Nisarg

कविता: बिबट्याचे मनोगत

bhagwatblog's picture
bhagwatblog in जे न देखे रवी...
14 Aug 2019 - 11:08 am

सिमेंटच्या जंगलात येण्याची नाही हौस
भरपूर पर्यटनाची मज नाही सोस
माणसा सोबत संघर्षात नाही मौज
भरपेट भोजन सुद्धा मिळत नाही रोज

सोसायटीत ओळखीचे कुणीच नाही
म्हाडात तर घर सुद्धा घ्यायचे नाही
नाशिक पाहण्यात तर मला रस नाही
माणसं भेटण्याचा मला आनंद नाही

हिंस्त्र तरी अन्न साखळीचा हिस्सा
जंगल हिरावून तुम्हीच दिला घुस्सा
वनक्षेत्र खालावले साखळी तुटली
आत्ता मात्र भूख सुद्धा प्रखर वाढली

Nisargकविता

कावळा..

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
31 Jul 2019 - 12:17 pm

बैसला फांदीवरी हा चिंब भिजुनी कावळा
मेघांपरी आभाळीच्या, रंग त्याचा सावळा.

तीक्ष्ण त्याची नजर आणि बुद्धी तर तिच्याहुनी,
ना धजे कोणी म्हणाया पक्षी दिसतो बावळा.

व्यर्थ शोधी भक्ष्य अपुले, ना फळेही दृष्टीला
निवडले जे झाड त्याने ते निघावे आवळा?

कर्ण जरी नसती, शिरी...आर्त काही घुमतसे
थांबला जो थेंब नयनी, काक अश्रू सावळा?

या अशा ओल्या दिनी काय भरवावे पिलां
आजही नाही कुणाचा पिंड पुजला राऊळा?

( मीटरमध्ये खूप चुका आहेत. पण बिचा-या कावळ्यावरची बिचारी कविता.. मानून घ्या. :))

Nisargकविता माझीकाहीच्या काही कविताजिलबीकविता

निर्झर

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
15 Jul 2019 - 8:01 pm

निर्झर

निर्झर होता एक बारीकसा; हिरव्या डोंगरातून वाहतसा
असुनी तो लहान छोटा; ठावूक नव्हत्या पुढल्या वाटा ||

धरतीवरच्या वर्षावाने; जीवन त्याचे सुरू जहाले
धरणी जाहली माता ती; अल्लड खट्याळ उदकाची ||

नित नवीन भरून जलाने; ठावूक त्याला भरभरून वाहणे
चंचल उत्कट उल्हासीत पाणी; घेवूनी जायी दो काठांनी ||

पुढेच मिळाली सरिता त्याला; सवे वाहण्या पुसे खळाळा
विचारही न करता तो मिळाला; निर्मळ नदीत एकरूप जाहला ||

- पाषाणभेद
१५/०७/२०१९

Nisargशांतरसकविताजीवनमान

ऑफिसात जाऊन आलो

महासंग्राम's picture
महासंग्राम in जे न देखे रवी...
2 Jul 2019 - 1:19 pm

ऑफिसात गेलो,
गप्पा मारून आलो
कॅन्टीनला जाऊन मी
भजे खाऊन आलो

जरी थेंब पावसाचे आले
ओला .. भिजून आलो
भांबावल्या दुपारी
झोपा काढून आलो

होते कुणी न कोणी
नव्हतोच एकटे ना?
लोकां कसे पटावे
पाट्या टाकून आलो.. ?

पाकीट जरी रिकामे
अकाऊंट भरून आले..
चुकू मुळी न देता
लॉगिन करून आलो.

मूळ पेरणा
इथे आहे

gholmango curryNisargअभय-काव्यकालगंगाकाहीच्या काही कविताप्रेरणात्मकबालसाहित्यभावकवितावावरकलानृत्यकविताविनोद

आभाळ पक्षी

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
25 May 2019 - 12:04 pm

आभाळानं द्यावे पाणी
धरतीनं गावी गाणी
धरतीनं जागा द्यावी
झाडांची आई व्हावी
झाडांनी सावली द्यावी
पक्षांची घरटी ल्यावी
पक्षांनी पंख पसरावे
आभाळात विहरावे
आभाळाने द्यावे पाणी
धरतीनं गावी गाणी

पाषाणभेद ( त्रंबकेश्वर मुक्काम)
२५/०५/२०१९

Nisargशांतरसकवितामुक्तक

सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग ३

स्वच्छंदी_मनोज's picture
स्वच्छंदी_मनोज in भटकंती
14 Aug 2018 - 12:37 pm

(थोड्याकाळाचा ब्रेक घेतल्यावर परत दोन नवीन शब्दचित्र लिहितोय)

पहील्या दोन भाग इथे पाहता येतील -

सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग १
सह्याद्रीतील शब्दचित्रे - भाग २

---------------
सह्याद्रीतील शब्दचित्रे:

Nisargsahyadreetrekking