'विठोबा'

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
11 Jul 2014 - 10:20 am

टीचभर ही भूक सांभाळी, विठोबा
जन्मभर होतीच आषाढी, विठोबा

मोजली कोणी अशी ही पापपुण्ये
चांगला तू आण मापारी, विठोबा

पारखोनी घे जरासे भक्त आता
हे तुला विकतील व्यापारी, विठोबा

शेवटी आलास ना गोत्यात तूही
माणसे असतात थापाडी, विठोबा

सोड गाभारा, अता घे वीट हाती
झोड जी झोडायची माथी, विठोबा

देहभर पाण्यात तरला जन्म देवा
तू खरा निष्णात नावाडी, विठोबा !

डॉ.सुनील अहिरराव

स्वरकाफियाहे ठिकाण

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

11 Jul 2014 - 11:45 am | कवितानागेश

सुंदर. :)

drsunilahirrao's picture

12 Jul 2014 - 3:15 pm | drsunilahirrao

धन्यवाद लीमाउजेट,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jul 2014 - 10:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सोड गाभारा, अता घे वीट हाती
झोड जी झोडायची माथी, विठोबा

देहभर पाण्यात तरला जन्म देवा
तू खरा निष्णात नावाडी, विठोबा !

खास...!!!

-दिलीप बिरुटे

अत्रुप्त आत्मा's picture

13 Jul 2014 - 7:35 am | अत्रुप्त आत्मा

*i-m_so_happy*

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, अतृप्त आत्मा
मनापासून आभार !

स्पा's picture

13 Jul 2014 - 9:34 am | स्पा

क्लासच

किसन शिंदे's picture

13 Jul 2014 - 10:05 am | किसन शिंदे

मस्तच

सूड's picture

15 Jul 2014 - 10:50 pm | सूड

मस्त!!

टीचभर ही भूक सांभाळी, विठोबा
जन्मभर होतीच आषाढी, विठोबा

सुरेख!

@सूड @यशोधरा मनापासून आभार

डॉ.सुनील अहिरराव साहेब, फार सुंदर कविता.

धन्या's picture

17 Jul 2014 - 5:56 pm | धन्या

सुंदर कविता. आवडली.

पद्मश्री चित्रे's picture

17 Jul 2014 - 6:45 pm | पद्मश्री चित्रे

आवडली कविता

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Jul 2014 - 7:05 pm | राजेंद्र मेहेंदळे

आवडली कविता

देहभर पाण्यात तरला जन्म देवा
तू खरा निष्णात नावाडी, विठोबा !

व्वाह! क्या बात कही!

शैलेन्द्र's picture

21 Jul 2014 - 3:27 pm | शैलेन्द्र

मोजली कोणी अशी ही पापपुण्ये
चांगला तू आण मापारी, विठोबा

मस्तं

आवडली..

@निश, धन्या, पद्मश्री चित्रे राजेंद्र मेहेंदळे, अपर्णा अक्षय, शैलेंद्र
धन्यवाद मित्रहो,