छा !
  • Log in or register to post comments

थोड्यक्यात बच गए !!

अर्धवटराव
Tue, 12/13/2016 - 00:02 नवीन
अभिनंदन :) १) गुगलबाबाला अगदी पहिल्याच दिवसापासुन याबाबत विचारणा करायला हवी होती २) सरळ पोलिस कम्प्लेण्ट देऊन या नेटवर्कधारी मंडळींना खास 'दुबई'ची सहल घडवायला हवी होती.
  • Log in or register to post comments

गुगल्या विचारलं होत

अबोली२१५
Tue, 12/13/2016 - 12:10 नवीन
मला अगोदर गुगल्या विचारलं होत पण result काही नाही आला, पण मी जस Dr प्रशांत चांदोरकरच नाव टाकलं तस गुगल्या उत्तर द्याल लागला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

सं मं

रुस्तम
Tue, 12/13/2016 - 09:15 नवीन
मागील भागाच्या लिंका (दुवे) या भागात आणि इतर भागात टाका ना.
  • Log in or register to post comments

बरं

मंजूताई
Tue, 12/13/2016 - 09:36 नवीन
झालं... एकदम हायस वाटलं.... हे मेसेज सगळीकडे पोचवले पाहीजे.. पुढच्याला ठेच मागचा शहाणा.. माझ्या उर्मिला (मदतनीस) ला असंच फसावायचा प्रयत्न केला होता.. वेळीच सावध केले होते.. नो लंच एज फ्री... कष्टाला पर्याय नाही...
  • Log in or register to post comments

चला थोडक्यात वाचलात...

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 12/13/2016 - 09:38 नवीन
जे होते ते चांगल्यासाठीच होते. नवा बिझनेस चालू करताना हा अनुभव अतिशय मोलाचा ठरेल यात काही शंका नाही. मनःपूर्वक शुभेच्छा. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

लेखमालेचे नाव बदलायला हवे असे

आनन्दा
Tue, 12/13/2016 - 10:33 नवीन
लेखमालेचे नाव बदलायला हवे असे वाटते.. मी क्यूनेट्मध्ये जाते वगैरे असे काहीतरी.. लेखमालेच्या शीर्षकावरून यामध्ये काही इनसायडर गोष्टी असतील असे वाटले होते, तो भ्रमनिरास झाला. पण लेखमाला खूपच चांगली. विशेषतः तुम्ही फसण्यापासून वाचलात हे वाचून बरे वाटले.
  • Log in or register to post comments

तुमचे पैसे वाचले हे वाचून

अभिजीत अवलिया
Tue, 12/13/2016 - 10:40 नवीन
तुमचे पैसे वाचले हे वाचून आनंद झाला. असाच एक मलम धंधा काही वर्षांपूर्वी आला होता. २००२-०३ साली. जापान लाईफ इंडिया. मी तेव्हा इंजिनीरिंगच्या पहिल्या वर्षाला होतो. आमचा एक तत्कालीन परम मित्र त्यासाठी मला पर्वरी गोवा इथे घेऊन गेला होता. नक्की काय धंधा आहे हे विचारल्यावर असेच गुळमुळं उत्तर. चल गोव्याला, तिकडे आमचे सिनियर तुला समजावतील. मग गेलो गोव्याला त्याच्याबरोबर तर झकपक सूट, टाय घालून शे दीडशे लोक आले होते. प्रत्येकाची एक स्टोरी होती. अगोदर त्यांचे कसे दिवस होते आणि कसे हा धंधा करून ते श्रीमंत झाले वगैरे. मग अशाच २ सिनियरनी धंधा समजावला. अगोदर एक लाख भरायचे. मग तुम्हाला एक मॅग्नेटिक गादी मिळणार. तिच्यावर झोपले की सर्व रोग बरे होणार इतकी भारी गादी होती ती. मग तुम्ही बकरे शोधायचे आणि त्यांना मेम्बर बनवून अशा गाद्या त्यांच्या गळ्यात मारायच्या. म्हणजे काही वर्षांनी पूर्ण जग रोगमुक्त. काही डॉक्टर वगैरेंची गरज नाही. मज्जाच मजा. पण मला त्यांचा बनाव लक्षात आला होता. बाहेर आल्यावर भयानक झापले मित्राला. त्यानंतर गेल्या १३ वर्षात आमचा काहीही संपर्क नाही.
  • Log in or register to post comments

एक लाखाची गादी घेतल्यानंतर ...

बबन ताम्बे
Tue, 12/13/2016 - 11:52 नवीन
त्या गादीवर शांत झोप तरी येत असेल की नाही शंका आहे. आमच्या ऑफीसमधे पण एक असाच बकरा बनला होता आणि त्याने एक लाख घालवल्यानंतर वसूल करायला ओळखीच्यांना भरीस पाडत होता. शहाम्रूगांच्या पिसांची गादी होती म्हणे :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत अवलिया

कर्ज काढून असल्या गाद्या घेतलेले पाहिलेत

मास्टरमाईन्ड
Tue, 12/13/2016 - 20:34 नवीन
खरोखर भयानक! पत संस्थेचं २३%-२४% किंवा अशाच विचित्र दरानं कर्ज काढून २-२ गाद्या घेतलेले महाभाग पाहिलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

ही बघा - एक प्रश्नावली जी

आनन्दा
Tue, 12/13/2016 - 10:52 नवीन
ही बघा - एक प्रश्नावली जी सगळ्या मलम धंद्यांना लागू पडते. https://www.quora.com/What-is-the-Business-Model-of-Qnet-1
  • Log in or register to post comments

तुम्ही फसला नाहीत हे वाचून

चिनार
Tue, 12/13/2016 - 11:27 नवीन
तुम्ही फसला नाहीत हे वाचून आनंद झाला. ३-४ वर्षांपूर्वीची गोष्ट, माझी एक लांबच्या नात्यात असलेली बहीण माझ्या पुण्यातल्या ऑफिस जवळ राहायची. एक दिवस ती अचानक भेटली. तसे आम्ही बऱ्याच वर्षांनी भेटत होतो. नंतर एकदा मी तिच्या घरी गेलो. तिचा नवरा नोकरी सोडून काहीतरी ऑनलाईन बिझीनेस करतो असे मला सांगितले. काही दिवांनी तिचा फोन आला. तिने तिच्या बिझीनेस मध्ये पार्टनर होशील का असे विचारले आणि मला येत्या शनिवारी CCD ला भेटायला बोलावले. पण बिझीनेस विषयी ती काहीही नीट सांगत नव्हती. CCD मध्ये एक Mr परेश सारखा माणूस भेटला. त्याने माझी मुलाखत घेतली. मी खोदून खोदून त्याला कंपनीविषयी विचारत होतो. पण ऑनलाईन पोर्टल हे सोडून तो काहीही बोलत नव्हता. एकंदरीत त्याचा आवेश हा "आपण लय दुनिया बघितली आणि ह्याहून चांगला कोणताच धंदा नाही" असा होता. मी नवीन बिझीनेस पार्टनर्स शोधायचे असा माझा प्रोफिले असल्याचे सांगितले. नंतर मला २ लाखाचा चेक मागितला. मी स्पष्ट शब्दात नाही सांगितले. Mr परेश ने थोडे समजावयाचा प्रयत्न केला. पण मी बधत नाही हे बघून त्याचा अपमान झाल्याचा आवेश आणून निघून गेला. नंतर बहिणीने भरपूर इमोशनल ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला. शेवटी पन्नास हजार तरी दे इथपर्यंत गाडी आली. मी निर्धाराने नाही म्हणून तिथून निघालो. नंतर तिचे फोन येत गेले. मी नाही म्हणायचे कारण तिला हवे होते. मी तिला तीन कारणं दिलीत १. माझ्याजवळ पैसे नाहीत २. माझ्याजवळ वेळ नाही ३. आणि मला इंटरेस्ट तर बिलकुलच नाही. यानंतर तिचा फोन आला नाही. मी पर्चेसला असल्यामुळे मार्केटिंग वाल्यांना इतक्या सहजासहजी बधत नाही. पण अनेक सामान्य लोक या चक्रात अडकतात.
  • Log in or register to post comments

मीही बऱ्याचदा...

इरसाल कार्टं
Tue, 12/13/2016 - 11:56 नवीन
मीही बऱ्याचदा अडकलोय यात, मित्र अथवा जवळचा कोणीतरी एकदम हात पाय धुवीन मागे लागतो अन आपल्याला गुढगे टेकावे लागतात. यांच्या सेमिनारमध्ये हायली मोटिवेश्नल ऐकायला मिळते मात्र. बऱ्याचदा मी तर अश्या सेमिनारला फक्त तेच ऐकायला जायचो आणि नंतर टांग देत जॉईन होणे टाळायचो. तरीही किमान ४ ठिकाणी फ़सलोय. काय करणार, हे लोक पिच्छा सोडतच नाहीत. आता मी एक ठेवणीतलं हत्यार बाहेर काढतो, "एक काम कर, आता माझ्याकडे पैसे नाहीत तर तू माझे पैसे भर आणि जेव्हा मी या बिझनेस मधून पैसे कमवायला लागेन तेव्हा सगळ्यात आधी तुझे पैसे तू घे. हवे तर १०% जास्त घे." विशेष म्हणजे हे लोकं पैसे भारतात कधीकधी आपले कारण त्यांनाही वाटत नाही कि त्यांचीही फसवणूक झाली आहे. माझ्या एक मित्राने तर माझ्या वरील वाक्याला भुलून माझेच नाही तर इतर मित्रांचेही पैसे भरले होते, विचार करा त्याला त्याच्या कंपनीवर किती विश्वास होता. आता बसलाय बोंबलत, आम्ही फक्त सहानुभूतीने बघतो त्याच्याकडे कारण मला वाटले तो मान्य करणार नाही पैसे भरायला पण त्याने भारमल आमचे पैसे, आमच्या मागे लागून आमची कागद-पत्रे घेऊन गेला नोंदणीसाठी. असेच दोन मित्र वॉटर प्युरिफायर डायरेक्ट सेल करणारी कंपनीचे एजंट झाले होते, नोकऱ्या सोडून हेच काम पूर्णवेळ निवडले. आता कंपनीने पॉलिसी बदलली अन हे 'तेल हि गेलं अन तूपही...' म्हणत कावरे बावरे झालेत.
  • Log in or register to post comments

झालेला प्रसंग रंगवून

किसन शिंदे
Tue, 12/13/2016 - 12:52 नवीन
झालेला प्रसंग रंगवून सांगण्याची हातोटी छानच! पैसे वाचले हे खूप चांगले झाले.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद उडवला

अबोली२१५
Tue, 12/13/2016 - 13:45 नवीन
संपादकीय मंडळाने ram ram यांचा प्रतिसाद उडवला आहे का ????
  • Log in or register to post comments

मला

सांरा
Tue, 12/13/2016 - 14:19 नवीन
वाटते प्रत्येकाने कधी ना कधी हा अनुभव घेतला आहेच.. मलाही ebiz, mi lifestyle, technobiz यांचे IR भेटले आहेत. इकडे आमच्या हातातून १०० सुटत नाहीत तर लाखाची काय कथा. बाकी आम्ही मित्रांनी mi मध्ये i का? y का नाही? यावरच २ तास मस्त टाइमपास करून घेतला होता. कधीही या IR ना भेटायला मित्रांसोबत जावे, जाम मजा येते. बाकी अबोली ताई तुमचा फक्त पैसाच नाही, तर वेळ आणि मनस्ताप जो तुम्हाला भोगावा लागला असता तो सुद्धा वाचला आहे. रच्याकने, Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी १ Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी २ Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ३ Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ४ Qnet क्युनेट आशियातील सर्वात मोठी फसवणूक साखळी ५
  • Log in or register to post comments

हॉलिडे इन

बापू नारू
Tue, 12/13/2016 - 15:18 नवीन
हॉलिडे इन वाले पण असाच भिकार धंदा करतात ,त्यांच्यापासून पण सावध रहा
  • Log in or register to post comments

नशीब बलवत्तर

पाटीलभाऊ
Tue, 12/13/2016 - 17:47 नवीन
नशीब बलवत्तर...कि तुम्ही सहीसलामत बचावलात या फसवणुकीतून...!
  • Log in or register to post comments

" आ बैल मुझे मार "

सिरुसेरि
Tue, 12/13/2016 - 19:11 नवीन
"आ बैल मुझे मार " अशी स्थिती झाली नाही हे सुदैवच ..
  • Log in or register to post comments

MLM पासून दूर राहावे हेच खरे

अमर विश्वास
Tue, 12/13/2016 - 19:14 नवीन
MLM पासून दूर राहावे हेच खरे... या MLM मुळे मी पैसे जरी गमावले नसले तरी काही मित्र जरूर गमावले आहेत ...
  • Log in or register to post comments

"प्रत्येक माणसाचे काही ड्रीम

संदीप डांगे
Tue, 12/13/2016 - 20:05 नवीन
"प्रत्येक माणसाचे काही ड्रीम असतात" ह्या वाक्याने सुरु होणारे संभाषण सुरु झाले की मी आटोमॅटिकली डिफेन्स मोड मध्ये जातो. मलमकलाकारांचे आवडते वाक्य आहे.
  • Log in or register to post comments

:) +११११११

मास्टरमाईन्ड
Tue, 12/13/2016 - 20:36 नवीन
बरोब्बर ! मी पण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

अगदी अगदी

अनिरुद्ध.वैद्य
Tue, 12/13/2016 - 21:29 नवीन
मुळात, काही कष्ट न करता, आपोआप तुम्ही कसे मालामाल व्हाल, असे सांगुन गुंतवणुक करा असं कोणी म्ह्ण्टलं की मी आपलं नाही म्हणुन टाकतो. नको बाबा. तुच हो स्रीमंत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

२००१ मध्ये Symbionic

श्रीगुरुजी
Tue, 12/13/2016 - 20:34 नवीन
२००१ मध्ये Symbionic Marketing या नावाच्या कंपनीने मला व माझ्या अर्धांगिनीला फसवायचा अगदी असाच प्रयत्न केला होता. माझ्या आयटी कंपनीतील एका मुलीने स्वतःहून मला अ‍ॅप्रोच करून या कंपनीचे नाव न सांगता एक नवीन संधी आहे असे सांगून मला एका सेमिनारला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले. आम्हाला न्यायला पोचवायला कार पाठवू असे देखील सांगितले. प्रत्यक्षात त्या सेमिनारमध्ये प्रत्येकाने ५०००० ते १ लाख रूपयाचे काहीतरी फालतू प्राड्क्टस घ्यायचे व ३ नवीन मेंबर आणल्यास तुम्हाला कमिशन मिळायला सुरूवात होईल असे सांगितले गेले. आपण या प्रकारामुळे कसे लक्षाधीश झालो असे सुमारे ३०-४० जणांनी पुढे येऊन सांगितले. कंपनीच्या संयोजकांच्या भाषणाला प्रेक्षकातील काही जण ठराविक वेळी ठरवून टाळ्या वाजवून "वॉव", "ग्रेट", "अमेझिंग" असे प्रोत्साहनपर उद्गार काढत होते. हा सर्व प्रकार हा मॅनेज्ड प्रकार असून स्वतः खड्ड्यात पडलेले लांडगे खड्ड्याच्या बाहेर येण्यासाठी बकरे शोधत आहेत हे लगेच लक्षात आले. हा सर्व मूर्खपणा संपल्यावर माझ्या सहकारी मुलीने मी किती पैसे गुंतविणार हे विचारल्यावर मी ठाम नकार दिला. मला कन्व्हिन्स करायचा तिने बराच प्रयत्न केला. परंतु मी बधत नाही हे बघून काही वेळाने तिचा बॉस (ज्याने तिला खड्ड्यात ढकलून तिच्या पाठीवर चढून तो खड्ड्याबाहेर आला होता) आमच्याकडे येऊन आम्हाला या स्किमचे महत्त्व सांगायला लागला. एकही रूपया न गुंतविण्याच्या आमच्या निर्धारामुळे काही वेळाने "तुम्ही भ्याड आहात. धाडस करण्याची तुमची तयारी नाही. तुमच्या बायकोला इंटरेस्ट आहे, पण तुम्ही तुमचा निर्णय तिच्यावर लादत आहात." असे काहीबाही सांगून डिवचायचा प्रयत्न केला. परंतु आम्ही त्याच्या युक्त्यांना अजिबात बळी न पडता तिथून निघून आलो व मोठे नुकसान टाळले. अ‍ॅमवेच्या गळ्यात पडणार्‍या लोचट प्रतिनिधींनाही मी असेच दोन वेळा वाटेला लावले होते. अमेरिकेत असताना एक अ‍ॅमवेचा प्रतिनिधी संध्याकाळी ६ च्या सुमाराला घरी येऊन तब्बल ३ तास चिवटपणे ठाण मांडून बसला होता व माझ्या गळ्यात स्किम मारायचा प्रयत्न करीत होता. परंतु चिवटपणाच्या बाबतीत मी त्याचा बाप निघालो आणि त्याचे सर्व प्रयत्न फोल ठरविले.
  • Log in or register to post comments

अ‍ॅमवे!

आनंदयात्री
Wed, 12/14/2016 - 00:04 नवीन
परमेश्वराने लोचट अ‍ॅमवे प्रतिनिधींसाठी नरकात स्पेशल छळछावणी बांधावी अशीच मागणी या निमित्ताने मांडतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

या ऍमवे ने तर माझा फार वेळ

सुबोध खरे
Wed, 12/14/2016 - 09:50 नवीन
या ऍमवे ने तर माझा फार वेळ खाल्ला आहे. एक अत्यंत प्रथितयश आणि बड्या कंपनीतील इंजिनियर मित्र आणि एक प्रथितयश रेडिओलॉजिस्ट डॉक्टर ( हे दोघे या लफड्यात का पडले तेच कळले नाही) यांनी प्रत्येकी तीन तीन तास खाल्ले आहेत. माझा मूळ धोशा मला हे करायचेच नाही असा असला तरीही केवळ गेट आउट म्हणून शकलो नाही म्हणून ६ तास फुकट गेले आहेत. ऍमवे चे एकही उत्पादन आजता गायत मी विकत घेतलेले नाही. हा भाग वेगळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हे दोघे या लफड्यात का पडले तेच कळले नाही

अर्धवटराव
Wed, 12/14/2016 - 10:55 नवीन
इतर म.ल.म बद्दल माहित नाहि, पण एम्वे ने अनेकांना मालामाल करुन दिलं आहे. एम्वेची काहि प्रॉडक्ट्स खरच चांगली आहेत. म.ल.म. हा निव्वळ धोकेबाजीचा धंदा आहे हे साफ चुक आहे. त्या बिझनेस मॉडेलमधे बर्‍याच अंशी तथ्य आहे. पण जसं क्रोसीन देऊन पोराचा ताप उतरवला कि बापाला आपण डॉक्टर झाल्याचा भास होतो, चार दिवस योगाभ्यास करुन अनेकांच्या कुंअलिनी वगैरे जागृत व्हायला लागतात, त्याचप्रमाणे धंदा ज्यांच्या गुणसुत्रातच नाहि अशा लोकांना आपण एकदम टाटा-बिर्ला झाल्याचा भास होतो व पुढे त्याची वाट लागते. ज्यांना धंदा कळतो ते गरज->मागणी-पुरवठा अशी चेन शोधतात व आपला नफा कमावतात. म.ल.म सुद्धा याच तत्वाने चालतो, फक्त त्यात लिंक्स थोड्या वेगळ्या पद्धतीने लागतात. ज्यांना त्या लावता येत नाहि, व तसं करणं आपल्याला जमणार नाहि हे कळतं ते या धंद्यापासुन दूर राहातात, आणि तेच योग्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

ज्यांना धंदा कळतो ते गरज-

आदूबाळ
Wed, 12/14/2016 - 11:32 नवीन
ज्यांना धंदा कळतो ते गरज->मागणी-पुरवठा अशी चेन शोधतात व आपला नफा कमावतात. म.ल.म सुद्धा याच तत्वाने चालतो, फक्त त्यात लिंक्स थोड्या वेगळ्या पद्धतीने लागतात.
याच्याबद्दल जरा विस्ताराने लिहिता का? मलमचा मुख्य यूएस्पी असा आहे की एकदा तुम्ही एका माणसाला जोडलंत, की तुम्हाला पैसे मिळतील. तसंच, त्या माणसाने जोडलेल्या माणसांमागेही पैसे मिळत राहतील. त्या माणसाच्या माणसांनी जोडलेल्या, ... ∞ "तू मला पैसे मिळवून दिलेस याबद्दल ही घे बक्षिसी / फाईंडर्स फी / कमिशन / एजन्सी फी" हे जगातल्या प्रत्येक बिझिनेस मॉडेलमध्ये घडतं. आणि ते योग्य आहे, कारण एजंटने केलेले श्रम आणि त्याला मिळालेले पैसे यात थेट नातं असतं. पण मलम वगळता अन्य कोणतंही बिझनेस मॉडेल "डेरिव्हेटेव्ह कमिशन" देत नाही. वरील उदाहरणात त्या एजंटच्या सब-एजंटच्या सब-एजंटच्या कमिशनमधला कोणताही भाग एजंटला मिळत नाही, कारण ते 'थेट नातं' नाही. जगात कोणतेही पैसे काम केल्याबद्दल (परफॉर्मिंग फंक्शन्स), भांडवल गुंतवल्याबद्दल (डिप्लॉयिंग अ‍ॅसेट्स) आणि/किंवा जोखीम घेतल्याबद्दल (बेअरिंग रिस्कस) मिळतात. मलमच्या डेरिव्हेटिव्ह कमिशन मॉडेलमध्ये हे घडताना दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा