Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 08/30/2011 - 04:29
लेखनविषय (Tags)
विडंबन
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
मत
चौकशी
सल्ला
प्रश्नोत्तरे
माहिती
हे वाड्मयचौर्य नाही, फारतर कल्पना आणि शब्द उधारीवर आणले आहेत. कुठून? करा थोडं खोदकाम. सर्वच छोट्या मोठ्या शहरखेड्यांत हजाम अस्तित्वात आहेत. वेळोवेळी नवीन हजाम आपापली दुकानेदेखील उघडतात. (त्यातल्या काहींचा हजामपणाचा धंदा बसला. काहींनी वयोपरत्वे राजीनामा दिला. काहींनी तर पुन्हापुन्हा राजीनामा दिलेला आहे. तर काही दीर्घ मुदतीच्या रजेवर आहेत. काही हजामांच्या मते आपण त्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. शिल्लक असलेल्या) सर्वच हजामांना बिनपाण्याने सफाई करण्याची इच्छा असते. मात्र उत्साहाने काढून टाकलेल्या केसांमुळे अगर अतिबारीक केलेल्या भुवयांमुळे गिऱ्हाईकांनी तक्रार केली तर शिकाऊ हजाम निरुत्साही होतात किंवा कधीकधी चिडतातही. जुन्या हजामांना असे अनुभव काही नवीन नाहीत. पण गिऱ्हाईकांच्या अपेक्षा वेगळ्या असल्याने आणि फॅशन जगतात घडलेल्या घडामोडींबद्दल आणि जुन्या गिऱ्हाईकांच्या पूर्वानुभवांविषयी बरीच माहिती असल्याने कधी हजामांचे व गिऱ्हाईकांचे हेअर कट आणि भुवयांच्या आकारावरून वाद होतात, खटके उडतात, आणि यांचे स्वरूप तीव्र होते असे दिसते. या वादांची कारणे सर्वच चुकीची असतात असे नाही. सर्वच बरोबर असतात असेही नाही. यातील सर्व वादांची कारणे दूर करता येणे शक्यही नाही आणि गरजेचेही वाटत नाही. पण यापैकी अनेक वाद हे केवळ कर्तन कशा पद्धतीचे असावे याबद्दल स्पष्ट कल्पना नसल्यामुळे झालेल्या वादावादीतून घडलेले असतात असे लक्षात येते. म्हणून सर्वांनाच काही प्रश्न विचारत आहे. त्याची उत्तरे आपापल्या विचाराने द्यावी. या धाग्याचा उपयोग हजामाच्या दुकानातील आपापले कर्तन अधिक चांगले करून त्यातून दृष्यकलाभ्यासकांसाठी आकर्षक देखावा कसा तयार होईल यासाठी मार्गदर्शन किंवा सल्ला म्हणून करावा. गिऱ्हाईकांना जसा याचा उपयोग होईल तसा हजामांनाही आपले कर्तन सुधारण्यासाठी याचा उपयोग होईल असे वाटते. यातून जे काही कळेल ते संक्षिप्त स्वरुपात मांडण्याची जबाबदारी माझी. काही प्रश्न मांडते, माझी विस्तृत उत्तरेही नंतर देईनच. नवीन गिऱ्हाईकांनीही सहभाग घ्यावा, परंतु जुन्या मिपाकरांकडूनही अधिक कल्पना येतील अशी आशा आहे. १. दुकानातील कुठल्याही डोके-हातापायांवरील केसांचे कर्तन करण्याआधी ते काही एका किमान पातळीचे असावे का? ही पातळी किंवा प्रमाण काय असावे? २. चांगल्या कर्तनाची तुमची सर्वसाधारण व्याख्या काय? - शक्य झाल्यास एखादे उदाहरण देऊन सांगावी. ३. नावाजलेल्या दुकानातील कर्तन, बटा उडवणे आणि स्वतःच्या घरातील वॅक्सिंग आणि एखादा जादाचा केस उडवणे यात काय फरक आहे? ४. एका हजामाकडून करून घेतल्या जाणाऱ्या कर्तनाची वारंवारिता काय असावी? ५. फुटकळ आणि बेकार केसांचे किती प्रमाणात कर्तन व्हावं? सतत केस गलिच्छ ठेवणाऱ्यांना मिळणाऱ्या दोन चंप्यांमधलं अंतर किती असावं? चांगल्या केशकलापाला हजाम संस्थेकडून कशा प्रकारे प्रोत्साहन मिळावं? आणि ६. न रुचलेल्या केशसंभाराचे कर्तन करताना काही विशेष काळजी घेण्याची गरज आहे का? माझी (सध्या) संक्षिप्त उत्तरे: १. होय. हजामांनी निदान प्रमाण फॅशनीकडे आणि केसांच्या लांबीकडे तरी थोडे लक्ष पुरवावे असे वाटते. अजागळ फॅशन करणाऱ्यांना मदतपूर्ण सूचना करण्याचा प्रयत्न हजाम संघटनेच्या मुख्य प्रवक्त्याकडून व्हावा. २. कर्तन हे निव्वळ वाढीच केस काढून टाकण्याचे काम नसून नवीन, दिमाखदार हेअरडू घडवण्याचे काम आहे. त्या दृष्टीने हजामांच्या स्वतःच्या अशा नजरेतून/अनुभवांतून वाटलेल्या सुंदर हेअरकटची सजेशन्स देणारे, कात्र्यांची अचूक निवड करून केलेले कर्तन. ३. बराच फरक आहे. स्वतःच्या घरात कसं कर्तन होईल यावर स्वतःच कर्तक व गिऱ्हाईक असल्याने पूर्ण अधिकार असतो. दुकानात तसा तो नसतो. जे गिऱ्हाईक मिळतं ते आपलं म्हणावं लागतं. त्यातले आरोग्यपूर्ण केसांचे निवडावे व कमी आरोग्यपूर्ण केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी गिऱ्हाईकांना मदत करावी. ४. कठीण प्रश्न आहे. काही हजाम खूप कमी कर्तन करतात तर काही फार जास्त. काही एकदम बरीच कापाकापी करतात आणि काही निष्क्रीय असतात. पण जे हजाम अधिक कार्यरत आहेत अशांकडून आत्ता दिसते त्यापेक्षा बरीच अधिक कलात्मक दृष्टी असावी. ५. माझे मत कर्तनकाम फुटकळ आहे हे लक्षात येण्यासाठी हजामांच्या नेहमीच्या कंगव्यावर फार ताण येऊ नये. तसे लक्षात आल्याबरोबर चांगले केस कसे असावे याबद्दल सूचना करावी. केस गलिच्छ ठेवणाऱ्यांना मिळणाऱ्या चंप्यांमध्ये फार अंतर असू नये - एखाद दोन कर्तन/वॅक्सिंगचे अंतर असावे. चांगल्या केसांची जाहीर वाहवा व्हावी. ६. माझ्या मते नावडलेले काढून टाकणे सोपे असते, आवडलेले किंवा पोटेन्शियल असलेल्यांमधून फॅशन मॉडेल घडवताना हजामांची उदासीनता आड येते. आवडलेले सांगताना काय आवडले, आणि का आवडले हे स्पष्टपणे आणि निव्वळ 'वा छान' 'मस्त' एवढंच टाळून सांगितल्यास इतर गिऱ्हाईकांनाही पुढील फॅशन निवडीत मार्गदर्शन होते.
  • Log in or register to post comments
  • 14708 views

प्रतिक्रिया

Submitted by पंगा on Tue, 08/30/2011 - 04:34

Permalink

...

सुरुवातीचा आणि शेवटचा असे दोन्ही कंस जागच्याजागी पूर्ण केलेले असल्यामुळे, शीर्षक कोणत्याही कंसांत नाही. सबब, विडंबन म्हणून हा लेख गणता येणार नाही. सदर लेख हा गंभीरपणे घेण्याचा असल्याने नीट वाचला पाहिजे. सबब, पुन्हा कधीतरी वाचीन म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 08/30/2011 - 04:56

In reply to ... by पंगा

Permalink

टेक्निकल प्रॉब्लेम

मूळ प्रेरणेचा लेख अप्रकाशित झाल्यामुळे थोडी अडचणच झाली म्हणून असं केलं. बाकी काही नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by भाऊ पाटील on Tue, 08/30/2011 - 14:59

In reply to ... by पंगा

Permalink

सलोमि

सहमत-विडंबन म्हणून हा लेख गणता येणार नाही. मग सलोमि म्हणुन एक क्याटेगरि बनवावी अशी सुचना. सलोमि धागा - सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी धागा कॄ. ह. घेणे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Tue, 08/30/2011 - 04:47

Permalink

एक प्रश्न

लेख खूप आवडला. हजामांना या सूचनांचा निश्चितच उपयोग होईल. अनेक समाजांमध्ये आपले केस झाकूनच ठेवण्याची प्रथा असते. किंवा कसेही वेडेवाकडे कापलेले असले तरी त्या कर्तनाबद्दल काही बोलण्याची परवानगी नसते. अशा परिस्थितीत सामान्य व्यक्तीचेच - गिऱ्हाइकांचेच - प्रश्न महत्त्वाचे असतात. अशा परिस्थितीतही सुंदर दिसण्यासाठी 'गिऱ्हाइकांना मार्गदर्शन करता येईल का?' यावरही लिहावे ही विनंती.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 08/30/2011 - 06:41

In reply to एक प्रश्न by राजेश घासकडवी

Permalink

उच्चभ्रू, संस्कृती आणि क्षमा

हजाम हे स्वतःला फॅशन व्यवसायातले जाणकार आणि उच्चभ्रू समजत असल्यामुळे या लेखाचा हजामांना किती फायदा होईल याची खात्री नाही. पण गिऱ्हाइकांना या लेखातून हजामी-कर्तन-प्रवृत्ती समजल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला तरी त्यांना फार त्रास होणार नाही अशी आशा आहे. आता तुमचा प्रश्नः सुंदर दिसणं म्हणजे काय असा प्रश्न येऊ शकतो किंवा सुंदर दिसावं का असा प्रश्न येऊ शकतो. दृष्यकलाअभ्यास म्हणून सुंदर दिसावं असा एक प्रवाद असेल किंवा डार्विनच्या सिद्धांताचा आधार घेऊन दुसरं उत्तर देता येईल. तर डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे बोललं तर स्त्री-नामधारी-आयडीने आपल्या महान संस्कृतीमधले, परमेश्वरदत्त शालीनता, लज्जा, संकोच, मार्दव वगैरे गुण सोडून देण्याचा आरोप होईल. तर आधी परवानगी द्यावी तर मी या मुद्द्यावरून सौंदर्य का आणि कसं या चा उहापोह करेन. दृष्यकलेबद्दल अभ्यासाच्या अभावामुळे मी फारसं बोलू शकत नाही. अर्थात या लेखात समाजातल्या मध्यमवयीन, संसाराच्या काळजीने त्रस्त , टकलू घटकाची, जो मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे, त्यांची काहीही दखल घेतलेली नाही. याशिवाय काही विकार, औषधांनी ग्रस्त विकेशांचीही दखल घेतलेली नाही. मी त्याबद्दल क्षमाप्रार्थी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Tue, 08/30/2011 - 04:57

Permalink

या 'कातर'वेळी

पाहिजेच ही केस-स्टडी :)
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Tue, 08/30/2011 - 05:43

Permalink

ऐ ऐ ऐ ऐ ऐ ऐ ऐ ऐ ढिंकचिका

ऐ ऐ ऐ ऐ ऐ ऐ ऐ ऐ ढिंकचिका ढिंकचिका ऐ ऐ ऐ ऐ ऐ ऐ ऐ ऐ
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Tue, 08/30/2011 - 06:02

Permalink

आज एक नवा समान अर्थीशब्द गवसला..

आज एक नवा समान अर्थीशब्द गवसला. बाकी काय बोलावे? मनीच्या बाता: गण्या हीच एनर्जी चांगल्या कामासाठी वापरता आली असती का रे?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Tue, 08/30/2011 - 06:11

Permalink

आम्ही घरीच केस कापतो

१. दुकानातील कुठल्याही डोके-हातापायांवरील केसांचे कर्तन करण्याआधी ते काही एका किमान पातळीचे असावे का? ही पातळी किंवा प्रमाण काय असावे?
या पातळीचा उहापोह दुकानाच्या बोर्डावर नसल्याने किंवा हजामाकडून तशी सूचना न आल्याने केस कर्तनासाठी अशी कुठलीही पातळी राखावी असा आग्रह करणे गैर वाटते
२. चांगल्या कर्तनाची तुमची सर्वसाधारण व्याख्या काय? - शक्य झाल्यास एखादे उदाहरण देऊन सांगावी.
पास. तूर्तास वेळ नाही आणि केस भादरून द्यायचा मूडही.
३. नावाजलेल्या दुकानातील कर्तन, बटा उडवणे आणि स्वतःच्या घरातील वॅक्सिंग आणि एखादा जादाचा केस उडवणे यात काय फरक आहे?
तसा फारसा फरक नाही, हजामत ही हजामतच असते. दुकानाच्या बोर्डावरही तसा फरक केलेला पाहिलेला नाही पण फरक असावा हे योग्य. मालक आणि हजामांनी याबाबत एक जाहीर निवेदन देणे योग्य ठरेल असे वाटते.
४. एका हजामाकडून करून घेतल्या जाणाऱ्या कर्तनाची वारंवारिता काय असावी?
सांगता येत नाही. तशा कोणत्याही सूचना नाहीत. कालच मी एका कर्तनालयात चार वेळा अर्ध्या अर्ध्या तासाच्या अंतराने कर्तन करून घेतले. या वारंवारितेवर अंकुश येणार असेल तर कळवावे.
५. फुटकळ आणि बेकार केसांचे किती प्रमाणात कर्तन व्हावं? सतत केस गलिच्छ ठेवणाऱ्यांना मिळणाऱ्या दोन चंप्यांमधलं अंतर किती असावं? चांगल्या केशकलापाला हजाम संस्थेकडून कशा प्रकारे प्रोत्साहन मिळावं? आणि
पायावरचे, हातावरचे, भुवईचे किंवा तत्सम केस किती लांबीचे असावेत ही अपेक्षा आहे? मोठ्या केसांचे कर्तन किती भागांत असावेत ही अपेक्षा आहे? पुन्हा, कर्तनालयात तशा काही सूचना नसल्याने अशी अपेक्षा करणे अयोग्य वाटते.
६. न रुचलेल्या केशसंभाराचे कर्तन करताना काही विशेष काळजी घेण्याची गरज आहे का?
न आवडलेल्या पांढर्‍या केसांच्या जटांकडे दुर्लक्ष करावे पण दुर्लक्ष कितींदा करणार? रोज कोणी पिकवू लागले तर आता "पिकलो" हे सांगण्याचा हक्क गिर्‍हाईकांना असावा. --------- बायदवे, साध्या कर्तनालयात केस कापायला $१२ + टीप आणि चांगल्या सलॉनमध्ये $३०+ टीप, तसेच केस रंगवून घ्यायला $७० +टीप, भुवया कोरून घ्यायला $७-८ + टीप (पुढले भाव सांगत नाही) पडत असल्याने आम्ही फुक्कट घरातच केस कापतो. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्तसुनीत on Tue, 08/30/2011 - 06:34

Permalink

हा हा हा

द रिव्हेंज ऑफ द सबाल्टर्न्स ! :)
  • Log in or register to post comments

Submitted by निवांत पोपट on Tue, 08/30/2011 - 08:40

Permalink

लेख आवडलाच. पण बरेच हजाम,

लेख आवडलाच. पण बरेच हजाम, "रिकामा xxx भिंतीला तुंबड्या लावी" ह्या॑ प्रकारातले असतात.स्वतःच्या अस्ताव्यस्त वाढलेल्या दाढीमिशांकडे लक्ष न देता आपला वस्ताय्राचा उपयोग इतरांना उगीच कूरूप करण्यात धन्यता माननारे ही हजाम असतात त्यांच्याबाबत ही काहीतरी लिहीलं असतं तर बरं झालं असतं
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Tue, 08/30/2011 - 09:23

Permalink

"हजाम" हा शब्द नुसता

"हजाम" हा शब्द नुसता जातीवाचकच नव्हे तर वरुन तुच्छतादर्शकदेखील आहे. (मूळ फारसी अरबी शब्द तसा नसला तरी.. आठवा.. फारसी अरबी शब्दांचा आपल्या भाषेत निकृष्टतादर्शक वापर. संतति: अवलाद, वंशवृद्धी: पैदास, शिष्यः चेला आणि अशी असंख्य.. साभार फ्रॉम चिं.वि. जोशी.) तो जरी लेखिकेने त्या उद्देशाने वापरला नसला तरी.. खरं तर उद्देश नसताना सहज वापरला जाणं जास्त वाईट.. उगाच वेगळे परिमाण देण्याचा उद्देश नाही. जाणवलं ते लिहिलं..
  • Log in or register to post comments

Submitted by कालिन्दि मुधोळ्कर on Tue, 08/30/2011 - 10:21

In reply to "हजाम" हा शब्द नुसता by गवि

Permalink

+१ जातिवाचक तर आहेच; शिवाय

+१ जातिवाचक तर आहेच; शिवाय विनोदीही नाही. दर्जा वगेरे अपेक्षा तर सोडूनच द्याव्या.
  • Log in or register to post comments

Submitted by आंसमा शख्स on Tue, 08/30/2011 - 10:30

In reply to +१ जातिवाचक तर आहेच; शिवाय by कालिन्दि मुधोळ्कर

Permalink

सहमत आहे

+१ संपादकांनी यांना समज देण्याची वेळ आली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by चेतन सुभाष गुगळे on Tue, 08/30/2011 - 15:34

In reply to +१ जातिवाचक तर आहेच; शिवाय by कालिन्दि मुधोळ्कर

Permalink

यापूर्वीचे यांचे लेखन पाहता असे वाटत नाही....

धागाकर्त्या लेखिकेने यापूर्वी एका लेखावर दिलेला प्रतिसाद पाहा. http://www.misalpav.com/node/18439#comment-321334 त्यात त्यांनी * मांडून तळटीप दिली आहे की जाती - भाषेचा उल्लेख मुद्दामच टाळला आहे. त्याचप्रमाणे त्यांचे पूर्वीचे लिखाण पाहता जातिवाचक उल्लेख करण्याची त्यांची लेखनशैली दिसून येत नाही. मला वाटते जातीवर नव्हे तर कार्यावर (not on the cast, but on the function) आधारित त्यांनी हा लेख लिहीला असावा. तसेही आपल्याकडे काही ठराविक कामे त्या त्या जातीत आलेल्या लोकांनीच करावीत असा संकेत आहे, म्हणून आपल्याला हा कार्यवाचक उल्लेख जातिवाचक उल्लेख वाटला असण्याची शक्यता आहे. अर्थात असे संकेत आता काही प्रमाणात तरी मोडीत निघत आहे की - जसे की एखाद्या व्यक्तीने ब्राह्मण जातीत जन्म घेतला असेल पण पुढे त्यांनी स्टील फॅब्रिकेशनचा व्यवसाय स्वीकारला तर तिची जात लोहार होईल का? नाही परंतू त्यांनी केलेले कार्य हे लोहाराचे कार्य म्हणूनच ओळखले जाणार. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जाती - जमातीत जन्म घेतलेले अनेक जण आज अध्यापक - प्राध्यापक म्हणून कार्य करीत आहेत. विद्यादानाचे कार्य ब्राह्मणांनी करावयाचे या संकेतानुसार या सर्वांची जात ब्राह्मण ठरणार आहे का? त्याचप्रमाणे गल्लोगल्ली उघडले गेलेले सलून, ब्युटीपार्लर्स, इत्यादी त्या जातीत जन्मलेल्या लोकांकडूनच चालविले जात आहेत असे नव्हे. तरीही धागाकर्तीचे पूर्वलेखन पाहिले असता या लेखनाला जातिवाचक न समजता कार्यवाचक समजायला हवे.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Tue, 08/30/2011 - 15:39

In reply to यापूर्वीचे यांचे लेखन पाहता असे वाटत नाही.... by चेतन सुभाष गुगळे

Permalink

बरं. मी जातीपेक्षा जास्त

बरं. मी जातीपेक्षा जास्त तुच्छतेचा उल्लेख केला होता. शिवाय उद्देश नसताना नकळत शब्द वापरला जाणं हे जास्त वाईट वाटतं असंही मला जाणवलेलं लिहिलं. बाकी भलती कलाटणी मिळावी असा उद्देश नाही. लेखिकेने जातिवाचक अशा उद्देशाने तो उल्लेख केलेला नाही, त्यांचा तसा स्वभाव नाही, हा उल्लेख व्यवसायवाचकच आहे याची अगदी शंभर टक्के खात्री आहे. यावरून आता जातीविषयी वाद नको..
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Tue, 08/30/2011 - 14:39

In reply to "हजाम" हा शब्द नुसता by गवि

Permalink

आठवा.. फारसी अरबी शब्दांचा

आठवा.. फारसी अरबी शब्दांचा आपल्या भाषेत निकृष्टतादर्शक वापर. संतति: अवलाद, वंशवृद्धी: पैदास, शिष्यः चेला आणि अशी असंख्य.. साभार फ्रॉम चिं.वि. जोशी.) बरोबर. असे आणखीन काही शब्द वापरतो आपण उदा : वकुब ( मूळ अर्थ शिक्षण) ,दुकान, हुशार याला अपवाद हौसः मूळ शब्द "हवस " बाकी हजामांचा आणि त्यांच्या व्यवसायाचा उत्तम उहापोह केला आहे. लेखाकाचा अभ्यास दांडगा आहे. पुण्यातील हजाम आणि ठाण्यासह मुंबैतील हजाम यांच्या दुकानावरील पाट्या यावर थोडा प्रकाश टाकावा तसेच काही हजाम त्यांची स्पेश्यालिटी म्हणून समोरील एकच बट कापतात आणि इतर चार पाच बटांपैकी कोणती कापली तर बरे दिलेस असे गिर्‍हाईकालाच विचारतात. अर्थात जुनी गिर्‍हाईकेही तितकीच हुशार असल्याने तीच हजामाना स्वतःच्या तसेच हजामाच्या डोक्याचा गोटा करुन देतात.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Tue, 08/30/2011 - 14:53

In reply to आठवा.. फारसी अरबी शब्दांचा by विजुभाऊ

Permalink

अगदी "हौस"च्या बाबतीतही

अगदी "हौस"च्या बाबतीतही पहा: हवस या मूळ अर्थाने तो वापरला जात नाही. हा वेगळा भाग झाला. पण "आवड" (छंद म्हणा किंवा अन्य काही.. जशी कपड्यांची वगैरे) या ऐवजी तिला अमुकची हौस आहे, असं म्हणताना "आवड" पेक्षा काहीसा निकृष्ट टोन येतोच. दागिन्यांची हौस आहे असं असूयेने किंवा "इतर" कोणाबाबतीत जास्त बोललं जातं (सून वगैरे) पण स्वतः किंवा स्वतःच्या मुलीविषयी मात्र दागिन्यांची "आवड" आहे असंच म्हटलं जात असावं. मूळ धाग्याशी या एकूण उहापोहाचा काही संबंध नाही. अवांतर झाले. क्षमस्व. फोटोग्राफीचा छंद / आवड आहे.. आणि फोटोग्राफीची हौस आहे यात दुसर्‍या प्रकारच्या उल्लेखात कॅज्युअल , अमॅचर सेन्स येतो. (फार बुवा हौस.. अशा अर्थाचा..)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 08/30/2011 - 20:07

In reply to "हजाम" हा शब्द नुसता by गवि

Permalink

>> "हजाम" हा शब्द नुसता

>> "हजाम" हा शब्द नुसता जातीवाचकच नव्हे तर वरुन तुच्छतादर्शकदेखील आहे. << होय. साधारणतः शिवी म्हणूनही इतर अनेक शब्द वापरले जातात, चांडाळ, कसाई, हे जातिवाचक आहेत. शिवीतून तुच्छता दर्शवली जाते हे मी वेगळं सांगायला नको. कधी कधी शिवी देऊनही अपमान होत नाही, आणि कधी शिव्या न देताही, संसदीय शब्दांमधे अपमान/अवमान करता येतो. एकेकाळी मिपाच्या मुखपृष्ठावर रोजच्या रोज दिसणार्‍या बायड्या या अवमानदर्शक होत्या असं माझं मत आहे. पण माझ्या मित्राला मी पाठीत धपाटा घालून "काय रे हजामा, माझा फोन का घेत नव्हतास? कुठे भिंतीला तुंबड्या लावत फिरत होतास?" असं शिवी घालत म्हणणं अपमानकारक, तुच्छतादर्शक आणि सेक्सिस्टही नाही. --- तर कधी कधी काय होतं की काही गोष्टींचे देव बनवले जातात; कुणाकडून मुद्दाम म्हणा, चुकीने म्हणा किंवा काही. देव म्हटलं की श्रद्धा आली आणि श्रद्धा आली की प्रकाशकाका म्हणतात त्याप्रमाणे चिकीत्सा करणं अमान्य होतं. त्याच वेळी इतर काही लोकं निरीश्वरवादी असतात, ते सगळ्याच गोष्टींची चिकीत्सा करतात; अगदी "अमक्या गोष्टीला देव का म्हणता, ती गोष्टही मर्त्यच आहे की!" वगैरे म्हटलं की देवभक्त, श्रद्धाळू लोकांना ते आवडत नाही. न आवडणंही मान्यच आहे, पण त्यामुळे निरीश्वरवाद्यांच्या विचारांच्या आदानप्रदानावर गदा आली की मग सिनिसिझमचा, विनोदाचा आसरा घ्यावा लागतो, चिमटे, बोचकारे काढावेसे वाटतात. हुकुमशहांना विनोदाचं वावडं का? या लेखातल्या काही उतार्‍यांची आठवण झाली: पण खरं तर विनोदांमुळे सामाजिक/राजकीय उलथापालथ होत नाही. इतकी ताकद खरं तर त्यांच्यात नसतेच. त्यांना अभिव्यक्त होण्यापासून रोखण्यानं काही हशील होत असेल, तर ते एवढंच की ही अभिव्यक्ती रोखणाऱ्याची दमनशक्ती आणि नियंत्रणपिपासू (कंट्रोल फ्रीक) वृत्ती यांचं त्यातून प्रदर्शन होतं. त्यांचे त्या दमनाच्या समर्थनार्थ दिले जाणारे सर्व युक्तिवाद हे अंतिमत: खोटे आणि काहीसे बावळटदेखील ठरतात. या विनोदांचं अस्तित्त्वही क्षणिकच असतं, आहे आणि असणार. विसंगती दाखवणं एवढंच काम मला करायचं होतं, जे माझ्या मते झालेलं आहे. --- असो. हे फार बौद्धीक वगैरे झालं. जुनी खोड ... जातच नाही. सविता, म्हटलं तर काहीच संदर्भ नाहीये, उगाच गंमतीसाठी गंमत. म्हटलं तर वर दिलेलं स्पष्टीकरण लागू आहे. >> अदितीतै, तुम्ही बाकी बरंच चांगलं लिहू शकता, का उगाच अशा लेखांवरती वेळ आणि शक्ती वाया घालवता? << स्वस्त आणि मस्तची चव जास्त छान लागते ना. घरच्या भाजीपोळीला कोपर्‍यावरच्या दुकानातल्या पावभाजीची चव कशी येणार? :-D ही टीका मी सकारात्मकतेनेच घेतली आहे. चांगलं लिहायला खूप वेळ लागतो, तेवढा वेळ खर्च करून काही लिहेन तेव्हा तुमच्या नजरेखालून ते नक्की जाईल याची काळजी घेईनच.
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Tue, 09/06/2011 - 00:20

In reply to >> "हजाम" हा शब्द नुसता by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

एकेकाळी मिपाच्या मुखपृष्ठावर

एकेकाळी मिपाच्या मुखपृष्ठावर रोजच्या रोज दिसणार्‍या बायड्या या अवमानदर्शक होत्या असं माझं मत आहे.
मत व्यक्त केलत ? वाचून आनंद झाला आता त्या अवमान दर्शक होत्या, असं तूमचं मत का आहे याचे स्पश्टीकरण इस्कटून द्या. बाकी चालूदे.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 09/06/2011 - 00:43

In reply to एकेकाळी मिपाच्या मुखपृष्ठावर by आत्मशून्य

Permalink

माझा वरचाच प्रतिसाद पुन्हा एकदा पहा.

चांगलं लिहायला खूप वेळ लागतो; जेव्हा तेवढा वेळ खर्च करून या विषयावर लिहेन तेव्हा ते तुमच्या नजरेखालून जाईल याची काळजी घेईन. तोपर्यंत संदर्भ म्हणून तुम्ही 'बाईमाणूस' (लेखिका - करूणा गोखले), 'द सेकंड सेक्स' (लेखिका - सिमोन द बोव्वार), असं काही वाचन सुरू करू शकता. आजचे विचारमंथनः काही मत व्यक्त न करणं हे ही एकप्रकारे मतप्रदर्शनच असतं, चर्चेला फाटा दिला तरी सरळसरळ अवमानकारक असणार्‍या धाग्यांवर कात्री न चालवणं ही पण अभिव्यक्तीच असते आणि वचनं देऊन कृती न करणं ही पण एकप्रकारची कृतीच असते. अवांतरः "चित्रकार एम. एफ. हुसेन यांनी त्यांच्या माताभगिनींची 'अशी' चित्रं काढली असती का" या प्रश्नाचा विचार करता असा एक उगाच प्रश्न पडला, असे प्रश्न विचारणारे, मुखपृष्ठावर एकेकाळी दिसणार्‍या बायड्यांच्या आणि तत्सम चित्रांमधे आपल्या माता-भगिनींचा विचार करू शकतात का?
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Tue, 09/06/2011 - 10:32

In reply to माझा वरचाच प्रतिसाद पुन्हा एकदा पहा. by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

पटतयं असं वाटतयं.

सर्वात महत्वाचं : 'बाईमाणूस' (लेखिका - करूणा गोखले) व 'द सेकंड सेक्स' (लेखिका - सिमोन द बोव्वार), अवश्य वाचल्या जाइल. उद्याचं विचारमंथनः :- पण, कसं आहे मी जर आज कोणत्याही कारणासाठी स्टड वॉकला पाठींबा जाहीर केला तर मग उद्या जॉनचे टोपलेस(अथवा न्यूड) फटू प्रसिध्द झाले तर मी गळे काढणं चूकच नाहीका ? उठसूट माता भगीनी गाठणे विचारवंतांची जूनी खोडच आहे तरीही त्याअनूशंगाने इथे वाक्य घूसडणं म्हणजे आपण आपल्या लाडक्या जॉनच्या टोपलेस फटूत आपल्या वडील व भावाचा विचार करू शकता काय असेच विचारणे का म्हणू नये ?
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Tue, 09/06/2011 - 10:43

In reply to पटतयं असं वाटतयं. by आत्मशून्य

Permalink

आपल्या लाडक्या जॉनच्या टोपलेस

आपल्या लाडक्या जॉनच्या टोपलेस फटूत आपल्या वडील व भावाचा विचार करू शकता काय असेच विचारणे का म्हणू नये ? :) आत्मशून्य..मी नेहमीच तुमचे विविध विषयांवरचे प्रतिसाद वाचतो. बिनतोड मुद्दे मांडण्याच्या बाबतीत तुम्हाला मानलं राव..
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 09/06/2011 - 19:31

In reply to आपल्या लाडक्या जॉनच्या टोपलेस by गवि

Permalink

अरे कर्मा!

विसंगती, विरोधाभास, उपहास वगैरे गोष्टींच्या शिकवण्या मिपावर चालवल्या पाहिजेत का? किंवा अशा प्रकारच्या प्रतिसादांना 'हा उपहासात्मक प्रतिसाद आहे' असा काही टॅग लावावा का?
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Tue, 09/06/2011 - 21:17

In reply to अरे कर्मा! by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

त्याची आवश्यक्ता नाही.

जाउद्या हो, झालं गेलं गंगेला मिळालं, कशाला त्यांच बोलण आपल्या मनाला टोचून घेताय ?
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Tue, 09/06/2011 - 21:37

In reply to अरे कर्मा! by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

सहमत!!

गविंचा प्रतिसाद वाचून पडलोच! गविंकडून तरी अपेक्षा फार जास्त होत्या आणि आहेत. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Tue, 09/06/2011 - 22:10

In reply to सहमत!! by Nile

Permalink

अदितीताईंचा वरचा प्रतिसाद न

अदितीताईंचा वरचा प्रतिसाद न वाचता फक्त आत्मशून्यला त्याच्या त्या एका ओळीसाठी आणि त्याच्या यापूर्वीच्या अनेक धाग्यांवरच्या पप्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर ती जनरलाईज्ड कॉमेंट होती .. याउपर इथे उपहास उपरोध वगैरे समजण्याइतका तपशीलवार उद्देशही यापप्रतिक्रियेपुरता नव्हता. तरीही कोणी काही चुकीचे समजले असल्यास क्षमस्व. .
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 09/09/2011 - 21:36

In reply to अदितीताईंचा वरचा प्रतिसाद न by गवि

Permalink

क्षमस्व वगैरे नकोच.

गवि, हा आख्खा धागाच विसंगतीवर बोट ठेवण्यासाठी काढला आहे तर एका प्रतिसादाचं काय घेता? पण तुम्ही मूळ धागा वाचला नसेल तर कदाचित उपहास आणि विसंगती समजणार नाही हे मान्य आहे. इकडेतिकडे जिथे कुठे जॉन अब्राहमचे फोटो मी चिकटवले आहेत ते का हे तुम्हाला सांगायचीही वेळ येत असेल तर ... अपेक्षाभंग झाला एवढंच सध्या म्हणावंसं वाटत आहे. ---- सध्याची प्रस्तावित स्वाक्षरी: चिल्लर लोकांची बाजू घेणे गैर नाही पण थिल्लर लोकांची बाजू घेताना दहादा विचार करावा. -- ॥जै भयालीदेवी प्रसन्न॥
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Fri, 09/09/2011 - 23:14

In reply to क्षमस्व वगैरे नकोच. by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

उगी उगी हा.....

अवांतर :- गविंचा स्पश्ट प्रतीसाद डोक्यावरून जाउन लोकांच जे धडपडणं वगैरे झाले ते पाहून अंमळ मौज वाटली. कारण ते म्हणजे आम्ही न धडपडता उभं राहू शकतो हे दाखवायचे प्रयत्न असतातच मूळात विनोदी.
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Sat, 09/10/2011 - 00:37

In reply to उगी उगी हा..... by आत्मशून्य

Permalink

कारण ते म्हणजे आम्ही न धडपडता

कारण ते म्हणजे आम्ही न धडपडता उभं राहू शकतो हे दाखवायचे प्रयत्न खीक. हे जाम आवडलंय.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Sat, 04/27/2013 - 23:31

In reply to >> "हजाम" हा शब्द नुसता by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

-१

एकेकाळी मिपाच्या मुखपृष्ठावर रोजच्या रोज दिसणार्‍या बायड्या या अवमानदर्शक होत्या असं माझं मत आहे. पण माझ्या मित्राला मी पाठीत धपाटा घालून "काय रे हजामा, माझा फोन का घेत नव्हतास? कुठे भिंतीला तुंबड्या लावत फिरत होतास?" असं शिवी घालत म्हणणं अपमानकारक, तुच्छतादर्शक आणि सेक्सिस्टही नाही.
तत्वतः दोहोंमध्ये काय फरक आहे? कुणाला काय अपमानकारक वाटेल याचा काही नेम नसतो. मग अपमानांची रिएटिव्ह लेजिटिमसी कशाच्या आधारावर ठरवणार? समाजात सध्या चलती असलेल्या जाणिवांच्या आधारे अपमान किती लागेल हे फारतर ठरवता येईल, पण अमुक गोष्ट तेवढी अपमानकारक आणि तमुक नाही हे वरील उदाहरणाद्वारे आजिबात स्पष्ट होत नाही. विशेषतः घेतलेल्या उदाहरणांसंदर्भात.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Sun, 04/28/2013 - 09:44

In reply to -१ by बॅटमॅन

Permalink

तत्वतः दोहोंमध्ये काय फरक आहे

तत्वतः दोहोंमध्ये काय फरक आहे?
एकेकाळी मिसळपावच्या मुखपृष्ठावर असणार्‍या बायड्या, आज मिसळपाववर हिरीरीने लिखाण करणार्‍या किती लोकांनी पाहिलेल्या आहेत याचा सर्व्हेच करावा लागेल. त्या बायड्यांबद्दल नवीन काही प्रतिक्रिया व्यक्त करणार्‍यांना, मत असणार्‍यांना मी फार जास्त सांगण्यापेक्षा दृष्यकलांचे गुर्जी (दोन) यांच्या एका संबंधित प्रतिसादाकडेच पाठवते.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Sun, 04/28/2013 - 10:53

In reply to तत्वतः दोहोंमध्ये काय फरक आहे by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

त्या बायड्या आणि

त्या बायड्या आणि उल्लेखिलेल्या शिव्यांत काय फरक आहे हे सांगावे. बायड्या आक्षेपार्ह असतील तर शिव्या का नाहीत? निव्वळ बायड्या दृश्य स्वरूपात दिसतात म्हणून आक्षेपार्ह आणि शिव्यांचं तसं नाही असं आहे का काही? त्या कलाकाराची शिल्पे आणि बायड्या यांच्यातील साम्यविरोधाबद्द्ल काही म्हण्णे नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मूकवाचक on Tue, 08/30/2011 - 11:08

Permalink

.

.
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on Tue, 08/30/2011 - 09:38

Permalink

अपेक्षित कृती, डोळे पाणावले!

अपेक्षित कृती, डोळे पाणावले!
  • Log in or register to post comments

Submitted by आंसमा शख्स on Tue, 08/30/2011 - 09:49

Permalink

हीन

मुळ प्रस्ताव आमच्या वाचनात आला होता. तो प्रस्ताव चांगला होता. मात्र हे हीन पातळीवरचे लेखन आहे. (विडंबनही म्हणवत नाही!) पाळलेले चार भाट जमून टाळ्या वाजवायला लागले की, कुणा फालतू लेखिकेलाही आपण फार थोर विनोदी विडंबनकार आहोत असे वाटू लागते. सदर लेख आणि खालील प्रतिसाद त्याचाच नमुना आहे. संपादकांना विनंती: कडवट वाटला तरी कृपया हा प्रतिसाद काढू नये. कारण स्पष्ट बोलणे आवश्यक झाले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Tue, 08/30/2011 - 14:37

In reply to हीन by आंसमा शख्स

Permalink

+१

.
  • Log in or register to post comments

Submitted by सावत्या on गुरुवार, 05/02/2013 - 16:27

In reply to हीन by आंसमा शख्स

Permalink

हीन

१००% सहमत !!!! पुर्वी नानाचा "गुलाम ए मुस्तफा" नावाचा बकवास चित्रपट आला होता त्या धर्तीवर "हजाम ए मुस्तफा" नावाचा चित्रपट काढता येईल. :-) आदिती तै तुम्ही पटकथा लिहु शकता!!!!! सावत्या
  • Log in or register to post comments

Submitted by सविता on Tue, 08/30/2011 - 11:50

Permalink

कंपूबाजांनी कंपूबाजांसाठी

कंपूबाजांनी कंपूबाजांसाठी लिहीलेला लेख! फारसा रेफरन्स लागला नाही... आणि तितका इंटरेस्टिंग न वाटल्याने पुर्ण वाचला पण नाही. अदितीतै, तुम्ही बाकी बरंच चांगलं लिहू शकता, का उगाच अशा लेखांवरती वेळ आणि शक्ती वाया घालवता?
  • Log in or register to post comments
Profile picture for user नावातकायआहे

Submitted by नावातकायआहे on Tue, 08/30/2011 - 14:56

In reply to कंपूबाजांनी कंपूबाजांसाठी by सविता

Permalink

१०१% सहमत

>> अदितीतै, तुम्ही बाकी बरंच चांगलं लिहू शकता, का उगाच अशा लेखांवरती वेळ आणि शक्ती वाया घालवता?
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Tue, 08/30/2011 - 16:18

Permalink

१. दुकानातील कुठल्याही

१. दुकानातील कुठल्याही डोके-हातापायांवरील केसांचे कर्तन करण्याआधी ते काही एका किमान पातळीचे असावे का? ही पातळी किंवा प्रमाण काय असावे? हो. ते एका किमान पातळीचे असावेत. असे पाहण्यात आले आहे कि काही हजाम मेंढ्या, डुकरे गेलाबाजार याक चे हि केशकर्तनाचा प्रयत्न करतात.म्हणून किमान "मनुष्य" हि पातळी ठेवावी. २. चांगल्या कर्तनाची तुमची सर्वसाधारण व्याख्या काय? - शक्य झाल्यास एखादे उदाहरण देऊन सांगावी. चांगले केशकर्तन म्हणजे पुढचा मागचा आरसा बघितल्यावर टकलूला देखील " टकलावर अजून रुळते अदृश्य लांबशी शेंडी" वाटायला पाहिजे. ३. नावाजलेल्या दुकानातील कर्तन, बटा उडवणे आणि स्वतःच्या घरातील वॅक्सिंग आणि एखादा जादाचा केस उडवणे यात काय फरक आहे? हो आहे. दुकानातील काम साचेबद्ध असते. वापरलेल्या प्रसाधानंबाबत खात्री नसते.तसेच सलज्जांना अंग उघडे टाकून दुकानात काम करून घ्यायला लाज वाटते. ४. एका हजामाकडून करून घेतल्या जाणाऱ्या कर्तनाची वारंवारिता काय असावी? महिन्यात दोन वेळा अथवा व्यक्तीनुसार प्रमाण ठरवावे. नाहीतर वाढले कि जा हजामाकडे...वाढले कि जा हजामाकडे. ५. फुटकळ आणि बेकार केसांचे किती प्रमाणात कर्तन व्हावं? सतत केस गलिच्छ ठेवणाऱ्यांना मिळणाऱ्या दोन चंप्यांमधलं अंतर किती असावं? चांगल्या केशकलापाला हजाम संस्थेकडून कशा प्रकारे प्रोत्साहन मिळावं? फुटकळ आणि बेकार केसांचे कर्तन रोज करावे.जसे कि नाकातील, ओठावरील अन्यथा चार चौघात शोभा होवू शकते.गलिच्छ केश वाहकाला अगदी रोज चंपी मिळाली तरी हरकत नसावी. आणि चांगल्या केशकलापाला शतकी मुद्रा देवून प्रोत्साहन द्यावे. ६. न रुचलेल्या केशसंभाराचे कर्तन करताना काही विशेष काळजी घेण्याची गरज आहे का? देवाने १८० अंश वळून बघण्यासाठी मान दिलेली आहे.न रुचलेले केशसंभार पाहू नयेत.
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Tue, 09/06/2011 - 00:36

In reply to १. दुकानातील कुठल्याही by इरसाल

Permalink

मूळ लेखापेक्षा इरसाल यांचा

मूळ लेखापेक्षा इरसाल यांचा प्रतिसाद रंजक वाटला !
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Tue, 08/30/2011 - 20:34

Permalink

हजाम च्या ऐवजेी बार्बर शब्द

हजाम च्या ऐवजेी बार्बर शब्द वापरला असता तर चालले असते का??????
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Tue, 09/06/2011 - 16:19

In reply to हजाम च्या ऐवजेी बार्बर शब्द by अविनाशकुलकर्णी

Permalink

जर त्यांनी बार्बर हा शब्द

जर त्यांनी बार्बर हा शब्द वापरला असता तर मग कुलकर्णी तुम्ही त्यांना, "क्या बिल्लू, तु आजकल हजामगिरी छोडके हलवाईगिरी (जलेबी) बिझनेस शुरु किया है क्या? " हा प्रश्न विचारणार होता काय....
  • Log in or register to post comments

Submitted by आंसमा शख्स on Wed, 08/31/2011 - 04:06

Permalink

स्पष्टपणे टीकात्मक प्रतिसाद आल्याने

स्पष्टपणे लेखन बकवास आहे हे सांगणारे टीकात्मक प्रतिसाद आले आहेत. आता लेखन फार बौद्धिक असल्याचा आव आणू नका! लेखन फालतूच आहे. उलट हीन दर्जाचे लेखन केले आहे, हे स्वतःशी मान्य केले तर बोळा निघेल. पुढील लेखनाची दिशा सापडेल. प्रतिक्रियात्म लेखनातून लेखकपण घडत नाही हे लक्षात घ्या. आणि 'फार आवडले ' म्हणणारे हरभर्‍याच्या झाडावर चढवतात म्हणून आपण चढून बसायचे असते असे नाही. ते चार घट़का मजा घेतील आणि जातील! खुदा तुम्हाला चांगली बुद्धी देवो आणि तुमच्या हातून चांगले लेखन घडो!
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Tue, 09/06/2011 - 14:46

In reply to स्पष्टपणे टीकात्मक प्रतिसाद आल्याने by आंसमा शख्स

Permalink

अगदी अगदी

आता लेखन फार बौद्धिक असल्याचा आव आणू नका! लेखन फालतूच आहे. उलट हीन दर्जाचे लेखन केले आहे, हे स्वतःशी मान्य केले तर बोळा निघेल. पुढील लेखनाची दिशा सापडेल. प्रतिक्रियात्म लेखनातून लेखकपण घडत नाही हे लक्षात घ्या.
शब्दा शब्दाशी प्रचंड सहमत आहे. कृपया अदिती ह्यांनी ह्यापुढे :- १)धर्मांतर २)संघ ३)मिपावरील लिंगभेद आणि धार्मिक भेद ह्यासारख्या बौद्धिक आणि प्रतिक्रियात्मक लेखनाकडे वळावे. सर्वात आधी अदिती ह्यांनी हे लेखन उडवावे, व 'लेखन काढले. तसदी बद्दल क्षमस्व असे लेखन येथे येणार नाही याची काळजी घेईन.' अशी माफी मागावी. येवढे करुनही त्यांना योग्य दिशा न सापडल्यास त्यांनी आंसमा शख्स ह्यांच्या लेखनाचा थोडा अभ्यास करावा व स्वतः मधील उणिवा दूर कराव्यात. आंसमा शख्स ह्यांच्यासारखे टिकाकार उलट नविन बौद्धिक लेखक घडवण्यात मोलाचा वाटा उचलत असतात. त्यांच्या बोलण्याचे वाईट न वाटून घेता उलट त्यांच्याकडून आंतरजालावर लिखाण कसे असावे ह्याचे धडे गिरवले जायला हवेत असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Tue, 09/06/2011 - 00:32

Permalink

पूर्वी यांचे छोट प्रतिसाद येत

पूर्वी यांचे छोट प्रतिसाद येत तोवर ठीक होतं. आता म्हणजे...
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Tue, 09/06/2011 - 03:36

In reply to पूर्वी यांचे छोट प्रतिसाद येत by आशु जोग

Permalink

उगी उगी

उगी उगी हं, रडू नका! अरे यांना डोळे पूसायला लेडिज रूमाल द्या रे कोणीतरी.
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Fri, 09/09/2011 - 22:14

In reply to उगी उगी by Nile

Permalink

ते काही नाही निलेतू घेत बस

ते काही नाही निले तू घेत बस या अत्तराचा सुगंध
  • Log in or register to post comments

Submitted by क्रेमर on Tue, 09/06/2011 - 07:12

Permalink

हजाम

हजामांना सिमेट्रीचा सेन्स उत्तम असतो. शशि कपुरच्या एका चित्रपटात हजामाला लॉटरी लागल्यानंतर तो स्वतःचा व्यवसाय लपवून अभिजन होण्याचा प्रयत्न करतो. राम नगरकरांच्या दुकानात मी तीन-चार वेळा केस कापले होते. असे सर्व विसंगत आठवून गेले.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com