गोष्ट सांगा गणित शिकवा... 7
तुमची सावली "गायब" होईल! (पुण्यात - 13 मे रोजी दु. 12:31 वा.)
Fake news? खाली लिंक्स आणि सविस्तर माहिती दिली आहे.
**************************
तुमची सावली "गायब" होईल! (पुण्यात - 13 मे रोजी दु. 12:31 वा.)
Fake news? खाली लिंक्स आणि सविस्तर माहिती दिली आहे.
**************************
To every problem, there is a most simple solution. हे चिंट्या जितके सहज म्हणाला, तितके सहज उत्तर मिळेल याची कुणालाच खात्री नव्हती. पण शोधले तर पाहिजेच! त्याशिवाय गत्यंतर नव्हते...
**************************
गोष्टीचा आधीचा भाग.... इथे टिचकी मारा
**************************
गोष्ट सांगा आणि गणित शिकवा... 5
नेहा, चिंट्या सायली तिघे ही चक्रावले... सॅमीने त्याचा खुर्चीच्या मागे, त्याला न दिसणाऱ्या दिव्याचा रंग कसा ओळखला असेल? कॅप्टन नेमोंच्या उत्तरात काय क्लु होता? काय दिसले असेल त्यांना?
**************************
गोष्टीचा आधीचा भाग .... इथे टिचकी मारा
**************************
“मला तर वाटलं भूत काका मुलांना छळायला फक्त गणिताचेच प्रॉब्लेम विचारतात! ही काय नवीन गेम टाकताहेत?” चिंट्या वैतागून म्हणाला ... मुलांना यंदा प्रश्नच समजत नव्हतं. पुन्हा पुन्हा वाचत होते... अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होते...
(a)K2Cr2O7 + (b)H2SO4 + (c)KI → (d)Cr2(SO4)3 + (e)I2 + (f)K2SO4 + (g)H2O
काय अर्थ असेल याचा? काय करायचं आहे आपल्याला? ...
**************************
गोष्टीचा आधीचा भाग .... इथे टिचकी मारा
*************************
घाबरलेली मुलं एकमेकांना बिलंगुनच उभी होती. आजूबाजूला बघून कानोसा घेत होती. भिंतीवरची अक्षरं दिसत होती पण कोणी वाचत नव्हते...
*************************
गोष्टीचा आधीचा भाग ... इथे टिचकी मारा
*************************
हळू हळू मुलं रिलॅक्स होऊ लागली आणि आजूबाजूला बघू लागली. भिंतीवरच्या अक्षरांचा शिवाय कुठेही काहीच नव्हतं. नेहा सॅमीला म्हणाली - चिंट्याला पिन कोड SMS कर, सारखा ट्राय करू नको सांग - तो भलताच काहीतरी ट्राय करेल आणि आपण इथे लॉक होऊ विनाकारण ...
रात्री कुणालाच नीट झोप लागली नाही. सायलीला नक्की काय करावे समजत नव्हतं. आई बाबांना सांगावे का?
****************************************************************************
गोष्टीची सुरवात ... मागची पोस्टसाठी इथे टिचकी मारा.
****************************************************************************
पाणी घेऊ का विचारायला म्हणून सायली बंगल्याचे गेट उघडून आत गेली. दरवाज्यावर बेल होती, पण ती वाजली नाही, म्हणून सायलीने दरवाज्यावर थाप मारली. थाप हलकीच होती पण दरवाजा थोडा उघडला, बहुतेक तो लॉक केला नव्हता. कुणी आहे का घरी म्हणत तिने दरवाजा अजून थोडा उघडून विचारलं, पण काही उत्तर आले नाही. सायलीने आता दरवाजा पूर्ण उघडला आणि आत डोकावलं...
****************************************
आजोबांचे डोळे चकाकले. "द गेम इज अफूट माय डीअर वॉटसन. लेट अस कँच द चॉकलेट चोर!"
घडले असे:
चिंटू, चिऊ आणि त्यांची चुलत भावंडे मिनी आणि मोंटू पहिल्या मजल्यावर शेजारी राहतात. आजी आजोबा तळ मजल्यावर रहातात. दुसऱ्या मजल्यावर आजोबांचे भाऊ आणि त्यांची मुलं रहात होती, पण गेली काही वर्षे ते इंग्लंड-अमेरिकेत आहेत. बिल्डिंग मध्ये अजून तिसरे कुणी नाही. त्यामुळे एकत्र कुटुंबाचे घर असल्यासारखे आहे. सहाजिकच, चौघेही मुलं बहुतेक एकत्रच असतात. सगळे दरवाजे सताड उघडेच असतात, मुलं सर्व घरात मुक्तपणे वावरतात.
मागच्या लेखात Teaching to the test किंवा परीक्षार्थी शिक्षणाचे दोष बघण्याचा प्रयत्न केला. पण शास्रोक्त (scientific) आणि न्याय (logical) विचार करून निर्णयाकडे यायला हवे आणि त्या निर्णयाला सारासार (practical and pragmatic) विवेक बुद्धीची जोड हवी. शिक्षणाचा हाच तर अंतस्थ हेतू आहे ना? (Critical thinking).
परीक्षा पद्धतीवर जास्त लिहिले आहे, पण परीक्षार्थी शिक्षणावर माझे विचार कुठून येतात हे सांगण्याचा प्रयत्न आहे.
नवीन वर्ष आलं की आपण उत्साहाने संकल्प करतो की आता नवीन काही तरी शिकूया. म्हणजे नवीन काहीतरी शिकायचा उत्साह एरवीसुद्धा अधून मधून येतच असतो, पण नवीन वर्ष म्हटलं की तो उत्साह जरा जास्तच असतो. पण होतं काय की आपण २-४ दिवस शिकायला बसतो, मग काहीतरी महत्वाचे काम येते किंवा कंटाळा येतो, मग आजच्या ऐवजी उद्या करू असे वाटते आणि ते काम रंगाळत जाते आणि मग शेवटी बंदच पडते. असे होऊ नये, म्हणून मी काय करतो ते मांडायचा हा प्रयत्न.