Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by खेडूत on गुरुवार, 08/04/2016 - 21:29
लेखनविषय (Tags)
धोरण
समाज
जीवनमान
क्रीडा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
शुभेच्छा
अभिनंदन
प्रतिक्रिया
बातमी
माहिती
रिओ ऑलिम्पिक २०१६ गेल्या वेळी लंडन ऑलिम्पिकच्या वेळेस २०१२ ला इंग्लंडमधेच वास्तव्य असल्याने ऑलिम्पिकमधील पाचसहा इव्हेंट्स आणि सामने प्रत्यक्ष जाऊन पहाता आले. आयुष्यात कधीतरी ऑलिम्पिक सामने पाहू ही इच्छा याचि देही पूर्ण झाली. यंदा ब्राझीलमध्ये प्रथमच रिओला ऑलिम्पिक होत आहे. ब्रिक्स देश म्हणून ब्राझील महत्व टिकवून आहेच, पण या स्पर्धेच्या निमित्ताने शानदार आयोजन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले महत्व ठळक करण्याचा ते प्रयत्न करतील. भारत अद्याप दोन दशके तरी या आयोजनास मुकेल असे वाटते. ५ ते २१ ऑगस्ट चालणाऱ्या या स्पर्धेचा थरार माझ्यासह अनेकांना यावर्षी दूरचित्रवाणीवरच अनुभवावा लागणार आहे. प्रायोजक आणि आयोजक, माध्यमे यांची लगबग सुरू झाली असेल. सुरक्षितता हाही सर्वात महत्वाचा मुद्दा आहेच. अनेक अपुरी कामे आणि आयोजनाचा गोंधळ तिथेही ऐकायला मिळतोय. पण तेव्हढं चालायचंच. भारताची कामगिरी अलीकडच्या काळात चांगली होते आहे, त्यामुळे नव्या पिढीला प्रोत्साहन मिळून अधिकाधिक ऑलिम्पियन खेळाडू तयार व्हावेत ही अपेक्षा आहे. यंदा हॉकी, कुस्ती, टेनिस, बॅडमिंटन शिवाय तिरंदाजी, नेमबाजी, गोल्फमधेही दाखल घेण्याजोगी कामगिरी होईल असे वाटते. तिथे उपस्थित राहणारे मोजके मिपाकर तरी असतील अशी आशा आहे. असल्यास ते तिथल्या खेळाविषयी बातम्यां सोबत सामाजिक आणि तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांविषयी लिहीतीलच. त्यांच्याकडून आणि अन्य क्रीडारसिकांकडून वेळोवेळी ताजी माहिती मिळावी यासाठी हा धागा. भारतीय चमूला या ऑलिंपिक स्पर्धेसाठी शुभेच्छा ! काही दुवे स्पर्धेचे संस्थळ पदकतालिका
  • Log in or register to post comments
  • 79468 views

प्रतिक्रिया

Submitted by यशोधरा on Fri, 08/05/2016 - 11:28

Permalink

धागा पाहिल्याची पोच.

धागा पाहिल्याची पोच.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Sun, 08/07/2016 - 08:31

In reply to धागा पाहिल्याची पोच. by यशोधरा

Permalink

ओह पोच वेग्रे हुच्च एकदम

ओह पोच वेग्रे हुच्च एकदम
  • Log in or register to post comments

Submitted by मोहनराव on Fri, 08/05/2016 - 13:57

Permalink

भारतीय खेळाडुंना शुभेच्छा!!

भारतीय खेळाडुंना शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Fri, 08/05/2016 - 14:27

Permalink

सर्व खेळाडूंना शुभेच्छा

आणि भारताने चमकदार कामगीरी करावी अशी दृढ इच्छा !!!! याध्यावर नियमीत येणारच.. नितवाचक मिपॉलींपकवाला नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Fri, 08/05/2016 - 15:00

In reply to सर्व खेळाडूंना शुभेच्छा by नाखु

Permalink

१+

सहमत
  • Log in or register to post comments

Submitted by साधा मुलगा on Fri, 08/05/2016 - 14:59

Permalink

सर्व भारतीय खेळाडूंना

सर्व भारतीय खेळाडूंना शुभेच्छा!!! दुवा आणि लेखासाठी धन्यवाद ! यावर्षी भारत अत्तापार्यान्त्ची सर्वोकृष्ठ कामगिरी करेल अशी आशा आहे. कबड्डी चा समावेश ऑलिम्पिक मध्ये व्हावा असे वाटते. google चांगली माहिती देत आहे एका क्लिक वर.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Fri, 08/05/2016 - 15:26

Permalink

आज पुरुष आणि स्त्रीयांच्या

आज पुरुष आणि स्त्रीयांच्या तिरंदाजीची "रँकिंग राऊंड" आहे. बोंबाल्या देवी हेच एक त्यातल्यात्यात माहीत असलेलं नाव.
  • Log in or register to post comments

Submitted by पाटीलभाऊ on Fri, 08/05/2016 - 19:43

In reply to आज पुरुष आणि स्त्रीयांच्या by आदूबाळ

Permalink

रँकिंग राऊंड

पुरुषांच्या तिरंदाजीच्या वैयक्तिक रँकिंग राऊंडमध्ये भारताचा अतनु दास हा ६८३ गुणांसह पाचवा क्रमांकावर राहिला. तर दक्षिण कोरियाच्या किम वूजिन याने ७०० गुणांसह जागतिक विक्रम नोंदविला.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Fri, 08/05/2016 - 22:10

Permalink

नारसिंग यादव काय करतो याकडे

नारसिंग यादव काय करतो याकडे लक्ष आहे
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Fri, 08/05/2016 - 22:26

Permalink

भारतिय चमूतील सर्व खेडाळूंना

भारतिय चमूतील सर्व खेडाळूंना उत्तुंग यशासाठी अनेकानेक शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Sat, 08/06/2016 - 17:09

Permalink

उद्घाटन तर मस्त झाले. थेट न

उद्घाटन तर मस्त झाले. थेट न पहाता आल्याने नंतर पाहिले. आता पाचला नौकानयन स्पर्धा आहे. दत्ता भोकनाळ हा एकमेव खेळाडू आहे. तो म्हणे तीन वर्षांपूर्वी पाण्याला घाबरायचा! साडेसातला आयर्लंड बरोबर हॉकी सामना आहे, शिवाय पेस बोपन्नाचा दुहेरी सामना आहेच. याशिवाय नेमबाजी व टे.टे. आहेत. भारत खेळत नसलेले अन्य खेळ बघण्यात रस आहेच.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Sat, 08/06/2016 - 19:35

In reply to उद्घाटन तर मस्त झाले. थेट न by खेडूत

Permalink

भोकनाळ उपांत्य फेरीत!

भोकनाळ उपांत्य फेरीत! आज प्रार्थना ठोंबरे आणि सानिया मिर्झा दुहेरी सामनाही आहे ना?
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Sat, 08/06/2016 - 22:30

In reply to भोकनाळ उपांत्य फेरीत! by आदूबाळ

Permalink

हो, पण् इथे रात्री दीडला आहे.

हो, पण् इथे रात्री दीडला आहे. तुमच्याकडे पहाता येईल.,
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 08/06/2016 - 19:44

Permalink

धाग्यावर लक्ष आहे.

धागा काढल्याबद्दल आभारी. धाग्यावर आणि खेळावर लक्ष असेलच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by साधा मुलगा on Sat, 08/06/2016 - 21:34

Permalink

दत्तू बबन भोकनाल उपांत्यपूर्व

दत्तू बबन भोकनाल उपांत्यपूर्व फेरीत दाखल. शुटींग मध्ये भारताच्या पदरी निराशा. हॉकी मध्ये बराताने आयर्लंड ला ३-२ ने हरविले. तिरंदाजी मध्ये महिला वैयक्तिक आणि सांघिकच्या पुढल्या फेरीत.
  • Log in or register to post comments

Submitted by अमितसांगली on Sat, 08/06/2016 - 22:46

Permalink

पेस

पेस-बोपान्ना बाहेर....
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Sat, 08/06/2016 - 23:24

Permalink

पुरुषांची सायकल शर्यत संपत आली आहे

शेवटचे तीस किमि आहेत. लाईव बघतोय. http://stream.nbcolympics.com/mens-cycling-road-race-part-2?nid=23060_2542
  • Log in or register to post comments

Submitted by पाटीलभाऊ on Sun, 08/07/2016 - 02:34

Permalink

टेबल-टेनिस

टेबल-टेनिस वैयक्तिक स्पर्धेत भारताच्या आशा संपुष्टात.
  • Log in or register to post comments

Submitted by अमितसांगली on Sun, 08/07/2016 - 08:25

Permalink

पदक अवघड होत चाललय आपल्यासाठी...

सानिया मिर्झा आणि प्रार्थना ठोंबरे पराभूत....जितू राय बाहेर...
  • Log in or register to post comments

Submitted by साधा मुलगा on Sun, 08/07/2016 - 18:52

Permalink

भारताची नेमबाजी महिला सांघिक खेळाची सुरुवात

पहिला सेट भारतीय महिलांनी जिंकला.
  • Log in or register to post comments

Submitted by साधा मुलगा on Sun, 08/07/2016 - 18:56

In reply to भारताची नेमबाजी महिला सांघिक खेळाची सुरुवात by साधा मुलगा

Permalink

दुसरा सेट एका पोइंट ने हरलो :

दुसरा सेट एका पोइंट ने हरलो :( ,टाय झालाय
  • Log in or register to post comments

Submitted by साधा मुलगा on Sun, 08/07/2016 - 19:02

In reply to दुसरा सेट एका पोइंट ने हरलो : by साधा मुलगा

Permalink

तिसरा सेट टाय झालाय, त्यामुळे

तिसरा सेट टाय झालाय, त्यामुळे आता हो चौथा सेट जिंकेल तो पुढे जाईल
  • Log in or register to post comments

Submitted by साधा मुलगा on Sun, 08/07/2016 - 19:10

Permalink

चौथा सेट जिंकून पुढील फेरीत

चौथा सेट जिंकून पुढील फेरीत प्रवेश केलेला आहे. भारतीय चमूचे अभिनंदन!!!
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Sun, 08/07/2016 - 22:25

Permalink

फारच छान झाला.

फारच छान झाला. आता रशियासोबत आहे, पहातोय.
  • Log in or register to post comments

Submitted by साधा मुलगा on Mon, 08/08/2016 - 09:00

Permalink

नेमबाजी मध्ये आपल्या महिला

नेमबाजी मध्ये आपल्या महिला संघाला रशियाकडून पराभव पत्करावा लागला. खरेतर आपल्या संघाने चांगली लढत दिली. तिसऱ्या सेटपर्यन्त आपण 2-1 ने पुढे असताना आपण तय ब्रेकर मध्ये हरलो. आपल्या पोरी खरेतर चांगल्या खेळत होत्या, एखादी चूक आपल्याला किती महागात पडू शकते हे ह्यावरून कळते. रशियाचा संघ पण चान्गला होता , पहिल्याच सेट मध्ये 10,9,9 असा स्कोर केल्यावर आपल्या पोरींचे खरे नाही असे वाटले, पण आपल्या पोरींनीही कौतुकास्पद लढत दिली.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Mon, 08/08/2016 - 14:52

In reply to नेमबाजी मध्ये आपल्या महिला by साधा मुलगा

Permalink

+1

+1
  • Log in or register to post comments

Submitted by साधा मुलगा on Mon, 08/08/2016 - 09:37

Permalink

दीपा कर्माकरच्या खेळाचे नीट

दीपा कर्माकरच्या खेळाचे नीट कव्हरेज करत नव्हते, तिची एक उडी पहिली पण upto the mark वाटली नाही पण तिने बाकी राऊंड्स मध्ये चांगली कामगिरी केलेली दिसते कारण सकाळी उठलो तेवहा ती फायनल ला पोहोचल्याचे कळले!!! तिलाही फायनल साठी शुभेच्छा! हॉकी मध्ये महिला संघाने जपनशी बरोबरी साधली. अजून तरी भारताच्या पदरी मेडल नाही, सुरुवात थोडी निराशाजनक असली तरी अजून संधी आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Mon, 08/08/2016 - 11:03

Permalink

काल ही दुखापत पाहिली आणि

Image removed. काल ही दुखापत पाहिली आणि काळजाचा ठोका चुकला.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋतुराज चित्रे on Mon, 08/08/2016 - 11:30

Permalink

Vault मध्ये दीपा कर्माकर

Vault मध्ये दीपा कर्माकर बिनधास्त वाटतेय व धोकादायक Produnova प्रकार करायला अजिबात कचरत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Mon, 08/08/2016 - 12:17

In reply to Vault मध्ये दीपा कर्माकर by ऋतुराज चित्रे

Permalink

दीपाने लहान वयात इतकी मोठी

दीपाने लहान वयात इतकी मोठी कामगिरी केलीय. तिचा आणि नेमबाजांचा खेळ जागून पाहिल्याचं सार्थक झालं. नेमबाजीत रशियन काकू सुसाट होत्या तर भारताकडून छोटी मुलगी चमकली. मुकाबला जबरदस्त झाला. प्रेशरमधे आपले खेळाडू गडबडतात. हॉकीतही तसेच झाले. दोन भागांऐवजी चार पन्धरा मिनिटांचे भाग केलेत. या बदलाचा जपानी मुलींनी फायदा घेतला. आज जर्मनीशी हॉकी मुकाबला, साडेसातला घरी पोहोचायला हवं ...!
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Mon, 08/08/2016 - 11:50

Permalink

हॉकी

संघाला शुभेच्छा... काहीही (ठळक+वादग्रस्त) राजकारण न होता गेलेला संघ म्हणून दोन्ही संघानी चांगली कामगिरी करावी ही ईच्छा..
  • Log in or register to post comments

Submitted by साहेब.. on Mon, 08/08/2016 - 14:19

Permalink

धागा काढल्याबद्दल आभारी

धाग्यावर आणि खेळावर लक्ष असेलच.
  • Log in or register to post comments

Submitted by महासंग्राम on Mon, 08/08/2016 - 15:22

Permalink

ब्रिक्स देश म्हणून ब्राझील

ब्रिक्स देश म्हणून ब्राझील महत्व टिकवून आहेच, पण या स्पर्धेच्या निमित्ताने शानदार आयोजन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले महत्व ठळक करण्याचा ते प्रयत्न करतील. नियोजन फसलंय ब्राझीलच. रोईंग सारख्या खेळात खेळाडूंना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Mon, 08/08/2016 - 18:49

Permalink

अभिनव बिंद्रा फायनल मध्ये...

अभिनव बिंद्रा फायनल मध्ये...
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Mon, 08/08/2016 - 20:52

Permalink

अभिनव बिंद्रा ... चौथा....

अभिनव बिंद्रा ... चौथा.... वेल प्लेड बिंद्रा....!
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Mon, 08/08/2016 - 20:55

Permalink

आणि त्याच वेळी हॉकीत... १३९

आणि त्याच वेळी हॉकीत... १३९ मिनीटे ५५ सेकंद सुंदर खेळ करून भारत २:१ ने पराभूत. शेवटच्या पाच सेकंदात गोल खाल्ला. तोंडाची चव गेली आता...
  • Log in or register to post comments

Submitted by थॉर माणूस on Tue, 08/09/2016 - 06:07

In reply to आणि त्याच वेळी हॉकीत... १३९ by असंका

Permalink

मुली इंग्लंडकडून पराभूत.

मुली इंग्लंडकडून पराभूत.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Mon, 08/08/2016 - 20:57

Permalink

१३९ नाही ...५९ मिनीटं ५५

१३९ नाही ...५९ मिनीटं ५५ सेकंद...सॉरी.
  • Log in or register to post comments

Submitted by साधा मुलगा on Mon, 08/08/2016 - 21:21

Permalink

आजचा पण दिवस खराब जातोय, एका

आजचा पण दिवस खराब जातोय, एका एका पोइंत्स नि हरतोय आपण. पण बिंद्रा चानागाला खेळला, hats ऑफ !!! जागतिक पातळीवर अशी कामगिरी करणे सोपे नाही, पण शेवटच्या ४ मध्ये पोहोचून आपलाच माणूस ४था यावा याला काय म्हणावे.
  • Log in or register to post comments

Submitted by साधा मुलगा on Mon, 08/08/2016 - 21:38

Permalink

आजचा भारताचा प्रवास

अभिनव बिंद्रा ४ था आला. नेमबाजी महिला एकेरीमध्ये बोम्बयाला देवी आणि दीपिका पुढे, लक्ष्मि राणी माझी बाहेर. हॉकीमध्ये शेवटच्या क्षणात २-१ ने जर्मनीने भारताचा केला पराभव. जलतरण butterfly event चालू आहे. रात्री महिला हॉकी संघाची ग्रेट ब्रिटनशी लढत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Mon, 08/08/2016 - 22:46

In reply to आजचा भारताचा प्रवास by साधा मुलगा

Permalink

जलतरणातही प्रकाश चौथा!

जलतरणातही प्रकाश चौथा! आजचा दिवस आपला नाहीच....
  • Log in or register to post comments

Submitted by थॉर माणूस on Mon, 08/08/2016 - 23:54

In reply to जलतरणातही प्रकाश चौथा! by खेडूत

Permalink

त्याच्या हीट मधेच चौथा. या

त्याच्या हीट मधेच चौथा. या कामगिरी वर फाइनल साठी पात्र ठरण्याची शक्यता नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 08/08/2016 - 21:48

Permalink

वाइट दिवस

बिंद्राचं चौथ्या क्रमांकावर राहणे आणि हॉकीत उत्तम खेळ करूनही शेवटची तीन सेकंद बाकी असतांना गोल झाला, हे पाहतांना वाईट वाटलं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by साधा मुलगा on Tue, 08/09/2016 - 10:48

Permalink

अभिनव बिंद्र काय किंवा आणखी

अभिनव बिंद्र काय किंवा आणखी कुणी काय सगळे अगदी ०.५ च्या फरकाने हरत आहेत, याचा अर्थ हरलेले लोक काही कमी होते असा भाग नाही , पण मोक्याच्या वेळी जो कुणी आपला खेळ उंचावेल तो बाजी मारून नेतो. मागे एकदा मी हर्ष भोगले यांचे achievers of excellence या विषयावर असलेले भाषण मिपावर धागा काढून शेअर केलेले. आजच्या ऑलिम्पिकच्या अनुषंगाने त्याची आठवण झाली. त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते कि नुसता अंगीभूत टॅलेंट तुम्हाला सर्व काही देवू शकत नाही, तो तुमचे एक दार उघडेल, नशिबाने दुसरे हि उघडेल पण शेवटचे दार उघडायला तुम्हाला तुमची मेहनत, तुमच्या मनाचा तोल आणि प्रत्येक क्षणी आपल्यातले १००% देण्याची तयारी लागते. काल पर्वाचे जे सामने पहिले त्यातही हेच प्रकर्षाने दिसून आले. आपला एखादा शॉट चुकतो, आपला प्रतिस्पर्धी त्याच वेळी सर्वोत्तम कामगिरी करत असतो, पुढील दोन शॉट वर आपल्याला सर्वोत्तम खेळ करायचा असेल आपल्या मनाचे संतुलन , एकाग्रता न ढळता आपल्याला कामगिरी केली पाहिजे, हे सारे नुसते TV वर बघत असताना आपल्याला टेन्शन येते, प्रत्यक्ष खेळाडूचे काय होत असेल याची कल्पना करा. आणि हेच खेळाडू गेले दोनेक वर्ष यावर मेहनत घेत असतात आणि अक्षरशः काही सेकंदात होत्याच नव्हते होत. भारतासाठी अजूनही वेळ गेलेली नाही काही खेळाडून कडून अजूनही आशा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Tue, 08/09/2016 - 13:39

In reply to अभिनव बिंद्र काय किंवा आणखी by साधा मुलगा

Permalink

बरोबरे..आवडलं! चार वर्षाची

बरोबरे..आवडलं! चार वर्षाची मेहनत क्षणात मातीमोल होते. पण खेळाचे हेच स्वरुप असते. सगळेच जिंकू शकत नाहीत. हेच म्हणून काल स्वतःची समजूत काढून घेतलेली... शेवटच्या सेकंदात खाल्लेल्ले गोल विसरू म्हणलं तरी विसरत नाहीत. अगदी विरेन रस्किन्हा, धनराज होते तेव्हाही हे झालेलं आणि अजूनही तेच होतंय.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Tue, 08/09/2016 - 16:48

Permalink

आज काय काय ?

आज काय काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Tue, 08/09/2016 - 17:03

Permalink

साडेसातला अर्जेंटिनाबरोबर

साडेसातला अर्जेंटिनाबरोबर हॉकी आहे. पिस्तोल आणि धनुष्यबाण नेमबाजी सुरु होईल दहा मिनिटांत.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Tue, 08/09/2016 - 17:20

Permalink

दत्तू भोकनाळ..रोविंग...

दत्तू भोकनाळ..रोविंग... त्याची पण मॅच आहे ना आज?
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Tue, 08/09/2016 - 17:22

In reply to दत्तू भोकनाळ..रोविंग... by असंका

Permalink

हो...आत्ताच आहे!

हो...आत्ताच आहे! आज दीपा कर्माकरचा २३ वा वाढदिवस आहे असे समजले, तिला शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Tue, 08/09/2016 - 17:27

Permalink

अरे वा...+१!

अरे वा...+१! खेळणार आहे का ती आज?
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • पान 8
  • पान 9
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com