आरोग्य

अस्वस्थ मनाचा ‘ताप’

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
22 Nov 2022 - 9:55 am

ताप येणे हे बऱ्याच आजारांचे प्राथमिक व महत्त्वाचे लक्षण असते. शरीराचे तापमान नियंत्रण आणि ताप येण्याची मूलभूत प्रक्रिया आपण यापूर्वी “गरम आणि ‘ताप’दायक” या लेखात समजावून घेतली आहे.
त्या लेखात संसर्गजन्य आणि अन्य शारीरिक आजारांमध्ये येणाऱ्या तापाचे विवेचन आहे. परंतु त्या व्यतिरिक्त, मानसिक बिघाड हे सुद्धा ताप येण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. या प्रकारचा ताप वैशिष्ट्यपूर्ण असतो. त्यासंबंधी स्वतंत्रपणे काही लिहावे अशी सूचना एका वाचकांनी नुकतीच केली. त्यानुसार हा लघुलेख लिहीत आहे.

जीवनमानआरोग्य

मानवी कामजीवन:प्रश्न आणि उत्तर

राहुल's picture
राहुल in जनातलं, मनातलं
29 Sep 2022 - 8:52 am

कामजीवनावर डॉक्टरांची विविध मते असतात. नेमके कोणते सत्य मानावे ?

विविध मते ही सर्वच विषयांत असतात. कामशास्त्रात आधुनिक व जुन्या काळातील असे प्रकार जर म्हटले तर संशोधनातून नवीन जे समजले ते सत्य मानावे. धर्म, संस्कृतीच्या पगड्याने कामजीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो. डॉक्टर जर खूप धार्मिक असेल तर तो विज्ञान सांगण्यापेक्षा संस्कृती रक्षणाच्या नावाखाली खोटे सांगू शकतो व तसे काही डॉक्टर बिनधास्त सांगतातही. कामजीवनातल्या प्रत्येक क्रिया, पद्धतीमागे विशिष्ट वैज्ञानिक कारण असते. ते तुम्हाला समजले तर तुम्ही तो 'सेक्स' प्रकार बिनधास्त करावा.

आरोग्यलेखसल्लामाहितीप्रश्नोत्तरेआरोग्य

मानवी कामजीवन: प्रश्न आणि उत्तर

राहुल's picture
राहुल in जनातलं, मनातलं
28 Sep 2022 - 9:19 am

स्त्रियांना गुदमैथुन आवडते का ? त्यातून कोणते आजार होतात का?

भारतासहित काही देशात याला विकृत मानले गेले आहे. तरी दोघांच्या इच्छेने कोणताही आजार पसरत नसेल अशी खबरदारी घेऊन जर कोणी त्याचा आनंद त्यांच्या खाजगी आयुष्यात घेत असेल तर त्याला तिसरा कोणताही व्यक्ती विरोध करु शकत नाही. स्त्रीयांना गुदमैथुन आवडते असे नाही. यांचे प्रमाण कमी आहे. तसेच पुरूषांनाही फार आवडते असेही नाही.

औषधोपचारविज्ञानशिक्षणलेखसल्लामाहितीप्रश्नोत्तरेआरोग्य

मानवी कामजीवन: प्रश्न आणि उत्तर

राहुल's picture
राहुल in जनातलं, मनातलं
27 Sep 2022 - 7:54 am

सरोगेट पार्टनर आणि बॉडी वर्क थेरपी

आरोग्यशिक्षणलेखसल्लाप्रश्नोत्तरेआरोग्य

खरचं गरज आहे का?

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
26 Sep 2022 - 3:13 pm

ढवळ्या शेजारी पवळा बांधला
वाण नाही पण गुण लागला

पेरणा

एकदा सुट्टीवर गेलो होतो. टाईमपास म्हणून डॉक्टर मित्राच्या दवाखान्यात बसलो होतो. बऱ्यापैकी गर्दी होती. रोगी येत होते, मित्र त्यांना तपासून औषधे गोळ्या, इंजेक्शन इ. देत होता. मला पण बर्‍यापैकी वैद्यकीय क्षेत्रात अनुभव म्हणून त्याच विषयावर अधून मधून गप्पा चालू होत्या.

समाजऔषधोपचारविचारअनुभवमतआरोग्यविरंगुळा

मानसिक आरोग्य जागरूकतेसाठी सोलो सायकलिंग

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
10 Sep 2022 - 5:00 pm

4 राज्ये, 1500 किमी- २० दिवस- सिंधूदुर्ग- गोवा- बेळगांवी- कलबुर्गी- हैद्राबाद- वारंगल- गडचिरोली- नागपूर

समाजजीवनमानसद्भावनाआरोग्य

थॅलसिमिया : विवाहपूर्व समुपदेशन आणि नैतिकता

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
1 Aug 2022 - 7:44 am

नुकताच घडलेला एक किस्सा.
माझ्या मित्राने त्याच्या मुलाच्या लग्नाच्या संदर्भात मला फोन केला. तो म्हणाला," माझ्या मुलासाठी मुलीचे एक स्थळ आलेले आहे. त्या मुलीला नुकताच कोविड होऊन गेला होता आणि त्यादरम्यान तिला रक्तगुठळी होण्याची तक्रारही उद्भवली होती. त्या अनुषंगाने त्या मुलीच्या अन्य काही रक्तचाचण्या केल्या गेल्या. त्यात तिला हिमोग्लोबिनच्या संदर्भात बीटा-थॅलसिमिया ट्रेट हा दोष असल्याचे आढळले होते".

जीवनमानआरोग्य

रंगदृष्टीचे तिरंगी सूत्र

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
11 Jul 2022 - 8:57 am

पृथ्वीवरील जीवसृष्टीत निसर्गाने अनेक रंगांची उधळण केलेली आहे. ती अर्थातच मनमोहक आहे. विविध वनस्पती आणि प्राणी हे भिन्नरंगी असून ते वेळोवेळी आपापले ‘रंग’ दाखवत असतात ! मानवनिर्मित अनेक गोष्टीही रंगीत आहेत. विविध रंगांच्या दर्शनातून मनात वेगवेगळे भाव उमटतात. आपल्या दैनंदिन जीवनातील सुसूत्रता अनेक रंगांवर आणि रंगबदलांवर अवलंबून आहे. मुळात आपल्याला रंगज्ञान होण्यासाठी आपले डोळे व मेंदू यांच्यातील विशिष्ट यंत्रणा कारणीभूत आहेत. या अद्भुत व अमूल्य अशा जीवशास्त्रीय प्रणालीवर दृष्टिक्षेप टाकण्यासाठी हा लेख.

जीवनमानआरोग्य