हे ठिकाण

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा

संपादक मंडळ's picture
संपादक मंडळ in जनातलं, मनातलं
19 Aug 2014 - 2:30 pm

नमस्कार! १९ ऑगस्ट १८३९ ला पॅरिसमधे छायाचित्रणकलेची अधिकृतरीत्या सुरुवात झाली. या घटनेला आज १७५ वर्षे होत आहेत.

या निमित्ताने मिपावर छायाचित्रणाची स्पर्धा घ्यावी असा एक प्रस्ताव श्री सर्वसाक्षी यांच्याकडून आला आहे. मिपावर अनेक गुणी कलाकार, छायाचित्रकार आहेत. मिपा सदस्य-स्पर्धकांना कोणताही एक विषय देऊन एकच एक स्पर्धा घेण्यापेक्षा स्पर्धामालिका सुरू करावी असा निर्णय घेण्यात आला आहे.

हे ठिकाणकलाजीवनमानतंत्रमौजमजाछायाचित्रणप्रकटनसद्भावनाशुभेच्छाविरंगुळा

जाडे मीठ.

अनिता ठाकूर's picture
अनिता ठाकूर in काथ्याकूट
14 Aug 2014 - 1:49 pm

लहानपणापासून घरात जाडं मीठ पहात आल्यामुळे, लग्नानंतरहि स्वयंपाकात तेच मी वापरू लागले. माझ्या लहानपणी वाण्याकडे जाड्या व बारीक मीठाची अशी दोन पोती असायची. नंतर 'आयोडीनयुक्त' ,सर सर असं पडणारं बारीक मीठ पिशव्यांतून मिळू लागलं आणि पोत्यांत ठेवलेलं बारीक मीठ दिसेनासं झालं.अजुन जाडं मीठ मात्र , पिशव्यांतूनच, मिळतं.मी अजुनहि स्वयंपाकात, शक्य असेल तेथे जाडं मीठच वापरते. मला वाटतं ह्या जाड्या मीठाचा वापर हल्ली कमी झालाय. बर्‍याच जणांना जाडं मीठ म्हणजे काय हेच माहित नाही.

मंत्रचळाच्या मागोव्यावर

आदूबाळ's picture
आदूबाळ in जनातलं, मनातलं
28 Jul 2014 - 7:40 pm

हा धागा प्रथम उघडला तेव्हा त्यावर एकही प्रतिसाद आला नव्हता. थोडासा वाचताच लक्षात आलं - बंदे में है दम! लहानग्या सचिनचा पहिला कव्हर ड्राईव्ह पाहून रमाकांत आचरेकरांना काय वाटलं असेल? मिसरूडही न फुटलेल्या खन्नाच्या हातची पहिली मिसळ खाऊन पहिलं गिर्‍हाईक पार्श्वभागी हात लावून बोंबललं असेल तेव्हा रामनाथ उपहारगृहाच्या तत्कालीन मालकांना मिसळीच्या लालजर्द तर्रीत भविष्य दिसलं असेल का?

हे ठिकाणसमाजजीवनमानमाहितीविरंगुळा

'विठोबा'

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
11 Jul 2014 - 10:20 am

टीचभर ही भूक सांभाळी, विठोबा
जन्मभर होतीच आषाढी, विठोबा

मोजली कोणी अशी ही पापपुण्ये
चांगला तू आण मापारी, विठोबा

पारखोनी घे जरासे भक्त आता
हे तुला विकतील व्यापारी, विठोबा

शेवटी आलास ना गोत्यात तूही
माणसे असतात थापाडी, विठोबा

सोड गाभारा, अता घे वीट हाती
झोड जी झोडायची माथी, विठोबा

देहभर पाण्यात तरला जन्म देवा
तू खरा निष्णात नावाडी, विठोबा !

डॉ.सुनील अहिरराव

स्वरकाफियाहे ठिकाण

उंबरठा नसलेले घर - २

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
7 Jul 2014 - 1:13 pm

कां कोण जाणे पण परत
उंबरठा बांधायची हिंमतच
होत नाहीये
----
न जाणो ती अंगणातली
फुलदाणी घरात परत
आलीचं नाही तर?!
----
मग वाटतं बरं झालं
उंबरठा वाहून गेला
कच्चाच होता नाहीतरी
----
तुझी डायरी तेवढी
बाहेर काढून वाचायची
अनिवार इच्छा होतेय
किमान ती अलमारी तरी
शांत होईल... एकदाची !
----
देवघरासमोरच्या समईत
तेल घातले
वाटले
ज्योतीची घालमेल थांबेल
पण...
----
काल नाही समजले
पण
त्या उंबरठ्याबरोबर
"शुभ - लाभ" लिहीलेल्या

करुणहे ठिकाण

ट्रफिक जाम

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
2 Jul 2014 - 11:04 am

गेल्या २७ तारखेला सकाळी लाल रंगाच्या बस (एसी बस) मधून कार्यालयात जाताना कळले, हृदयाच्या राजमार्गावर ठीक ठिकाणी ट्रफिक जाम झाल्यामुळे शरीराच्या अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम झाला आहे. ताड्ताडीने शरीराच्या मंत्रिमंडळाची मिटिंग घेण्यात आली. ट्रफिक जाम दूर करण्यासाठी यथाशीघ्र ह्रदयाच्या राजमार्गावर बाय पास बांधावे लागतील, असा निर्णय घेण्यात आला. तूर्त काही काळ लेखणीला विश्रांती द्यावी लागेल. असो.

हे ठिकाणबातमी

नवा भिडू..

निखळानंद's picture
निखळानंद in जे न देखे रवी...
28 Jun 2014 - 3:20 pm

मिपाकरांनी वसवलेला हा नेटका गाव..
घेतो आम्हा नेटसरुंच्या मनाचा ठाव..

इथे कोणासही नाही पावभाजी ची हाव..
सगळे मारतात फक्त मिसळीवरच ताव..

इथे सगळ्यांमधे दिसतोय आपुलकीचाच भाव..
नाही दिसत कुठे आत्मप्रौढीचा प्रभाव..

मझ्यासारख्या नवख्याला सांभाळून घ्या राव..
चुकलो माकलो तर घालू नका घाव..

मला बघायला आवडतील तुमचे हाव-भाव..
मला आपले म्हणा.. निखळानंद माझे नाव !

अद्भुतरसहे ठिकाण

उंबरठा नसलेले घर -- १

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
24 Jun 2014 - 3:46 pm

काय झालं कुणास ठाऊक पण
काल रात्री पावसात या घराचा
उंबरठाच वाहून गेलाय
तेव्हापासून घरातल्या सगळ्या वस्तू
जणू स्वतंत्र झाल्या आहेत
----
बैठकीच्या खोलीत
कोपर्‍यातल्या मेजावर
एक फुलदाणी होती
..
काल रात्रीपर्यंत होती
सकाळी अंगणात सापडली
पहाटेच्या वर्षावात एखादं फुलं
पदरात पडेल
या आशेने अंगणात आली असावी बहुदा
----
देवघरासमोरील समईची मंद ज्योत
आजकाल बाळकृष्णाच्या चेहर्‍याशी
पोहचेनाशी झालीये
त्या वाहलेल्या उंबरठ्याच्या
दिशेने झुकत राहते
थरथरत
----

करुणशांतरसहे ठिकाण

शेतात जाण्याचा रस्ता मिळविण्यासाठी (कायदेविषयक) मदत हवी आहे.

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in काथ्याकूट
17 Jun 2014 - 3:33 pm

नमस्कार मंडळी!
जमिनीचा नकाशा
जमिनीचा नकाशा

मराठवाड्यामधील एका तालुक्याच्या ठिकाणी माझी १२ एकर जमीन आहे आणि मला शेतात जाण्याचा रस्ता मिळविण्यासाठी (कायदेविषयक) मदत हवी आहे.

जमिनीसंबंधित तथ्ये:

काही लॅण्डस्केप्स...माझेही

प्रचेतस's picture
प्रचेतस in कलादालन
9 Jun 2014 - 8:49 pm
हे ठिकाण

१. रतनवाडीचा अमृतेश्वर

a

२. सिन्नरचा गोंदेश्वर

a

३. सिन्नरचाच आयेश्वर/ऐश्वर्येश्वर

a