Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by संपादक मंडळ on Fri, 10/31/2014 - 13:03
लेखनविषय (Tags)
कला
जीवनमान
तंत्र
छायाचित्रण
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
सद्भावना
शुभेच्छा
आस्वाद
प्रतिभा
http://www.misalpav.com/node/28571 http://www.misalpav.com/node/28729 http://www.misalpav.com/node/28931 ******************************************** नमस्कार मंडळी! दिवाळीच्या फराळाचा फन्ना उडवला का नाही! आणि दिवाळी अंकही बरेच वाचून झाले असतील! आता जराशा विश्रांतीनंतर छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त चौथी स्पर्धा सुरू करूया चला!. नुकतीच दिवाळी संपली आहे. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. म्हणून या स्पर्धेचा विषय राहील उत्सव प्रकाशाचा! मग तो उत्सव एका पणतीचा असेल किंवा लखलखत्या रोषणाईचा, किंवा आकाशातल्या नैसर्गिक रोषणाईचा. 'प्रकाश उत्सव' ही संकल्पना केंद्रस्थानी असलेली तुमची छायाचित्रे येऊ द्यात तर इथे! प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. बर्‍याच जणांच्या विनंतीवरून ही मुदत ७ ऐवजी १५ दिवस करत आहोत. इतर सर्व नियम मात्र दुसर्‍या आणि तिसर्‍या स्पर्धेप्रमाणेच राहतील! सर्वच स्पर्धकांना आणि सहभागीं मंडळींना शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
  • 71736 views

प्रतिक्रिया

Submitted by माम्लेदारचा पन्खा on Fri, 10/31/2014 - 13:13

Permalink

एन्ट्री टाकायची कशी?

विस्मरण झालंय.....जरा लिंक द्याल का कोणी?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Fri, 10/31/2014 - 23:58

Permalink

माझी प्रवेशिका

गेल्या वर्षी आमच्या ओळखीच्या मिश्र (भारतीय पती, अमेरिकन पत्नी) जोडप्याकडे थँक्सगिविंग डिनरला गेलो होतो. कॅंडल लाइट डिनरसाठीची सुंदर सजावट होती. त्यावेळी काढलेला हा फोटो. Image removed. EXIF Details: Sony Nex5N; F/5.6; 1/100 फोटोवर पोस्ट प्रोसेसिंग केलेले नाही. फोटो मोठ्या आकारमानात बघायचा असल्यास कृपया चित्रावर क्लिक करावे. माझ्या छायाचित्रणात सुधारणा करण्यासाठी आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Mon, 11/03/2014 - 10:43

In reply to माझी प्रवेशिका by श्रीरंग_जोशी

Permalink

सुरेखच आलाय फोटु

सुरेखच आलाय फोटु
  • Log in or register to post comments

Submitted by काव्यान्जलि on Sat, 11/01/2014 - 10:48

Permalink

माझी प्रवेशिका..

लक्ष्मी पूजना दिवशी काढलेला फोटो... Image removed. Exif Details : Canon EOS 600D Lens- 18-55 Stutter speed - 1/15s Aperture - f/5.6 ISO 1250 फोटोवर पोस्ट प्रोसेसिंग केलेले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Mon, 11/03/2014 - 10:43

In reply to माझी प्रवेशिका.. by काव्यान्जलि

Permalink

झकासच

झकासच
  • Log in or register to post comments

Submitted by मोहन on Sat, 11/01/2014 - 12:26

Permalink

माझी पण प्रवेशिका

जयपूरला कुठे ते आठवत नीही Image removed. - जयपूर Exif Details - Canon EOS 1000 , Lens : 18-55 Exposure 1/6 , Focal Length - 18 mm f/3.6 ISO 800 (संपादन : चित्र पानावर नीट दिसावे यासाठी त्याचा आकार योग्य तेवढा कमी केला आहे.)
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Mon, 11/03/2014 - 10:44

In reply to माझी पण प्रवेशिका by मोहन

Permalink

सहिच रे

सहिच रे पाण्यात पडलेलं प्रतिबिंब मस्तच दिसतंय
  • Log in or register to post comments

Submitted by खोंड on Sat, 11/01/2014 - 14:53

Permalink

माझी बारीक केलेली प्रवेशिका

Image removed. मोठे छायाचीत्त्र पाहण्या करीता फोटो क्लिक करा Canon EOS 600D Focal Length: 18 mm Aperture: 7.6 Exposure: 1/250 ISO:100 पोस्ट प्रोसेसिंग केले आहे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sat, 11/01/2014 - 15:07

In reply to माझी बारीक केलेली प्रवेशिका by खोंड

Permalink

मी जर चुकत नसेल तर हे सासवडचे

मी जर चुकत नसेल तर हे सासवडचे संगमेश्वर मंदिर आहे. १३ व्या शतकातले, यादवकालीन. कळस मात्र नंतर जीर्णोद्धारीत केलेला. टिपिकल पेशवेकालीन शैली.
  • Log in or register to post comments

Submitted by खोंड on Sat, 11/01/2014 - 15:29

In reply to मी जर चुकत नसेल तर हे सासवडचे by प्रचेतस

Permalink

अंदाज थोडासा चुकला …

अंदाज थोडासा चुकला … हे सासवड जवळील ऐतिहासिक हिवरे गावातील शंकराचेच मंदिर आहे. फक्त २ कि मी लांब असेल. हे मंदिर पांडवकालीन आहे. कऱ्हा नदीवर अशी बरीच सुंदर शंकराची मंदिर आहेत उदाहरणार्थ संगमेश्वर, वटेश्वर, सिद्धेश्वर, पांडेश्वर … इ. या बद्दल एक आख्यायिका आहे. जेंव्हा या भागात पांडवांचा वास होता तेंव्हा त्यांनी महायज्ञ करायचे ठरवले आणि त्या साठी ब्र्म्हदेवाला आमंत्रित करायचे होते. त्यांना बोलवायचं काम भिमाकडे होते. ब्र्म्हदेव तेंव्हा तपस्चर्या करत होते. त्यांना जागे करण्यासाठी भीमाने त्यांच्या डोक्यावर कमंडलू उपडा केला आणि त्या पाण्यातून कऱ्हा नदीचा उगम झाला . तपश्चर्या भंग केली म्हणून ब्र्म्हदेव भीमच्या मागे लागले. जसे ब्र्म्हदेव जवळ येत तसा भीम एक शंकराची पिंड बनवत असे. ब्र्म्हदेव शंकराचे भक्त असल्याने पूजा न करता त्यांना पुढे जाता येत नसे. याच पिंडींवर नंतर पांडवांनी मंदिरं बांधली. सगळी मंदीरं प्रत्येकी एका रात्री बांधली असं म्हणतात. या मंदिरामध्ये प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला एका शिलेमध्ये ५ अगदी गोलाकार अशी भोक आहेत. ती पांडवांची खून आहे अस म्हणतात. या मंदिराला एक दगडी गच्ची देखील आहे. हे छायाचित्तर गच्चीवरूनच काढले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Sat, 11/01/2014 - 15:50

In reply to अंदाज थोडासा चुकला … by खोंड

Permalink

ही सर्व मंदिरे पाहिली आहेत.

ही सर्व मंदिरे पाहिली आहेत. बाकी ह्या आख्यायिकांची नेहमीच मोठी गंमत वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Fri, 11/21/2014 - 12:13

In reply to माझी बारीक केलेली प्रवेशिका by खोंड

Permalink

ओहो...

हे तर आमच्या आजोळचे मंदीर! शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीचे कैक दिवस या मंदीरात घालवलेत. आवारात, सभागॄहात, गच्चीवर... (अवांतरः हे मंदीर ओढ्याच्या पलिकडे आहे. ओढ्याच्या अलिकडे एक म्हसोबाचेदेखील मंदीर आहे. त्यात ९-१० फूट उंच शीळा आहे, ज्याची म्हसोबा म्हणून पूजा केली जाते. हिवर्‍याची यात्रा याच म्हसोबाची यात्रा असते.)
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Sat, 11/01/2014 - 16:58

Permalink

प्रकाशाचे प्रकाशचित्र.......

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Sun, 11/02/2014 - 11:07

Permalink

आमचा उजेड..

हा घ्या आमचा उजेड.. ;-) Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 11/07/2014 - 19:11

In reply to आमचा उजेड.. by चिगो

Permalink

चिगोचे फोटो नेहमीच खास असतात.

चिगोचे फोटो नेहमीच खास असतात.
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Sun, 11/02/2014 - 11:10

Permalink

स्पर्धेसाठी नाही..

हा स्पर्धेसाठी नाही.. सहज टाकलाय. चालत नसल्यास उडवावा, ही विनंती.. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 11/02/2014 - 12:34

Permalink

स्पर्धेसाठी नाहीत

Image removed. ***** Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by माम्लेदारचा पन्खा on Sun, 11/02/2014 - 15:28

Permalink

मा झी एक प्र वे शि का.....

Image removed. घरची दीपमाळ.....मोबाईलमधे घेतलेले छायाचित्र..... कोणतेही प्रोसेसिंग केलेले नाही..........
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Mon, 11/03/2014 - 10:55

In reply to मा झी एक प्र वे शि का..... by माम्लेदारचा पन्खा

Permalink

येस

स्पर्धेला परफेक्ट बसणारा फोटू वाटतोय मला अप्रतिम आलाय
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sun, 11/02/2014 - 19:14

Permalink

काल कमला नेहरु पार्क { मलबार

काल कमला नेहरु पार्क { मलबार हिल} इथुन { जिथे म्हातारीचा बूट आहे } सैफी हॉस्पिटल पासुन दिसणारा क्वीन्स नेकलेस {मरीन ड्राइव्ह } टिपला... बरीच कसरत आणि सेटींग्स चे प्रयोग करुन फोटो काढले. त्यातला एक इथे देतो आहे. Image removed. फोटोत डाविकडे जी वास्तु दिसते आहे ते सैफी हॉस्पिटल आहे, झूम करुन ती बिल्डींग नक्की कशी दिसते ते खालील फोटोत कळेल. { फक्त १ फोटो देण्याचा नियम अर्थातच लक्षात आहे, फक्त ती वास्तु कशी दिसते त्यासाठीच खालचा फोटो दिला आहे,स्पर्धेसाठी वरचाच फोटो धरला जावा.} सैफी हॉस्पिटल :- Image removed.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- LIC sells Rs 7,700 crore shares in 14 Sensex companies, ups stake in 10
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Mon, 11/03/2014 - 10:55

In reply to काल कमला नेहरु पार्क { मलबार by मदनबाण

Permalink

मला खालचाच फोटो आवडला जास्त

मला खालचाच फोटो आवडला जास्त :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 11/03/2014 - 12:12

In reply to मला खालचाच फोटो आवडला जास्त by स्पा

Permalink

वरचा फोटो तांत्रिक दॄष्ट्या

वरचा फोटो तांत्रिक दॄष्ट्या मला काढायला कठीण गेला, मी ट्रायपॉडचा वापर केला नाही. तर जे लोखंडाचे सुरक्षतेचे कठडे आहेत {ज्यावर कॅमॅरा न हलता सरळ राहुच शकणार नाही असा} त्यावर ठेवुन काढला आहे. अनेक लोक तिथे येतात, त्यामुळे तशी गर्दी तिथे असतेच. त्यात आपल्या इथे जर लोक रस्त्यावर चालताना बागेत चालल्या सारखे चालतात, तर बागेत कसे चालत असतील याचा अंदाज केलेला बरा ! ;) बरं लोकांना आपण काही आदेश देउ शकत नाही, की ओ... ओ... अहो मी फोटो काढतो आहे मधे येउ नका. लोक तर असेही पाहिले आहेत, तुम्ही फोटो काढत असाल तर मुद्दामुन समोर येउन उभे राहतील. :) असो... तर अनेकांचे धक्के बसले ! :) त्यामुळे अनेक क्लीक्स वायाच गेले. आता तो लोखंडी कठडा ज्यावर ठेवुन { खरं तर नुसता टेकु देउन ठेवणे अधिक योग्य वाटेल} मी हा फोटो काढला तो तुमच्या सुरक्षतेसाठी { हो कॅमेरा ठेवण्यासाठीही तो नाही हे मला ठावुक आहे. ;) } आहे, पण अगदी डब्लु डब्लु एफच्या रिंगणात कसे दोरांवर कसे आदळतात, तसे धावत येउन आदळणारेही नग असतात. हल्ली सफ्लीच वेड आहे, प्रत्येक जण त्या लोखंडी कठण्याला टेकुन फोटो काठतात, त्यामुळे त्या कठड्यात मस्त कंपने येतात ! :) अश्या कठड्यावर ठेवुन सुद्धा ब्लर न होता फोटो आला,शिवाय एवढ्या अंधारात हे सगळं करण अधीक कठीण होत. त्यामुळे मी तो फोटो दिला आहे. झूम फोटो त्यामानाने मला काढायला सोपा वाटला.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Mon, 11/03/2014 - 11:34

Permalink

पद्मावतीच्या देवळात देवीसमोर

पद्मावतीच्या देवळात देवीसमोर तिन्हीसांजेला एका दगडीत लागलेला दिवा Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Fri, 11/07/2014 - 09:37

In reply to पद्मावतीच्या देवळात देवीसमोर by स्पा

Permalink

जबरदस्त..

खुपच सुंदर.. अत्यंत मंगल तरीही अत्यंत गुढ असं काहीसं फिलींग देणारा फोटो.. तुझी "फोटोजेनिक" नजर अत्यंत जबरा आहे, स्पा..
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Mon, 11/03/2014 - 12:58

Permalink

जबरदस्त क्लिक !

जबरदस्त क्लिक !
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Mon, 11/03/2014 - 13:00

In reply to जबरदस्त क्लिक ! by वेल्लाभट

Permalink

सगळेच!

सगळेच!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Mon, 11/03/2014 - 13:38

Permalink

कारंज्याच्या तुषारांनी तयार झालेले इंद्रधनुष्य!

माझी एंट्री - कारंज्याच्या तुषारांनी तयार झालेले इंद्रधनुष्य! स्थळ : फिलाडेल्फिया झू, फिलाडेल्फिया काळ : २०१० मधे कधी तरी Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 11/06/2014 - 15:09

In reply to कारंज्याच्या तुषारांनी तयार झालेले इंद्रधनुष्य! by प्रभो

Permalink

मस्त!

प्रकाशाचा आणि पाण्याच्या थेंबांचा खेळ!
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Mon, 11/03/2014 - 18:35

Permalink

माझी एन्ट्री!!

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 11/03/2014 - 20:43

In reply to माझी एन्ट्री!! by किसन शिंदे

Permalink

एकच नंबर !!

एकच नंबर !!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Tue, 11/04/2014 - 06:55

In reply to माझी एन्ट्री!! by किसन शिंदे

Permalink

किसन्देव ... लै भारी फोटू!

किसन्देव ... लै भारी फोटू!
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on Fri, 11/07/2014 - 09:34

In reply to माझी एन्ट्री!! by किसन शिंदे

Permalink

लैच भारी..

लैच जबरदस्त, किसनदेवा.. ह्या अश्या फोटोजसाठीतरी 'फटाकेमुक्त दिवाळी' नसावी, असं वाटतं..
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Fri, 11/07/2014 - 18:31

In reply to माझी एन्ट्री!! by किसन शिंदे

Permalink

सुरेख!

सुरेख!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Mon, 11/03/2014 - 21:47

Permalink

माझी प्रवेशिका

कॅमेरा - कॅनन ५०० डी फोकल लेन्ग्थ - ५५ मीमी ऑपरेटिव्ह मोड - मॅन्युअल एक्स्पोजर - ५ सेकंद अ‍ॅपर्चर - f/10 मिटरींग - इवॅल्युअ‍ॅटिव आएसओ - १०० Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Mon, 11/03/2014 - 21:52

Permalink

स्पर्धेसाठी नाही

स्पर्धेसाठी नाही माझं भुलेश्वर Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Tue, 11/04/2014 - 00:15

In reply to स्पर्धेसाठी नाही by प्रचेतस

Permalink

वा!

पोस्टप्रोसेसिंगमध्ये ब्लू चॅनेल सिलेक्ट करून थोडासा ब्लू कास्ट कमी करून पहा. अजून परिणाम छान दिसेल. फ्रेमिंग असं का घेतलं असावं असा विचार करतो आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 11/04/2014 - 08:52

In reply to वा! by एस

Permalink

धन्यवाद

पोस्ट प्रोसेसिंग कॉन्ट्रास्ट कमी जास्त करण्यापलीकडे येतंच नाही. तुमच्या पोस्ट प्रोसेसिंगवरील लेखाची अजूनही वाट पाहतो आहे. फ्रेमिंग असं घेण्याचा काही विचार नव्हता. फक्त मूर्तीवर एकाच बाजूने प्रकाश पडला होता आणि अर्धी बाजू अंधारात पूर्ण बुडून गेली होती त्याच वेळी हा फोटो क्लिकवला.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Tue, 11/04/2014 - 00:18

Permalink

सगळे फोटो जबरा आले आहेत.

सगळे फोटो जबरा आले आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Tue, 11/04/2014 - 00:20

Permalink

वा!

सर्वच छायाचित्रे एक से बढकर एक आहेत. खूपच छान! अवांतर - पोस्टप्रोसेसिंग केलेले नाही असे बर्‍याचजणांनी मुद्दाम सांगितले आहे. का बरे केलेले नाही? ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Tue, 11/04/2014 - 01:18

In reply to वा! by एस

Permalink

पोस्टप्रोसेसिंग

पोस्टप्रोसेसिंग करणे जमत नाही. फार पूर्वी शिकत असताना फोटो इम्पॅक्ट नावाचे टूल थोडेबहुत वापरले होते. अमेरिकेत राहून नव्याने फोटोशॉप वगैरे शिकायचे असेल तर पहिले ते विकत घ्यावे लागेल. त्यामुळे आधिच उल्हास त्यात फाल्गुनमास अशी अवस्था आहे :-) .
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Tue, 11/04/2014 - 08:24

Permalink

मस्त आलेत सगळेच फोटो.

मस्त आलेत सगळेच फोटो.
  • Log in or register to post comments

Submitted by काव्यान्जलि on Tue, 11/04/2014 - 10:51

Permalink

पोस्ट प्रोसेसिंग केले नाहीये कारण ….

१) फारसे जमत नाही :P २) फोटो चांगला येणं महत्वाचं आहे असं वाटत. पोस्ट प्रोसेसिंग मुळे फोटोग्राफरचे खरे स्किल्स लपवले जातात. (असं वाटणं कदाचित पोस्ट प्रोसेसिंग येत नाही म्हणूनच असावं.) पण आधी, बरे फोटो काढायला शिकायाचेत. मग प्रोसेसिंग !!
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on गुरुवार, 11/06/2014 - 17:18

In reply to पोस्ट प्रोसेसिंग केले नाहीये कारण …. by काव्यान्जलि

Permalink

तरीही

२) फोटो चांगला येणं महत्वाचं आहे असं वाटत. मुळात आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण कॅमेर्‍यातील अनेक तांत्रिक गोष्टींचा वापर करूनच फोटो घेत असतो.माझा अनुभव असा आहे की पोस्ट प्रोसेसिंगने फोटो अमुलाग्र बदलता येतो. विशेषत: फोटोतील छायाप्रकाशात एक प्रकारचा स्निग्धपणा आणता येतो. ( लेव्हल करेक्शन) कलर कास्ट दूर करता येतो.( कलर बॅलन्स) एकूण फोटोतील सर्वसाधारण प्रकाश वाढवता वा कमी करता येतो. ( एक्स्पोझर करेक्शन) .फोटोशॉप ला पर्याय म्हणून असणारी ओपन सोर्स सॉफ्टवेअर ही हे काम करतात. व हे शिकायला अर्धा तास पुरे. सबब फोटो करेक्शनने फोटोतील मजाच निघून जाते हे म्हणणं युक्त नाही. खरा फोटोग्राफर तोच जो कोणताही प्रगत कॅमेरा न वापरता ( आयसोली टाईप) उत्तम फोटो काढतो बाकी आपण बहुतेक जण तंत्राचेच गुलाम असतो.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 11/04/2014 - 11:28

Permalink

@ स्वॅप्सः

@ स्वॅप्सः लिवाच आता ते पोस्टप्रोसेसिंग काय आस्तंय ते तेच्यावर एक लेख :) (नुसता कॅमेर्‍यात पाहून किलिक कर्नारा छायाचित्र-आशिक्शित बिगारी फटुग्रापर) इए
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 11/04/2014 - 11:58

Permalink

लिवाच आता ते पोस्टप्रोसेसिंग

लिवाच आता ते पोस्टप्रोसेसिंग काय आस्तंय ते तेच्यावर एक लेख हेच म्हणतो. :) मी आता सगळे फोटो रॉ फॉरमॅट मधेच काढत असल्याने पोस्ट प्रोसेसिंग करतोच. {पुर्वी पोस्ट-प्रोसेसिंगला माझा विरोध होता कारण आपण स्वतःच फोटो असे काढावेत की त्याची गऱज पडु नये असा माझा विचार होता. मग हळुहळु रॉ फॉरमॅटवर स्वीच झाल्यावर पोस्ट प्रोसेसिंगचे महत्व कळले आणि पटले देखील.} प्रत्येकाची स्वतःची आवड आणि कौशल्य जसे असते त्या प्रमाणे फोटो प्रोसेस केलेले दिसतात.तरी सुद्धा अती प्रोसेसिंग टाळावे, कारण मग मूळ प्रकाशचित्रातली मजा निघुन जाउन फक्त पोस्ट-प्रोसेसिंगच नजरेला दिसते.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- अमरापूरकरांचे जाणे पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक' मातीत रमणारा अभिनेता! अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :( Maharaani :- { Sadak }
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Tue, 11/04/2014 - 13:28

Permalink

बरोबर

अती प्रोसेसिंग टाळावे, कारण मग मूळ प्रकाशचित्रातली मजा निघुन जाउन फक्त पोस्ट-प्रोसेसिंगच नजरेला दिसते.
पोस्टप्रोसेसिंग आणि एडिटिंग असा तो फरक आहे. अर्थात काय किती प्रमाणात चांगलं हे फारच सब्जेक्टिव आहे. लेख लिहायला बराच वेळ लागेल अजून. पूर्वतयारीत मग्न आहे. बादवे, त्यासाठी महागडी सॉफ्टवेअर घेण्याची सध्या गरज नाही. तुम्ही गिम्प सारख्या किंवा फास्टस्टोनसारख्या चकटफू गोष्टी वापरू शकता. बेसिक तत्त्वे एकदा समजली की मग तांत्रिक बाजूंचा विचार करू शकतो.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 11/04/2014 - 14:30

Permalink

ज्योत.

Image removed. कोणतीही प्रोसेसींग नाही. मोबाईलफोन lava iris x5 (सुनील बिरुटे) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by विलासराव on Tue, 11/04/2014 - 20:26

Permalink

हा स्पर्धेसाठी नाही:

Image removed. हा स्पर्धेसाठी नाही: Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by विलासराव on Wed, 11/05/2014 - 10:01

In reply to हा स्पर्धेसाठी नाही: by विलासराव

Permalink

पहिला स्पर्धेसाठी आहे.

पहिला स्पर्धेसाठी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 11/04/2014 - 23:36

Permalink

स्पर्धेकरिता नाही...

स्पर्धेकरिता नाही... दुबईतील बूर्ज खलिफावरील नविन वर्ष २०१४ ची रोषणाई (जालावरून)...
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com