✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

() हजामांना मार्गदर्शन करता येईल का? ()

३
३_१४ विक्षिप्त अदिती यांनी
Tue, 08/30/2011 - 04:29  ·  लेख
लेख
हे वाड्मयचौर्य नाही, फारतर कल्पना आणि शब्द उधारीवर आणले आहेत. कुठून? करा थोडं खोदकाम. सर्वच छोट्या मोठ्या शहरखेड्यांत हजाम अस्तित्वात आहेत. वेळोवेळी नवीन हजाम आपापली दुकानेदेखील उघडतात. (त्यातल्या काहींचा हजामपणाचा धंदा बसला. काहींनी वयोपरत्वे राजीनामा दिला. काहींनी तर पुन्हापुन्हा राजीनामा दिलेला आहे. तर काही दीर्घ मुदतीच्या रजेवर आहेत. काही हजामांच्या मते आपण त्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. शिल्लक असलेल्या) सर्वच हजामांना बिनपाण्याने सफाई करण्याची इच्छा असते. मात्र उत्साहाने काढून टाकलेल्या केसांमुळे अगर अतिबारीक केलेल्या भुवयांमुळे गिऱ्हाईकांनी तक्रार केली तर शिकाऊ हजाम निरुत्साही होतात किंवा कधीकधी चिडतातही. जुन्या हजामांना असे अनुभव काही नवीन नाहीत. पण गिऱ्हाईकांच्या अपेक्षा वेगळ्या असल्याने आणि फॅशन जगतात घडलेल्या घडामोडींबद्दल आणि जुन्या गिऱ्हाईकांच्या पूर्वानुभवांविषयी बरीच माहिती असल्याने कधी हजामांचे व गिऱ्हाईकांचे हेअर कट आणि भुवयांच्या आकारावरून वाद होतात, खटके उडतात, आणि यांचे स्वरूप तीव्र होते असे दिसते. या वादांची कारणे सर्वच चुकीची असतात असे नाही. सर्वच बरोबर असतात असेही नाही. यातील सर्व वादांची कारणे दूर करता येणे शक्यही नाही आणि गरजेचेही वाटत नाही. पण यापैकी अनेक वाद हे केवळ कर्तन कशा पद्धतीचे असावे याबद्दल स्पष्ट कल्पना नसल्यामुळे झालेल्या वादावादीतून घडलेले असतात असे लक्षात येते. म्हणून सर्वांनाच काही प्रश्न विचारत आहे. त्याची उत्तरे आपापल्या विचाराने द्यावी. या धाग्याचा उपयोग हजामाच्या दुकानातील आपापले कर्तन अधिक चांगले करून त्यातून दृष्यकलाभ्यासकांसाठी आकर्षक देखावा कसा तयार होईल यासाठी मार्गदर्शन किंवा सल्ला म्हणून करावा. गिऱ्हाईकांना जसा याचा उपयोग होईल तसा हजामांनाही आपले कर्तन सुधारण्यासाठी याचा उपयोग होईल असे वाटते. यातून जे काही कळेल ते संक्षिप्त स्वरुपात मांडण्याची जबाबदारी माझी. काही प्रश्न मांडते, माझी विस्तृत उत्तरेही नंतर देईनच. नवीन गिऱ्हाईकांनीही सहभाग घ्यावा, परंतु जुन्या मिपाकरांकडूनही अधिक कल्पना येतील अशी आशा आहे. १. दुकानातील कुठल्याही डोके-हातापायांवरील केसांचे कर्तन करण्याआधी ते काही एका किमान पातळीचे असावे का? ही पातळी किंवा प्रमाण काय असावे? २. चांगल्या कर्तनाची तुमची सर्वसाधारण व्याख्या काय? - शक्य झाल्यास एखादे उदाहरण देऊन सांगावी. ३. नावाजलेल्या दुकानातील कर्तन, बटा उडवणे आणि स्वतःच्या घरातील वॅक्सिंग आणि एखादा जादाचा केस उडवणे यात काय फरक आहे? ४. एका हजामाकडून करून घेतल्या जाणाऱ्या कर्तनाची वारंवारिता काय असावी? ५. फुटकळ आणि बेकार केसांचे किती प्रमाणात कर्तन व्हावं? सतत केस गलिच्छ ठेवणाऱ्यांना मिळणाऱ्या दोन चंप्यांमधलं अंतर किती असावं? चांगल्या केशकलापाला हजाम संस्थेकडून कशा प्रकारे प्रोत्साहन मिळावं? आणि ६. न रुचलेल्या केशसंभाराचे कर्तन करताना काही विशेष काळजी घेण्याची गरज आहे का? माझी (सध्या) संक्षिप्त उत्तरे: १. होय. हजामांनी निदान प्रमाण फॅशनीकडे आणि केसांच्या लांबीकडे तरी थोडे लक्ष पुरवावे असे वाटते. अजागळ फॅशन करणाऱ्यांना मदतपूर्ण सूचना करण्याचा प्रयत्न हजाम संघटनेच्या मुख्य प्रवक्त्याकडून व्हावा. २. कर्तन हे निव्वळ वाढीच केस काढून टाकण्याचे काम नसून नवीन, दिमाखदार हेअरडू घडवण्याचे काम आहे. त्या दृष्टीने हजामांच्या स्वतःच्या अशा नजरेतून/अनुभवांतून वाटलेल्या सुंदर हेअरकटची सजेशन्स देणारे, कात्र्यांची अचूक निवड करून केलेले कर्तन. ३. बराच फरक आहे. स्वतःच्या घरात कसं कर्तन होईल यावर स्वतःच कर्तक व गिऱ्हाईक असल्याने पूर्ण अधिकार असतो. दुकानात तसा तो नसतो. जे गिऱ्हाईक मिळतं ते आपलं म्हणावं लागतं. त्यातले आरोग्यपूर्ण केसांचे निवडावे व कमी आरोग्यपूर्ण केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी गिऱ्हाईकांना मदत करावी. ४. कठीण प्रश्न आहे. काही हजाम खूप कमी कर्तन करतात तर काही फार जास्त. काही एकदम बरीच कापाकापी करतात आणि काही निष्क्रीय असतात. पण जे हजाम अधिक कार्यरत आहेत अशांकडून आत्ता दिसते त्यापेक्षा बरीच अधिक कलात्मक दृष्टी असावी. ५. माझे मत कर्तनकाम फुटकळ आहे हे लक्षात येण्यासाठी हजामांच्या नेहमीच्या कंगव्यावर फार ताण येऊ नये. तसे लक्षात आल्याबरोबर चांगले केस कसे असावे याबद्दल सूचना करावी. केस गलिच्छ ठेवणाऱ्यांना मिळणाऱ्या चंप्यांमध्ये फार अंतर असू नये - एखाद दोन कर्तन/वॅक्सिंगचे अंतर असावे. चांगल्या केसांची जाहीर वाहवा व्हावी. ६. माझ्या मते नावडलेले काढून टाकणे सोपे असते, आवडलेले किंवा पोटेन्शियल असलेल्यांमधून फॅशन मॉडेल घडवताना हजामांची उदासीनता आड येते. आवडलेले सांगताना काय आवडले, आणि का आवडले हे स्पष्टपणे आणि निव्वळ 'वा छान' 'मस्त' एवढंच टाळून सांगितल्यास इतर गिऱ्हाईकांनाही पुढील फॅशन निवडीत मार्गदर्शन होते.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विडंबन
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
मत
चौकशी
सल्ला
प्रश्नोत्तरे
माहिती

प्रतिक्रिया द्या
14708 वाचन

💬 प्रतिसाद (57)

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया आवडली.

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 09/06/2011 - 07:42 नवीन
प्रतिक्रिया आवडली. (शशी कपूरच्या चित्रपटातली होऊ घातलेली अभिजन) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्रेमर

अदितीतै, तुम्ही असेच गोड गोड

कवितानागेश
Tue, 09/06/2011 - 15:31 नवीन
अदितीतै, तुम्ही असेच गोड गोड छोट छोट प्रतिसाद देत रहा बरे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

((((०)))))

सुधीर मुतालीक
Tue, 04/30/2013 - 18:47 नवीन
व्वा, मस्त, सुंदर, अवास्तव, मजा आली !!
  • Log in or register to post comments

संपादित

प्रसाद१९७१
गुरुवार, 05/02/2013 - 15:52 नवीन

संपादित

  • Log in or register to post comments

प्रत्येक धागा उघडल्यावर काही

पिलीयन रायडर
गुरुवार, 05/02/2013 - 15:59 नवीन
प्रत्येक धागा उघडल्यावर काही ना काही प्रतिसाद द्यायलाच पाहि़जे असाही काही नियम नाहीये.. मला हा धागा फार आवडलाय अशातला भाग नाही पण मी तुमचा प्रतिसाद वाचला होता.. आणि तो उडणार हे ही तेव्हाच कळालं.. कारण तो होताही तेवढा वैयक्तीक.. स्तुतीच करावि असा नियम नाहीये पण लिहीताना भाषा सांभाळावी असा नियम आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

आणि तुम्ही तावातावाने अजुन

पिलीयन रायडर
गुरुवार, 05/02/2013 - 16:05 नवीन
आणि तुम्ही तावातावाने अजुन काही लिहिण्या आधी...
५. मिसळपाव सदस्यांवर लेखन करताना अपमानास्पद, सांसदिय भाषेस सोडून केलेले लेखन, सार्वजनिक शिष्टाचारांना सोडून केलेले लेखन, अश्लील शब्दांचा/ चित्रांचा वापर असलेले साहित्य, सदस्यांमधले वैयक्तिक हेवेदावे, जुने हिशेब चुकते करणे (score settling) प्रकारातील प्रतिसाद किंवा लेख अप्रकाशित करण्याचा निर्णय संपादक मंडळाचा असेल.
हे येथे वाचायला मिळेल.. मिसळपावचे आधिकारीक धोरण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

थांबा...लिंक राहिलिये...

पिलीयन रायडर
गुरुवार, 05/02/2013 - 16:06 नवीन
http://www.misalpav.com/node/13199
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा